काय सुरेख ओघवत्या भाषेत परिक्षण केलयस रे इंद्रदा.. आणि संपुर्ण कथानक न सांगता वेळीच समारोप करुन हा चित्रपट पाहाणाची उत्कंठा अजुनच वाढवली आहे.
(टोरेंट शोधुन लवकरच उतरवुन घेतो.)
"....बघवेल की नाही शंकाच आहे तरी....."
~ शुचिताई, जरूर पाहा. प्रत्येक "आई"ने हा चित्रपट पाहावा असाच आहे. मी जरी परिक्षणात "डॅनी" ला जेसनची कार उडविते आणि तो गतप्राण होतो असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात हे दृश्य दिग्दर्शकाने पडद्यावर दाखविलेले नसल्याने अपघातामुळे 'शहारे' येणे असला प्रकार नाही. चित्रपट फ्लॅशबॅक तंत्राने घेतला असून डॅनीचा मृत्यु आणि त्यामागील कारण हे संवादातूनच प्रकट होते....डॅनीसोबत खेळ आणि दंगामस्ती हे हॉवीने केलेल्या व्हिडिओ चित्रणातून प्रेक्षकाला कळते. केवळा भावमुद्रा आणि तितकेच हळवे संवाद (+ चित्रीकरण) यामुळेच एखादा चित्रपट कसा खिळवून ठेवतो, याचे 'रॅबिट होल' एक छान उदाहरण आहे.
इन्द्रा
लकी आहात तुम्ही धनंजय की तुम्हाला थेट नाटकच पाहायला मिळाले. मुळात नाटक गाजले (अजूनही गाजतच आहे) म्हणून निकोल किडमनला त्यावर चित्रपट निर्माण करण्याची स्फूर्ती मिळाली (तीच निर्माती आहे). डेव्हिड लिंडसेला तर नाटकाबद्दलच 'पुलित्झर प्राईझ' मिळाले होते....तर यात बेक्काची भूमिका करणार्या सिंथिया निक्सन हिला 'टोनी अवॉर्ड" जे नाट्यदुनियेत ऑस्करच्या तोडीचे मानले जाते. हाही योगायोगच की निकोल हिलाही त्याच भूमिकेसाठी ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले आहे.
(थोडीशी उत्सुकता : तुम्ही 'सिंथिया' ने साकारलेली बेक्का पाहिली?)
इन्द्रा
"....विहीर पण पाहिलेला नाही. पण मिपावर त्याविषयी वाचल्यासारखं आठवतंय. काही साम्य आहे का कुठेतरी?...."
~ श्री.आ.रा...तुम्ही जर अमिताभ बच्चन निर्मित आणि उमेश कुलकर्णी दिग्दृशित "विहीर' बद्दल म्हणत असाल तर 'रॅबिट होल' आणि 'विहीर' मध्ये काही साम्य नाही.
"विहीर" ची कथा दोन मावस भावांमधील आहे. एक समिर आणि दुसरा नचिकेत. समीर आपल्या गावाकडील भावाला फार मानतो. पत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. समीर आपल्या मावशीच्या लग्नानिमित्य पुण्याहून नचिकेतच्या गावी येतो. पण नचिकेत सतत भविष्याविषयी गूढ बोलत असतो....पुढे विहीरीत पडून त्याचा मृत्यूही होतो....पुण्यास परत आलेल्या समीरला ते पटत नाही....आणि तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच गावातील एक मेंढपाळ त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगून ताळ्यावर आणतो...असे काहीसे 'विहिर' चे कथानक आहे.
अर्थात तुमच्या नजरेतील 'विहीर' दुसरी असेल तर त्याविषयी शोधले पाहिजे.
इन्द्रा
निकोल किडमन दिसते सुरेखच. तिचा इतका चांगला अभिनय बघायला नक्की आवडेल.
मूल जाण्याचं दु:ख आणि त्याबरोबरची जन्मभर पुरून उरणारी वेदना कोणत्याही देशातली असो किंवा भाषेतली असो, तेवढीच उत्कट.
अनुपम खेरचा १९८४ सालचा एक नितांत सुंदर चित्रपट आठवला. " सारांश."
".... सारांश"...
~ या चित्रपटाबद्दल ऐकले, वाचले आहे बरेच. पण का कोण जाणे पाहायला मात्र अजून मिळालेला नाही. कथानक अंधुकसे माहीत आहे, म्हणजे अनुपम खेर यांचा मुलगा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये अपघातात मरण पावलेला असतो आणि त्याची रक्षा आणायला ते एका समवयस्क मित्रासमवेत मुंबई विमानतळावर जातात, तर तिथे त्यांची नित्याच्या रितरिवाजानुसार ससेहोलपट होते....पुढे काही राजकारणही आहे...इ.
'रॅबिट होल' मधील डॅनी हा मुलगा मात्र ४ वर्षाचा असून बंगल्यासमोरील रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू होतो असे दाखविले आहे....[तेही संवादातून...प्रत्यक्ष अपघात दाखविला नसूनही हा प्रसंग प्रभावीपणे ठसतो.]
जरूर पाहा, फार भावेल तुम्हाला.
इन्द्रा
सुरेख परीक्षण..
निकोल नी फिगर जपण्यासाठि "सरोगेट मदर" च्या माध्यमातुन स्वतः च्या मुला ला जन्म दिला हे वाचण्यात आले. ते खरे आहे का ? ते कसे शक्य आहे ? असे तंत्रज्ञान कुठल्या देशात उपलब्ध आहे ?
"....सरोगेट मदर" च्या माध्यमातुन..."
~ होय. ही सत्य घटना आहे. १७ जानेवारीला निकोल आणि तिचा पती कीथ अर्बन (जो ऑस्ट्रेलियन आहे) यानी वार्ताहर परिषदेत असे जाहीर केले की, २८ डिसेंबर २०१० रोजी त्याना "सरोगेट मदर' माध्यमातून दुसर्या अपत्य प्राप्तीचा [नाव : फेथ मार्गारेट] लाभ झाला. या अगोदरही त्याना याचप्रकारे 'संडे रोझ' नावाची मुलगी झाली आहे, जी आता दोन वर्षाची आहे.
"...ते कसे शक्य आहे ?..."
~ अर्थातच. अमेरिका आणि कित्येक युरोपीअन देशात हा प्रघात सुखनैव चालू आहे. ही बाब स्पष्ट आहे की हा विषय आपल्या भारतीय मनाला 'नवखा' वा 'न पटणारा' होऊ शकतो, पण पाश्चिमात्य राष्ट्रांनी हे सायन्स एक उपयुक्ततेचे म्हणून स्वीकारल्याचे दिसतेच आहे. विशेष म्हणजे अशा बाळांना (जसे 'सिंगल मदर'ना) ही योग्य तो सामाजिक दर्जा मिळतोच.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "निकोल किडमन हिने फिगर जपण्यासाठी" हा पर्याय स्वीकारलाही असेल. पण सर्वच स्त्रिया केवळ 'फिगर' साठी 'सरोगेट' चा पर्याय घेतात असे नसून काही शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात वा लागोपाठ अॅबॉर्शन झाल्याने नैराश्य आलेल्या, तसेच लग्नाच्या बेडीत न अडकताही अपत्यसुख हवे असणार्या स्त्रियाही सरोगेट सिस्टीमला आपलेसे करीत असल्याचे दाखले आहेत.....अर्थात ही उदाहरणे युरोप आणि अमेरिकेतच प्रामुख्याने आढळतील.
(विषय थोडा किचकट आहे....त्यामुळे या विकल्पावर विश्वास बसणे थोडेसे कठीण वाटण्याची शक्यताही आहे.)
इन्द्रा
फिगर साठि हा पर्याय निवडायला काय हरकत आहे.
मुलं झाल्यावर बायकांची फिगर बिघडते हे सत्य नाकारुन चालणार नाहि. ह्याला अर्थात अपवाद आहेत. काहि बायकांची फिगर सुधारते सुध्दा. पण भारतात हे शक्य नाहि. राखी सावंत ने म्हणल्या प्रमाणे " जो भगवान नहि देता वो डॉक्टर देता है "
जर हे तंत्रज्ञान भारतात काहि वर्षां पुर्वी उपलब्ध असते तर भारतीय स्त्री ला हि लाभ झाला असता. अशी आशा करुया कि भारतीय स्त्रीयांना हि लवकरच हे तंत्र उपलब्ध होइल. बच्चन ह्यांच्या घरी हि पाळणा हलेल.
कतरीना, प्रियंका आदि नामवंत नट्या ह्याचा लाभ घेतील आणि उगाच लग्नाच्या फंदात पडणार नाहित.
सान्ड्रा बुलक, मॅडोना, एन्जलीना जोली ह्या सगळ्या जरा थांबल्या असत्या तर त्यांना अफ्रिकेत जाउन बेवारशी मुलं दत्तक घेयला लागली नसती..
बाय द वे.. तुम्हि "ब्रुनो " नावाचा सिनेमा पाहिला आहे का.. जरुर बघा.. त्यात एक दत्तक घेण्याचा चांगला सीन आहे.
"...फिगर साठि हा पर्याय निवडायला काय हरकत आहे..."
~ वेल. या कारणासाठी (च) जर हा पर्याय निवडायचा असेल तर ती व्यक्ती [अर्थात फीमेल] एंटरटेनमेन्ट, फॅशन या क्षेत्राशी संबंधित असेल अथवा टेनिस, स्केटींग वा तत्सम क्रिडाक्षेत्रातील असेल. कारण ही काही मोजकी क्षेत्र अशी आहेत की तिथे त्या स्त्रीला आपल्या 'करीअर' साठी फिगरची काळजी महत्वाची वाटत असते. अर्थात तिचा जोडीदारही बहुतांशी त्याच क्षेत्रातील असल्याने [जसे निकोलबाबतीत आहे] त्यालाही अशारितीने 'पालक' होणे गैर वाटणार नाही. अमेरिकेत तर सरकारमान्य 'आर्टिफिशिअल इनसेमिनेशन क्लिनिक्स' आहेत इतका हा प्रकार समाजाभिमुख झाला आहे.
भारतातही ही संकल्पना रुजत आहे, पण तिचा प्रसार अमेरिकेत जितक्या वेगाने झाला आहे तितका नक्कीच नाही. पण काही महिन्यापूर्वी "अनुबंध" या मराठी मालिकेत हाच विषय विस्तृत प्रमाणावर घेतल्याचे आढळले होते आणि या मालिकेला मिळालेले टीआरपी पाहाता इथल्या महिला वर्गानेही हा विकल्प चांगलाच आहे असे मान्य केल्याचे निदर्शनास आले होते. [अर्थात नेहमीप्रमाणे 'अनुबंध' मध्ये 'सरोगेट मदर' च्या डोळ्यातून गंगा-जमुना-कावेरी-गोदावरी-तापीला येणार नाहीत इतके पूर आणून मूळ विषय भरकटून टाकण्याचा नित्याचा प्रकारही झाला होताच....असो]
सॅण्ड्रा बुलॉक, मॅडोना आणि अॅन्जेलिना जोली यानी काही अनाथाना दत्तक घेणे आणि 'सरोगेट मदर' या कल्पनेशा सांगड घालणे ठीक नाही असे मला वाटते. त्यांचा विषय सर्वस्वी वेगळा आहे.
("ब्रुनो..." ~ हा हुकला. कारण एका 'गे' तरुणावर आधारित विनोदी चित्रपट आहे इतपतच माहित असल्याने माझे त्याच्याकडे लक्ष गेलेच नाही. पण 'दत्तक' कल्पना आहे, हे आता तुमच्याकडून कळाल्याने जरूर पाहिन. थॅन्क्स !)
इन्द्रा
अभ्यासपुर्ण उत्तरा साठि धन्यवाद.
भारतात हि कल्पना रुजत नाहि याचा खेद वाटतो.
भारतीय स्त्रीया स्वत: च्या फिगर ची काळजी घेत नाहित त्या मुळे भारतीय युवक अमेरीकेसारख्या देशात गमन करतात असे म्हणले तर चुकिचे ठरणार नाहि. तुमचे काय मत आहे ?
गुजरात नेहमी भारताच्या एक पाउल पुढे असतो.
सहज यांनी छान सर्च करुन माहिती पुरवली आहे. पण सहजराव किंवा अन्य कोणी ह्या धाग्यांचे मराठित भाषांतर करुन लिहिले तर सगळ्यांना समजेल व लाभ होईल.
"...'भाड्याने गर्भाशय' ही संकल्पना भारतात गुजराथमधे बर्यापैकी रुजली आहे. .."
~ होय, सहज. मला माहीत होती ती बातमी. खरे तर यामागील इतिहास तपासता आला तर तो एक रोचक शोध होईल कारण गुजराथमध्ये 'टेस्ट ट्यूब बेबी', 'सरोगेसी' या संकल्पना जितक्या मराठी मनाला वाटतात तितक्या नव्या बिलकुल नाहीत. [इथे पैशाचा प्रश्न आहे की नाही, हा घटक दुय्यम मानू या.]
१९८० साली (म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटला] प्रभाकर पणशीकर यानी अनिल बर्वे लिखित 'पुत्रकामेष्टी' नावाचे नाटक रंगमंचावर आणले होते. त्यात नेमका हाच विषय घेतला होता....[मधू कांबीकर ही एक वेश्या असून ती सुधा करमरकर आणि पणशीकर या दांपत्यासाठी आपल्या गर्भात मूल वाढविण्यास तयार होते....अर्थात योग्य तो मोबदला घेऊन, असे काहीसे ढोबळ कथानक....यांची नाटकातील नावे आता आठवत नाही]. पण वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक कांती मडिया यानी सर्वप्रथम हे नाटक गुजराथीमध्ये अनुवादित करून घेतले आणि 'मृगजल सिंचीने.." या नावाने प्रथम तिथेच मंचावर आणले जे तुफान गाजले, इतकेच नव्हे तर 'सरोगसी' ची ती कल्पना मराठी प्रेक्षकांपेक्षा गुजराथी प्रेक्षकाने चटकन स्वीकारली.....मराठी अवतार 'पुत्रकामेष्टी' ला म्हणावा तितका प्रतिसाद न मिळण्यामागे तो विषय इथे पचनी पडला नाही, हेच सार.
'त्या' बातमीतील 'आणंद' गावाने याबाबतीत जे नाव मिळविले आहे त्यावरून तिथे ही कल्पना आता नाविन्याच्या पलिकडील वाटत आहे हे स्पष्टच दिसते.
इन्द्रा
"....भारतात हि कल्पना रुजत नाहि याचा खेद वाटतो...."
~ श्री.वडिल यानी वर एका प्रतिसादात हा विचार मांडला आहे. पण ही कल्पना इथे किती रुळत चालली आहे याचे उत्तर येत्या ११ फेब्रुवारी २०११ ला इथे प्रदर्शित होत असलेला "मला आई व्हायचंय !" हा इंडो-अमेरिकन संयुक्त निर्मिती पाहण्यास अजिबात विसरू नका (दोन्ही देशातील कलाकार आहेत चित्रपटात). मुंबई हायकोर्टात वकीली करीत असलेल्या समृद्धी पोरे यानी निर्माण केलेला 'सरोगेट मदर' या विषयावरील हा चित्रपट अमेरिकेत अनेक पारितोषिके विजेता ठरला आहे.
मला कथानक माहीत आहे, पण ते इथे लिहून रसभंग करणे उचित नाही.
इन्द्रा
सरोगेट मदर या तंत्राच्या उपयोगापाठी "फिगर" राखणे हे एकच कारण नसावे. या नट्या एवढ्या बिझी असतात, की मूल पोटात ९ महिने वाढवायला त्यांच्याकडे वेळ नसतो. या ९ महिन्यात तब्येतीची इतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अशा कारणामुळे शूटिंग झालं नाही तर निर्मात्याचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. ऐश्वर्या रायच्या पुढच्या ४ वर्षांच्या तारखा बुक झालेल्या आहेत असं एका माहितगार व्यक्तीकडून ऐकलं.
योग्य व्यायाम आणि आहार याच्या मदतीने फिगर राखणे हे कोणालाही शक्य आहे. भारतीय सिनेमा सृष्टीत हेमा मालिनी, डिंपल कपाडिया, मलाइका अरोरा-खान अशी कितीतरी उदाहरणे आहेत, या सगळ्या जणी २ मुलांच्या आया आहेत. पण हेमा आजही तिच्या मुलीपेक्षा सुंदर दिसते, तर मलाइकाची मुन्नी बघताना लोक काय प्रतिक्रिया देतात हे वेगळं सांगायला नकोच!
प्रतिक्रिया
+१
गणपा शी सहमत
खरच...
चित्रपट उत्कट वाटतो आहे.
फ्लॅशबॅक तंत्र....!!
सुरेख परिक्षण!!!
छान परिक्षण!
सुरेख परिक्षण
मस्त...
छान परिक्षण
निशब्द आणि हतबुद्ध ! सुरेख
छान परीक्षण
मस्त लिहिले आहे रे इंद्रा.
मस्तं लिहीले आहेस इंद्रा.
खूप छान परिक्षण
मस्त
सुरेख
व्वा. मस्त परिक्षण. बघणारच.
छान परीक्षण
सिंथिया निक्सन...!!
छान!
विहीर आणि रॅबिट होल....!
सुंदर चित्रपट परिक्षण !!! और
मान गये उस्ताद!
अप्रतिम परीक्षण
सारांश आणि रॅबिट होल...!
सुरेख परिक्षण !!
सुरेख...
सुरेख परीक्षण.. निकोल नी फिगर
सरोगेट मदर....!!
फिगर साठि हा पर्याय निवडायला
पर्याय
अभ्यासपुर्ण उत्तरा साठि
एवढे अवांतर झालेच आहे तर
गुजरात नेहमी भारताच्या एक
पुत्रकामेष्टी....!!
रोचक माहिती. भारतीय नट्या
"मला आई व्हायचंय.... !"
थोड विषयांतर झाल आहेच आणि
फिगर
छान
मस्त