एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.
"रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला
अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला -
"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला
मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?"
- नाहिद नालबंद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2972
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम...
सहमत.
In reply to उत्तम... by विकास
झकास! विनोद ऐकला होता. पण
कविता आवडली .. मस्त आहे
रावण हा देखील दशरथाचाच मुलगा
विनोदी!
मस्त
In reply to विनोदी! by दैत्य
मस्त रिप्लाय ... आवडला
In reply to विनोदी! by दैत्य
नाना?? अस्सं आहे होय!!
In reply to विनोदी! by दैत्य
दैत्य- गदिमांचे शब्द आठवले.
In reply to विनोदी! by दैत्य
सॉलीड
In reply to विनोदी! by दैत्य
उत्तम आहे कविता
हा हा हाहा
मस्त...दैत्यांचे उत्तरही