Skip to main content

स्वागत २०११ !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 30/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ चे स्वागत करुयात !!! २०१० ह्याही वर्शी अनेक मित्र्-मैत्रीणी मिळालेत. बरेचदा आपली मैत्री होते, २-४दा फोनही होतात, मात्र मग कामकाजाच्या व्यापात संपर्कात रहाणे राहुन जाते . ऑनलाइन मित्र्-मैत्रीणींच्या बाबतितही तसेच हेच नातेवाईकांनाही लागु. मावस बहिण शेजारच्या एमिरेट्समधे रहात असुनही माझ्याकडुन फोन केला जात नाही. म्हणुन ही मैत्री /नाते टिकवण्यासाठी मात्र मी २०११ मधे प्रयत्नशिल रहाणार आहे. हाच माझा नविन वर्शाचा संकल्प म्हणायला हरकत नाही. आता तुमचे संकल्प शेअर करा की !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7541
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

आम्हीपण स्वागत करतो. जरा २०१० चा आढावा (निदान धावता तरी) घेतला असतास लेखात तरी चालल असतं. असो हे काम आपण परा ला देवूया. ;) बाकी संकल्पाविषयी, ह्यावर्षी संकल्प कमीच आहेत्....! जरा कथाकादंबरी वाचायच्या आहेत.

In reply to by sneharani

जरा २०१० चा आढावा (निदान धावता तरी) घेतला असतास लेखात तरी चालल असतं. असो हे काम आपण परा ला देवूया.
मनापासून धन्यवाद. जुने जाणते सदस्त आवर्जुन आठवण काढतात हे बघुन बरे वाटते. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत राज्याचा सर्वागीण आढावा घेणारा व सर्वप्रकारची माहिती संकलितपणे देणारा 'महाराष्ट्र वार्षिकी २०१०' हा ग्रंथ सिद्ध झाला असून तो विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.पुण्यातील 'द युनिक अ‍ॅकॅडमी' ने महाराष्ट्र वार्षिकी २०१ हा बहुचर्चित संदर्भग्रंथ निर्माण केला आहे. हे वर्ष महाराष्ट्र वार्षिकीचे दुसरे वर्ष आहे.विविध चळवळींची मातृभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्राची आजची स्थिती काय आहे? हे शोधताना महाराष्ट्र सर्वच आघाडींवर अपयशी होताना दिसत आहे. याचा या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने विचार व्हावयास हवा. त्या दृष्टीने केलेली एक वाटचाल म्हणून या प्रयत्नाकडे पाहता येईल. एकूण दहा विभागांमध्ये या वार्षिकीच्या लेखांची मांडणी झालेली आहे. विशेष लेखांच्या महत्त्वपूर्ण भागात महाराष्ट्र, भारत व जग यांच्यापुढे असणाऱ्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर अभ्यासूपणे चिकित्सक पद्धतीने लिहिले गेलेले हे विशेष लेख महाराष्ट्र वार्षिकीत आढळतील. महाराष्ट्राचा इतिहास, समाज, संस्कृती, चित्रपट, भूगोल, पर्यटन व धार्मिक स्थळे, जिल्हा आढावा, जिल्ह्य़ांचे राजकारण, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय योजना, प्रशासन यंत्रणा, शासकीय प्रशिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, मुख्यमंत्र्यांचा कार्यआढावा, ई-शासन, १९६० ते २००९ पर्यंतचे राजकारण, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, महाराष्ट्राचे शिल्पकार, २००९ मधील प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, महाराष्ट्राविषयी संकीर्ण माहिती या व अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खजिनाच या वार्षिकीत दडलेला आहे. एकूण १२३४ पृष्ठे असलेल्या या पुस्तकाची किंमत केवळ ३५० रुपये असून ते सर्व महत्त्वाच्या पुस्तक विक्रीकेंद्रात उपलब्ध आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ, महाराष्ट्राच्या आढाव्या विषयी नाय रे पर्‍या.. मसंच्या गेला बाजार निदान मिपाच्या आढाव्या विषयी बोलतेय स्नेहराणी. ;)

In reply to by गणपा

महाराष्ट्राच्या आढाव्या विषयी नाय रे पर्‍या.. मसंच्या गेला बाजार निदान मिपाच्या आढाव्या विषयी बोलतेय स्नेहराणी
सध्याच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण, संस्कृती इ.इ. आणि मसंचे राजकारण, संस्कृती इ.इ. ह्यात काही फरक उरलाय असे मला वाटत नाही. आपले ह्यावरील मत काय आहे ?

ह्यावर्षी मी कुठलाही संकल्प न करण्याचा संकल्प केलेला आहे बघुया कितपत यश मिळते या संकल्पात ते!

In reply to by कच्ची कैरी

फारच सुरेख !!! तुमच्या ह्या संकल्पाला माझ्या शुभेछ्हा!!! www.mejwani.wordpress.com हे मी कायम 'मी जवानी' असे वाचते मग लक्शात येते हे तर 'मेजवानी 'आहे :( क्रुपया टेक इट लाइटली ;)

माझा संकल्प - अधिकाधिक पुस्तके खरेदी करणे आणि वाचणे. पुस्तकांसाठी एक छानसे कपाट बनवून घेणे, किंवा गोदरेजची असतात तशापैकी एक घेणे. फोटोग्राफीच्या छंदासाठी अधिक वेळ देणे आणि फोटो काढण्याची अधिक नियमित प्रॅक्टीस करणे. चुचे, छान धागा गं :)

काही संकल्प करायचा नाही हा आमचा या वर्षीचा संकल्प मनातल्या मनात " आम्ही चुचु ला आग्रह करुन ध्यान -पार्ट २ लिहायला लावु " असा संकल्प करत आहोत. असो बीटीडब्ल्यु : संकल्प करायचा असतो की सोडायचा ?

नवीन पाककृत्या करुन त्या मिपावर न टाकण्याचा संकल्प करतोय... बघु किती तास टिकतोय ते. सगळ्या मिपाकरांना येणार्‍या २०११ च्या अनेक शुभेच्छा.

In reply to by गणपा

गणपा तुमचा संकल्प अजिबात पूर्ण होवु नये अश्या मी तुम्हाला शुभेच्छा देते.म्हणजे आम्हाला 'हटके 'रेसेपीज चाखायला तर नाही पण निदान वाचायला व पहायला तरी मिळतील

माझा संकल्प : थोडा वेळ घरच्यांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करणे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुरेख बिप्स !!! बिप्स ला कुठे काय बोलावे ते निट कळते म्हणुनच तो माझ्या गुड बुकात अजुन वास्तव्य करुन आहे ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

एखाद्या वरिष्ठ संपादकाने डबल मिनींग प्रतिसाद देणे खटकले , असो . :) अवांतर : तरी 'ड' बरोबर लिहीला होता !

In reply to by टारझन

हे 'वरिष्ठ' संपादक काय असतं? संपादकांमधे फूट पाडण्याच्या या प्रयत्नाचा मी निषेध करतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वरिष्ठ संपादक म्हणजे ज्या संपादकाला योग्य वेळी कुठे आणि काय बोलावे ह्याचे ज्ञान असतो आणि त्यामुळे तो लोकांच्या गुदबुकात अजुनही स्थान कायम ठेवुन असतो. ह्यात फुट पाडण्यासारखे काही नव्हते. परंतु आपले कृष्णकृत्य उघडकीस आले त्यावर बरोबर काणाडोळाकरुन फुटाफुटीची भाषा करुन एखाद्या सामान्य सभासदावर असा हिन आरोप करणे एका वरिष्ठ संपादकासाठी लज्जास्पद बाब आहे असे खेदाने णमुद करावेसे वाटते. राजाने माराले पावसाने झोडपले .. अशा अवस्थेत आजचा सामान्य मिपाकर आहे असे वाटते. असो.

In reply to by टारझन

लोकांच्या गुदबुकात अजुनही स्थान कायम ठेवुन असतो
टारू, अरे लिहिताना थोडे भान ठेवत जा. असे अनर्थ होतात बघ.

In reply to by आजानुकर्ण

लोकांच्या गुदबुकात अजुनही स्थान कायम ठेवुन असतो टारू, अरे लिहिताना थोडे भान ठेवत जा. असे अनर्थ होतात बघ.

आमचे काही लेख शब्दच्छल करणार्‍या भारतीय तत्वज्ञानावर आधारीत असल्याने काही बुद्धिवंताना मिपावर कचरा झाला आहे असे वाटते. त्यांचा आदर राखुन २०११ मधे मिपावर लेखन/प्रतिसादापासुन दूर रहाण्याचा संकल्प करावा की काय या विचारात आहे. मिपाकरांनी मार्गदर्शन करावे.

In reply to by अवलिया

आमचे काही लेख शब्दच्छल करणार्‍या भारतीय तत्वज्ञानावर आधारीत असल्याने काही बुद्धिवंताना मिपावर कचरा झाला आहे असे वाटते. त्यांचा आदर राखुन २०११ मधे मिपावर लेखन/प्रतिसादापासुन दूर रहाण्याचा संकल्प करावा की काय या विचारात आहे. मिपाकरांनी मार्गदर्शन करावे.
नानाशी सहमत आहे. खरेतर मिपापासूनच दुर रहावे असा विचार मनात घोळत आहे :)

In reply to by अवलिया

मिसळ पाव बगुन बगुन एसिडिटी वाढतिया.. आधुन मधुन इनो घ्या का 'साजुक' ठिकानि जाउन या ;-) ख्रिस्ति नव वरशाच्या समस्त मिपा परिवाराला शुभेच्छा!

माझा संकल्पः भिक्कार धाग्यांचा खव करणे!!! फुटकळ कौलांचे च्रूर्ण पाडणे!!! अर्थशून्य काथ्याकूटांना हाणणे!!!! जय मिपा!!!

In reply to by पिवळा डांबिस

वांगो पिंगो इल्ले ... बिंगो .. ;) (मनातल्या भावनांना शब्दरुपी वाट करुन दिल्याबद्दल आभार :) ) - टवळा डांबीस

In reply to by पिवळा डांबिस

काका, पिडां ब्रिगेड मध्ये नाव नोंदणी चालु असल्यास कळवणे. स्वयंसेवक म्हणुन भर्ती व्हायला तयार आहे ;)

In reply to by Nile

अरे, तो गणपा रीतसर भरती वगैरे विचारतोय. अशा ब्रिगेडमध्ये घूसखोरी करायची हे त्याला माहिती नाही. ते जरा शिकव की त्याला. ;)

In reply to by Nile

नायल्या घूसखोरीच्या प्रशिक्षणाच्या क्लासेसचे रेट काय रे तुझे ;) आणि ते प्रॅक्टिकल वगैरे निट करुन दाखवताना आधी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणुनच स्वतःवर टेस्ट करायला सांगितलं आहे, तुमच्यावर चाललं नाही तर आमच्यावर काहीच व्हायचं नाही.

In reply to by श्रावण मोडक

शिकवताना तर तुम्हीच म्हणाला होतात "तुझ्याकडे ते आहे, पण ते तुला दाखवणे माझे काम आहे" म्हणुन. बाकी आम्हाला काय माहित? शिकवणारे तुम्ही, तुम्हालाच माहित. ;-)

In reply to by Nile

शिकवताना तर तुम्हीच म्हणाला होतात "तुझ्याकडे ते आहे, पण ते तुला दाखवणे माझे काम आहे" म्हणुन. बाकी आम्हाला काय माहित? शिकवणारे तुम्ही, तुम्हालाच माहित.
अच्छा म्हणजे तुझ्याकडे 'ते' आहे हे तुला श्रामोंनी दाखवलेच नसते तर आपल्याकडे 'ते' आहे हे तुला कळलेच नसते तर. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

सदासर्वदा "निळ्या" चित्रांचे विचार करत जाउ नका. म्हणजे मनावर असे परिणाम होणार नाहीत. बाकी काही गोष्टींची जाणीव करुन द्यावी लागत नाही हे तुम्हाला माहित नव्हते हे पाहुन थोडेसेच आश्चर्य वाटले.

या वर्षी... निरोगी आरोग्य संपादन करण्याचा संकल्प... स्वताच्या पैशाने, हक्काचं घर घ्यायचा संकल्प काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प

In reply to by स्पा

>>निरोगी आरोग्य संपादन करण्याचा संकल्प... वा रे गब्रू. रोगट आरोग्य पण असतंय का? असो. संकल्पपूर्तीच्या शुभेच्छा! माझेही संकल्प साधारण असेच आहेत. संपादन केलेले आरोग्य टिकवण्याचा संकल्प.. स्वतःच्या पैशाने घेतलेल्या घरावर हक्क टिकवण्याचा संकल्प.. २०१० मध्ये नवीन शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा संकल्प..

२०११ .. माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारे असणार आहे.. त्यामुळे संकल्प न करता ही बर्याच गोष्टी ज्या नशिबात अधोरेखीत आहेत त्याचे पालन या वर्षी मी करणार आहे. तुम्हाला कळलेच असेन मला काय म्हनायचे आहे ?

मी सन्यास घेणार आहे. ह्याहुन अधिक काही बोलण्यासारखे नाही, बाकी असो. - छोटा डॉन

माझा संकल्प जास्तित जास्त एखाद महिना टिकतो मग रुटीन प्रमाणे चालते. तरीपण ह्यावर्षी जास्तित जास्त गोष्टी शिकुन घ्यायचा संकल्प केला आहे.

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा :-) हे वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, सुखासमाधानाचे, शांतीचे, सम्रुद्धीचे, भरभराटीचे जावो.

गेल्या वर्षीचा आमचा सगळ्यात मोठा संकल्प "एक क्विंटल बाय २०१०" हा थोडक्यात हुकल्या मुळे या वर्षी संकल्प करायचा नाही असे ठरवले होते. पण आता ह्याचा उलटा संकल्प करायचे ठरवले आहे. येत्या वर्षात माझे वजन २५-३० किलो ने उतरवण्याचा संकल्प आहे. अर्थात त्यात अवघड काहीच नाही म्हणा. येत्या वर्षात आंतरजालावरचा वावर कमी करण्याचा विचार मनात येतोच आहे. गेल्या वर्षीचा संकल्पानुसार दिवसाला १६-१८ तास जालावर पडिक राहाणे कंपल्सरी होते. साधारण जुन पर्यंत हा संकल्प टिकलाही. पण आता ह्या वर्षी जालावर फक्त दिवसाला १-२ तासच घालवण्याचा मानस आहे. क्रमशः

In reply to by निखिल देशपांडे

येत्या वर्षात माझे वजन २५-३० किलो ने उतरवण्याचा संकल्प आहे. अर्थात त्यात अवघड काहीच नाही म्हणा.
है साबास .. जियो निदे ... ह्याला म्हणतात निदे .. - क्विंटल्झन

"फ्रोझन पराठाज नि रोटीज" खाऊन कंटाळा आलाय. जानेवारीअखेरपर्यंत पोळ्या करायला शिकण्याचा संकल्प केलाय. मग ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्राझिल करत करत पाडव्यापर्यंत वर्तुळापर्यंत पोहोचू शकेन काय अशा विचारात आहे. मग लगेच पुढला संकल्प करावयास मोकळा! :)

वा वा वा!! इतक्या जणांचे इतके वेगवेगळे संकल्प बघुन डोळे पाणावले :P मला पण संकल्प करायचाय! फक्त कसला संकल्प करू हेच समजत नाहीये! :(

माझी लेखनाची हौस मी मिपा वर मनसोक्त भागवून घेण्याचा ह्यावर्षीचा संकल्प आहे ,. परदेशगमन (पर्यटन ) हा एक प्रमुख संकल्प आहे . बाकी मराठा तितुका मेळवावा महारष्ट्र धर्मे वाढवावा हा समर्थांचा संदेश माझ्या आयुष्याचा संकल्प आहे ( सज्जन गडावर काही सज्जन संघटना आपला मोर्चा नव्या वर्षी वळवणार नाहीत ,अशी आशा करूयात .)

आता निघते!! बाय ऑल्..नविन वर्शाच्या शुभेच्छा !! आपली स्नेहांकित, सौ. पर्नल नेने मराठे

सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! माझे संकल्प : १. मिपापासून जास्तीत जास्त दूर राहणे. २. आहे ते वजन राखणे....जे सगळ्यात अवघड आहे. जमल्यास दोन पौंड कमी करेन म्हणते.

स्वतःशी प्रामाणीक रहायचा प्रयत्न करायचा आहे. बघू या जमते का ? :) नवीन वर्षाच्या शुभेच्छा !! अमोल केळकर