Skip to main content

मुलीची आई

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 11/02/2011 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे - मुलगी जन्मली सगळे म्हणाले लक्ष्मी आली घरी खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१|| अंगणातल्या चिमण्या घरीदारी नाचतात तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२|| झगे परकरपोलके झाले साड्याचोळ्या ल्याल्या पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३|| शिकल्या सवरल्या स्वावलंबी झाल्या आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४|| आईचं काळीज धडधडू लागलं पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५|| मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| तेव्हा वाटलं आत्या व्हावं मावशी व्हावं भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई ||७|| तरी जाताजाता सांगावसं वाटतं जग खूप छान आहे आव्हानाना वाव आहे पण डगमगू नको कारण देवाची दैवाची साथ आहे, आणि पाठीवर सदैव मायेचा हात आहे ||८||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3838
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

एक ओळ वाचली होती, माधवी देसाईंच्या मुलीच्या कवितेते. ' जन्म देण्या पेक्षा ही जास्त वेदना दायक असत मुलीच्या डोळ्यात दुसर्‍या बद्दल प्रेम पहाण' त्या नंतर भिडलेली ही दुसरी कवीता. सासुबाईंना नमस्कार सांग एका मुलीच्या आईचा!

मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| खुप भरुन आले .....बापातल्या आई ला कधि एकदा संध्याकाळी घरी जाउन लेकिला कुशित घेतोय असे झालंय

भाबडी आणि निर्व्याज भावना !

कविता आवडली.

शुची - छान कविता आणि आपण पुढाकार घेऊन सासूबाईंची कविता प्रकाशित केलीत. अभिनंदन.मनापासून .