Skip to main content

रावणाला कोणी मारला ?

प्रकाशित मुखपृष्ठ
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला मुख्याध्यापक म्हणाले - "शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?"; "जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?" - नाहिद नालबंद

याद्या 2960
प्रतिक्रिया 14

लेखनविषय:
काव्यरस

मजेदार आहे... आधी मला वाटले की आता काही नवीन पौराणीक धागे दोरे मिळाले की काय ज्यातून सिद्ध झाले की रावणाला रामाने मारलेच नाही वगैरे म्हणून. ;)

In reply to by विकास

मलासुध्दा असेच वाटले होते. विनोदाचे कवीतेत भन्नाट रुपांतर केला आहेस.

नाना, ब्येष्ट कविता बघा ! असा एक जोक ऐकला होता ! तुमची हरकत नसेल तर ह्यच्याच पुढे दोन कडवी सुचत आहेत...ती टाकतो.. मुख्याध्यापक म्हणाले - "शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?"; "जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?" तेवढ्यात चुणचुणीत विद्यार्थी पुढे आला, "हिंसेबद्दल सगळे निषेध व्यक्त करुयात मूक-निदर्शने आणि जाहिर शोकसभेने मारेकर्याचे मन बदलूयात!" मास्तरांना अतिशय आनंद झाला वाटले अहिंसेचा आज केवढा विजय झाला अधिकारी मात्र पेंचात पडला, म्हणला काय करावे ह्या गावाला, ह्या शाळेला, काय हो मास्तर, सहज सोप्पा सवाल काय विचारला इतिहास सोडून तुम्ही राजनितीत घुसला 'राम' उत्तर अपेक्षित होते, त्याचाही तुम्ही 'हे राम' केला!

In reply to by दैत्य

कविता आवडली आणि दैत्याची कडवीसुद्धा.