✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ग्रो अप बेब्ज..!!

ग
गवि यांनी
Wed, 02/16/2011 - 17:10  ·  लेख
लेख
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो.. तर .. वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं. युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ.. मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार. तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे. ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत. बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही. दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना? खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच. मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ? मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही. ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच. पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत? अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं." तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही? त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही? साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार". रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल. काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का? आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का? निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का? विचार..विचार.. किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे.. ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64169 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

डीवाय?

आजानुकर्ण
गुरुवार, 02/17/2011 - 13:56 नवीन
डीवायचा कँपस म्हणजे पिंपरीचा की आकुर्डीचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस

टारझन
गुरुवार, 02/17/2011 - 14:00 नवीन
आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस मधे तर एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे असायचा .. :) एकंदरीत आपला एरियाही एक आहे , आणि क्राऊड सुद्धा एकाच प्रकारचे आहे :) शिवाय लोकं सुद्धा एकाच प्रकारच्या माणसिकतेतली असल्याने डिवाय पिंपरी काय किंवा आकुर्डी काय , पोरी त्याच आणि त्यांचे ते ही तेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे

सुहास..
गुरुवार, 02/17/2011 - 14:06 नवीन
एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे असायचा . >>> अच्छा !! अच्छा ...म्हणुन ते टिकल्या, वेण्या आणि जीन्स चे नॉलेज वाढले का ? ..खव त सांग रे ! असो ..धागा हा प्रतिसाद लिहुन ऊघडायचे बंद करीत आहे ..डोकं दुखायला लागल च्यायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पण टार्झणराव.... ब्रिटीश

वपाडाव
गुरुवार, 02/17/2011 - 14:13 नवीन
पण टार्झणराव.... ब्रिटीश लायब्ररीसमोर पार्क केलेल्या गाडीवर पायघडी घालुन डोळे सैरभैर फिरविण्यात जी मजा आहे ती काही औरच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शाळेवर टीका?

आजानुकर्ण
गुरुवार, 02/17/2011 - 13:40 नवीन
शाळेवरच टीका. मुलीवर का बरे करीन? का वाटलं तुम्हाला तसं ? तिथे त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच.. शाळा हीच या बाबतीत दोषी.
माझ्या मर्यादित अनुभवानुसार जेव्हा शाळा एखादा नियम करत असे तेव्हा तो बहुसंख्य विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सोयीचा असावा असा करत असे. मुलामुलींमध्ये भेदभाव वाढीस लागू नये, शिस्तपालनाची सवय लागावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी सुटसुटीत, कंफर्टेबल, एकसारखा दिसणारा गणवेश हा एक उपाय असावा असे वाटते. (मुलांना पोषक आहार मिळावा व वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुलामुलींच्या खाण्यापिण्याच्या सवयींतून भेदभाव अधोरेखित होऊ नये यासाठी याच धर्तीचा दुसरा त्वरित आठवणारा उपाय म्हणजे मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी असा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णयही काही प्रतिगामी शाळा घेतात.) सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या मला वाटते त्यानुसार 20-25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे केवळ सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींच्या सोयीचा विचार करण्यापेक्षा चालतही येणाऱ्या मुलींचा विचार करून शाळेने कदाचित गणवेशनिश्चिती केली असावी. पिनोफॉल हा काय प्रकार आहे हे मला माहीत नसल्याने तो नेमका कसा अडचणीचा ठरतो याची पुरेशी कल्पना नाही. मात्र काही शाळांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही मुलामुलींना वेगळ्या स्वरुपाचे गणवेश (रंग मूळ गणवेशाशी मिळताजुळता असला तर) वापरण्याची परवानगी दिली जाते. (आमच्या शाळेत काही मुलींना साड्या घालण्याची तर काही मुलांना फुल प्यांट घालण्याची परवानगी मिळाली होती असे आठवते. आम्ही हाफ चड्डीतच होतो त्यामुळे सर्व प्रकारच्या हाफ चड्ड्यांविषयी तीव्र तिरस्कार निर्माण झाला आहे.) त्यामुळे शाळेला सरसकट दोष देण्यापेक्षा अशा उपाययोजनांचा लाभ घेतल्यास उत्तम असे सुचवावेसे वाटते.
त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच..
मुळात अनेक मुलेमुली (माझ्या अनुभवानुसार) स्वखुषीने शाळेत जाण्यासच तयार नसतात. याबाबतीतही सरसकटपणे शाळांना दोषी ठरवून काही साध्य होणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टाय वगळून हा साधारण असा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/17/2011 - 22:36 नवीन
टाय वगळून हा साधारण असा आमच्या शाळेचा गणवेश होता Image removed. आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुली (प्रमाण आठवत नाही) अगदी पाचवीपासून सायकलने यायच्या. रस्त्याने जाताना इतर शाळांमधल्याही अनेक मुली सायकलने शाळेत जाताना दिसायच्या. पाचवीतल्या मुलींनी साडी नेसून सायकल चालवत शाळेत जावं अशी काही तुमची सूचना आहे का? (बहुदा नसावी.) >>... मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी ... << याबाबतीत आमची शाळा बरीच चांगली होती असं आठवतं. सक्ती अशी नव्हती, आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डबा शेअर करून खाण्याची चांगली सवय लागली होती. त्यामुळे बरेच वेगवेगळे प्रकार चाखले जायचे आणि त्याची घरी जाहिरातही व्हायची. शिवाय रोज वेगवेगळ्या भाज्याही पोटात जायच्या. मुलींना टिकली, बांगड्याची सक्ती होती हे आठवलं, नशीब लाल रिबीनी नाही लावायला सांगायचे, इतर बर्‍याच शाळांसारखे!! @पक्या: तुमच्या बहिणीकडे असेल. माझ्याकडे एके काळी, एका वेळेस असे दोन-दोन ड्रेस असायचे. आमच्या मराठी शाळेत त्याला पिनोफॉलच म्हणायचे. मी इंग्लिशमधे त्याला pinofor म्हणेन पण मराठीत तो पिनोफॉलच. बाकी कर्णा, तुझा पहिला प्रश्नः अशा मुली मला इथेच होस्टेल, हापिसाच्या आसपास रोज दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

>>:आमच्या मराठी शाळेत त्याला

पक्या
गुरुवार, 02/17/2011 - 22:47 नवीन
>>:आमच्या मराठी शाळेत त्याला पिनोफॉलच म्हणायचे. मी इंग्लिशमधे त्याला pinofor म्हणेन पण मराठीत तो पिनोफॉलच. बहुतेक शब्द नीट माहित नसल्याने झालेला अपभ्रंश असावा तो. मराठीत पिनोफॉल असा शब्द नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पिन्हफोर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/18/2011 - 01:17 नवीन
आमच्या मराठीत तो शब्द पिनोफॉल असाच आहे. तुम्ही हवं तर तुमच्या मराठीत पिनोफोर म्हणा नाहीतर पिनोफॉर. इंग्लिशमधे हा शब्द पिनोफॉरही नाही, pinafore (उच्चारी पिन्हफॉर) असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

पिनोफॉल नाही , पिनोफोर

पक्या
गुरुवार, 02/17/2011 - 21:54 नवीन
पिनोफॉल नाही , पिनोफोर म्हणतात त्याला. माझ्या बहीणीकडे होता तसा ड्रेस म्हणून नाव व्यवस्थित माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो..

मस्त कलंदर
गुरुवार, 02/17/2011 - 22:52 नवीन
आणि तो असा मुलीने घातलेल्या ड्रेससारखा दिसतो...Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

ते संस्कृतीरक्षकांच्या आणि

सुहास..
गुरुवार, 02/17/2011 - 09:10 नवीन
ते संस्कृतीरक्षकांच्या आणि टवाळांच्या नजरेला हीन वाटतं त्याचा परिणाम ते कपडे घालणाऱ्या मुलींच्या मानसिक कंफर्टवरही होतो. >>> एन्ड व्हाट डझ दिस मिन्स ..संस्कृती -रक्ष़क आणि टवाळ , याच एक अर्थ संस्कृती -रक्ष़क = टवाळ असा ही निघु शकतो..तसे असेल तर मी म्हणेन ' संस्कृती -रक्ष़क ' असण्याला नेमका कशाबाबत विरोध आहे . जर आपण आपली जपली तर हरकत काय आहे ? उगाच पाश्चात अंधानुकरण करण्यात काय हशील ..आधी ट्रेन्ड , फॅशन आणि यंगस्टर्स ची मानसिकता याचा एक ठराविक साचा नाही हे लक्षात घ्यायला हवे. आणि नसेल तर ..जन्मदिन मुबारक हो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बलात्कार हा शब्द न वापरता

मृत्युन्जय
गुरुवार, 02/17/2011 - 11:04 नवीन
बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. मला नाही वाटत गविंना तसं काही म्हणायचं आहे. हे घरात चोरी होण्यासारखं आहे. घराला कुलुप लावुन तुम्ही बाहेर पडलात तर घरात चोरी होण्याची शक्यता कमी असते. दार सताड उघडे ठेवुन बाहेर गेलात तर चोरीची शक्यता वाढते. मी दार बंद केले काय किंवा उघडे ठेवले काय, त्यामुळे चोराला माझ्या घरात चोरी करण्याचा काहीच हक्क नाही. पण दार सताड उघडे ठेवुन मी बाहेर पडलो तर मुळात गुन्हेगारी वृत्ती असणार्‍या लोकांसाठी मी मार्ग अजुन सुकर करुन ठेवतो किंवा त्यांना चोरी करण्यासाठी उद्युक्त करतो असे मला तरी वाटते. चोरी करणारा मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असतो. माझ्या घरात चोरी होउ नये असे जर मला वाटत असेल तर काळजी मलाच घ्यायला हवी ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हे ठीकच...पण स्त्रीकडे

शिल्पा ब
गुरुवार, 02/17/2011 - 11:07 नवीन
हे ठीकच...पण स्त्रीकडे शारीरिक शक्ती कमी असल्याने प्रतिकार करणे अवघड अथवा अशक्य होते आणि केवळ याच कारणाने आपल्या आवडीनिवडीला मुरड घालावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

असहाय्य माणसाला नेहेमीच

मृत्युन्जय
गुरुवार, 02/17/2011 - 11:20 नवीन
असहाय्य माणसाला नेहेमीच तडजोडी कराव्या लागतात. तडजोड करावी की नको त्या प्रकाराला तोड द्यावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तुम्ही दुर्बळ आहात म्हणुन कोणालाही तुमच्यावर अन्याय करायचा अधिकार नाही. अन्याय झालाच तर न्याय मिळणे हा तुमचा अधिकारच आहे. त्यासाठी समाजाने, न्यायव्यस्थेने योग्य ती मदत करणे हा देखील तुमचा अधिकार आहे. दुर्बळावर अन्याय करणारा निंदेस पात्र तर आहेच आहे. मुद्दा हा आहे की अन्याय करणारा तर गुन्हेगारी वृत्तीचाच असतो. तुम्ही जर त्याच्यापासुन स्वतःचे संरक्षण करु शकत नसाल तर किमान त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती उफाळुन येइल असे काही न करणे तुमच्या हातात आहे. चुक कोणाची हा मुद्दा अलाहिदा. समजा चुक गुन्हेगाराचीच आहे. पण नंतर काही झाले तर नुकसान कोणाचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

>>मुद्दा हा आहे की अन्याय

विलासराव
Wed, 02/23/2011 - 10:11 नवीन
>>मुद्दा हा आहे की अन्याय करणारा तर गुन्हेगारी वृत्तीचाच असतो. तुम्ही जर त्याच्यापासुन स्वतःचे संरक्षण करु शकत नसाल तर किमान त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती उफाळुन येइल असे काही न करणे तुमच्या हातात आहे. चुक कोणाची हा मुद्दा अलाहिदा. समजा चुक गुन्हेगाराचीच आहे. पण नंतर काही झाले तर नुकसान कोणाचे आहे? सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

थोड अजुन आत जाउ या!

सहज
गुरुवार, 02/17/2011 - 08:37 नवीन
आंतरजालाच्या सुरवातीच्या काळात टाईम्स, रेडिफ तुलनेत सोज्वळ होते आता पहील्या पानापासुन भरपूर आकर्षक चित्र व दुवे येउ लागले आहेत. सुरवातीला मआंजावर माफक सूचक लेख येत होते आता बरेच अनावृत्त लेखन येउ लागले आहे. शेवटी ती म्हण ऐकली असेलच काहीतरी ऑलवेज सेल्स! ह्या लेखाचा मुद्दा काय आहे हे ज्याची त्याची जाण यावर ठरणार. नेहमीप्रमाणे संस्कृती, व्यक्तिस्वातंत्र, स्त्री‍ पुरुष भेद होणार व प्रतिसादात शेवटी जो जे वांछील तो ते लाहो असा सूर नेहमीप्रमाणे येणार. बाकी आदिवासी लोक काय वस्त्र घालतात म्हणे.. असो ते जाउ द्या. आयपीएल मधे कुठल्या चीयरलिडर असाव्या त्यांच्या निवडीची स्पर्धा घेउया, त्याचे ड्रेस कुठले असावे याचेही रिअ‍ॅलिटी शो करुया. तुमचे चालू द्या. तुम्ही कंझ्युम करा. आळशांचे राजे अहो तुमच्या प्रांतांना सांगा आपण कुण्या सुन्द्रीला घेउन रिअ‍ॅलिटी शो काढुया, कुण्या परिस्थितीने नाडलेल्या रौशनी, शबनम ला घेउन शो बनवुया, लोकांना व्होट करायला लावूया, शेकडो चॅनेलवर शेकडो सुन्द्री, शबनम येतील, बाकीच्या वॉनाबी रिअ‍ॅलिटी स्टार अनुकरण करतील. कोण नक्षलवाद जॉईन करेल? इथे मस्त पैसा आहे. लोक कशाला बाहेर जाउन दंगा करतील, आपल्या आवडत्या पावनखिंडीत विहार करतील. घ्या घ्या ऑम्लेट. (भांडवलशहा हिंदूराव) सहज
  • Log in or register to post comments

जबरी

गुंडोपंत
गुरुवार, 02/17/2011 - 09:56 नवीन
आळशांचे राजे अहो तुमच्या प्रांतांना सांगा आपण कुण्या सुन्द्रीला घेउन रिअ‍ॅलिटी शो काढुया, कुण्या परिस्थितीने नाडलेल्या रौशनी, शबनम ला घेउन शो बनवुया, लोकांना व्होट करायला लावूया, शेकडो चॅनेलवर शेकडो सुन्द्री, शबनम येतील, बाकीच्या वॉनाबी रिअ‍ॅलिटी स्टार अनुकरण करतील. कोण नक्षलवाद जॉईन करेल? इथे मस्त पैसा आहे. लोक कशाला बाहेर जाउन दंगा करतील, आपल्या आवडत्या पावनखिंडीत विहार करतील. घ्या घ्या ऑम्लेट. अनेकांना लेख लिहावे लागले तेथे सहजरावांनी फक्त ५ ओळींत जबरी लेखन केले आहे! खरे सांगायचे तर वास्तवाच्या या फरकानेच नवीन फ्याशनी मला कशातरी ओंगळवाण्या वाटू लागतात! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बेंबीवर संपलेला शर्ट:- हा

अवलिया
गुरुवार, 02/17/2011 - 08:47 नवीन
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही. किंवा इथे काहीतरी पहाण्यालायक आहे हे मागुन येणार्‍या लोकांना सुचित करण्यासाठी ते हातवारे असतील का असा विचार करत आहे. :)
  • Log in or register to post comments

आता !

सुहास..
गुरुवार, 02/17/2011 - 09:02 नवीन
इथे काहीतरी पहाण्यालायक आहे हे मागुन येणार्‍या लोकांना सुचित करण्यासाठी ते हातवारे असतील का असा विचार करत आहे. >>> +१ रे नाना , मी बर्‍याच मुली अश्या पण पाहिल्यात ज्या तिने घातल आहे म्हणुन मी ही घालते. (काय करणार मी पाहिलेल्या त्या दोघींची आवड एकच होती. असेही कॉलेजात हल्ली मुलं कमी आनि मुली जास्त आहेत, दरवेळी दहावी-बारावी चा निकाल बघुन घ्यावा ..असो..)..हा किस्सा तर माझ्या समोरचाच आहे..अर्थात माझ्या एकाच्या अनुभवावर असे लिहीणे म्हणजे काही अंतिम सत्य नाही...पण शोभा डे वगैरै ची पुस्तके वाचुन ' आय वेयर ईट अ‍ॅज आय एम कन्फर्टेबल ' म्हटल्यावर ..' बुल**' असेच म्हणावेसे वाटते... जाता जाता : प्रल्हाद शिंदेच्या एका गाणे आठवले..बोल ..कस तरी दिसं , अग निट तरी नेस, हे नवं-नवं लुगड .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अजून माहिती!

कवितानागेश
गुरुवार, 02/17/2011 - 09:04 नवीन
साडी नेसल्यावर सुद्धा पाठीचा कमरेचा बराचसा भाग दिसतो, फक्त पायजम्यांमूळे (=जीन्स, ३/४, इतर प्यांटी)नाही. साडीदेखिल बेंबीखाली नेसता येते. नौवारी साडीत पाय दिसतात. अनेक पंजाबी ड्रेस वक्षखिंड दाखवू शकतात, गळ्याशी ओढ्णी घेतली की. ...त्यामूळे ड्रेस कोड हा प्रकार निरर्थक ठरतो. नक्की कुठेल कपडे चांगले हे असे कुणालाच ठरवता येणार नाही. कपडे घालणार्‍या आणि त्यांच्याकडे बघणार्‍या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणूक अवलंबून आहे. कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील, तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्‍या भोवतालच्या समाजात आहे.
  • Log in or register to post comments

त्यांच्याकडे बघणार्‍या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणू

गुंडोपंत
गुरुवार, 02/17/2011 - 10:00 नवीन
कपडे घालणार्‍या आणि त्यांच्याकडे बघणार्‍या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणूक अवलंबून आहे. याच्याशी सहमत आहे! कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील, तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्‍या भोवतालच्या समाजात आहे. याच्याशी सहमत नाही! उघडे टाकणे म्हणजेच सुंदर हा समज फार जुना म्हणजे मानवाला कपडे सापडल्या पासूनचा आहे. आणि तसे नेमकेपणाने आब राखत करता, येणे ही मोठी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नऊवारी

पैसा
गुरुवार, 02/17/2011 - 21:55 नवीन
एका कॉलेजमधे जाणार्‍या मुलीने "नऊवारीइतका रिव्हीलिंग ड्रेस कोणताच नाही" असं त्यांच्या 'ट्रॅडिशनल डे' ला सांगून मला विचार करायला प्रवृत्त केलं होतं! ;) खरंच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे

सुहास..
गुरुवार, 02/17/2011 - 09:13 नवीन
कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील, तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्‍या भोवतालच्या समाजात आहे. >>> काही अंशी सहमत !! एकुण काही कल, सुंदर दिसण्यापेक्षा 'हॉट' दिसणे, हे नवशहरीकरणातील यंगस्टर्स च ब्रीद-वाक्य असे माझे मत ..
  • Log in or register to post comments

उत्तम चर्चा ...

छोटा डॉन
गुरुवार, 02/17/2011 - 09:48 नवीन
उत्तम चर्चा चालु आहे. बरीच मते गंमतशीर आहेत, काही खरोखर पटतील अशी आहेत ... बाकी (कपड्याच्या बाबतीत ) ज्याला जे आवडतं ते करण्याचा हक्क त्याला द्यावा असे वाटते. मात्र नंतर तक्रार वगैरे झाल्यास सर्व जबाबदारी ते कपडे परिधान करणार्‍या व्यक्तीची असावी. ह्यावरुन पराशेठ यांनी फेमस केलेली "एक तर खिडकीत उभा राहु नये, उभे राहणार असालच तर कुणी शुक शुक केले तर बोंबा मारु नये" ही म्हण आठवली ;) बाकी 'थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' हा भारताचा राष्ट्रीय पोषाख म्हणुन घोषीत करावा अशी मागणी करतो ;) - ('थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' प्रेमी ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

अरे

गुंडोपंत
गुरुवार, 02/17/2011 - 10:01 नवीन
अरे म्हणजे कोपरी नि माझी चड्डीच की! वा वा! पूर्ण पाठिंबा आहे माझा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अजाबात चालणार नाही

नितिन थत्ते
गुरुवार, 02/17/2011 - 10:20 नवीन
>>बाकी 'थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' हा भारताचा राष्ट्रीय पोषाख म्हणुन घोषीत करावा अशी मागणी करतो हा हा हा.... हे मात्र मान्य नाही. उद्या कपाळावर येणार्‍या बटा ही पुरुषांची राष्ट्रीय वेशभूषा घोषित कराल. मग आम्ही काय देशद्रोही का? . . . . (भावी टकलू)
  • Log in or register to post comments

उद्या कपाळावर येणार्‍या बटा

विजुभाऊ
गुरुवार, 02/17/2011 - 11:13 नवीन
उद्या कपाळावर येणार्‍या बटा ही पुरुषांची राष्ट्रीय वेशभूषा घोषित कराल. मग आम्ही काय देशद्रोही का? मी तर आत्ताच बगावतीचे झेन्डे खान्द्यावर घेतलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वा वा वा वा

आजानुकर्ण
गुरुवार, 02/17/2011 - 10:23 नवीन
मस्त चालू आहे चर्चा. चालू द्या
  • Log in or register to post comments

गवि, तुमचे बरेच मुद्दे

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 10:41 नवीन
गवि, तुमचे बरेच मुद्दे मान्य पण जर ह्या मुलि कम्फरटेबल असतील ह्या कपड्यात तर तुमचा काही मह्ण्नं नाहीये . बाकि का हो ड्युड्स ना का माफ केलेय ह्या लेखातुन जे लो वेस्ट घालुन रस्त्यावर तर जाउ द्या जीम ला पण प्रदर्शन करत्तात. म्हन्जे आजकाल मुले पण झिपरे वाढवने *** दाखवणे असले प्रकार करतात.तुम्हाला ड्युड्स ग्रो व्हावे असे वाटत नाही का? का अ‍ॅज युज्वल पुरुषां ना सगळे माफ ;) जसं कि रुल्स बनवणार्‍यांसाठी रुल्स नसतात च ;) तुमचा त्रिवार निषेध!!! निषेध!!! निषेध!!!
  • Log in or register to post comments

आहो काकु ... लेख काय ...

टारझन
गुरुवार, 02/17/2011 - 10:45 नवीन
आहो काकु ... लेख काय ... तुमचा प्रतिसाद काय ? तुम्ही हल्ली "णिणाद सद्ध्या मुक्काम पोष्ट पर्भणी" चं लेखण जास्त वाचता काय ? :) कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

२दा आलाय

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 10:44 नवीन
२दा आलाय
  • Log in or register to post comments

त्यावर तुम्ही लिहा..

गवि
गुरुवार, 02/17/2011 - 10:45 नवीन
त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले तर खमंग होणार नाही.. :) शिवाय राजेश आणि आदितींना दिलेला प्रतिसाद वाचा.. :) धन्यु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 11:59 नवीन
त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले तर खमंग होणार नाही.. Smile
ह्या गोष्टी खमंग वाटत असल्या असत्या तर लिहिले असते.पण नाही वाटत त्यामुळे नाही लिहिनार. इथेच बोलु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्हाला ते खमंग वाटत नाही ?

टारझन
गुरुवार, 02/17/2011 - 12:03 नवीन
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? मग काय खमंग वाटते ? स्त्रीविषयक चर्चा ? :( :( :( केवढा मोठा लॉस आहे हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

तुम्हाला ते खमंग वाटत नाही ?

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 12:11 नवीन
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? मग काय खमंग वाटते ?
चर्चा खमंग वाटत नाही. बाकि काय खमंग वाटते ते मी तुला का सांगु?
स्त्रीविषयक चर्चा ?
मी स्त्रीविषयक बोल्लेच नाहीये.वाच वरचे प्रतिसाद.
Sad Sad Sad केवढा मोठा लॉस आहे हा !!
कोनाचा? कसा? कळले नाही. तुझा का? तु इन्टरेस्टेड आहेस का पुरुषांविषयी खमंग वाचण्यात. मग शोभा डे वाच.अजुन तुला काय काय माहित असेल ते वाच.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>> मग शोभा डे वाच << शोभा डे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/17/2011 - 12:16 नवीन
>> मग शोभा डे वाच << शोभा डे कोणी लिहीलं आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

चौकश्या

सुहास..
गुरुवार, 02/17/2011 - 12:18 नवीन
शोभा डे कोणी लिहीलं आहे? >>> तुला लई चौकश्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शोभा डे लेखिका कम मॉडेल आहे

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 12:24 नवीन
शोभा डे लेखिका कम मॉडेल आहे ती. माहिती असुनही विचारण्याचे कष्ट घेतल्यबद्दल धन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शोभा डे कोणी लिहीलं आहे? =))

टारझन
गुरुवार, 02/17/2011 - 12:34 नवीन
शोभा डे कोणी लिहीलं आहे?
=)) =)) =)) आगायाया =)) =)) =)) बाजार उठला =)) असो .. आम्ही फक्त "मन्ना डे " वाचतो बुवा. .. :) बाकी काकुंनी चिडु नये .. हलकेच घ्यावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

कुठे हे स्त्री विषयक चर्चा

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 10:55 नवीन
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
नीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

नीट वाच हा मुद्दे दोघांनाही

टारझन
गुरुवार, 02/17/2011 - 10:58 नवीन
नीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुन
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

आता हाच धागा सुरु आहे तर

मुलूखावेगळी
गुरुवार, 02/17/2011 - 11:07 नवीन
आता हाच धागा सुरु आहे तर ह्याच धाग्यावर का नको पण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

गविंच्या मताशी सहमत आहे.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/17/2011 - 10:57 नवीन
गविंच्या मताशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

पुणे तिथे काय उणे?

अभिज्ञ
गुरुवार, 02/17/2011 - 11:45 नवीन
बाकी चर्चा उत्तम. http://www.youtube.com/watch?v=cO1I2GwlgDM अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

ये .... शंभर !!!!!!! हभिनंदन

स्पा
गुरुवार, 02/17/2011 - 11:47 नवीन
ये .... शंभर !!!!!!! हभिनंदन गवि
  • Log in or register to post comments

मुद्दा मांडण्यासाठी मसाला

गणेशा
गुरुवार, 02/17/2011 - 14:02 नवीन
मुद्दा मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो.ते अधूनमधून हिरवट शब्द नसते तर तुमच्यासहित कोणी काय मुद्दा आहे तेही शेवटापर्यंत वाचले नसते.
अवांतर : गवि , तुमचे लिखान आवडले .. आवडते. हा लेख ही उत्तम झाला आहे.. जे बदलायचे आहे त्याचे वर्णन हे असेच मनावर ठसले पाहिजे .. जरे येथे मुद्धा कंफर्टपनाचा असला तरी हा लेख बर्याच अन्कंफर्ट मनाचा चलबिचलपणा पण दाखवतो आहे.. तरीही आपल्याच लेखामध्ये मुद्दे मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो हे म्हणने चुक आहे, अआणि तितकेच आपल्या प्रतिभेला कमी लेखने आहे. प्रत्येक कलाकृती हि तीच्या निर्मात्याला आनंद देवुन जाते.. आणि त्या कलाकृतीचा खुद्द त्या कलाकाराणेच आदर केला पाहिजे .. म्हणजे इतर ही ते करतीलच ... अतिअवांतर : अश्लिल कपडे घालताना ज्याचा त्याचा प्रश्न असे उद्दात धोरण अवलंबवताना.. एखाद्याने जर त्या पद्धतीने लेखन केले की तुम्ही प्रसिद्धीसाठी हे केले आहे असे वाटते असे म्हणताना काहीच कसे वाटत नाही .. एकिकडे ज्याचा त्याचा प्रश्न आणि दुसरीकडे माल मसाला का म्हणुन ते कळाले .. मत हे ठाम हवे ... भले ते चुकीचे का असेना - गणेशा
  • Log in or register to post comments

ज्यांना जे जे जशा फॅशन चे

पक्या
गुरुवार, 02/17/2011 - 22:12 नवीन
ज्यांना जे जे जशा फॅशन चे कपडे घालायचेत ते त्यांनी घालावेत. फक्त घालताना एक काळजी घ्यावी की ते व्यवस्थित दिसावेत..ओंगळवाणे दिसू नयेत...मग भले बिकीनी ही घालोत. फॅशन करताना त्या फॅशन ची व्यवस्थित माहिती करून ती करावी . लो वेस्ट जीन्स घालून बसायचे असेल तर कमरेला बेल्ट लावणे मस्ट आहे. म्हणजे बसलेल्या स्थितीत ती जिन्स मागून व्यवस्थित दिसते.( गवींच्या भाषेत -)वक्षखिंड दाखवणारा टॉप घालायचा असेल तर तो पुरेसा घट्ट हवा (बॉडी फिटींग). बाकी गविंना ज्या मुली त्यांच्या वेषभूषेत अनकंफर्टेबल वाटल्या त्या तशा नसतील ही. पायावर पाय घालून दोन अडीच तास बसणे हे पुरषांना जमत नसेल पण युवतींना तशी सवय असेल. नाहीतर ती मुलगी उठून उभी पण राहिली नसती का. अशा स्थितीत बसणेच मस्ट होते असे नक्कीच नसेल, मुले नाही का सारखे आपल्या केसांवरून हात फिरवत असतात तशाच मुली देखील कपडे वर खाली ओढत असतील.
  • Log in or register to post comments

खूप प्रतिसाद मिळालेला धागा

रेवती
गुरुवार, 02/17/2011 - 22:22 नवीन
खूप प्रतिसाद मिळालेला धागा पाहिला की 'हा विषय' मला का नाही सुचला असं दरवेळी वाटत राहतं.
  • Log in or register to post comments

ट्रेंड सेटर

मराठे
गुरुवार, 02/17/2011 - 22:45 नवीन
सवय नसल्यामुळे आज जे कपडे अन्कम्फर्टेबल वाटताहेत; काही दिवसांनी सवय झाली की त्यांना कंफर्टेबल वाटू लागतील. मग जशी जशी असे कपडे घालणार्‍या मुलींची संख्या वाढत जाईल तसे तसे लोकांनाही त्याचे वावडे उरणार नाही. तोवर नविन फ्याशन येईल. आणि हे चक्र चालू राहिल. तसं पाहिलं तर आज अन्कंफर्टेबल वाटत असूनही असे कपडे घालणार्‍या मुली म्हणजे एक प्रकारे 'ट्रेंड सेटर' च म्हणायला हव्या. राहिला प्रश्न त्या फ्याशन च्या समर्थनार्थ केलेला युक्तीवाद (कंफर्ट)... जो चूक असू शकतो (एखाद्या मुलीला/मुलाला वाटतही असेल कंफर्टेबल म्हणजे सगळ्यांनाच कंफर्टेबल असेल असं नाही).. त्याऐवजी 'वैयक्तिक आवड निवड' (ज्याचा त्याचा प्रश्न!) हा युक्तीवाद जास्त बरोबर वाटतो.
  • Log in or register to post comments

कुणाला वाटेल त्याने तसे कपडे

पिंगू
गुरुवार, 02/17/2011 - 23:22 नवीन
कुणाला वाटेल त्याने तसे कपडे घालावेत आणि त्यामुळे दुसरयांच्या पोटात जळजळ व्हायचं कारण नको. बाकी लेखातील मूळ मुद्द्यांशी सहमत.. - पिंगू
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा