Skip to main content

मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 03/01/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच समीरसूर याचा आयडियाची कल्पना - फिकी मिसळ हा लेख वाचला.. छान परिक्षण..! हे परिक्षण वाचून काही ढोबळ विचार मनात आले ते खाली उतरवत आहे.. सचिन, महेश कोठारेंबद्दल मला काही बोलायचे नाही..माझ्या मते ते दोघेही सामान्य किंवा अतिसामान्य कुवतीचे आहेत..सचिन स्वत:लाच महागुरू वगैरे म्हणवून घेतो याची मौज वाटते..! :) अशिक सराफ -मूळातला खूप गुणी. निर्विवादपणे एक समर्थ अभिनेता. परंतु तरुण वयातही तो बागेत नट्यांमागनं धावतांना कैच्याबैच दिसायचा... मराठी सिनेसृष्टीला या अभिनेत्याकडून खूप काही करून घेता आले असते..! लक्षा आवडायचा मला.. अतिशय गुणी. परंतु त्याच्याही कलेचे खरे चीज झाले नाही, निर्मात्या-दिग्दर्शकांना ते करून घेता आले नाही हे माझे व माझ्या गुरुजीचे - भाईकाकांचे मत...! अलिकडच्या काळातले अगदी म्हणावे तसे आणि किमान दोन-तीन वेळा पाहावे असे, लक्षात राहण्यासारखे माझे आवडते चित्रपट दोनच - १) ध्यासपर्व २) हरिश्चंद्राची फॅक्टरी. राजाभाऊ परांजपेंसारखी मंडळी कुठे गेली आता...? डॉ लागू, निळूभाऊ, जब्बार, यांचीही खूप उणीव भासते.. मराठी चित्रपटातले आजचे संगीत - मला विशेष आवडत नाही, भावत नाही किंवा समजत नाही असे मी म्हणेन..अर्थात, एखाद दोन काही मोजके अपवाद आहेत.. बाबूजी, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर या सर्वांची खूप म्हणजे खूपच उणीव भासते.. त्यातल्या त्यात आनंद मोडकांकडून अजून खूप काही आशा आहेत.. अजय-अतुल ही मुलं तशी गुणी आहेत.. परंतु त्यांनीही ग्लॅमरमध्ये हरवून न जाता जास्तीत जास्त चांगले काम करावे असे वाटते.. उगाच, 'पी हळद आणि हो गोरा..' असे त्यांचे होऊ नये, जे सध्या होऊ पाहात आहे असे वाटते..! असो.. हे काही फुटकळ विचार. मनात आले ते पटापट उतरवले.. इतरांनीही येथे आपापली, आजच्या व पूर्वीच्या मराठी चित्रपटांविषयी व त्यातल्या संगीताविषयी आपली एकंदरीत मते माडावीत व या धाग्यास एका साधकबाधक चर्चेचे मूर्त स्वरूप द्यावे, ही विनंती.. आपला, (मराठी चित्रपटप्रेमी) तात्या.

वाचने 36963
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

बाबूजींचं संगीत असलेला सुवासिनी, जगाच्या पाठीवर आणि हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला उंबरठा व जैत रे जैत हे दोन चित्रपट, म्हणजे मराठी चित्रसंगीताच्या दुनियेतले सर्वोच्च क्षण हे माझं वैयक्तिक मत.. इतरांचीही मतं वाचायला आवडतील.. तात्या.

ध्यासपर्व पाहिला नाही, हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला पण भावला नाही. एका महान कार्याची ओळख करुन देणारा चित्रपट त्यातील नायकाच्या विविध बदलत्या भावावस्थेला न्याय देऊ शकला नाही. जुने काही मराठी चित्रपट बरे होते पण त्यापेक्षा हिंदी चित्रपट किंवा आंग्ल चित्रपट पहाणे मी ठीक मानतो. इतर भाषा मला समजत नाहीत, सबटायटल्स वाचुन चित्रपट समजुन घेणे मला जमत नाही. जुनी मराठी गाणी हा अमुल्य ठेवा आहे. मात्र बरेचसे मराठी चित्रपट पहाणे हा जन्मठेपेपेक्षा भयानक अनुभव असतो असे मी स्वत: मराठी असुन आणि माझी मातृभाषा मराठी असुनही मत आहे. एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही. अवांतर - मी चित्रपट क्षेत्राशी संबंधित नसल्याने आणि त्यात कधी जाईल अशी शक्यता नसल्याने उगाचच मग तुम्ही तरी दा़खवा करुन चांगला चित्रपट ! असल्या विचारजंती प्रतिक्रिया देऊ नये. धन्यवाद.

In reply to by अवलिया

ध्यासपर्व पाहिला नाही,
अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
एकही मराठी चित्रपट कालातीत किंवा सुरेख, परिपुर्ण, बेस्ट या लायकीचा नाही.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे.. असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

माझे आजोबा व त्यांचे जेष्ठ भाऊ कर्व्यांचे खंदे पाठीराखे होते .व त्यांच्या कार्यात फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करत .त्यांना स्वताला त्याकाळात अनुक्रमे दोन मुल व दोन मुली होत्या . हा सिनेमा अप्रतिम आहे, मात्र त्याचे मार्केटिंग अजून केले पाहिजे होते .असे राहून राहून वाटते .माझ्या मते ती किशोर ह्यांची सर्वोत्कृष्ट भूमिका .

In reply to by विसोबा खेचर

अवश्य पाहा.. मला तरी खूप आवडला होता हा सिनेमा..
जरुर.
अपवाद म्हणून नावे घ्यायची झाली तर जब्बारच्या सिंहासन या चित्रपटाचे नांव आत्ता तरी चटकन आठवत आहे..
मान्य आहे. सिंहासन असो की अजुन कुठलाही नाव घ्या .. हे चित्रपट चांगलेच आहेत. पण .... हा पण मोठा गंमतीचा आहे. असो.

In reply to by विसोबा खेचर

अशोक सराफ चा " वजीर " देखील सुरेख, परिपुर्ण आणी बेस्ट म्हणता येईल. पाहीला नसेल तर जरुर पहा.

असे एकदा वाचले होते आणी या मधे तथ्य आहे असे वाटते. त्यांचे चीत्रपट कला, मनोरंजन, कथा, दीग्दर्शन, संगीत, अभीनय, ग्लॅमर व अंबट्शौकीनता यांनी परीपूर्ण असल्याने त्याला समाजाचा व्यापक पाठींबा मिळतो. जे सध्या आपण मराठीत मीस करतोय.

In reply to by आत्मशून्य

'हो आणि दबंग मधील व्रात्य पणाची. शीला आणि मुन्नी मराठी सिने सुष्टीत आहेत ० साईज च्या .पण त्यांच्या पुढ्यात जरठ ./खुजे (अभिनय व शारीरिक ) अवाढव्य केसाळ पोटाचे चट्टेरी पट्टेरी कापड घालणारे अभिनेते असतात .एक हाणामारीचे कथानक असलेला सिनेमा हवा आहे .ज्यात विनोद चतकोर असेल मराठी सिनेमा नेट च्या माध्यमातून जगभर नेणे व इतर भाषेत भाषांतरित करणे आदी उपायांनी त्याचे उत्पन्न वाढू शकेल .. बाकी राजीव पाटील कला व दर्जा सांभाळून सिनेमे काढेन पण जेष्ठ मात्र त्याच जुन्या पुराण्या आयडिया तून धमाल करू पाहत आहेत .

मकरंद अनासपुरे सुरुवातीला चांगला वाटला पण नन्तर कुठे घोडे अडले कोण जाणे. त्याच्या अभिनयात तोचतोच पणा आलाय. भरतजाधव बद्दल काहीच बोलायचे नाही. तो अतीसामान्य आणि पठडीतला ( जिवावर येतय मण दुसरा शब्द नाही म्हणून लिहितोय) अभिनय सिद्धार्थ जाधव. खरच गुणी अभिनेता. याला चांगल्या भुमीका मिळतील त्याचे तो सोने करेल सम्जय नार्वेकर हा देखील बरेच दिवसात दिसला नाही. कोणत्याही प्रकारच्या भुमीका उत्तम सादर करु शकतो. नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते. पण उत्तम कथानक जोवर येत नाही तोवर काहीच उपयोग नसतो. नुसते पीजे आणि मरुनमुटकून केलेले विनोद याचा काहीच उपयोग होत नाही

In reply to by विजुभाऊ

नव्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडे छान काम करते.
मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतली विभावरी देशपांडे खूप आवडली.. तात्या.

मराठीत इतक्यात चांगले चित्रपट आलेच नाहीत असे नाही. सातच्या आत घरात, श्वास, नितळ, गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे अलिकडच्या काळातले काही चांगले चित्रपट. मला यंदा कर्तव्य आहे, अगं बाई अरेच्या, गुलमोहर आदि पिक्चर सुद्धा आवडले. चित्रपट संगीत मात्र फारसे चांगले येत नाही आहे. नटरंग वगळता फार आवडेल असे कुठले नाव संगीताच्या बाबतीत घेण्यासारखे नाही. मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.

In reply to by मृत्युन्जय

लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल.
या मृत्युंजयाच्या मताशी १००% सहमत दोन पावलं पुढे जाउन अस म्हणेन की हिंदी चित्रपटांत केविलवाण्या भुमिका करुन मराठी अभिनेत्यांसाठी हिंदी चित्रपटांतील चांगल्या भुमिकांची कवाडं बंद करुन ठेवलीत.

In reply to by मृत्युन्जय

जास्त आवश्यक आहेत.
मधल्या काळात जे भंकस, बक्वास, टिनपाट चित्रपट येउन गेले त्यामानाने आत्ता परिस्थिती बरीच चांगली आहे असे माझे मत आहे. लक्ष्या चांगला अभिनेता खरा. अशोक सराफ पण. पण या दोघांनी मिळुन मराठी चित्रपटसृष्टीची जेवढी वाट लावली तेवढी अजुन कोणी लावली नसेल
चालायचेच, मराठीत वीनोदाची लाट आली आणी क्रीएटीव्हीटि संपली भंपकपणा वाढला आणी हेच सध्या बोलीवुड्ला लागू पडत आहे.. नूसतेच इनोदी चीत्रपट येतायत एका मागून एक ह्यामूळे लवकरच बोलीवुड पण डब्यात जाणारच आहे म्हणून तर साला जो तो स्टार आज टी.वी. प्रोग्राम पटकावत आहे. कारन पैका तीथच भेटतो आन धंदा बी सेफ.. कालाय तस्मै नमः

मी माझ्या मुलाला चित्रपट क्षेत्राची ओळखच जॅत रे जॅत नं करुन दिलि आहे, श्री. जब्बार पटेल हे आमचे गाव वाले आणि हदेचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही मनात कुठेतरी जवळीक होतिच. एकेकाळी ' गो-या देहावरती' कॉलेजचं गॅदरिंग ३ वर्षे गाजवलं आहे. हृदयनाथ मंगेशकारांचें संगीत असलेला निवडुंग हा पण मला आवडणारा चित्रपट आहे, त्यातली गाणि, संगित आणि अर्चना जोगळेकर. लहानपणी शिवाजी महाराजांचे सगळे चित्रपट आवडायचे, विशेष करुन सुर्यकांतांचे वगॅरे. साधी माणसं पण खुप छान आहे. नवीन पॅकी चेकमेट, जोगवा, आघात, गाभडीचा पाउस हे चित्रपट काही आशा जागवुन गेले होते. हर्षद.

अशोक सराफ पण >> मान्य !! वजीर, एक डाव धोबी पछाड आणि एक उनाड दिवस या विषयी काय मत आहे आपले. (यातल ' हुरहुर असते हे गाण झक्कास !! ). धाग्याकर्त्यास विनम्र सुचना (म्हणजे बस क्या तात्या, बच्चे की जान लोगे क्या !! ;) ) अजुन काही चित्रपटांची यादी देत आहे, नक्की पहा मग आपले मत बनवा ही विनंती. १) सावरखेड- एक गाव २) मुंबई-पुणे-मुंबई ३) वळु ४) दहावी फ ५) मी सिंधुताई सपकाळ ६) एक कप चहा ७) जोगवा ८) त्या रात्री पाउस होता. ९) गाभ्रीचा पाउस १०)रानभुल ११) गैर तुर्तास ईतके बघा , बाकीची यादी देतो लवकरच !!

वजीर, लपंडाव, गोष्ट छोटी डोंगराएवढी, यंदा कर्तव्य आहे असे काही आवडलेले मराठी सिनेमे. बाय द वे.. महेश कोठारेचे थरथराट, धांगडधिंगा, झपाटलेला, खबरदार, दे दणादण, धडाकेबाज अशा नावांवरूनच त्यांचे जीनर काय आहे ते कळते. जरा थ्रिलर, कधी हॉरर, हॉलीवूडच्या थीम्सचे मराठी अर्धशहरी अर्ध गावरान रूप अशा एका साच्यातले चालतात म्हणून काढत राहिलेले सिनेमे. तेच सचिनचंही. त्याचे नर्मविनोदी सिनेमे "नवरी मिळे नवर्‍याला" पासून "नवरा माझा नवसाचा" पर्यंत हे एकूण जुळी पात्रं, वेषांतर, हलकेफुलके कौटुंबिक जोक्स, फसवाफसवी, काहीतरी करायला जाऊन लफड्यात पाय फसणे अशा थीमचे एकसाची असतात. नावावरुन आणि अनुभवाने माहीत होणारी जातकुळी त्या त्या वेगळ्याच ट्रेडमार्क प्रकारची असल्याने त्याची तुलना श्वास, वळू, ध्यासपर्व वगैरे या गटाशी होऊ शकत नाही. ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा वगैरे हे गंभीरपणे बघण्याचे सिनेमे आहेत. त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. नवीन काळात तर खूप नवीन धाडसी विषय घेऊन मराठी सिनेमे निघताहेत असं दिसतं. टेक्निकली आणि आशयात सुद्धा. फ्रेश तर नक्कीच आहे बदल..

In reply to by गवि

त्यांचा दर्जा अत्युच्च आहेच पण उच्च नीच म्हणावे की "वेगळा" म्हणावे असा प्रश्न पडतो. सहमत आहे. या धमाल जोड्यांचे धूमधडाका, बनवाबनवी, झपाटलेला हे टाईमपास सिनेमे आमचे ऑल टाईम फेव्हरीट आहेत. :) तसेच अगं बाई अरेच्चा, कायद्याचं बोला, जाऊ तिथं खाऊ हे देखील खूप आवडले होते.

मराठी चित्रपट तांत्रिक अंगांने अगदीच मागासलेला वाटायचा.. आताही चित्र तुलनात्मदृष्ट्या वाईटच आहे.. मात्र अभिनय व काहि प्रमाणात कथा यांत मराठी चित्रपट मला हिंदी चित्रपटांपेक्षा उजवा वाटतो. अर्थात उत्तम प्रेमकथा नसणे हा मराठी चित्रपटसृष्टीचा पराभव की मराठी मानसिकता हा प्रश्न उरतोच :)

In reply to by ऋषिकेश

साले भडक साऊथवाले सूध्दा एक एक नीतांत सून्दर प्रेमकथा सादर करत असतात आणे आपण ? श्वास सारखे संवेदन्शील चित्रपट चूचकारण्यातच महानता मानतो

वर असंख्य चांगल्या चित्रपटांची यादी दिलीच आहे. एक दोन वर्षापूर्वी एकदा चाफळकरांनी (मंगला / सिटी प्राईड) कोथरूड सिटी प्राईड ला चक्क सगळे मराठी पिक्चर लावले होते आणि सगळे उत्तम चालत होते मल्टिप्लेक्स मध्ये. या दोघा / तिघा म्हातार्‍यांना आणि सगळ्यात जास्त सचिनला वेड लागलं आहे किंवा बळंच मूर्खपणा / माज आला आहे. महागुरू हा तर फक्त हसण्याच्या किंवा अनुल्लेखे मारावे या लायकीचा प्रकार होता. त्याचा तो विग आणि अनेक वर्षांच्या कारकिर्दीचा पुन्हा पुन्हा वापर उल्लेख हा वीट आणणारा प्रकार असतो. पण अनेक चांगले पिक्चर्स गेल्या ८-१० वर्षात बनले आहेत -- १) श्वास, २) नितळ, ३)गोष्ट छोटी डोंगराएवढी, ४) कायद्याचे बोला, ५)नटरंग, ६)टिंग्या, ७)जोगवा, ८)डोम्बिवली फास्ट, ९)वळू, १०)मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ११) दहावी फ १२) गाभ्रीचा पाउस १३) गैर इतर काही १) वास्तुपुरुष - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर २) पक पक पकाक - सई परांजपे ३) उत्तरायण - एक अतिशय सुंदर चित्रपट ४) दोघी ५) तू तिथे मी - अप्रतिम ... ६) बनगर वाडी - अमोल पालेकर - जुना आहे ९५-९७ असावा. ७) मुक्ता - पुन्हा जब्बार आणि जुना आहे. ८) हरिश्चंद्राची फॅक्टरी एक गोष्ट ही आहे की जब्बार / सुमित्रा - सुनील / सई परांजपे/ अमोल पालेकर इत्यादींनी गेल्या दहा वर्षात जास्त चित्रपट केले नाहीत. जे एक दोन केलेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. अस्मिता चित्र / संजय सूरकरचा एकही नवीन पिक्चर गेल्या काही वर्षात आला नाही. पण अनेक नवीन दिग्दर्शक आणि कलाकार पुढे आले आहेत. आनंद मोडकांसारखं मधुर नसेल अगदी पण अजय अतुलने खूप मोठा बदल नक्कीच घडवला आहे. महेश कोठारेच्या डॅम इट आणि उघडी बटणं आणि पोट सुटलेला हिरो म्हणून अशोक सराफ पेक्षा आता अतुल कुलकर्णी ( दहावी फ / नटरंग / वळू/वास्तुपुरुष), गिरीश कुलकर्णी (वळू/ गोष्ट छोटी डोंगराएवढी) असे उत्तम नायक, सोनाली कुलकर्णी (मुक्ता मधली आपली जुनी सोनाली :)), अमृता सुभाष, देविका दफ्तरदार, मुक्ता बर्वे, शर्वरी जमेनीस अशा अनेक चांगल्या अभिनय करू शकणार्‍या नायिका, सहनायिका आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या पिक्चरला महाग तिकीट काढून थिएटरला जाणारे प्रेक्षकही आहेत. एकूण थोडा जास्त उठाव मिळण्याची गरज आहे. जरा दोन वर्षापूर्वी जसा जोर धरला होता तसे परत खूप चांगले पिक्चर्स एकामागोमाग एक प्रदर्शित व्हायला हवेत. काही जुन्या कलाकारांनी (आनंद मोडक, नीना कुलकर्णी, संजय सूरकर, स्मिता तळवलकर, दिलीप प्रभावळकर) काही नवीन कामं केली तर कधीही उत्तम चित्रपट होऊ शकतात आणि कुठल्याही मल्टिप्लेक्स मध्ये चुलबुल पांडे आणि शीलाच्य बरोबरीने हाउस फुल चालू शकतात.

In reply to by आत्मशून्य

कायद्याचं बोला हा बराच चांगला चित्रपट आहे. My cousin Vinny चे कुठलेही कोर्टातले प्रसंग वापरलेले नाहीत. शर्वरी जमेनीस ला केस मध्ये कुठलाही भाव / जागा नाही. मराठीकरण उत्तम केलं आहे. राहण्याची जागा बदलण्याच्या गोष्टी कॉपी केलेल्या नाहीत. फडणवीसाने त्याला शेवटी नियमात पकडणे हे मूळ चित्रपटात नाही. वर कोणी म्हटल्या प्रमाणे ती फुलराणी ही पण कॉपीच आहे. पण अजरामर आहे... तसा हाही चांगला प्रयत्न आहे. ठराविक साच्यातल्या गोष्टी.. तोच हिरो, भरतचे तेच तेच तेच तेच परत परत बोलणं. तोच चेहरा यापेक्षा खूप बरा आहे.

" बनवा-बनबी " नंतर सचिन हा माझ्यासाठी बहिष्कृत नट आहे. १२ ) क्षण १३ ) गोजिरी (कॉपी असला तरी छानच होता.) १४ ) सनई चौघडे १५) विहीर १६ ) उलाढाल (एक भरतचा पचकुळा अभिनय सोडला तर ) १७ ) रीटा

कलाकारांची बलस्थानं आणि उणिवा ह्यांचा तात्यांइतका सखोल अभ्यास दुसर्‍या कुणाचा नसेल. हे स्किल असे छोट्या लेखांपुरते मर्यादित न ठेवता अजून पुढे न्यावे ही विनंती. उत्तम कलाकॄती घडण्यासाठी अंकूश असणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्या अनेक ठिकाणी ओळखीही आहेत. मनावर घेऊन आपण समिक्षा केल्यास ती पोकळी आपण भरू शकता ह्यात शंका नाही.

अश्विनी भावेचा "कदाचित" नाही का आवडला कुणाला? मला खूपच आवडला होता! कथा, अभिनय, सादरीकरण, तांत्रिक बाजू, अश्विनी भावेचं "वय" ग्रेसफुल्ली कॅरी करणं, सगळंच मला खुप आवडलं होतं.

In reply to by यशोधरा

यशो कदाचित तुनळीवरुने काढलेला दिसतोय. पण नेटफ्लिक्सवर आहे - मराठी चित्रपटांसाठी अजुन एक चांगली गोष्ट, पण तुला नेटफ्लिक्स किती सोयीस्कर आहे याची कल्पना नाही.

In reply to by यशोधरा

अगं सोयीच अशासाठी म्हटलं कारण त्याला महीन्याची वर्गणी असते - इथे अमेरीकेत ८-१० डॉलर, म्हणजे खूप काही महाग नाही , पाहीजे तितके चित्रपट पाहू शकतो महीनाभरा. आणि मुख्य म्हणजे पायरेटेड नसते, त्यामुळे ते समाधानही मिळते. बाकी ठिकाणचं माहीती नाही म्हणून म्हटलं की कितपत सोयीचं आहे ते माहित नाही.

In reply to by सखी

अमेरिकेबाहेर (बहुदा कॅनडाचा अपवाद वगळता) तुम्हाला नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग अ‍ॅक्सेस करता येत नाहीत.

आयुश्य हे ....... . .. .. हे हे हे .... चुलीवरल्या ... ल्या ल्या ल्या ... कढई मधले ... ले ले ले ... कान्द्द्द्द्द्द्द्दे प्प्प्प्प्पोह्ह्ह्हे .... ह्हे ह्हे ह्हे !!

मराठी सिनेमात बर्‍याच वेळा चांगल्या विषयाची वाट लावलेली बघायला मिळते. उदा: सनई चौघडे. काही वाट न लावलेले सिनेमे गंभीर असतात म्हणून चालत नाहीत. उदा: कवडसे. गाण्यांशिवाय, कथा असलेले, वेगवान सिनेमे क्वचितच येतात. उदा: चेकमेट.

सचिन कुंडलकरचा 'गंध' पाहावा अशी शिफारस करेन. किमान मध्यमवर्गीय नागरी प्रेक्षकास रंजक वाटेल आणि तरीही निव्वळ टाईमपास वाटणार नाही अशा दुहेरी निकषांवर तो उतरतो. अर्थात लहान गावांत असे चित्रपट चालत नाहीत त्यामुळे प्रदर्शित होतच नाहीत. त्यामुळे दूरचित्रवाणीवर यायची वाट पाहणे नाहीतर डीव्हीडी किंवा पायरेटेड पाहाणे याला पर्याय नाही.

मी बर्‍याच वर्षात खिशातली दमडी खर्च करुन अथवा गेलाबाजार लोकाच्या पैशाने देखील थेटरात जाउन मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे ह्या विषयावर काही अक्कल पाजळायचा मला अधीकार आहे असे वाटत नाही. बाकी चर्चा वाचतोय...

वरील अनेक प्रतिसादात "चांगल्या" चित्रपटांची यादी दिली आहे (जी खरोखरच चांगली आहेत यात दुमत दिसत नाही...) त्यातील नावे वाचल्यावर हे प्रकर्षाने जाणविले की, मुंबई आणि पुणे सोडल्यास महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शितच झाले नसावेत. आमचे कोल्हापूर तर मराठी चित्रपटसृष्टीची एकेकाळची कर्मभूमी समजली जाते पण मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यार्‍या इथल्या थिएटरची शोचनीय अवस्था पाहता तिथे जागा असलीच तर 'अलकाताईं' ते जगप्रसिद्ध जीवघेणे रडणे पाहून स्वतःला तिच्या जागी कल्पणार्‍या स्त्रियांनाच व तसल्या भट्टीतीलच चित्रपटांना. त्यामुळे वरील कल्पक नावीन्यपूर्ण कथानक असलेल्या चित्रपटाना इथे (आणि तत्सम शहरात) एकदोन दिवसासाठीही थिएटर नसते [सन्माननीय अपवाद "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय....] आणि शिवाय त्या निर्मात्याला "आपला चित्रपट फक्त मुंबई-पुणेकरा" साठीच आहे असेही कुठेतरी वाटत असेल. फक्त एकदा येथील स्थानिक फिल्म क्लबच्या लोकांनी प्रयत्नपूर्वक 'श्वास', 'दहावी फ', 'वास्तुपुरूष', 'विहीर' असे मोजके चित्रपट निमंत्रितांसाठी आणले होते, त्याचा लाभ झाला आणि मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे निव्वळ 'ती' त्रयी नव्हे असेही वाटून गेले. त्या सप्ताहात कोल्हापुरकरांशी झालेल्या संवादात "वास्तुपुरुष" च्या सुमित्रा भावे यानी कबुली दिली होती की निव्वळ वितरणव्यवस्थेच्या त्रुटीमुळे असे चित्रपट महाराष्ट्रात जावू शकत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपटाने जागतिक पातळीवर जाण्याइतपत प्रगती केली आहे हे फक्त माध्यमात वाचण्याचीच बाब राहिली आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सहमत. अनेकदा असे होते की चित्रपट येणार म्हणून कुठेतरी वाचतो आणि येण्याची वाट बघतो, विसरूनही जातो नंतर. काही दिवसांनी लक्षात येते की तो चित्रपट आपल्याकडे आलाच नाही. 'देवराई'चे असे झालेले आठवतेय मला.

In reply to by मिहिर

जुना धागा या प्रतिसादाने परत वर काढते आहे मंडळी, पण एकोळी/अतिछोटा धागा न काढण्याचा इतका एकच उपाय समोर होता. ह्या चित्रपटांचे नाव मागच्या वर्षी कानावर आले होते, पण नंतर काहीच ऐकलं नाही, २००९ च्या बीएमएमला दाखवणार होते. मिपांकरांनी यातले कोणतेही चित्रपट पाहीले आहेत का? आणि त्याबद्दलची त्यांची मतं (बरी/वाईट) वाचायला उत्सुक आहे. अचानक - लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणून चित्रपटाविषयी उत्सकता आहे http://in.bookmyshow.com/movies/Achanak-(Marathi)/ET00002285 वावटळ - राजश्रीच्या साईटवर याचं ट्रेलर असावं, पणं इथुन आत्ता दुवा देता येत नाही. तांदळा - याची स्वतःची अशी बेबसाईटही आहे http://www.tandalathefilm.com/homeM1.html . यात एक गाणं आरती अंकलीकरांनी गायलेले दिसतयं आणि कलाकारांमध्ये आसावरी जोशीचे नाव आहे, म्हणजे बहुदा ती 'ढुंढते रह जाओगे' मधलीच ना.

चांगले असलेले गंभीर मराठी चित्रपट नेहमीच राजकारण, समाजकारण किंवा कौटुंबिक विषयांवर असतात. जे विनोदी चित्रपट असतात तेही बर्‍याच घासून गुळगुळीत झालेल्या विषयावर असतात आणि त्यात त्या विषयापेक्षा अभिनेत्यांचे संवाद आणि टायमिंग यातून विनोद निर्मीती करायचा प्रयत्न असतो. वरती आत्मशून्य यांनी म्हटल्याप्रमाणे, निव्वळ करमणूकप्रधान आणि सगळा मालमसाला भरलेले व्यवस्थित बजेटचे चित्रपट फारसे नसतातच आणि असले तरी त्यातली पात्रं इतकी अविश्वसनीय मराठी बोलतात, इतके विचित्र कपडे घालतात आणि इतके टुक्कार दिसतात की त्या चित्रपटाचा 'ग्लॅमर क्वोशंट' पार रसातळाला जातो. खूप पैसा लावून, भरपूर मेहनत घेऊन आणि खरोखर चांगले दिसणारे (म्हणजे उदाहरणार्थ अतिश्रीमंताच्या रोलमध्येही मध्यमवर्गीय न वाटणारे) नट-नट्या घेऊन प्रेमकथा, थ्रीलर्स वगैरे जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत मराठी चित्रपट बहुजनांमध्ये लोकप्रिय होणार नाही. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा करण्याची इच्छा जोपर्यंत मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये निर्माण होत नाही तो पर्यंत दर्जा सुधारणार नाही. वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

वरती काही लोकांनी दिलेल्या यादीतले चित्रपट चांगले आहेत पण फक्त एका विशिष्ट वर्गाला आवडतील असे आहेत. भाषा न समजणार्‍या माणसाने पाहिला तरी त्याला चित्रपट आवडला पाहिजे.
म्हणजे काय ते नीटसे कळले नाही. मराठी न समजणार्‍या माणसाने दादा कोंडक्यांचे सिनेमे पाहिले असते तर त्याला त्यातल्या द्वयर्थी संवादांचा एकही अर्थ कळला नसता. तमाशापटांतले सवाल-जबाब वगैरे भाषानिष्ठ प्रकारही मराठी न समजणार्‍या माणसांना कळणार नाहीत. अभिजनांना आवडणारे वेगळ्या वळणाचे चित्रपट न ध्यानात घेता इथे मुद्दाम लोकप्रिय मराठी पिच्चरांची उदाहरणे घेऊन पाहिली तरीही तुमचा मुद्दा लक्षात आला नाही.

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही मराठी चित्रपटांचीच उदाहरणे का घेत आहात ते समजत नाही. मला अभिप्रेत असलेले चित्रपट मराठीत बनतच नाहीत. संवेदनशील चित्रपट फक्त शिकलेल्या आणि कलेची जाण असलेल्यांना आवडतात. तमाशापट किंवा दादा कोंडकेंचाही स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. असं नेहमीच का असतं? सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनोरंजन करू शकेल असे चित्रपट का बनत नाहीत? इंग्रजी न समजताही लोक इंग्रजी चित्रपट पाहतात आणि त्यांना ते आवडतातही. वेगवेगळे (पण करमणूकप्रधान) विषय, उत्तम बजेट आणि त्याचा उत्तम वापर करून तंत्रदॄष्ट्या उत्तम चित्रपट असतील तरच मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळतो असं मला म्हणायचं आहे.

In reply to by नगरीनिरंजन

तमाशापट किंवा दादा कोंडकेंचाही स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. असं नेहमीच का असतं? सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनोरंजन करू शकेल असे चित्रपट का बनत नाहीत?
दादा कोंडक्यांचे चित्रपट किंवा काही तमाशापट सुपरहिट होते. त्यामुळे बहुतेकांचं मनोरंजन ते करू शकत होते असं वाटतं.
संवेदनशील चित्रपट फक्त शिकलेल्या आणि कलेची जाण असलेल्यांना आवडतात.
अमेरिकेतही हेच होताना दिसतं. 'टायटॅनिक' किंवा 'अवतार'ला नाकं मुरडणारे कलेची जाण असणारे लोक अमेरिकेतही आहेतच. त्यामुळे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर वैश्विक असावा.
इंग्रजी न समजताही लोक इंग्रजी चित्रपट पाहतात आणि त्यांना ते आवडतातही. वेगवेगळे (पण करमणूकप्रधान) विषय, उत्तम बजेट आणि त्याचा उत्तम वापर करून तंत्रदॄष्ट्या उत्तम चित्रपट असतील तरच मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळतो असं मला म्हणायचं आहे.
'मोठ्या प्रमाणावर जनाधार' हे महत्त्वाचं आहे. दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल. पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्‍या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही.

In reply to by चिंतातुर जंतू

>>दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल मान्य पण यात होता हा शब्द महत्त्वाचा आहे. आता परिस्थिती तशी आहे का? त्या काळात हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट यात किती फरक होता आणि आता किती आहे, तेव्हा लोकांना हिंदी किती समजायचं आणि आता किती समजतं आणि लोकांची आवड तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्याकाळी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये इतकी दरी नव्हती, किंबहुना कित्येक मराठी चित्रपट समकालीन हिंदी चित्रपटांपेक्षा सादरीकरणात जास्त उजवे होते. दुर्दैवाने मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांशी स्पर्धा न करता एकतर त्यांची भ्रष्ट नक्कल करतात किंवा हिंदी चित्रपटात नसणारे विषय घेऊन संवेदनशील वगैरे चित्रपट बनवतात. >>पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्‍या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही. तेव्हा ते चालायचे कारण तेव्हाची परिस्थिती. आता तसेच चित्रपट चालतील असे नाही. हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करून, त्यांचे विषय त्यांच्यापेक्षा नाहीतर किमान त्यांच्याइतक्याच चांगल्या पद्धतीने दाखवले तरच लोक मराठी चित्रपटांना प्राधान्य देतील. आजकाल दाक्षिणात्य चित्रपट इतके चांगले असतात की ते इतर लोकही पाहतात आणि बरेचसे हिंदीत रिमेक (गझनी, रावण वगैरे) करून दाखवले जातात. तसं मराठीचं व्हावं अशी इच्छा धरली तरच थोडं फार भविष्य आहे.

In reply to by नगरीनिरंजन

किंबहुना कित्येक मराठी चित्रपट समकालीन हिंदी चित्रपटांपेक्षा सादरीकरणात जास्त उजवे होते.
हा सुवर्णकाळ कोणता आणि असे कोणते चित्रपट आपण उदाहरणादाखल नमूद करू शकाल? तुलनेसाठी त्यांच्या समकालीन हिंदी चित्रपटांचेही मासले द्यावेत ही विनंती.
दुर्दैवाने मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांशी स्पर्धा न करता एकतर त्यांची भ्रष्ट नक्कल करतात किंवा हिंदी चित्रपटात नसणारे विषय घेऊन संवेदनशील वगैरे चित्रपट बनवतात.
त्यामागे तर साधं धंद्याचं गणित असावं. हिंदी सिनेमाला ज्या व्यापक जनाधाराची शक्यता असते, ती शक्यता मराठी सिनेमाला नसते, नसणार. त्यामुळे मराठी सिनेमा हिंदी सिनेमाशी धंद्यात स्पर्धा करू शकणार नाही. 'नटरंग'सारखा एखादा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सिनेमा मासल्यादाखल घेतला तरीही तो हिंदी सिनेमाच्या मानानं काहीच धंदा करू शकत नाही असं दिसतं.

In reply to by चिंतातुर जंतू

एक दोन उदाहरणे देतो. पाठलाग या चित्रपटाच्या यशाने प्रभावित होऊन मेरा साया काढण्यात आला. माणूस आणि आदमी (माझ्या समजुतीप्रमाणे) एकाचवेळी मराठी आणि हिंदीत काढून दोन्ही गाजले. आणखीही उदाहरणे असतीलच. पण तुम्हाला खरेच माझा मुद्दा समजला नाहीये. हिंदीशी स्पर्धा केल्याने मराठी चित्रपटाचा व्यवसाय तेवढा होईल असे मी म्हणत नाहीये. पण तशी स्पर्धा करायची वृत्तीच नाहीये असं मी म्हणतोय. चित्रपट निर्मिती हा धंदा आहे हे मान्य पण त्यातही काहीतरी मोठं करायची जोखीम कोणी घेत नाही. जेव्हा स्वतंत्र आणि मोठा विचार करून चित्रपट काढले जातील तेव्हा नक्कीच लोक ते पाहतील. नटरंग वगैरेचं यश हेच सांगतंय की लोक पाहायला तयार आहेत, पण त्यांना हवंय ते देणारे चित्रपट तर काढले पाहिजेत. आता नटरंग चालला म्हणून कोणी पुन्हा तमाशा-लावणीवर चित्रपट काढला तर चालणार नाही. पण तसाच संगीत, उत्तम छायाचित्रण, चांगले कलाकार आणि इतर तांत्रिक अंगांनी उत्तम असलेला चित्रपट चालेल. गुणवत्ता कमी नाहीय, पण निर्माते जोखीम घेत नाहीत त्यामुळे असेच लो बजेट चित्रपट निघणार आणि त्यातला एखादा उत्तम कथा, दिग्दर्शन यामुळे थोडाफार चालणार.

अजून काही चांगले - स्मृतिचित्रे, २२ जून १८९७. सुखांत ही चांगला होता, असे ऐकून आहे - इच्छामरण हा विषय.

In reply to by रेवती

सुखांत नाही आवडला का तुम्हाला? म्हणजे थोडंसं अवास्तव वाटणारं आहे त्यात, पण चित्रपटांत चालूनही जातं. मला तरी विषय आवडला त्याचा... आता प्रतिक्रिया लिहितानाच जाणीव झाली की कदाचित दिग्दर्शन याहून चांगले होऊ शकले असते. पण 'सुखांत' पाहिला तेव्हा विषयच एवढा महत्त्वाचा वाटला की बाकिच्या गोष्टी जाणवल्याच नाहीत.

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते.. खूप उत्सुकता निर्माण झाली होती हा सिनेमा पहायची.... पण योग नाही आला....

In reply to by भडकमकर मास्तर

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते..
बापरे !!! त्या पळालेल्या ( दुसर्‍याच्या ) बायकोच्या शोधात मास्तर लगेच ( शिवाजीनगर ) स्टँडावर जातील असे वाटले नव्हते बॉ ;) अवांतर : एकदम फालतु शिनेमा होता, बरेच प्रेक्षक पळाले. असो. - छोटा डॉन

In reply to by भडकमकर मास्तर

"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते.. खूप उत्सुकता निर्माण झाली होती हा सिनेमा पहायची.... पण योग नाही आला....
"बायको पळाली स्टँडवर " हे शिर्षक असलेल्या काही सिडी दत्त मंदीराच्या मागील बोळात मिळतात, इच्छुकांनी लाभ घ्यावा.

दिलीप प्रभावळकरानी मोजक्याच काही चित्रपटात कामे केलेली आहेत. एक डाव भुताचा : हा साधाच पण चांगला चित्रपट होता. कथा दोन गणपतरावांची : या चित्रपटात सुंदर सोपा नैसर्गीक अभिनय काय असतो याचा प्रत्यय प्रभावळकर आणि डॉ.मोहन आगाशे देतात. सुंदर चित्रण , प्रसंगाची सहज मांडणी पुन्हा एकदा राजा परांजपेंचा चित्रपट पहातोय असा आनद मिळतो. रात्र आरंभः दिलीप प्रभावळकरांचा अजून एक आगळा चित्रपट. सरकारनामा: यातील कोकणातील मंत्र्याची बोलण्याची ढब दिलीप प्रभावळकर छोट्या रोल मध्ये देखील लक्षात रहातात मराठीत अनेक गुणी कलाकार आहेत. त्याना वाव मिळेल अशा भुमीका मिळत नाहीत. अशोक सराफ देखील "हम पांच" मालीकेत जी धमाल करतात तसे रोल त्यान मराठीत मिळत नाहीत. मराठी चित्रपटाना उत्त्तमोत्तम कथा मिळू शकत नाहीत असेदेखील नाही. चाम्गले चित्रपट असतील तर प्रेक्षक येतील अशी आता परिस्थिती आहे.

In reply to by विजुभाऊ

चौकट राजा विसरलात काय? या चित्रपटाला आनंद मोडकांचेच संगित होते. तसे प्रभावळकर यांनी काही टुकार भुमिकाही केल्यात ..छक्के पंजे या चित्रपटातील आणि तात्या विंचू.. यातला तात्या विंचूला मात्र माफ करा कारण तो त्यांचा गेस्ट अ‍ॅपिअरन्स होता..जास्त भुमिकातर त्या बाहूल्याचीच होती. ओम फट् स्वाहा!!

रजनीकांत ने मराठी चित्रपटात काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याने स्वतः काही केले तरच काहितरी होईल. रजनीकान्त कडून असा चमत्कार होईल का?

In reply to by विजुभाऊ

रजनीकांतने डावा खिसा झटकला तरी एक मराठी चित्रपट सहज निघेल. अशोक सराफला हिरो म्हणून जर बरीच वर्षं स्विकारलं गेलं तर रजनीकांतला नक्कीच स्विकारलं जाईल.;)

गैर हा चित्रपट नुकताच पाहिला. चांगल्या चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव वाचून खेद वाटला. :) न पटणारे अचाट कथानक, दुबळी तांत्रिक बाजू, सुरकुत्या पडलेला हिरो, आयटम साँगमधले कपडे, सजावट बाजारू बारमधल्या गोष्टींपेक्षाही बेकार वगैरे वगैरे.

In reply to by प्रियाली

अगदी अगदी... मी कालच पाहिला गैर, भंकस वाटला. एखाद्या रडक्या डेली सोपचे ७-८ भाग एकत्र जोडल्यागत वाटले. आणि गाणी तर कुठेही आणि काहीही गरज नसताना घुसवली आहेत. 'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.

In reply to by अनामिक

त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.
याच धाग्यावर परत एकदा १००% सहमत. यावेळी अनामिकशी. ही बया किती ओव्हर अ‍ॅक्टिंग करते त्याला तोड नाही. श्वास पासुनच डॉक्यात जायची.... कुठेतरी एकदम ट्रांन्स मध्ये हरवल्यासारख तिच ते बोलणं ऐकलं की शॉट बसतो डोक्याला.