Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 12:23
णमस्कार्स लोक्स , अ‍ॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत .. तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत .. "गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते "डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . "हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते "दत्ताच्या आरत्यां" पर्यंत .. मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. तेंव्हा मोठ्या अपेक्षेणे हा काथ्याकुट काढत आहे, आपण सगळे जाणताच .. मिपाचा वाचक वर्ग सगळ्या वयोगटातला आहे. तसेच आता तो अधिक विपुल संख्येतही आहे. तेंव्हा सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे हा धागा. मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल :) "अखिल मानवजातीय पुरुष उमेद्वार हितार्थ जारी " - टारझन
  • Log in or register to post comments
  • 37868 views

प्रतिक्रिया

Submitted by पियुशा on गुरुवार, 02/10/2011 - 12:30

Permalink

(विषय दिलेला नाही)

Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on गुरुवार, 02/10/2011 - 18:05

In reply to (विषय दिलेला नाही) by पियुशा

Permalink

हा हा हा

योग्य वयात फेसबुक वर असण्याचे फायदे घेत आहे !!!! ;) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 02/10/2011 - 12:52

Permalink

हातभार

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. अन्याय, अन्याय! बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना! त्यांना पण काही भावना असतात! ;) सुंदर, बिन्सुंदर आणि इतर अशा सगळ्या प्रकारच्या मुलींना प्रपोज करण्यात यावे ही विनंती/ धमकी! जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? जास्तीत जास्त सक्सेस्चा अर्थ एकाच वेळेस जास्तीत जास्त मुलींनी (सुं.बिन्सुं. व इ.) लाजून, मुरकून 'व्हय' म्हणावे असा आहे का? कशाचीही प्रोबॅबिलिटी वाढवायला मिपावरचे 'स्टॅटिस्टिक्स' वर का.कू. करणारे दिग्गज मदत करतीलच. किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? ते अण्तर मुलीच्या उंची व तिच्या हाताच्या लांबी सापेक्ष बदलेल. तिची 'पोच' कुठपर्यंत आहे हेदेखिल आधीच 'परीक्षा करून' तपासून पहावे. पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? नाय बा! या हंगामात रबी पिके साम्भाळावीत. आंब्याचा मोहोर सांभाळावा. सेन्सेक्स घसरतोय. स्टॉक्स्मध्ये पैसा गुंतवावा. फालतू, महागड्या गिफ्टस्मध्ये फायदा दिसत नाही. आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? जे मुलांना मुलींमध्ये हवे असते तेच सगळे! त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? तिचे दुसर्‍याशी लग्न झाल्यानंतरसुद्धा तिच्या मागे मागे करुन! ;) एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . पास. मझ्या कविता चोरीला जाउ देनार नाही मी कधीच! कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल ठांकू! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:42

In reply to हातभार by कवितानागेश

Permalink

अन्याय, अन्याय! बिन्सुंदर

अन्याय, अन्याय! बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना! त्यांना पण काही भावना असतात!
कर दी ना छोटी बात .... तुम्ही भावणा दुखावल्यात प्रेमविरांच्या .. कारण प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा .. आपण ताबडतोब वाक्य मागं घेऊ :) बाकी प्रतिसाद भारीच :) अजुन येऊन द्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 02/10/2011 - 13:54

In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन

Permalink

प्रेमात पडलेल्या प्रत्येक

प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा ..
जोरदार सहमती. तु तर एकदम अनर्थाचा अर्थ केलास.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/10/2011 - 14:14

In reply to प्रेमात पडलेल्या प्रत्येक by नरेशकुमार

Permalink

टारबा आणि नकु..

टारबा आणि नकु दोघांशी दणदणीत सहमती.. "अनर्थाचा अर्थ" आवडले..
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on गुरुवार, 02/10/2011 - 14:29

In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन

Permalink

दिल आया गधी पे तो परी भी क्या

दिल आया गधी पे तो परी भी क्या चिज हय
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/10/2011 - 13:01

Permalink

हम्म. तसे एखाद्या मुलीला

हम्म. तसे एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी १४ पेबुरवारी हवाच असे नाही. पार्श्वभागात दम, फासे उलट पडल्यास दुसरीकडे वळून पहाण्याची तयारी एवढ्या दोन गोष्टी आणि महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ. शक्यतो पोरींच्या मागे लागु नये, त्यांच्याकडे दुर्ल़क्ष केले की त्याच आपोआप लाईन देतात असा अनुभव आहे. स्वजबाबदारीवर दुर्लक्ष करुन पडताळा घ्यावा, हातचे सुटल्यास आम्हाला बोल लावू नये. काही काही शायंटीस्टलोक पण असेच बोलतात ब्वा http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1354817/Playing-hard--Men-feelings-wraps-attractive.html !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:44

In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया

Permalink

णाणा , तुम्ही उलटीचं औषध

णाणा , तुम्ही उलटीचं औषध देऊन म्हणताय .. जर जुलाब लागले तर जबाबदार नाही ... आहो कसं काय घ्यायचं मग हे औषध :(
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 02/14/2011 - 13:42

In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया

Permalink

नाना,

नाना,
महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.
अस्सेच झाले एकदा.... आम्ही एका टवळीला प्रपोज करायला म्हून गेल्तो. तिला यवडा घाम सुटला अन ती पळून गेली, माज्या येका दोस्ताला सांगत व्हती, मी प्रपोज केल्याचं. नंतर इचार केला जर तिन "व्हय" मनली आस्ति तर काय र्हायल व्हत आमच???? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 02/10/2011 - 13:08

Permalink

......................... अशी

......................... अशी हाक मला अंतर्मनातुन आली .
च्या मारी ! हा रोग तुला पण जडला का ? मला वाट्टे हा रोग फकस्त मोठ्ठ्या मोठ्ठ्या लोकास्नी होतो.
मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.
तिच्या बरोबर तिचे भाऊ नसताना तिला भिडावे.
जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
प्रेमाने नाही म्हटले तरी तो सक्सेसच आहे.
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे
डोक्यावर हेल्मेट घालुन प्रोपोज मारावे.
पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?
पोरिंना पटविन्याचा हंगाम १२ महिने १८ काळ असतो.
आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?
मनी आनी हनी
त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
तीला जळवुन, तिच्या समोर दुसर्‍याच पोरीला पटविन्याचा प्रयत्न करा.
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
हे असलं रोमँटिक फीमँटिक आपल्याला काय जमत नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 02/14/2011 - 13:43

In reply to ......................... अशी by नरेशकुमार

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 02/10/2011 - 13:08

Permalink

पण णाणा मला सांगा

राजश्री मॅडमनी काय करायचे?त्यानी प्रपोज केले ते चुकले काय? तो हंगाम योग्य नव्हता काय? ह्यावर देखिल प्रकाश टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:40

In reply to पण णाणा मला सांगा by वेताळ

Permalink

राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय

राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय स्ट्राँग असावा .. आणि त्याची शांती झाली नसावी ... त्यांच्या ग्रहांची लोकेशण पण काही ठिक नव्हती म्हणे .. त्यात त्यांना भेटला छोटासा णेपच्युण .. त्याला काय करायचं तेच माहिती नव्हतं .. मग काय होणार ? असो , जास्त प्रकाश युयुस्तु सारखे जाणकार टाकतील ;) अवांतर : चौदा फेब्रुवारी चे ग्रहयोग आणि होकार - नकार यांचा काही संबंध आहे काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/10/2011 - 13:45

In reply to राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय by टारझन

Permalink

णेपचुण नाही प्ल्युटो रे..

णेपचुण नाही प्ल्युटो रे.. नेपचुन मोठा आहे प्लुटो आणि प्लुटॉनिक काही संबंध असाव्वा का ?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:51

In reply to णेपचुण नाही प्ल्युटो रे.. by अवलिया

Permalink

हो हो .. तेच तेच ... लांबुन

हो हो .. तेच तेच ... लांबुन मॉठा दिसला होता पण कसा .. असो .. मला एक सांगा ... माणवाने आकाशात सोडलेले उपग्रह पण माणवाच्या राषीभविष्यात लुडबुड करतात का ? :) म्हणजे कुंडलीतल्या एखाद्या स्थानात घर करुन बसतात का ? जर चंद्रमा करु शकतो तर बाकी उपग्रह पण करु शकतात असे वाटते. जाणकारांनी प्रकाष टाकावा :) - मिपाचे जाणकार
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/10/2011 - 13:55

In reply to हो हो .. तेच तेच ... लांबुन by टारझन

Permalink

यावर एक धागा काढावा असे मी

यावर एक धागा काढावा असे मी सुचवतो. या धाग्यावर ती चर्चा अवांतर होईल
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/10/2011 - 13:10

Permalink

टार्‍या लेका परवानगी घेउन

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ? ;) बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.
तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत...
अब्बे सक्काळी सक्काळी एकाने फोन केला मला आणि म्हणे "प्लिज मला ते 'अज दिन चढेया..' चे हिंदी लिरिक्स शोधून देच !" एक पिझा खायला घालायला तयार झाला. =)) त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:36

In reply to टार्‍या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार

Permalink

टार्‍या लेका परवानगी घेउन

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ?
=)) =)) =)) तुम्ही चिमटे काढायची संधी काय सोडु णका .. :)
एक पिझा खायला घालायला तयार झाला. =))
रोफ्ल ... आपणंच सांगितलेला .. सीसीडी मधला "किपिचिनो" चा सिन आठवेश =))
त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या
हा हा हा .. पब्लिकचं हल्ली फेसबुक अ‍ॅडिक्शन वाढलंय .. कुठे तरी वाचलं होतं .. एक पोर्‍या पोरी ला प्रपोज करतो , ती हो म्हणते तर हा भावड्या डायरेक्ट पळतंच सुटतो .. पोरगी म्हणते काय रे कुठे चाललास .. तर पठ्ठ्या म्हणतो .. कैनै .. जरा फेसबुक वर स्टेटस अपडेट करुन येतो =)) बाकी आतापर्यंत मला " फक्त मिसळपावमुळे" या अप्रतिम काव्याचे विडंबण करुन मिपा ऐवजी पोरीचं नाव टाकुन तिला देण्याचे अफलातुन पर्याय सुचत आहेत :) चुचु सारख्या जाणकारणीच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत् :) ती एक प्रांजळ प्रतिक्रीया देते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/10/2011 - 13:48

In reply to टार्‍या लेका परवानगी घेउन by टारझन

Permalink

चुचुआत्या सध्या ध्यानाच्या

चुचुआत्या सध्या ध्यानाच्या बदल्यात कढई मिळते का शोधात आहे. मागच्या हलव्याच्या वेळेस जळालेली कढई अजुन निघत नाही असे काहीसे म्हणत होती. खरे खोटे माहित नाही
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 02/10/2011 - 13:50

In reply to चुचुआत्या सध्या ध्यानाच्या by अवलिया

Permalink

उपसंपादकाच्या डुलक्या

किंचित सुधारणा - 'ध्यानाच्या' आणि 'बदल्यात' या मधे 'कपड्यांच्या' हा शब्द वाचावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 02/10/2011 - 17:04

In reply to उपसंपादकाच्या डुलक्या by अवलिया

Permalink

वरील सुधारणेमुळे 'ध्यान'

वरील सुधारणेमुळे 'ध्यान' नाराज होण्याची शक्यता किती असेल?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/10/2011 - 13:49

In reply to टार्‍या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

>>बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो. +१, हेच म्हणतो. इतरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, आमचे कसले आलेय प्रेम न काय काय अजुन. असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:53

In reply to +१ by छोटा डॉन

Permalink

घ्या डॉनराव .. आहो तुमच्या

घ्या डॉनराव .. आहो तुमच्या सारख्या नौजवाण , हुशार , आणि उमेदीच्या तरुणांसाठीच तर आम्ही धागा सुरु केलाय ना ? ह्यातुन बर्‍याच तरुणांना ( काही काकांना पण होऊ शकतो , हु नोज ? ) फायदा होणार :) - ( जनहितचिंतक ) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/10/2011 - 13:59

In reply to घ्या डॉनराव .. आहो तुमच्या by टारझन

Permalink

( आमच्यासाठी ) उपयोगशुन्य ...

प्रपोज करणे आणि त्यातल्या तत्सम काळज्या हे सगळे एखादी 'सुंदर पोरगी' मिळाल्यानंतरचे प्रकार आहेत. तुर्तास आम्हाला ह्याचा अजिबात उपयोग नाही. धागा बुकमार्क करुन ठेवतो, एखादी सुम्दर कन्या मिळाली की ह्यातले सल्ले वाचुन प्रपोज करीन असे सांगतो. सध्या आम्ही केवळ प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घेऊ. बाकी चालु द्यात :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 02/10/2011 - 13:51

Permalink

माझे दोन सेंट्स - १३ लाच

माझे दोन सेंट्स - १३ लाच प्रपोस मारा , १४ ला जास्त स्पर्धा असते , १३ ला हो म्हटल तर १४ ची सोय होते नाहीतर १४ ला बॅक-अप / DRP प्लान कामास येतो :) अनुभवी !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 13:56

In reply to माझे दोन सेंट्स - १३ लाच by माझीही शॅम्पेन

Permalink

सेण्सिबल

एक शंका : जर १५ ला प्रपोज मारले तर ? उरल्या सुरल्या माला मधे सापडण्याचे जास्त चाण्स नाही असु शकत क ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 02/10/2011 - 14:02

In reply to सेण्सिबल by टारझन

Permalink

ओके !! कुठलीच शक्यता नाकारता

ओके !! कुठलीच शक्यता नाकारता येत नाही , क्लीयरांस मध्ये चांगला "माल" हाती लागण्याची शक्यता आहे , पण मग नऊ महिने (बाल-दिन) पर्यंत थांबणार आशालील तर पॅकेज डील पण मिळेल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 14:05

In reply to ओके !! कुठलीच शक्यता नाकारता by माझीही शॅम्पेन

Permalink

कृपया मामा बणण्याच्या टिप्स

कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत :) त्या सगळ्यांना ठाऊक असतीलंच .. त्यासाठी विषेष काही करावं लागत नाही :) नुस्तं बसुन राहिलं तरी मामा होता येतं :)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 02/10/2011 - 14:49

In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन

Permalink

माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर

माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर आणि प्रपॉजल आपटल तर अनंत क्षणाचा मामा असतो ( अस आमाचच सू-वाक्य आहे) बाकी अधिक तयारीसाठी फूडचा धागा गुंडाळून बघा (छोट्या डॉना यांचा मास्टर-पीस) http://www.misalpav.com/node/996 जर नाही उत्तर आल तर न्यूक्लियर डिसेप्शन" सगळे भाग एका दमात सांगतो अशी धमकी देऊन बघ अजुन एक चांगला धागा पहिला होता ज्याच्यावर एक दिवसासाठी काय प्लान करता येईल ह्या बद्दल बर्‍याच मिपाकरणी तारे तोडले होते :) पण दुवा सापडेना
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 02/10/2011 - 17:50

In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन

Permalink

हा हा हा

कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत एव्हढी ताकद कोणाची आहे रे?????
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/10/2011 - 13:53

Permalink

काय सांगताय?

काय सांगताय डॉन राव? कमालच झाली म्हणायची.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 02/10/2011 - 13:56

In reply to काय सांगताय? by विनायक प्रभू

Permalink

कसली कमाल ?

मास्तर, त्यात कसली कमाल ? आम्हाला 'प्रेमाचा' अनुभव नाही म्हणलो तर ह्यात कमाल कशी असु शकते ? ;) - (आश्चर्यचकित) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/10/2011 - 13:59

Permalink

कमाल

नाही? हीच कमाल आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 14:04

In reply to कमाल by विनायक प्रभू

Permalink

ओ मास्तर ... माहित असेल तर

ओ मास्तर ... माहित असेल तर सल्ले द्या ... उगाच डॉण्याच्या कमाली ची काय कमाल करताय ? आमचा डॉण्यावर पुर्ण विष्वास आहे ... डॉण्या तु लढ रे आम्ही आहोत कापडं संभाळायला !! मास्तर .. एखादी जाणकार प्रतिक्रीया द्यावी ... लोकांचे सिमकार्ड एक्पायर होण्या आधी !!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/10/2011 - 14:49

In reply to ओ मास्तर ... माहित असेल तर by टारझन

Permalink

माहीती

भरपुर आहे रे टारबा. पण तो प्रबंध होइल. सर्व फ्रेम ऑफ रेफरन्स चा विचार करुनच वन टू वन योग्य राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on गुरुवार, 02/10/2011 - 14:27

Permalink

अडाणी शोध

तु ना टारझन एखाडी अडाणी मुलगी शोध तिचे तुला होकार देण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा एखादी अशी मुलगी जिचे मिसळपावला खाते नसेल किंवा जिचे मिपाला खाते असुन तुझ वरीजनल नाव जिला माहित नसेल अशी किंवा एखादी मुक बधीर किंवा एखादी बिनडोक किंवा एखादी ...............
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 15:05

In reply to अडाणी शोध by कच्ची कैरी

Permalink

प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद ...

मी पोरी कशा णिवडाव्या ह्यावर सल्ला मागितलेला नाहीये :) तुम्ही आडाणी दिसता ;) पोरींच्या णकारात पण होकार असतो असे जाणकार म्हणतात .. समजा , जर आम्ही तुम्हाला प्रपोज केले ( फक्त समजा ) तर तुमचा णकार असेल का होकार ? ;) - अंब्याचा करंडा
  • Log in or register to post comments

Submitted by कच्ची कैरी on गुरुवार, 02/10/2011 - 15:14

In reply to प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद ... by टारझन

Permalink

म्हणुन सांगितले

जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? असे आधीच तुम्ही विचारल्याने मी वरील सल्ल दिला आहे आणि तुम्ही मला प्रपोज कराल अस गृहित धरल फक्त समजा म्हणुनही घेतले तरी माझा नकार आणि नकारच असेल
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 15:17

In reply to म्हणुन सांगितले by कच्ची कैरी

Permalink

आपल्या णकारा मुळे अंमळ

आपल्या णकारा मुळे अंमळ गुदगुल्या झाल्या ... बाकी आत्ताच हाती आलेल्या माहिती णुसार , कानाखाली खायची वाचवायचे असेल तर निवडुंगा सारखी दाढी वाढवावी .. पोरींचे हात आधिच कोमल असल्याने ते मारण्याची रिस्क घेत नाही... आमची उंची जास्त असल्याने पोरींचे हात पोचुच शकत नाही तेंव्हा .. :) :) :) (हल्ली पोरी स्टुल बरोबर घेउण फिरतात असं ऐकलंय .. खरंय का ? कुठे गेले जाणकार .. बॅट्री मारा हो )
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on गुरुवार, 02/10/2011 - 16:21

In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन

Permalink

आश्चर्य....

साक्षात लव्ह "गू"रू ला अश्या मदतीची गरज वाटावी..... काय आहे "गू"पीत? ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on गुरुवार, 02/10/2011 - 20:34

In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन

Permalink

तार्या

अरे भौ ;निवडूंगा सारखी दाढी वाढवली कि सक्सेस ची प्रोबाब्लीती कमी होते ना. optimization झाले पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by ashvinibapat on गुरुवार, 02/10/2011 - 14:40

Permalink

मला सांगा एखाद्या सुंदर

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . जनहिताची कळकळ लक्षात आली का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 02/10/2011 - 14:41

Permalink

खरे प्रेम असेल तरच एक

खरे प्रेम असेल तरच एक गुलाबाचे फुल घेउन जावे व एका गुढघ्यावर उभे राहुन मस्त फिल्मी प्रपोज करावे. उगाच जास्त विचार करु नये. कानाखाली वैगरे जाळचे दिवस गेलेत आता. होकार किवा नकार येइल फक्त. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो ;) बाकी नानाचा सल्ला योग्य वाटला नाही. मुलींना भाव द्यावा लागतो नाहितर मुली ढुन्कुनही बघत नाहीत आणी तुमचा आयडी जि तॉक वरुन दिलिट होउ शकतो =)) तुर्तास इतके पुरे.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/10/2011 - 15:01

In reply to खरे प्रेम असेल तरच एक by पर्नल नेने मराठे

Permalink

. पण मग होकार आला कि गिफ्ट्स

. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो
=)) =)) =)) ही पोरगी अगदी कहर आहे =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/10/2011 - 14:46

Permalink

या सगळ्या विभागात आम्ही अगदीच

या सगळ्या विभागात आम्ही अगदीच अनभिज्ञ आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 02/10/2011 - 14:51

In reply to या सगळ्या विभागात आम्ही अगदीच by llपुण्याचे पेशवेll

Permalink

पुप्स बस क्या यार हमको उल्लु

पुप्स बस क्या यार ;) हमको उल्लु मत बना. हम अलिबागसे नही आये.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 02/10/2011 - 15:06

In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे

Permalink

पुप्स???? =)) =)) नगरी

पुप्स???? =)) =)) नगरी ष्टाईलमध्ये लवशिप देणार का विचारायचे (आता काय विचारतात म्हायती नाय). पोरगी आपल्याला वाटते तशी असंल तर घाबरून नाही म्हणायची किंवा लाजून हो म्हणायची. बाराची असेल तर केवढ्याला घेणार असं विचारून लाजवायची किंवा तोंड रंगवायची. तरीपण न लाजता फ्रेंडशिप तरी दे म्हणणार्‍यांचे काम व्हायचे बहुतेकवेळा. मागं मागं करून मागणे हा यशाचा मंत्र होता आणि आहे. तो ज्याना जमत नाही ते आमच्यासारखे नुस्ते लांबून बघत बसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/10/2011 - 15:32

In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे

Permalink

आहे ते आहे चुचुआत्ते.

आहे ते आहे चुचुआत्ते.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on गुरुवार, 02/10/2011 - 14:58

Permalink

अरे त्या कुठल्या तरी

अरे त्या कुठल्या तरी चित्रपटात आहे ना प्रसंग.. मागुनच तुला आवडणार्या मुलीला " आय लव यु" म्हणुन प्रपोज मार.ती मागे वळुन पाहील. ती हसली तर ठिक. चिडली तर "कैसे फसाया दिदि को..कैसे फसाया दिदिको.." (हिंदीतच बोल) असे म्हणुन उड्या मारत कल्टी मार. हाय काय अन नाय काय..
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com