Skip to main content

(घट डोईवर घट कमरेवर)

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 05/01/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून, घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥ धुणि कशि होतील, अर्धीच र्‍हातील, जो तो आता रांगही लावील सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥ बघ तो वरचा भट शिंदळिचा, कितके घट तो आणि एकटा मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥ नेलीस जोडी, भरे तेवढी तोवर करतो जिन्यात कोंडी छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥ मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4991
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

=))

मेव्या लेका, सुडौल कंबरा बघायचं वय तुझं अन संडासाच्या लायनींची कसली काळजी रे तुला? ;-) (मेव्याचा शिनीयर)

=))

चालीवर (आणि चाळीवर) फिट्ट बसणारे विडंबन :)

In reply to by नंदन

हा हा हा ... फक्त पिदाड विडंबन नसल्यामुळे पी.मेवाराम म्हणता नाही येणार.

=))

मेवेशेठ, मस्त विडंबन.. (वाचक)केशवसुमार आम्हाला आमच्या घट पोटावर घट कमरेवर... ह्या विडंबनाची आठवण झाली.. (स्मरणशील)केशवसुमार

आता अधिकृतपणे तुझं नाव व्ही. मेवाराम करण्यात येत आहे! (पण असा चाळीत हिंडत राहिलास तर 'मदनाच्या मंजिर्‍या' कुठे भेटतील?)

आमच्या लहानपणी आम्ही भट डोईवर भट कमरेवर असे म्हणत असु

जमलंय अगदी!!! चाल आणि चाळ दोन्हीही !!! चालीवरच्या सगळ्या हरकती आणि चाळीतल्या सगळ्या कसरती बारकाईने टिपल्याबद्दल अभिनंदन!!! :-) --असुर

=)) =))