माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे -
मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा
मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण
मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं आत्या व्हावं
मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई ||७||
तरी जाताजाता सांगावसं वाटतं
जग खूप छान आहे
आव्हानाना वाव आहे
पण डगमगू नको
कारण देवाची दैवाची साथ आहे, आणि पाठीवर सदैव मायेचा हात आहे ||८||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3838
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता...
खुपच छान
सुरेख!
एक ओळ वाचली होती, माधवी
मुलीची जात नाही रहाणार
सुंदर!
मस्त !
छान.
छान भावपुर्ण कविता
छान
मस्त कविता. डोळ्यात पाणी आलं.
शुची - छान कविता आणि आपण
शुची उर भरुन आला ....
छान. डोळे पाणावले.
शुचे सुरेख ग !!! मला माझिच