मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

अमोल केळकर · · कौल

वाचने 6392 वाचनखूण प्रतिक्रिया 156

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 12:24
या वर्गी करणाचा उपयोग कदाचीत मिपाचे मालक/ प्रशासक यांना पुढील कट्टा आयोजनास होईल. (मिपाकरांना भेटण्यास उत्सुक) केळकर

In reply to by अमोल केळकर

इसम Tue, 06/10/2008 - 22:46
मूळ नाशिक शहरातला, आत्ता नाशिक, महिन्यापूर्वी लंडन-अल्जीरिया (येवून जावून) आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा तिथेच. किती देशांच पाणी प्यायलोय याचा काही हिशोब राहिला नाही आता.

ऋचा Fri, 05/30/2008 - 12:36
सध्याचे वास्तव्य : पुणे मूळ : खालापूर(रायगड जिल्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जो दुसरा टोल नाका आहे तिथे ("खालापूर टोल नाका"))

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:36
ईस्ट कोस्ट अमेरिका.. पण २ महिन्यसाठी वास्तव्य भारतात.. पुणे, कोल्हापूर.. सांगली. इथे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन Fri, 05/30/2008 - 13:04
सहा महिन्यापस्न इंग्लंडात होतो. आता लवकरच पुन्हा भारतात येतोय,पुण्यात. आपलाच, मनोबा

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:22
आम्ही पुणे जिल्ह्याच्या वायव्यभागातले. सध्या पुणेकर. पण पुणेरी नाही. आपला, (पुणेकर) आजानुकर्ण

ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:48
मु. पो. पुणे.. अवांतरः बाकी पुणे व मुंबई असे दोन वेगळे पर्याय असते तरी चालले असते :) -- ध्रुव

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ध्रुव Mon, 06/02/2008 - 12:57
अहोइ ध्रुवीकरण नाही :) पण निर्विवादपन पुणे मुंबई जिंकणार हे उघडच आहे. म्हणून म्हणल की वेगवेगळे पर्याय असते तर अजून मजा आली असती. -- ध्रुव

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 15:16
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली २. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज ३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत) ४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

गमत्या Fri, 05/30/2008 - 15:46
मराठवाडा कसे मागे राहिल ? हे घ्या माझे पहिले मत..... सध्या पुण्यात असलो म्हणुन काय झाले. मुळचा मात्र मराठवाडयातलाच (औरंगाबादचा).

राजे Fri, 05/30/2008 - 15:48
दिल्ली प्रदेशी .. मराठीचा व मिपाचा झेंडा फक्त माझ्याच खाद्यांवर आहे हे मला माहीतच नव्हते.... स्वगतः राजे, जबाबदारी वाढली आहे.... झेंडा फडकवत ठेवण्याची व सेना वाढवण्याची कामगीरी तुमच्याच शिरावर आहे. ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आर्य Fri, 05/30/2008 - 16:29
आम्ही सांगलीचे आहोत पण बरीच वर्ष पुण्यात काढली (वाण नाही पण गुण लागला) सध्या बेगळूरु (दक्षिण भारत) आणि हो ! ऍडी भेटल्यावर गुण दाखवतो (हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर) आर्य

In reply to by अमोल केळकर

रविराज Sat, 05/31/2008 - 00:43
मी सुदधा एकेकाळचा विश्रामबागेतला पडिक. वालचंदला होतो. मूळचा सातारकर.

In reply to by आर्य

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 17:05
हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर :) डन बॉस. पुढचा कट्टा सात्विक नसणार आहे. न घाबरता ये तू :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नि३ Fri, 05/30/2008 - 16:58
तसा मुळचा विदर्भीयन (च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 17:06
मुळ मुंबईकर, नंतर मस्कतवासी, सध्या पुणे मुक्कामी. (मस्कत आणि मुंबईस येऊन-जाऊन).

चतुरंग Fri, 05/30/2008 - 19:04
सध्या विल्मिंग्टन (मॅसाच्यूसेट्स, अमेरिका). भारतात आल्यावर पुण्यातही वास्तव्य असते. (कायम आभासी वावर 'मिपा'वर! ;)) चतुरंग

मन Fri, 05/30/2008 - 19:27
बदलायची सोय आहे का? मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानित आलोय. पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.) आपलाच, मनोबा

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 23:58
अरे व्यंकट, तू अमेरिकेत आहेस ना? (येताना माझ्याकरता बाटली आणणार आहेस ना? मी पैसे देईन हो, परंतु ड्युटीफ्री मालाची मजाच वेगळी म्हणून सांगितलं! ;) मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! असो, कौलप्रस्तावक केळकर काय तो खुलासा करतीलच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:47
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! अगदी तसेच म्हणायचे आहे

In reply to by व्यंकट

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:45
कितीही वाटले बेळगाव महाराष्ट्राचे तरी सध्या कर्नाटकात ( बेळगाव , निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे )

मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 20:41
सह्याद्रिच्या कुशित रायगडाच्या पयथ्याशि ... लोणेरे (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग) आपला मयुर

मानस Fri, 05/30/2008 - 21:07
मूळ - मुंबई, शिवाजी पार्क, सध्या - वॉशिंग्टन डि.सी. जवळ, व्हर्जिनिया मानस

मीनल Sat, 05/31/2008 - 06:47
मी मुळची मुंबईची ५ वर्ष बीजिंग चीन मधे सध्या जॉर्जिया अमेरिकेत राहते. मीनल.

फटू Sat, 05/31/2008 - 08:05
मुळ गाव... मुक्काम वडगाव कोंड, पोष्ट गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:23
अरे वा! मिपावरदेखील शुगरलॉबी दिसते! पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे म्हणून म्हटलं! :) आणि त्याच्या खालोखाल अमेरीकन मंडळी! बापरे! काहीतरी तांत्रिक शक्कल लढवून मिपा केव्हा टेकओव्हर कळतील ते कळणारच नाही! :) आपला, (पश्चिम महाराष्ट्रप्रेमी शुगरलॉबी किंग) शरदतात्या पवार.

प्रशांतकवळे Sat, 05/31/2008 - 09:21
मु. पो. सासवने, ता. अलिबाग, जि. रायगड (ज्या गावात करमरकरांचे पुतळे आहेत, ते समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव) सध्या सौदी अरेबिया. प्रशांत

वरदा Sat, 05/31/2008 - 09:43
पण मनानं केव्हाच ठाण्यात पोचलेय्...आईच्या कुशीत..... :( अरे निम्मे लोक अमेरिकेत आहोत आपण एक टेलिकाँफरंस कट्टा भरवावा का? :-C

केशवराव Sat, 05/31/2008 - 15:25
कोकण - - - - - अलिबाग. समुद्र किनारी. नारळी - पोफळींच्या बागेत. [ या कधितरी]

गणपा Sat, 05/31/2008 - 15:47
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....) बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले. मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात. -गणपा

झकासराव Sat, 05/31/2008 - 16:43
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी. म्हणजेच शुगर लॉबी वाला. :) अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

राजेश Sun, 06/01/2008 - 08:27
इंदापूर, ता.माणगाव, जि.रायगड (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग)

कुंदन Sun, 06/01/2008 - 11:49
सध्या : इजिप्त भारतात असताना : डोंबिवली भविष्यात : दुबई / कुआला लांपुर / तेल अविव / साओ पाओलो - जिथे चांगली संधी मिळेल तिथे ...

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 20:31
तसा शुगर लॉबीच्या राजधानीचा....बारामतीचा :) हल्ली अठवड्याचे ५ दिवस मुंबईकर (भांडूप पुर्व) आणि विकांताला शनवार पेठ, पुणे-३० (म्हणजे फक्त पाठीवरची धोपटी टाकण्यापुरतं, बाकी रविवारी संध्याकाळपर्यंत आख्खं पुणं अखंडरित्या बोंबलत हिंडणे )

लिखाळ Mon, 06/02/2008 - 16:08
सध्या जर्मनी मूळचा पुणेकर (दिवसातला बराच काळ मिपावर :) ) --लिखाळ.

जयवी Wed, 06/04/2008 - 13:42
अय्या म्हणजे मी एकटीच का इकडची ;) मूळची नागपुरी .... काही काळ मुंबापुरी... मग सौदी अरेबियाची वारी..... आणि आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी :)

In reply to by प्रभाकर पेठकर

टारझन Sat, 08/16/2008 - 16:51
तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे. मुळचा खवाट पुणेरी.... भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय. अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

केशवसुमार Wed, 06/04/2008 - 14:21
जन्मगावः मिरज कायम वास्तव्यः पुणे तातपुरते वास्तव्यः डर्मशडाट- जर्मनी (१२ देश, १०० गावचे पाणी पिलेला)केशवसुमार

रम्या Wed, 06/04/2008 - 15:53
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं. रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं! (पक्का कोल्हापुरी) रम्या. परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 22:51
अगबाई आमचे नाशिककर कुणीच नाही की काय? माझे माहेर - वडनेर भैरव जि. नाशिक सासर- जुन्नर पुणे सध्याचे वास्तव्य --- आपली पुण्यनगरी ,पुणे.

In reply to by वरदा

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 23:57
अग वरदा मुळची नाशिकची असले तरी आता पुण्याची पेशवीनच म्हणायची नाही का? गंमत म्हणजे नवय्राचं नाव श्रीमंत . म्हणुन मी पेशवीन !

In reply to by श्रीमंतपेशवे

वरदा गुरुवार, 06/05/2008 - 00:36
मग पेशवीण म्हणायचं ना गं हे किती कन्फ्युजिंग आहे.....पेशवे का पेशवीण कळतच नाही ;) ह. घे. हे. सां. न. लगे

In reply to by श्रीमंतपेशवे

विजुभाऊ Sat, 06/14/2008 - 13:33
आम्च्याकडे दोन बैलं व्हती हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by श्रीमंतपेशवे

अमितकुमार Mon, 06/16/2008 - 20:00
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल.... धन्यवाद, अमितकुमार