✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गड्डा यात्रा सोलापुर

५
५० फक्त यांनी
Tue, 01/25/2011 - 15:17  ·  लेख
लेख
  • गड्डा यात्रा - काठ्यांचे फोटो

Book traversal links for गड्डा यात्रा सोलापुर

  • गड्डा यात्रा - काठ्यांचे फोटो ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31307 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

झाडून सगळे फोटो अप्रतिम

स्पा
Tue, 01/25/2011 - 15:55 नवीन
झाडून सगळे फोटो अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

कच्ची कैरी
Tue, 01/25/2011 - 16:03 नवीन
फोटोसहित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली .बाकी फोटो १ नंबर हं !
  • Log in or register to post comments

पाळण्यांत बसायला मी अजुनही

मुलूखावेगळी
Tue, 01/25/2011 - 16:11 नवीन
पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
मी पाळन्यात बसुन घाबरते ;) बाकि २-३ लेख एकत्रच टाकलेत. असे वाटतेय कष्ट वाचवन्यासाठी होलसेल सगळे फोटो १ नम्बर मी अचानक न ठरवता गेलेली आहे सोलापुरच्या गड्ड्याला बर्याचदा
  • Log in or register to post comments

स्पा, कच्ची कॅरी व मुवे ,

५० फक्त
Tue, 01/25/2011 - 16:23 नवीन
स्पा, कच्ची कॅरी व मुवे , प्रतिसादांसाठी अतिशय धन्यवाद. @ मुवे - मी अचानक न ठरवता गेलेली आहे सोलापुरच्या गड्ड्याला बर्याचदा - हा हिशोब काही समजला नाही, आणि २-३ लेख एकत्र नाहीत, एकच आहे आणि तो ही लेख नाही, फोटोच जास्त आहेत. पाळण्यांत एकदा बसले की भिती नाही वाटत, वाटते ती आधिच. (लग्नासारखं) हर्षद.
  • Log in or register to post comments

नाही मला असे म्ह्नानायचे होते

मुलूखावेगळी
Tue, 01/25/2011 - 16:31 नवीन
नाही मला असे म्ह्नानायचे होते कि मी जेव्हाही सोलापुरला गेलेय तेव्हा गड्डा यात्रा होती तिथे पन मी ठरवुन कधीच गेले नव्हते.
  • Log in or register to post comments

खिळाच्या वर उभे राहुन आशिर्वाद ?

आत्मशून्य
Tue, 01/25/2011 - 18:58 नवीन
तसे अधून मधून खाली उतरावेच लागते नाही तर पायात खीळे रूतायला सूरूवात होते. तसेच दोन खीळ्यांमधील अंतरही फार कमी असते ज्या मूळे जास्त खीळे वापरता येऊन शरीरचे वजन जास्तीजास्त खीळ्यात वीभागले गेल्याने खीळे टोचत (खोल वर रूतत )नाहीत. बाकी चांगले अ‍ॅक्यूप्रेशर होत असावे, तब्येत छान राहील त्यांची (योगसाधनेमूळे न्हवे). पण शक्य असेल तर पायखाली फक्त ५-६ खीळे ठेवून आशीर्वादाला ऊभे राहून दाखवा म्हणावे :) एकूणच फोटो मस्त हे काय सांगयलाच हवे ....??
  • Log in or register to post comments

मस्त झाली म्हणायची ट्रीप ..

गणेशा
Tue, 01/25/2011 - 19:10 नवीन
मस्त झाली म्हणायची ट्रीप .. सर्व वृत्तांत मस्त मजा करत रहा.. आम्ही ही सामिल होउच ..
  • Log in or register to post comments

झकास!

धमाल मुलगा
Tue, 01/25/2011 - 19:20 नवीन
खूप वर्षांपुर्वी गड्ड्याच्या यात्रेला जायला मिळालं होतं. एकदम झकास असते बा ही यात्रा. :) बाकी, मंदीर नव्यानेच सुशोभित केलं आहे का? माझ्या आठवणीतलं मंदीर बरंच जुनं आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त रिपोर्ताज.. मी सोलापूरात

यकु
Tue, 01/25/2011 - 19:44 नवीन
मस्त रिपोर्ताज.. मी सोलापूरात दोन वर्षे राहिलो आहे.. या यात्रेला "गड्डा" का म्हणायचं ते मला कुणीच सांगू शकलेलं नाही.. कदाचित कानडी शब्द असावा.. सोलापूरचे काही खास शब्द शेंगा चटणी, कंबर तलाव ( कानडी उच्चार खंबर ) .. शेंगदाणे म्हटलेलं त्यांना कळत नाही.. हसायला लागतात.. सोलापूर एक लै भारी शहरयं.. ऐतिहासिक आणि बिलकुल भपकेबाजी नसणारं..
  • Log in or register to post comments

यात्रा-जत्रा-देउळ सगळच

गणपा
Tue, 01/25/2011 - 19:53 नवीन
यात्रा-जत्रा-देउळ सगळच आवडल. :) वड्याचा फटु तर उगाच पाहिला अस झालं :(
  • Log in or register to post comments

जुने दीवस

मराठी_माणूस
Tue, 01/25/2011 - 19:55 नवीन
एकदम ३०/३५ वर्ष मागे गेलो. ह्या यात्रेचा खुप आनंद घेतला आहे. परत सचित्र आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

छान

सखी
Tue, 01/25/2011 - 20:40 नवीन
छानच फोटो, जत्रा, देऊळ, वृत्तांत - सगळचं आवडलं दुसरा फोटो विशेष आवडला. सोलापुरला काही वेळेस जाणं झालय तरी या यात्रेची कल्पना नव्हती. भाग्यश्री वड्याबद्दल बरच ऐकलं आहे, पण खायचा योग कधी येणार कोणास ठाऊक - त्यामुळे जास्तच जळजळ झाली. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही हे भारीच. पुलंच्या उपासची आठवण झाली. काहीस 'डाएटसाठी मधल्या वेळेचा भात सोडायचा ठरवलं, सुरवातीचा आणि शेवटचा घ्यायला हरकत नाही.' आणि तुम्ही मुलाचे फिरवुन व नंतर झोपल्याचे वर्णन केले आहे, त्याने मला माझ्या बाबांची आठवण झाली. फक्त ते सायकलवर खूप लांब, लांब देवदर्शनाला घेऊन जायचे, दर आठवड्यातुन २-३ वेळेस तरी. मी पुढे बसलेली असायची व येताना त्यांच्या हातावर झोपायची आणि त्यांना तशीच सायकल चालवायला लागायची. परत माझा इतका करंटेपणा की आपण दमलोय हेच त्यांना सांगायची, त्यांनी ते कधीच सांगितले नाही :(
  • Log in or register to post comments

मस्त...

योगप्रभू
Tue, 01/25/2011 - 20:49 नवीन
मला सोलापूर, तिथली माणसं आणि खादाडीच्या जागा खूप आवडल्या. त्यामुळे हे लेखन अर्थातच माझ्यासाठी मस्त ट्रीट.
  • Log in or register to post comments

मस्त! सोलापूरच्या गड्ड्याची

मराठे
Tue, 01/25/2011 - 23:09 नवीन
मस्त! सोलापूरच्या गड्ड्याची छान यात्रा घडवलीत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

+१

सद्दाम हुसैन
Wed, 01/26/2011 - 00:26 नवीन
फोटो तर खुपच सुरेख .. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रतिम मजा आली.

शुचि
Wed, 01/26/2011 - 03:16 नवीन
अप्रतिम :) मजा आली.
  • Log in or register to post comments

बेश्ट!

सहज
Wed, 01/26/2011 - 07:03 नवीन
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो फार आवडले!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!!

आमोद शिंदे
Wed, 01/26/2011 - 08:35 नवीन
गड्ड्यामधे रमलेल्या लेकाचा फोटू टाकला असतात तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आमोद प्रतिसादासाठी अतिशय

५० फक्त
Wed, 01/26/2011 - 09:10 नवीन
आमोद प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद, अरे बरेचसे फोटो लेकानंच काढलेत आणि गर्दि एवढी असते की असे फोटो काढायला वे़ळच मि़ळाला नाही, एक -दोन विडिओ आहेत, ते टाकतो आहे युट्युबवर आणि लिंक देतो इथे. हर्षद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

माझे बाबा जसे मला खांद्यावर

स्पंदना
Wed, 01/26/2011 - 08:24 नवीन
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत.... बस बस हर्शद भाई !! सलाम तुम्हाला, या अश्या भावनेन तर पुढची पिढी तयार होते. तुमच्या बाबांच पितृत्व फळाला आल.
  • Log in or register to post comments

तुम्हाला सर्वांना अतिशय

५० फक्त
गुरुवार, 01/27/2011 - 18:17 नवीन
तुम्हाला सर्वांना अतिशय धन्यवाद, १-२ दिवसांत लेकाचा व्हिडिओ टाकतो आहे इथेच पाहुन मजा करा त्याच्यासारखीच. हर्षद.
  • Log in or register to post comments

हा घ्या लेकाचा व्हिडिओ,

५० फक्त
गुरुवार, 01/27/2011 - 22:45 नवीन
हा घ्या लेकाचा व्हिडिओ, निळ्या कपात पांढरा हाफ शर्ट घालुन बसलेला माझा लेक.
  • Log in or register to post comments

बराच धीट आहे की तुमचा नान्या

यकु
Fri, 01/28/2011 - 00:26 नवीन
बराच धीट आहे की तुमचा नान्या (?).. वाकडं लावतोय तोच ना ;-) मला तर रहाटपाळणा पाहिला तरी चक्कर येते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

फोटो आणि वृत्तांत एक्दम

डावखुरा
Tue, 02/01/2011 - 16:51 नवीन
फोटो आणि वृत्तांत एक्दम भारी... त्या काठ्या घेउन ते नाचतात काहो...आणि त्याला काठ्या-कवाड्या म्हणतात का?
  • Log in or register to post comments

हर्षू, खासच आहेत रे फोटो!

क्रान्ति
गुरुवार, 02/03/2011 - 21:31 नवीन
हर्षू, खासच आहेत रे फोटो! अगदी दक्षिण कसब्यातून काठया पहातोय असं वाटलं! गणपा, या एकूण सात काठ्या असतात. पहिली लिंगायत समाजाची हिरेहब्बू यांची मानाची काठी. मग सोनार, कुंभार अशा इतर सगळ्यांच्या मिळून एकूण सात. श्री सिद्धरामेश्वर हे योगी, तपस्वी होते. ते अतिशय रूपवान, तेजस्वी दिसत. त्यांच्या एका कुंभार भक्ताची कन्या त्यांच्यावर भाळली आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तिनं इच्छा व्यक्त केली. पण सिद्धरामेश्वरांनी आपण योगी असल्यानं गृहस्थाश्रम आपल्याला वर्ज्य आहे असं तिला समजावलं. पण तीही निश्चयाची पक्की होती, तिनं मनोमन सिद्धरामेश्वरांना आपला पती मानून इतर कुणाशीही विवाह करणार नाही, असं आपल्या पित्याला सांगितलं. यावर उपाय म्हणून सिद्धरामेश्वरांनी आपला नंदीध्वज तिला दिला व याच्याशी तू विवाह कर असं सांगितलं. तिनं त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाशी विवाह केला आणि त्यानंतर होमकुंडात स्वत:ची आहुती दिली. या विवाहाचं प्रतिक म्हणून आजही संक्रांतीच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात या काठ्या आणि नंदीध्वज यांचा विवाह अगदी थाटामाटात, विधिपूर्वक संपन्न होतो आणि निम्म्याहून अधिक सोलापूरकर अगदी घरचं लग्न असल्यासारखे नटूनथटून या लग्नाला उपस्थित रहातात. भोगीदिवशी ६८ ज्योतिर्लिंगांना तेल लावण्याचा कार्यक्रम होतो, संक्रांतीदिवशी लग्न आणि किंक्रांतीला होम. होमादिवशी साडीचोळी अर्पण केली जाते भक्तांकडून कुंभारकन्येला. काठ्या या त्या कन्येचं प्रतिक. त्यांचा विवाह नंदीध्वजाशी होतो. या काठ्या इतक्या जड आणि उंच असतात, की त्या चालवायची प्रॆक्टीस केली जाते जवळजवळ महिनाभर आधीपासून, जशी गणपतीत लेझिमची करतो तशी. कारण ती काठी झुकून चालत नाही! उंची पण एवढी असते, की एक आठवडाभर रोडक्रॊस केबल काढून ठेवाव्या लागतात वीज आणि फोनवाल्यांना. त्यामुळे त्या मार्गावरचे फोन बंद रहातात, पण तेव्हा कुणी कुरकुर नाही करत! [अर्थात, आता तर मोबाइल आले, पण आम्ही जेव्हा तिथे होतो, तेव्हा एरवी फोन बंद झाला अर्ध्या तासासाठी, तरी ओरडणारे लोक तब्बल आठवडाभर काहीही तक्रार करायचे नाहीत!] बरं, ती मिरवणूक काही तास-दोन तासांची नसते, जवळजवळ अर्धा दिवस जातो त्यात, कारण घरोघरी दारात थांबवून त्या काठ्यांची पूजा केली जाते, नवसाचे खोबरं-लिंबू यांचे हार घातले जातात. आणि विशेष म्हणजे सोलापुरातील सगळ्या जातिधर्माचे लोक या सोहळ्यात सामील असतात! पारंपारिक बाराबंदी, फेटे घालून अनवाणी पायांनी सगळ्या वयातली मुलं-माणसं लगबगीनं काठी धरण्यासाठी धावत असतात! तोही मोठा मान असतो! आणि मग या विवाहानिमित्त यात्रा भरते मस्तपैकी भली मोठी. माझ्या बंधुराजानं फोटो दिलेच आहेत दोन दुव्यांमधे. मी मला आठवली तेवढी माहिती दिली.
  • Log in or register to post comments

या वर्षी यात्रा हुकली

मनिमौ
Fri, 03/31/2017 - 14:56 नवीन
पण लेख वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

भाग्यश्री वडा...

राघवेंद्र
Fri, 03/31/2017 - 21:54 नवीन
भाग्यश्री वडा... कधी जायचे सोलापूरला
  • Log in or register to post comments

छान फोटो आणी लेखन

सिरुसेरि
Sat, 04/01/2017 - 11:08 नवीन
छान फोटो आणी लेखन . सोलापुरजवळ माचनूर हे गाव आहे . तिथलेही मंदिर खुप भव्य , सुरेख आहे .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा