✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गंध ओला..

प — प्राजु, Fri, 06/13/2008 - 13:22

प्रतिक्रिया द्या
7560 वाचन

💬 प्रतिसाद (29)
स
स्वाती राजेश Fri, 06/13/2008 - 13:34 नवीन

प्राजु,

पावसाचा पुरेपुर उपभोग घेतलेला दिसतो आहे..... आणि सोबत आता जोडीदार आला म्हटल्यावर तर कविता सुचेल नाहीतर काय होईल...(जगदीशभाउजी भारतात आले आहेत असे गृहीत धरून लिहीले.:)) मस्त कविता....खूप दिवसांनी लिहिली आहेस...:) वाट पाहात होतो तुझ्या कवितेची.....
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 13:42 नवीन

गंध ओला..

पावसाचा पुनःप्रत्यय तुझीया कवितेतुन कॉतुकाचे बोल आले आपसुक धावुन सुंदर >>अप्रतिम काळा पहाड
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 14:20 नवीन

प्राजु

सुंदर आहे काव्य ! विशेषतः ह्या ओळी : (छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) मस्तच..... उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/13/2008 - 15:26 नवीन

पावसाचे

पावसाचे उत्तम भावभरे वर्णन. वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट पुढचा वैशाख एक वर्ष दूर आहे. सर्व मिपाकरांना हा पावसाळा अशाच आणखी कवितांनी नादधुंद करो हीच सदीच्छा.
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 06/13/2008 - 15:55 नवीन

सुंदर

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट एकदम मस्त.... निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा सही.... आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा हे ही सुंदर दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड यातं मला नक्की नाही सांगता येतं पण काही तरी बिघडलयं (बहुतेक नाद / यमक)? :? अजुन येउ देत ओलावलेला चेतन
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 06/13/2008 - 16:36 नवीन

वा......

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... मस्तच..
  • Log in or register to post comments
र
रामराजे Fri, 06/13/2008 - 16:54 नवीन

अहाहा!

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... बढिया है! कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे!
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/13/2008 - 16:58 नवीन

छान

सर्वच काव्य रचना मस्त कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 06/13/2008 - 17:29 नवीन

सगळीच कविता

सुंदर आहेगं प्राजु...अशा वेगळ्या ओळी नाही काढता येणार.. भारतवारी एकदम सुंदर चाल्लेली दिसतेय्...बाकी स्वाती म्हणते तेच....
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/13/2008 - 23:06 नवीन

सहमत !! खूप

सहमत !! खूप आवडली कविता ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
ब
बेसनलाडू Fri, 06/13/2008 - 23:12 नवीन

मोरपीस

आंतरजालीय स्नेही चित्तर यांनी एके ठिकाणी दिलेला एक प्रतिसाद येथे जसाच्या तसा उधृत करावयाचा मोह आवरत नाही - कविता वाचून गालावरून मोरपीस फिरवल्यागत झाले :) निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी हे विशेष आवडले. फारच रोम्यान्टिक हो ;) केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 06/13/2008 - 23:22 नवीन

छान

छान कविता. भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस... हे आवडले. >>केसातून गारा वाहणे मात्र जरा खटाकलेच. गारा ऐवजी दुसरे काही वाहू शकले असते काय,याचा विचार करतो आहे. - अहो पण बेसनलाडू , त्या नुसत्या गारा नाहीयेत...वितळल्या शुभ्र गारा असा उल्लेख आहे. म्हणजे गारा वितळून त्यांचे पाणीच वहात आहे. त्यामुळे तसे काही त्यात खटकण्यासारखे नाही.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 06/14/2008 - 00:10 नवीन

गारा+वितळणे

वितळल्यावर त्या गारा राहत नाहीत,असे वाटते;त्यामुळे खटकले.स्थायू अवस्थेत त्यांना गारा म्हणता येईल,पण द्रवावस्थेत गारा(?) पटले नाही (आणि मग खटकले) असो. (पदार्थवैज्ञानिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
झ
झंप्या Tue, 06/17/2008 - 09:24 नवीन

पदार्थ

पदार्थ वैज्ञानिक लाडवा, तू कविता वगैरे वाचायच्या भानगडीत कसा पडलास रे? घरचा अभ्यासः 'जे न देखे रवी ते देखे कवी' मधले पदार्थ विज्ञान शोधून दाखव पाहू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मुक्तसुनीत Fri, 06/13/2008 - 23:24 नवीन

कविता ..

कविता आवडली. पहिल्या दर्जाची रेखीव रचना. काही ठिकाणी छंदाचे बोट सुटले आहे ; पण एकूण परिणाम उत्तम साधला आहे. इंदिराबाईंच्या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/13/2008 - 23:38 नवीन

सुरेख!

एका सुंदर प्रणयकाव्याचा आनंद मिळाला! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 06/13/2008 - 23:50 नवीन

मस्त

प्राजु, कविता आवडली. मस्त
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 00:36 नवीन

धत तेरीकी...:)

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा धत तरीकी! इतकं सुंदर वातावरण असताना जळ्ळा तो संयम करायचा काय? अरे अश्या धुंद वातवरणात संयम नाही सोडायचा तर मग काय मजा? :) साला, संयमबिय्यम कसला आलाय? असे क्षण भरभरून जगायचे असतात! असो, प्राजू, जियो..! पाऊसकविता आवडली, छानच केली आहेस... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 06/14/2008 - 09:05 नवीन

धन्यवाद..

आपणा सर्वांचे मनापासून अभार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पद्माकर टिल्लु Mon, 06/16/2008 - 20:41 नवीन

उत्तम

उत्तम कविता !!!!खुप दिवसानी छान वाचायला मिळले. माझ्या अशाच जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला . छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??) क्या बात है!!!! पद्माकर
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Mon, 06/16/2008 - 21:00 नवीन

मस्तच जमुन गेलं..

लिहिणार्‍याने लिहीत जावे.. वाचणार्‍याने वाचत जावे... वाचणार्‍याने एक दिवस... लिहीणार्‍याचे पेनच घ्यावे... फारच सुंदर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माकर टिल्लु
प
प्राजु Mon, 06/16/2008 - 21:14 नवीन

धन्यवाद..

पद्माकर, शेकस्पिअर.. आपलेही मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 06/17/2008 - 09:02 नवीन

छान

आपली कविता सहज समजणारी आणि सुंदर आहे. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Tue, 06/17/2008 - 09:18 नवीन

सुंदर.

पाचवी ते सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्या सारखी कविता. मुलांना लहानपणापासुनच कवितेची गोडी लावण्यासाठी खूप उपयोगी येईल. फरच छान!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/17/2008 - 17:10 नवीन

नक्की..

झंप्याशेठ, आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? ;) जरा सविस्तर लिहा.. बाकी माझी कविता समजायला सोपी आहे हे वाचून बरे वाटले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंप्या
व
विसोबा खेचर Tue, 06/17/2008 - 18:15 नवीन

जाऊ दे..

आपण माझी स्तुती केली आहे की, माझ्या बाल बुद्धीचे वाभाडे काढले आहेत?? जाऊ दे गं प्राजू! काही अतृप्त नमोगती आत्मे मिपावर भटकत असतात. तुझी इतकी सुंदर कविता त्यांना पचायला जरा जडच गेली. त्यामुळे मग तिला बालबुद्धीची वगैरे म्हणून हिणवण्यातच मग हे अतृप्त आत्मे सुख मानतात! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विवेक काजरेकर Tue, 06/17/2008 - 13:40 नवीन

मस्त !!!!

प्राजु छान लिहिलं आहेस. फक्त खालील ओळींचा अर्थ पाचवी-सहावीच्या मुलांना समजावताना मास्तरांची काय तारांबळ उडेल याची कल्पना करुन स्वत:शीच हसतोय मी =)) (ज्याचे गाल आहेत त्याचेच ओठ आहेत असं काहीतरी सांगून वेळ मारुन न्यावी लागेल मास्तरांना) थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा इतक्या रोमॅंटिक कविता जर पाचवी सहावीला शिकवणार असतील तर आपली तयारी आहे परत त्या वर्गात जाऊन बसण्याची :P
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 05/02/2010 - 19:23 नवीन

सुंदर

सुंदर कविता! पण या ओळी सगळ्यात जास्त आवडल्यात - निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा राघव
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 05/03/2010 - 00:36 नवीन

निसर्ग

मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा