नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ?
एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा
"पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर
नाहीतर एक दिवस,मिर्या वाटील डोक्यावर"
दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी
हिची सून गोरी अन् तिची सून काळी
हिच्या मुलीला गेलेत 'दिवस'
तिच्या मुलीला संपलाय 'आठवा'
हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा
"सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा
बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ?
एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा
-नाहिद नालबंद
याद्या
2765
प्रतिक्रिया
12
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपाव
नालबंदींवर बंदी घाला
....आणी म्हणुनच आम्हा
In reply to नालबंदींवर बंदी घाला by कच्ची कैरी
लेख बायकांवर आहे , कच्च्या
In reply to ....आणी म्हणुनच आम्हा by नरेशकुमार
ठिक आहे, मिंतियान ला भेटु.
In reply to लेख बायकांवर आहे , कच्च्या by टारझन
तसेही कैरी पिकली की त्याला
In reply to लेख बायकांवर आहे , कच्च्या by टारझन
बायका
In reply to नालबंदींवर बंदी घाला by कच्ची कैरी
नाहीतर एक दिवस,मिर्या वाटील
आणि त्याने ते खरे करुन
In reply to नाहीतर एक दिवस,मिर्या वाटील by विजुभाऊ
वात्रटिका
हेच
In reply to वात्रटिका by धनंजय
प्रयत्न चांगला आहे.
खुमासदार