रानातल्या पाखरांची रूणझुण किलबील
वारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ
वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट
दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड
दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड
निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा
थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी
आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा
(छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी
विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??)
भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...
- प्राजु
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7586
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राजु,
गंध ओला..
प्राजु
पावसाचे
सुंदर
वा......
अहाहा!
छान
सगळीच कविता
सहमत !! खूप
In reply to सगळीच कविता by वरदा
मोरपीस
छान
गारा+वितळणे
In reply to छान by पक्या
पदार्थ
In reply to गारा+वितळणे by बेसनलाडू
कविता ..
सुरेख!
मस्त
धत तेरीकी...:)
धन्यवाद..
उत्तम
मस्तच जमुन गेलं..
In reply to उत्तम by पद्माकर टिल्लु
धन्यवाद..
छान
सुंदर.
नक्की..
In reply to सुंदर. by झंप्या
जाऊ दे..
In reply to नक्की.. by प्राजु
मस्त !!!!
सुंदर
निसर्ग