विहंग नायकांना माझीही नम्र आदरांजली. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची भूमिका असलेले 'स्थळ: स्नेहसदन' हे गोवा हिंदू असोसिएशनचे
नाटक पाहिले होते. बायकोशी भांडणार्या, व्यायामात टाळाटाळ करणार्या वृद्धाची त्यांची भूमिका टिपीकल असली, तरी प्रेक्षकांची दाद घेऊन गेली होती.
... हा धागा उशीराच पाहिला...आणि काल ही आठवण लिहू शकलो नाही...
,,...
"पाहिजे जातीचे " या तेंडुलकर लिखित आणि " अरविन्द देशपांडे दिग्दर्शित नाटकात विहंग नायक आणि नाना पाटेकर काम करत असत...
या नाटकासंदर्भात त्यांची आठवण...... त्यांच्याच शब्दांत...
नाटकातील सर्वात कठीण प्रसंग ... मी नानाच्या श्रीमुखात भडकावतो तो...पपांनी ( अरविंद देशपांडे) हा प्रसंग बसवताना नानाला गालावर हात ठेवायला सांगितला, परंतु नानाच्या बेरड प्रकृतीला हे बरे वाटेना...आणि पहिल्या प्रयोगापासून तो डायरेक्ट गालावर मारून घेऊ लागला...जराही बेअरिंग न सोडता मी प्रत्येक वेळी ओठातल्या ओठात "सॉरी नाना " म्हणत राहिलो .. हे प्रकरण बराच काळ चाललं ... मागाहून नाना गालावर हात ठेवू लागला आणि माझं सॉरी म्हणणं पण बंद झालं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विहंग नायक यांना माझीही आदरांजली. एक सहज अभिनय करणारा कलावंत हरपला. लहानपणी दूरदर्शन वर 'गजरा' नावाचा कार्यक्रम होत असे. त्यात पहिल्यांदा या गुणी कलावंताची ओळख झाली होती. मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक...
बिपिन.
मराठी कलावंतांच्या मागे अपघाती किंवा अकाली मृत्यूचा काय शाप आहे हे कळत नाही. जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सरनाईक, भक्ति बर्वे आता विहंग नायक...
हम्म! ही गोष्ट मात्र खरी आहे. हा एक विचित्रच योगायोग म्हणावा लागेल!
आपल्या सगळ्यांनाच एकाच गोष्टीपुढे नेहमी मान झुकवावीच लागते आणि ती गोष्ट म्हणजे नियती! अपघाताचे निमित्त साधून नियतीने ही अतिशय उमदी लोकं आपल्यातून उचलली आहेत!
सिंहासन सिनेमात मुख्यमंत्र्याच्या भूमिकेचं अतिशय उत्तम रितीने बेअरिंग सांभाळणार्या अरूण सरनाईकासारख्या एका देखण्या आणि उमद्या नटाचा असाच अपघाती अंत व्हावा, ही गोष्ट आज इतक्या वर्षांनंतरही तेवढीच चटका लावून जाते! माझा अत्यंत आवडता कलाकार होता तो!
आपला,
(नियतीपुढे हतबल) तात्या.
खूपच बोलका चेहरा असलेले विहंग नायक दूरदर्शनमुळे चांगलेच आठवतात. तसे दूरदर्शनवर अनेक चेहरे दिसतात, काही विसरले जातात, पण विहंग नायक आपल्या वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहिले.
एक आदर्शवादी कर्तव्यदक्ष शिक्षक, प्रेमळ व भाबडा बाप आणि अत्यंत सज्जन गृहस्थ अशा भूमिकेतून ते गेले कांही महिने रोज टीव्हीवर दिसत असत. त्यांनी आमच्या मनात घर केले होते. अशा गुणी कलावंताचे असे अकाली निधन फारच दु।खदायक आहे. त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
आदरांजली
ओह!!
पाहिजे जातीचे. . . . .!
अगदी हेच!
माझीही आदरांजली.
बातमी धक्कादायक...
हेच म्हणतो.
आदरांजली
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरेरे!
आदरांजली
सक्षम कलाकार....
मास्तर..
विहंग नायक यांना माझीही आदरांजली....
विहंग नायक यांना माझीही आदरांजली....
माझीही आदरांजली...
हम्म!
बातमी
गुणी कलाकार
आदर्श शिक्षक
प्रेमळ व भाबडा बाप
श्रद्धांजली
आदरा॑जली.