Skip to main content

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

लेखक टारझन यांनी गुरुवार, 10/02/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अ‍ॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत .. तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत .. "गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते "डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . "हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते "दत्ताच्या आरत्यां" पर्यंत .. मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. तेंव्हा मोठ्या अपेक्षेणे हा काथ्याकुट काढत आहे, आपण सगळे जाणताच .. मिपाचा वाचक वर्ग सगळ्या वयोगटातला आहे. तसेच आता तो अधिक विपुल संख्येतही आहे. तेंव्हा सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे हा धागा. मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल :) "अखिल मानवजातीय पुरुष उमेद्वार हितार्थ जारी " - टारझन

वाचने 38008
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. अन्याय, अन्याय! बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना! त्यांना पण काही भावना असतात! ;) सुंदर, बिन्सुंदर आणि इतर अशा सगळ्या प्रकारच्या मुलींना प्रपोज करण्यात यावे ही विनंती/ धमकी! जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? जास्तीत जास्त सक्सेस्चा अर्थ एकाच वेळेस जास्तीत जास्त मुलींनी (सुं.बिन्सुं. व इ.) लाजून, मुरकून 'व्हय' म्हणावे असा आहे का? कशाचीही प्रोबॅबिलिटी वाढवायला मिपावरचे 'स्टॅटिस्टिक्स' वर का.कू. करणारे दिग्गज मदत करतीलच. किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? ते अण्तर मुलीच्या उंची व तिच्या हाताच्या लांबी सापेक्ष बदलेल. तिची 'पोच' कुठपर्यंत आहे हेदेखिल आधीच 'परीक्षा करून' तपासून पहावे. पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? नाय बा! या हंगामात रबी पिके साम्भाळावीत. आंब्याचा मोहोर सांभाळावा. सेन्सेक्स घसरतोय. स्टॉक्स्मध्ये पैसा गुंतवावा. फालतू, महागड्या गिफ्टस्मध्ये फायदा दिसत नाही. आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? जे मुलांना मुलींमध्ये हवे असते तेच सगळे! त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? तिचे दुसर्‍याशी लग्न झाल्यानंतरसुद्धा तिच्या मागे मागे करुन! ;) एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . पास. मझ्या कविता चोरीला जाउ देनार नाही मी कधीच! कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल ठांकू! ;)

In reply to by कवितानागेश

अन्याय, अन्याय! बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना! त्यांना पण काही भावना असतात!
कर दी ना छोटी बात .... तुम्ही भावणा दुखावल्यात प्रेमविरांच्या .. कारण प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा .. आपण ताबडतोब वाक्य मागं घेऊ :) बाकी प्रतिसाद भारीच :) अजुन येऊन द्या :)

In reply to by टारझन

प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा ..
जोरदार सहमती. तु तर एकदम अनर्थाचा अर्थ केलास.

हम्म. तसे एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी १४ पेबुरवारी हवाच असे नाही. पार्श्वभागात दम, फासे उलट पडल्यास दुसरीकडे वळून पहाण्याची तयारी एवढ्या दोन गोष्टी आणि महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ. शक्यतो पोरींच्या मागे लागु नये, त्यांच्याकडे दुर्ल़क्ष केले की त्याच आपोआप लाईन देतात असा अनुभव आहे. स्वजबाबदारीवर दुर्लक्ष करुन पडताळा घ्यावा, हातचे सुटल्यास आम्हाला बोल लावू नये. काही काही शायंटीस्टलोक पण असेच बोलतात ब्वा http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1354817/Playing-hard--Me… !

In reply to by अवलिया

णाणा , तुम्ही उलटीचं औषध देऊन म्हणताय .. जर जुलाब लागले तर जबाबदार नाही ... आहो कसं काय घ्यायचं मग हे औषध :(

In reply to by अवलिया

नाना,
महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.
अस्सेच झाले एकदा.... आम्ही एका टवळीला प्रपोज करायला म्हून गेल्तो. तिला यवडा घाम सुटला अन ती पळून गेली, माज्या येका दोस्ताला सांगत व्हती, मी प्रपोज केल्याचं. नंतर इचार केला जर तिन "व्हय" मनली आस्ति तर काय र्हायल व्हत आमच???? ;-)

......................... अशी हाक मला अंतर्मनातुन आली .
च्या मारी ! हा रोग तुला पण जडला का ? मला वाट्टे हा रोग फकस्त मोठ्ठ्या मोठ्ठ्या लोकास्नी होतो.
मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.
तिच्या बरोबर तिचे भाऊ नसताना तिला भिडावे.
जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
प्रेमाने नाही म्हटले तरी तो सक्सेसच आहे.
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे
डोक्यावर हेल्मेट घालुन प्रोपोज मारावे.
पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?
पोरिंना पटविन्याचा हंगाम १२ महिने १८ काळ असतो.
आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?
मनी आनी हनी
त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
तीला जळवुन, तिच्या समोर दुसर्‍याच पोरीला पटविन्याचा प्रयत्न करा.
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
हे असलं रोमँटिक फीमँटिक आपल्याला काय जमत नाय.

राजश्री मॅडमनी काय करायचे?त्यानी प्रपोज केले ते चुकले काय? तो हंगाम योग्य नव्हता काय? ह्यावर देखिल प्रकाश टाका.

In reply to by वेताळ

राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय स्ट्राँग असावा .. आणि त्याची शांती झाली नसावी ... त्यांच्या ग्रहांची लोकेशण पण काही ठिक नव्हती म्हणे .. त्यात त्यांना भेटला छोटासा णेपच्युण .. त्याला काय करायचं तेच माहिती नव्हतं .. मग काय होणार ? असो , जास्त प्रकाश युयुस्तु सारखे जाणकार टाकतील ;) अवांतर : चौदा फेब्रुवारी चे ग्रहयोग आणि होकार - नकार यांचा काही संबंध आहे काय ? :)

In reply to by टारझन

णेपचुण नाही प्ल्युटो रे.. नेपचुन मोठा आहे प्लुटो आणि प्लुटॉनिक काही संबंध असाव्वा का ?

In reply to by अवलिया

हो हो .. तेच तेच ... लांबुन मॉठा दिसला होता पण कसा .. असो .. मला एक सांगा ... माणवाने आकाशात सोडलेले उपग्रह पण माणवाच्या राषीभविष्यात लुडबुड करतात का ? :) म्हणजे कुंडलीतल्या एखाद्या स्थानात घर करुन बसतात का ? जर चंद्रमा करु शकतो तर बाकी उपग्रह पण करु शकतात असे वाटते. जाणकारांनी प्रकाष टाकावा :) - मिपाचे जाणकार

In reply to by टारझन

यावर एक धागा काढावा असे मी सुचवतो. या धाग्यावर ती चर्चा अवांतर होईल

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ? ;) बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.
तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत...
अब्बे सक्काळी सक्काळी एकाने फोन केला मला आणि म्हणे "प्लिज मला ते 'अज दिन चढेया..' चे हिंदी लिरिक्स शोधून देच !" एक पिझा खायला घालायला तयार झाला. =)) त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ?
=)) =)) =)) तुम्ही चिमटे काढायची संधी काय सोडु णका .. :)
एक पिझा खायला घालायला तयार झाला. =))
रोफ्ल ... आपणंच सांगितलेला .. सीसीडी मधला "किपिचिनो" चा सिन आठवेश =))
त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या
हा हा हा .. पब्लिकचं हल्ली फेसबुक अ‍ॅडिक्शन वाढलंय .. कुठे तरी वाचलं होतं .. एक पोर्‍या पोरी ला प्रपोज करतो , ती हो म्हणते तर हा भावड्या डायरेक्ट पळतंच सुटतो .. पोरगी म्हणते काय रे कुठे चाललास .. तर पठ्ठ्या म्हणतो .. कैनै .. जरा फेसबुक वर स्टेटस अपडेट करुन येतो =)) बाकी आतापर्यंत मला " फक्त मिसळपावमुळे" या अप्रतिम काव्याचे विडंबण करुन मिपा ऐवजी पोरीचं नाव टाकुन तिला देण्याचे अफलातुन पर्याय सुचत आहेत :) चुचु सारख्या जाणकारणीच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत् :) ती एक प्रांजळ प्रतिक्रीया देते ;)

In reply to by टारझन

चुचुआत्या सध्या ध्यानाच्या बदल्यात कढई मिळते का शोधात आहे. मागच्या हलव्याच्या वेळेस जळालेली कढई अजुन निघत नाही असे काहीसे म्हणत होती. खरे खोटे माहित नाही

In reply to by अवलिया

किंचित सुधारणा - 'ध्यानाच्या' आणि 'बदल्यात' या मधे 'कपड्यांच्या' हा शब्द वाचावा ही विनंती.

In reply to by अवलिया

वरील सुधारणेमुळे 'ध्यान' नाराज होण्याची शक्यता किती असेल?

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो. +१, हेच म्हणतो. इतरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, आमचे कसले आलेय प्रेम न काय काय अजुन. असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

घ्या डॉनराव .. आहो तुमच्या सारख्या नौजवाण , हुशार , आणि उमेदीच्या तरुणांसाठीच तर आम्ही धागा सुरु केलाय ना ? ह्यातुन बर्‍याच तरुणांना ( काही काकांना पण होऊ शकतो , हु नोज ? ) फायदा होणार :) - ( जनहितचिंतक ) टारझन

In reply to by टारझन

प्रपोज करणे आणि त्यातल्या तत्सम काळज्या हे सगळे एखादी 'सुंदर पोरगी' मिळाल्यानंतरचे प्रकार आहेत. तुर्तास आम्हाला ह्याचा अजिबात उपयोग नाही. धागा बुकमार्क करुन ठेवतो, एखादी सुम्दर कन्या मिळाली की ह्यातले सल्ले वाचुन प्रपोज करीन असे सांगतो. सध्या आम्ही केवळ प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घेऊ. बाकी चालु द्यात :) - छोटा डॉन

माझे दोन सेंट्स - १३ लाच प्रपोस मारा , १४ ला जास्त स्पर्धा असते , १३ ला हो म्हटल तर १४ ची सोय होते नाहीतर १४ ला बॅक-अप / DRP प्लान कामास येतो :) अनुभवी !

In reply to by माझीही शॅम्पेन

एक शंका : जर १५ ला प्रपोज मारले तर ? उरल्या सुरल्या माला मधे सापडण्याचे जास्त चाण्स नाही असु शकत क ? :)

In reply to by टारझन

ओके !! कुठलीच शक्यता नाकारता येत नाही , क्लीयरांस मध्ये चांगला "माल" हाती लागण्याची शक्यता आहे , पण मग नऊ महिने (बाल-दिन) पर्यंत थांबणार आशालील तर पॅकेज डील पण मिळेल ;)

In reply to by माझीही शॅम्पेन

कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत :) त्या सगळ्यांना ठाऊक असतीलंच .. त्यासाठी विषेष काही करावं लागत नाही :) नुस्तं बसुन राहिलं तरी मामा होता येतं :)

In reply to by टारझन

माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर आणि प्रपॉजल आपटल तर अनंत क्षणाचा मामा असतो ( अस आमाचच सू-वाक्य आहे) बाकी अधिक तयारीसाठी फूडचा धागा गुंडाळून बघा (छोट्या डॉना यांचा मास्टर-पीस) http://www.misalpav.com/node/996 जर नाही उत्तर आल तर न्यूक्लियर डिसेप्शन" सगळे भाग एका दमात सांगतो अशी धमकी देऊन बघ अजुन एक चांगला धागा पहिला होता ज्याच्यावर एक दिवसासाठी काय प्लान करता येईल ह्या बद्दल बर्‍याच मिपाकरणी तारे तोडले होते :) पण दुवा सापडेना

In reply to by विनायक प्रभू

मास्तर, त्यात कसली कमाल ? आम्हाला 'प्रेमाचा' अनुभव नाही म्हणलो तर ह्यात कमाल कशी असु शकते ? ;) - (आश्चर्यचकित) छोटा डॉन

In reply to by विनायक प्रभू

ओ मास्तर ... माहित असेल तर सल्ले द्या ... उगाच डॉण्याच्या कमाली ची काय कमाल करताय ? आमचा डॉण्यावर पुर्ण विष्वास आहे ... डॉण्या तु लढ रे आम्ही आहोत कापडं संभाळायला !! मास्तर .. एखादी जाणकार प्रतिक्रीया द्यावी ... लोकांचे सिमकार्ड एक्पायर होण्या आधी !!

In reply to by टारझन

भरपुर आहे रे टारबा. पण तो प्रबंध होइल. सर्व फ्रेम ऑफ रेफरन्स चा विचार करुनच वन टू वन योग्य राहील.

तु ना टारझन एखाडी अडाणी मुलगी शोध तिचे तुला होकार देण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा एखादी अशी मुलगी जिचे मिसळपावला खाते नसेल किंवा जिचे मिपाला खाते असुन तुझ वरीजनल नाव जिला माहित नसेल अशी किंवा एखादी मुक बधीर किंवा एखादी बिनडोक किंवा एखादी ...............

In reply to by कच्ची कैरी

मी पोरी कशा णिवडाव्या ह्यावर सल्ला मागितलेला नाहीये :) तुम्ही आडाणी दिसता ;) पोरींच्या णकारात पण होकार असतो असे जाणकार म्हणतात .. समजा , जर आम्ही तुम्हाला प्रपोज केले ( फक्त समजा ) तर तुमचा णकार असेल का होकार ? ;) - अंब्याचा करंडा

In reply to by टारझन

जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? असे आधीच तुम्ही विचारल्याने मी वरील सल्ल दिला आहे आणि तुम्ही मला प्रपोज कराल अस गृहित धरल फक्त समजा म्हणुनही घेतले तरी माझा नकार आणि नकारच असेल

In reply to by कच्ची कैरी

आपल्या णकारा मुळे अंमळ गुदगुल्या झाल्या ... बाकी आत्ताच हाती आलेल्या माहिती णुसार , कानाखाली खायची वाचवायचे असेल तर निवडुंगा सारखी दाढी वाढवावी .. पोरींचे हात आधिच कोमल असल्याने ते मारण्याची रिस्क घेत नाही... आमची उंची जास्त असल्याने पोरींचे हात पोचुच शकत नाही तेंव्हा .. :) :) :) (हल्ली पोरी स्टुल बरोबर घेउण फिरतात असं ऐकलंय .. खरंय का ? कुठे गेले जाणकार .. बॅट्री मारा हो )

In reply to by टारझन

साक्षात लव्ह "गू"रू ला अश्या मदतीची गरज वाटावी..... काय आहे "गू"पीत? ;) -सूर्यपुत्र.

In reply to by टारझन

अरे भौ ;निवडूंगा सारखी दाढी वाढवली कि सक्सेस ची प्रोबाब्लीती कमी होते ना. optimization झाले पाहिजे

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ? एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा . जनहिताची कळकळ लक्षात आली का ?

खरे प्रेम असेल तर एक गुलाबाचे फुल घेउन जावे व एका गुढघ्यावर उभे राहुन मस्त फिल्मी प्रपोज करावे. उगाच जास्त विचार करु नये. कानाखाली वैगरे जाळचे दिवस गेलेत आता. होकार किवा नकार येइल फक्त. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो ;) बाकी नानाचा सल्ला योग्य वाटला नाही. मुलींना भाव द्यावा लागतो नाहितर मुली ढुन्कुनही बघत नाहीत आणी तुमचा आयडी जि तॉक वरुन दिलिट होउ शकतो =)) तुर्तास इतके पुरे.

In reply to by पर्नल नेने मराठे

. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो
=)) =)) =)) ही पोरगी अगदी कहर आहे =)) =))

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुप्स बस क्या यार ;) हमको उल्लु मत बना. हम अलिबागसे नही आये.

In reply to by पर्नल नेने मराठे

पुप्स???? =)) =)) नगरी ष्टाईलमध्ये लवशिप देणार का विचारायचे (आता काय विचारतात म्हायती नाय). पोरगी आपल्याला वाटते तशी असंल तर घाबरून नाही म्हणायची किंवा लाजून हो म्हणायची. बाराची असेल तर केवढ्याला घेणार असं विचारून लाजवायची किंवा तोंड रंगवायची. तरीपण न लाजता फ्रेंडशिप तरी दे म्हणणार्‍यांचे काम व्हायचे बहुतेकवेळा. मागं मागं करून मागणे हा यशाचा मंत्र होता आणि आहे. तो ज्याना जमत नाही ते आमच्यासारखे नुस्ते लांबून बघत बसतात.

अरे त्या कुठल्या तरी चित्रपटात आहे ना प्रसंग.. मागुनच तुला आवडणार्या मुलीला " आय लव यु" म्हणुन प्रपोज मार.ती मागे वळुन पाहील. ती हसली तर ठिक. चिडली तर "कैसे फसाया दिदि को..कैसे फसाया दिदिको.." (हिंदीतच बोल) असे म्हणुन उड्या मारत कल्टी मार. हाय काय अन नाय काय..

In reply to by मनराव

मनराव तुम्ही मनात मांडे खाउ नका =)) तुमच्या मनात कोणता ढासु सल्ला आहे तो द्या .

In reply to by पर्नल नेने मराठे

चुच्स . .. आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? :)

In reply to by टारझन

आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? Smile
सुगंध घेउनच पळुन जाइल. बाकि जरा गायन, वाद, न्रुत्य कला ह्यातले काही जमतेय का बघा.

In reply to by मुलूखावेगळी

गायन वाद्य नृत्य...
म्हणजे तुनतून/डफ हातात देण्याची क्लृप्ती शोधताय म्हणा की तुमी... किंवा मग बोटावर नाचवणार त्या बिचार्याला... -सर्वासारखी

In reply to by पर्नल नेने मराठे

१४ फेब्रुवारी सोडून कोणत्याही दिवशी जमेल त्या पोझ मधे प्रपोझ करावे (मारू नये..).

In reply to by अवलिया

काय माहित नाही बा ... फेस्बुक वर अपडेट टाकेल तेम्व्हा समजेल :) तुमच्या टॉम्याचा काय प्लान ?

In reply to by पर्नल नेने मराठे

पोळ्यांचा रेट काय आहे ? पोळ्या चवीला कश्या असतात ? पोळ्या मउ असतात कि कडक ? पोळ्या बरोबर तोंडी लावायला भाजी मिळते का ?

मागे तुच एकदा तुझ्या एका लेखात सांगितल होतस तेच सांगतो.. तिच्या समोर तिच्या मैतरणीला लाल गुलाबाच फुल नेउन दे ;) आणि मग पुढे घडणार्‍या प्रसंगांना धिराने तोंड दे. =)) =))

In reply to by प्रकाश घाटपांडे

वाडा कितीही मोठा असला तरी दिंडी दरवाजा एक माणूस जेमतेम आत जाईल इतकाच असतो असे आमचे एक आजोबा म्हणायचे. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हा हा हा .. पण अलिकडे वाड्यालाही भलं मोठं शटर बसवलेलं असतं .. मोठं सामान आत न्यायला ..

In reply to by टारझन

सहमत आहे. म्हणजे प्रपोशनचा मुद्दा गौण ठरतो असे म्हणायचे का मग? फक्त प्रपोझल महत्वाचे.

प्रश्नः १४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?: उत्तरः तोंडाणे..