Skip to main content

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 30/05/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6771
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

आत्तापर्यंत फक्त १०१ जणांनीच सध्या रहण्याची ठिकाणं सांगितलीत.
बाकी मेंबरं कुठे कुठे रहातात ते पण कळूदे की !


पक्का पुणेकर... कसबा सदाशिव आणि कोथरूड...
सध्या लंडन जवळ ... पुण्याला जाण्याची वाट पाहणारा...

मैत्र..


मूळची ठाणेकर
सध्या पुणेकर व्हाया कोकण,सोलापूर्,ठाण्याचा ग्रामीण भाग.


तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद..............

धन्यवाद,
अमितकुमार


अस्मादिकांचे मूळ गाव मोखाडा (जि. ठाणे). पुढे शिक्षण आणि करीयर नाशिकमध्ये. पण आता करीयरसाठीच होळकरांच्या इंदुरमध्ये (मप्र) वास्तव्य.


म्हणजे मुळचो कोकणातलो
नंतर मुंबईत दिवस काढले
आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत
क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम
"कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय.
सामंत


:D पंधरा देशाचे पाणी व....?? पिलेला, सध्या देंहिक वास्त्यव्य -वॉशिंग्टन डि.सी. जवळ मेरीलॅन्डला आहे. :D


In reply to by स्वप्निल..

मला तर स्वप्नातही भुक लागते....


[( सध्या स्कॉटलंड मधे आहे
परतीचे वेध लगलेले आहेत.......................... [(
मी संदीप,एक वाचक


नमस्कार,
आम्ही इथलेच म्हणजे " श्रीस्थानक " ( ठाणे )

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.


मागिल ५० पिड्या पुण्यात (नारायण पेठ ;) )माझ्यासकट , पुधील पिध्यांचे माहित नाहि...

जिथे कमी तिथे आम्ही ..:)


नायजेरिया-त मराठी बाणा जिवंत ठेवणार्‍या अनेक शिलेदारांपैकी एक!

- ९६-मराठा!


मी मुळचा त्र्यंबकेश्वरचा..सध्या मुंबईत
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)


खूप प्रतीसाद आले आहेत. पण ग्राफ अद्यवत केला आहे असे वाटत नाही. कृपया तो करावा.


मूळ : नागपूर
नन्तर : पुणे (तिथे काय उणे )
सध्या : मिलवॉकी (उ. अमेरिका)


नगर, नाशिक, पुणेकर

सध्या - लॉस एंजेल्स, पुढच्या महिन्यापासुनचा मुककाम परत वॉशिंग्टन डी. सी.


मी लवकरच ऍटलांटाजवळ अल्फारेटा इथे जाणार आहे. तिथे कोणी मिसळपाववाला आहे का ?


मुळ मुम्बै.... पन गेल्या वर्षभरापासुन आमेरिका (मार्ल्बोरो) इथे....


मुक्तसंगः अनहंवादि
हल्ली मुक्काम - मुंबई परिसर (डोंबिवली) बाकी रशियास व त्या बाजूस जाणे येणे आहेच.


मुळः अ़कोला
सध्या: Amsterdam, The Netherlands(युरोप), क्षमस्व!! पण मराठी मधे लिहिता आले नाही.
:S

---किट्टु


कृष्ण मथुरेचा!
पण मी पूण्याचा!


यशोदेचा घनश्याम


मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही ..
मी मुंबैकर!
--णे तेथे काय उणे?


मुळची "ठाणेकर" पण सध्या वास्तव्य कुवैत.
इथे कट्टा असला तरी उपयोग नाहि.
"अनामिका"
अनुदिनी-
https://maharashtradharma.mywebdunia.com/
https://manalig.blogspot.com/


मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे
या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं