✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'द किंग'

प
प्रास यांनी
Tue, 01/25/2011 - 21:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4151 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलं आहे. एक गोष्ट

मराठे
Tue, 01/25/2011 - 21:16 नवीन
चांगलं लिहिलं आहे. एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही म्हणून सांगतो, थोडे दिवस थांबून जर हा लेख टाकला असतात तर जास्त सयुक्तीक झालं असतं. शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं. अर्थात मी एल्विसला कमी लेखतोय असं कृपा करून समजू नका..
  • Log in or register to post comments

सहमत आहे

प्रास
Tue, 01/25/2011 - 22:26 नवीन
मराठेजी, तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. थोडे दिवस थांबून हा लेख टाकला असता तर जास्त संयुक्तिक झाले असते. तरी स्वरभास्कर भीमसेनांविषयी काही लिहिण्यासाठी मी माझी लेखणी पारजावी इतकी तिची लायकी नाही असं मला वाटतं. तसा विचार आहे पण त्यावर मनन करण्याइतपतही धीर अजून गोळा करु धजलो नाहीये. आणि म्हणूनच त्यांचा एकप्रकारे सांगीतिक सहप्रवासी असलेल्या 'एल्व्हिस'वर लिहून थोडा मनावरचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार पण अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास उदार मनाने क्षमा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

शेजारी भिमसेनांचा फोटो असताना

आमोद शिंदे
Wed, 01/26/2011 - 04:03 नवीन
शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं.
हे जरा अतीच होतय हा! अण्णा गेले अतिशय दु:खद घटना पण म्हणून त्यांचा फोटो मिपावरुन काढेपर्यंत कुठल्याही गायकाविषयी लिहू नये हे कसले सयुक्तिक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

एल्व्हिस प्रिसले ची "गॉसपेल"

शुचि
Wed, 01/26/2011 - 05:45 नवीन
एल्व्हिस प्रिसले ची "गॉसपेल" गाणी ऐकली आहेत. अतिशय आवडली........खूप खूप आवडली. संध्याकाळी दुवे टाकते. प्रास आपला लेख खूप आवडला. : ) मला वाटतं ही खालची गाणी एल्व्हीस प्रिसले ची गॉसपेल गाणी आहेत. तसं कुठेही ठळक म्हटलं नाही पण अनावर जादू आहे. - http://www.youtube.com/watch?v=62Ym0gONsaU&feature=related http://www.youtube.com/watch?v=P1d4Rp8SXF8&feature=related http://www.youtube.com/watch?v=SSFFciPS-xA&feature=related http://www.youtube.com/watch?v=cLTYlxmQs90&feature=related http://www.youtube.com/watch?v=lAjgCElQXVE&feature=related http://www.youtube.com/watch?v=zaNLgPmUTUY&NR=1
  • Log in or register to post comments

धन्यवाद शुचि......

प्रास
Tue, 01/25/2011 - 22:35 नवीन
धन्यवाद शुचि......
  • Log in or register to post comments

जादुगार....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 01/25/2011 - 23:23 नवीन
फार सुंदर (आणि तितक्याच भावुकतेने...) रितीने "किंग" वर लिहिले आहे 'प्रास' यानी. अमेरिकेत नोकरी निमित्ताने असलेल्या माझ्या एका मित्राच्या थोरल्या काकांनी (जे आत्ता वयाच्या सत्तरीत असतील) त्याला कधीतरी सवड मिळाल्यास फॉरेस्ट हिल्स एरियात 'ग्रेसलॅण्ड' या ठिकाणी जाऊन येण्यास सांगितले होते व तिथे न चुकता 'प्रिस्ले म्युझियम' ला भेट देण्याची आठवण केली होती. मित्र आजच्या पिढीतील असल्याने 'एल्व्हिस' बद्दल फक्त जितके वाचले होते तितपतच त्याला माहिती, पण आपले काका किंगबद्दल 'मॅड' का होते (आजही आहेतच...) हे त्याला प्रत्यक्ष ग्रेसलॅण्डच्या म्युझियमला भेट दिल्यावरच कळाले. प्रतिवर्षी (अगदी आजही....एल्व्हिसच्या मृत्युनंतर ३५ वर्षानीही) जवळपास ८ ते १० लाख पर्यटक 'लाडक्या एल्व्हिस प्रिस्ले' च्या आठवणीसाठी तिथे हजेरी लावून त्याच्या जादुचा जो आनंद घेतात तो केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यासारखाच आहे असे मित्राने आम्हाला इथे पत्राद्वारे कळविले होते. एक रॉक एन्ड रोल गायक आणि सार्‍या अमेरिकेच्या गळ्यातील ताईत बनतो आणि जितक्या वेगाने तळपतो तितक्याच वेगाने पृथ्वीतलावरून नाहिसाही होतो (त्याच्या मृत्युमागील कारणाचे थडगे उकरण्यातही काही अर्थ नसतो... असे कलाकार एका धुंदीतच जगतात आणि जातानाही त्या धुंदीत निघून जातात. त्यांच्या जीवनशैलीची सर्वसामान्यांच्या शैलीशी तुलना न करणे हेच खरे !). एल्व्हिस प्रिस्ले, पॅट बून आणि क्लिफ रिचर्ड या कलाकारांनी १९५० ते १९७० हा कालखंड आपल्या गायनशैलीने असा काही अविस्मरणीय केला होता की त्या काळातील त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेखन वाचले की त्यांनी जगभरातील कानसेनांचे आयुष्य किती मनोहारी केले होते याची झलक मिळते. छान आठवण शब्दबध्द केली आहे, प्रास तुम्ही...धन्यवाद ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

मेंफीस म्हणजे तर माझं जुनं गाव!!

दैत्य
Tue, 01/25/2011 - 23:48 नवीन
अरेच्च्य्या!! मेंफीस म्हणजे तर माझं जुनं गाव!!....मी दोन वर्षं तिकडं राहिलो आहे... 'मेंफीस आणि एल्व्हिस' ऐकायला माझे कान सतत टवकारले जातात!... एल्व्हिसबद्दल म्हणाल तर लोक अजूनही मानतात. ग्रेसलंड तसं सिटीच्या बाहेर आहे, पण त्या भागात सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते. शहरात प्रवेश करतानांच एल्व्हिसचं मोठं चित्र आहे, आणि निऑन साइन वाली गिटार वगैरे.... सध्या तसंही रॉक एन रोल इतिहासजमा झाल्यामुळे त्याला फक्त 'पर्यटन मूल्य' राहिलं आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

मी-सौरभ
Wed, 01/26/2011 - 02:18 नवीन
ऐकल पाहिजे परत एकदा सगळं
  • Log in or register to post comments

वा

आवडाबाई
Wed, 01/26/2011 - 23:58 नवीन
काय आठवण करून दिलीत ! "तू कधी एल्विस ऐकला नाहीस ? धन्य आहेस ! माझ्याकडून कॅसेट घेऊन जा, पण ऐक !" - असं सांगून ती कॅसेट (तेव्हा कॅसेटच असायच्या) अक्षरश: माझ्या गळ्यात मारून मला ऐकायला भाग पाडणार्‍या मित्राचे किती आभार मानू ! जास्त करून रॉक न रोल ऐकले आहे - लव मी टेंडर, डेविल इन डिसगाईज, कान्ट हेल्प फॉलिंग इन लव, इट्स नाऊ अऑर नेवर आणि अर्थात आर यू लोनसम टूनाईट ! वॉव ! काही गॉस्पेल ऐकलीत, आता पुन्हा ऐकते ! दुवा देणार्‍या सार्‍यांना दुवा ! त्याची कमी गाजलेली, पण छान अशी कुठली गाणी आहेत? कारण त्याची शेकडो गाणी आहेत असे ऐकले आहे, पण ऐकली गेली आहेत काही सिलेक्टेड. मस्त लेख !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा