Skip to main content

बायका

प्रकाशित मुखपृष्ठ
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा "पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर" दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी हिची सून गोरी अन् तिची सून काळी हिच्या मुलीला गेलेत 'दिवस' तिच्या मुलीला संपलाय 'आठवा' हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा "सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा -नाहिद नालबंद

याद्या 2765
प्रतिक्रिया 12

लेखनविषय:
काव्यरस

नालबंदवरच बंदी घालावी असे वाटते म्हणे नसत्या चौकश्या कशाला लागतात या बायकांना ?अहो भाऊ आमच्याजवळ स्वत:सठी वेळ नाही इथे चौकशा कुण्याच्या करणार ?येता -जाता शिकवत असतात शहाणपणा -आमच्याजवळ शहाणपणा आहे म्हणुन शिकवतो दुसर्यांना कारण ज्ञान वाटल्याने वाढते आणी म्हणुनच आम्हा बायकांजवळ ज्ञान वाढतच चालले आहे .

In reply to by नरेशकुमार

लेख बायकांवर आहे , कच्च्या कैर्‍यांवर नाही .. ह्यांना मिरचीचे लोणचे का लागले कळले नाही ;) - अंबा पाय्री

In reply to by टारझन

तसेही कैरी पिकली की त्याला आंबा म्हणतात! कैरी ही कच्चीच असते. हे म्हणजे पिवळे पितांबर, गाईचे गोमुत्र म्हंटल्यासारखे झाले.

In reply to by कच्ची कैरी

अहो "कच्ची" कैरी कळकळीची विनंती - एवढं मनाला लावून (सिरियसली) घेऊ नका हो ! लिखाणाकडे एक कलाकृती म्हणून पहाल का ?