Skip to main content

शिरढोणचा ढाण्या वाघ

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 17/02/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिशांविरुद्ध ज्या अनेक कर्तबगार स्त्रीपुरुषांनी रान पेटवले, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही अशा अनेक नरवीरांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहित नाही असा सच्चा देशभक्त विरळाच होय ! आज १७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडक्यांची पुण्यतिथी ! एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !! अधिक माहिती इथे वाचता येईल - http://www.saamana.com/2011/February/13/Link/Utsav7.htm निवेदन - आपणांस वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल काही ऐतिहासिक माहिती द्यायची असल्यास या धाग्यावर द्यावी, त्यांच्या कार्याचे एकविसाव्या शतकातील नजरेने मुल्यमापन करायचे असल्यास वेगळा धागा चालू करावा. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4703
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !!

झपाटून जाऊन क्लेशांची जराही पर्वा न करता जगात संचार करुन देशासाठी झगडलेल्या थोरांमधे सर्वात थरारक आणि खडतर लढा फडके यांचा होता.सलाम.

धन्यवाद नान्या. वासुदेव बळवंत फडके यांनी त्यावेळेला अक्कलकोटस्वामी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतांच्या भेटी घेतल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. वासुदेव बळवंत फडके थोर दत्तभक्तही होते. अशा परमभक्त, परमप्रतापी देशभक्ताचे कायम ऋणी राहू.

एका महान क्रांतीकारकाला आदरांजली!!
त्यांच्या कार्याचे एकविसाव्या शतकातील नजरेने मुल्यमापन करायचे असल्यास वेगळा धागा चालू करावा.
करियर, नोकरी, प्रमोशन, पैशांची चिंता करत तब्येत, व्यक्तीगत आणि कौटुंबिक आयुष्य, या सगळ्यांची हेळसांड करणारे ऐटीतले कामगार पाहिले की मला बर्‍याचदा वासुदेव बळवंत फडक्यांची आठवण येते.

एका महान क्रांतीकारकाला भावपुर्ण आदरांजली !! लढा देत असताना...... सासवडच्या अलीकडे, मल्हारगडावर वासुदेवांनी बरेच दिवस वास्तव्य केल्याचे ऐकिल आहे.......

आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद ! वसुदेव बलवंत फडके यांना मानाचा मुजरा

तुम्ही अशा थोर लोकांची आठवण करून देताय त्याबद्दल. जरी क्रमशः लिहिलं नसलं तरी ही लेखमालिका अशीच चालू राहू दे!

ब्रिटिश राजसत्तेविरूध्द "रान पेटविले" ही संज्ञा खर्‍या अर्थाने ज्यानी केली ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. इथे धाग्यावर उल्लेखिलेला 'सामना' तील लेख वाचला. फक्त एक छोटेसे कुतूहल आहे : एडन येथे त्यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे, याचाच अर्थ त्यांच्या देहावर अंत्यसंस्कारही तिथेच झाले असणार. पण त्याचे अवशेष त्या काळातील त्यांच्या नातेवाईकांनी वा सहकार्‍यांनी इकडे आणण्याचे काही प्रयत्न केले होते का? असो...सहज एक अधिकची माहिती या दृष्टिकोणातून पृच्छा. १९८४ मध्ये 'भारतीय क्रांतिवीर' या मालेत भारतीय पोस्ट खात्याने 'वासुदेव बळवंत फडके' यांचे तिकिट प्रकाशित केले होते...ते या निमित्ताने [विकीवरून साभार] इथे देत आहे (फर्स्ट डे कव्हरसहीत) : Photobucket शिरढोणच्या वाघास नम्र अभिवादन...! इन्द्रा