Skip to main content

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

लेखक टारझन यांनी गुरुवार, 10/02/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अ‍ॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत .. तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत .. "गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते "डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . "हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते "दत्ताच्या आरत्यां" पर्यंत .. मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. तेंव्हा मोठ्या अपेक्षेणे हा काथ्याकुट काढत आहे, आपण सगळे जाणताच .. मिपाचा वाचक वर्ग सगळ्या वयोगटातला आहे. तसेच आता तो अधिक विपुल संख्येतही आहे. तेंव्हा सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे हा धागा. मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल :) "अखिल मानवजातीय पुरुष उमेद्वार हितार्थ जारी " - टारझन

वाचने 37962
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? हेल्मेट घालून ट्राय मार... मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? मागल्या जन्मी काय वेताळ होतास का रे बाबा? येवढा कठीण प्रश्न? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? हॅ हॅ हॅ हॅ....

एका कागदावर घरच्या महिन्याच्या सामानाची यादि पेन्सिलने लिहा आणि तुमच्या मढ्यातल्या, म्हणजे, मनातल्या भावना, कल्पना, योजना पेननं लिहा. तो कागद द्या ज्या पोरिला द्यायचा ते, पोरी जास्त असतील तर तेवढ्या कॉप्या तयार ठेवा. १. पोरगी कागद परत करेल, वाचता येत नाही म्हणुन. - ( स्वानुभव) २. तिनं फक्त तुमच्या भावना, कल्पना वाचल्या आणि हो म्हणाली तर - पोरगी फक्त गैरफायदा घेईल सांभाळुन. ३. तिनं तुमच्या भावना कल्पना + यादि वाचली आणि हो म्हणाली तर - पोरगी संसार सुखाचा करेल. ४. तिनं तुम्ही केलेल्या यादित चुका काढल्या तर - लगेच खिशातुन एक राखी काढुन तिच्या कडुन बांधुन घ्या. ५. कागद तसाच परत केला - तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, अजुन एक वर्ष स्वातंत्र्य उपभोगा.

आजु बाजुला तीचा भाउ, बाप (पुरुष नातेवाईक) नाही आहे ह्याचि खात्री करुनच प्रपोज प्रेमाने करावे, सर्वात म्ह्तवाचे जिथे कोणी नसेल अश्या ठीकानि,किंवा आपल्याला तीथे कोणि ओळ्खनार नाहि अश्या ठिकानी प्रपोज मारावा , अश्याने काय होईल जर का तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि.

In reply to by महेश-मया

>>तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि ओरड्ल्यावर तुला ओळखणारं कोणी नसलं तरिहि वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी मागे पुढे बघणार नाही त्याची तयारी पण ठेव......... :P

In reply to by मनराव

अरे मित्रा प्रपोज मारतांना नेहमी आपल्या मित्रांना सोबत न्यावे, पन त्यांना लांब उभे राहण्यास सांगावे, अश्याने काय होईल वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी आलाच तर आपले मित्र वाचवायला येतील, माझ्या मते प्रपोज हा पुर्न प्लान करुनच मारवा

एक छानसे फुल, कोणतेही चालेल...धोत्रा वगैरे नको..तर असे एखादे फुल द्या...एखादी छानसी ज्वेलरी शक्यतो कानातले किंवा pendent द्या...आजकाल अमेरिकन डायमंडच्या ज्वेलऱ्या मिळतात त्यातूनच घ्या आणि एखाद्या पॉश हाटेलात खायला घेऊन जा...एवढा खर्च करायच्या आधी थोडा अंदाज घ्या किंवा ऐपत असेल तर त्याची गरज नाही... तर, गिळताना मधेच " एक विचारू का?" असं म्हणून काय विचारायचं ते विचारा...आणि हो hallmark च ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरू नका. काय झालं ते आम्हालापण कळवा. खरं सांगायचं तर १४ पेब्रूवारी पेक्षा दुसर्या एखाद्या दिवशीच तिला मस्त सरप्राईज मिळेल आणि तुमची "हो" ऐकायची शक्यता वाढेल. बाकी ऐपतीनुसार हाटेल, फुल, ज्वेलरी वगैरेत बदल करावा.

सोप्प्य रे टारु. तू खरेतर येथे नविदिताना मार्गदर्शन करायचेस तर तुच सल्ले मागत बसला आहेस. तसे प्रपोज मारणे सोप्पे आहे. भग्वद गीतेचा सल्ला ऐक कर्म करताना फळाची चिंता करायची नाही. बिन्धास्त जे करायचे आहे ( म्हणजे फक्त प्रपोज मारणेच) ते करून मोकळे व्हायचे . परिणामांची चिम्ता कशाला करायची. जे जे होईल ते ते सहावे. शहाणे करून सोडावे सकल जन

ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज? तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस. दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.;) तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.

In reply to by रेवती

ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज?
खि खि खि .... खि खि खि ....
तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस.
खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ...
दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.
आहो का तुम्ही भिती दाखवता सारखी मला ? आय लव माय लोणलीणेस :) अँड माय लोणलीणेस इज किलिंग मी ... आय मस्ट कन्फेस .. .आय स्टिल बीलिव्ह .. व्हेण अ‍ॅम णॉट विथ यु आ लुज मा माईड ... गिव्ह मी अ साईड ... हिट मी समवन विथ बेसबॉल स्टिक ..... ( मी काय लिहीतोय ? )
तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.
णक्की विचारा , आय होप आय वोंट डिसपॉईंट यु :) वेळेवर खबर पोच करिन :)

फक्त तोंडी प्रपोज करावे, लिखित स्वरूपातील कोणतीही मटेरीयल (उदा. ग्रीटींग, प्रेमपत्र) देऊ नये. या गोष्टी, ती जर हो म्हणाली, तर मागाहून देता येतील. पण जर ती नाही म्हणाली, तर आपण तिला प्रपोज केले आहे, याचा कोणताही लिखित पुरावा मागे सोडू नये. कारण ते मटेरीयल तिच्याव्यातिरिक्त दुसर्‍या कुणाला (भाऊ किंवा बाप) सापडले, तर तिला (आणि आपल्याला सुद्धा) जरा जास्तच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. -सूर्यपुत्र.

किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? फोन वरुन मारावे?? कर बोंबाबोंब तुझाच फोन तुतेल !!!

टार्‍या तुला पोरींबद्दल सल्ला देणे म्हणजे कावळ्याने राजहंसाला चालणे शिकवण्यासारखे होईल. तर्रीपण सांगतो. आपण ज्या गोष्टीकडे पाठ फिरवतो ती आपल्या पाठी येते. बास्स सिंपल. अवांतरः आमचे परममित्र डॉनराव यांच्या विस्तृत प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

In reply to by छत्रपती

प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद छत्रपती सरकार ... आम्ही कसले हो पोरींबद्दल ज्ञानी ? पोरी तर आम्हाला हेट करतात :( बाकी परमाणु मित्र डॉण आजकाल फक्त स्वतःच्या लेखांवर् प्रतिक्रिया देतात ...

होशील का माझ्या बाळाची आई का मी होऊ तुझ्या बाळाचा मामा असे विचारल्याने (लोकशाहीत त्यांना पर्याय दिल्याने एखादी डाव्या व उजव्या विचारसरणीची जहालपंथीय मुलगी सुध्धा एक पर्याय नक्की निवडेल कानाखाली जाळ वैगेरे हिंसक प्रकार होणार नाहीत .( बाकी बाबा बर्व्यांसारखा हदयापरिवर्तनावर विश्वास ठेवणारे पण खूप आहेत ह्या जगात ) तेव्हा ट्राय ट्राय बट डोंट क्राय

निनाद, अरे मेलो फुटलो वाचुन, सगळं हापिस बघतंय माझ्याकडे काय झालं याला म्हणुन. असो, मुळ धागा टारझनचा आणि त्यावर हे असले प्रतिसाद, हे सगळे घरी रात्रीच वाचायला हवं होतं, हापिसात हे ऊघडायची रिस्कच घ्यायला नको होती.