मुलीची आई
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे -
मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा
मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण
मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं आत्या व्हावं
मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई ||७||
तरी जाताजाता सांगावसं वाटतं
जग खूप छान आहे
आव्हानाना वाव आहे
पण डगमगू नको
कारण देवाची दैवाची साथ आहे, आणि पाठीवर सदैव मायेचा हात आहे ||८||
वाचने
3796
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुंदर कविता... :)
खुपच छान
सुरेख!
एक ओळ वाचली होती, माधवी देसाईंच्या मुलीच्या कवितेते. ' जन्म देण्या पेक्षा ही जास्त वेदना दायक असत मुलीच्या डोळ्यात दुसर्या बद्दल प्रेम पहाण'
त्या नंतर भिडलेली ही दुसरी कवीता.
सासुबाईंना नमस्कार सांग एका मुलीच्या आईचा!
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
खुप भरुन आले .....बापातल्या आई ला कधि एकदा संध्याकाळी घरी जाउन लेकिला कुशित घेतोय असे झालंय
सुंदर कविता!!
:)
मस्त !
भाबडी आणि निर्व्याज भावना !
छान भावपुर्ण कविता
कविता आवडली.
मस्त कविता.
डोळ्यात पाणी आलं.
शुची - छान कविता आणि आपण पुढाकार घेऊन सासूबाईंची कविता प्रकाशित केलीत.
अभिनंदन.मनापासून .
शुची
उर भरुन आला ....
छान. :)
डोळे पाणावले. :(
शुचे सुरेख ग !!!
मला माझिच आई आठवली :)
सुंदर कविता...