इनोद (अर्थातच पी जे, चोरलेले इ. इ.)
उगाच पाचकळपणा...
______________________
एक बाई दुसर्या बाईला विचारले
प.बा.:तु हा गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला..
--------------------------------
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?
दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या...
-------------------------------
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी.. हॅ हॅ हॅ...
-------------------------------
प्रियकर प्रेयसीला उत्साहाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..
आणि मग काय..
मग काय..
.
.
.
.
.
प्रेयसी झाडू लागली !!
--------------------------------
भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाउस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर..
----------------------------------
बंड्या: आई ..आई, बाहेर एक दाढीमिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत... ;-)
--------------------------------------------------------------------
एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा
बिझनेस काय म्हणतोय?
अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये. जरा माझ्या एअरटेल वर फोन करा..
------------------------------
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण!!
------------------------------
नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : तुला अफ्रीकेहून परत आणेन...
______________
आता तुमचे हाणा....
प्रतिक्रिया
पाच वाक्यात पाच ज्योक
हा जोक ज्यांना अश्लील वाटेल त्यांनी वाचु नये.
आल्याचा आहेर
एकदा पोपटाची बायको पोपटीण परत
आयडीया
Pagination