✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

म
मितान यांनी
गुरुवार, 12/30/2010 - 00:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15380 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

सु - रे - ख !

संदीप चित्रे
गुरुवार, 12/30/2010 - 02:38 नवीन
तुझ्याकडून लिहिला गेलेला अजून एक सु-रे-ख लेख !
  • Log in or register to post comments

फार फार सु रे ख!!! तुझे लेख

प्राजु
गुरुवार, 12/30/2010 - 03:01 नवीन
फार फार सु रे ख!!! तुझे लेख आले की 'मेजवानी' इतकंच येतं डोक्यात आणि आपोआप क्लिक होतं त्यावर. :) अ‍ॅज युज्वल.. सुरेख लेखन
  • Log in or register to post comments

लई खास हो!

बहुगुणी
गुरुवार, 12/30/2010 - 04:06 नवीन
शब्दा-शब्दा ला दाद द्यायला हवी इतकं उत्कट प्रकटन आहे, खूप आवडलं!
  • Log in or register to post comments

सहमत आहे

स्मिता.
गुरुवार, 12/30/2010 - 10:12 नवीन
खरंच, शब्दा-शब्दाला दाद द्यावी इतका छान झालाय लेख. वाचता-वाचता मी माझ्या खजिन्याचा विचार केव्हा करायला लागले कळलंच नाही. असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.. अगदी अगदी!! हे असे साधे-नेहमीचे पण वेगळी अनुभूती देणारे काही क्षण कायम मनात घर करून राहतात. त्याहीपुढे जाऊन मी असं म्हणेन की ते क्षण आपल्याला काहीतरी नवीनच शिकवून जातात. आताही असं होतंय की मनात जे आहे ते शब्दात सांगताच येत नाहीये... तो केवळ अनुभव असतो आणि ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

फार सुरेख!!

असुर
गुरुवार, 12/30/2010 - 05:44 नवीन
फार सुरेख!! प्राजुतैशी सहमत!!! खरंतर अजून सविस्तर प्रतिसाद द्यायचा होता, पण 'क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी'... असो!! --असुर
  • Log in or register to post comments

अप्रतिम आठवणी

शुचि
गुरुवार, 12/30/2010 - 05:45 नवीन
लोकांच्याही आठवणी सांग ना मितान . मस्त लिहीतेस. खूप सुंदर लिहीलयस.
  • Log in or register to post comments

मस्त लेखन! मगाशी घाईत होते

रेवती
गुरुवार, 12/30/2010 - 06:42 नवीन
मस्त लेखन! मगाशी घाईत होते म्हणून नंतरसाठी निवांत वाचायला ठेवून दिला होता.
  • Log in or register to post comments

मस्त!

सहज
गुरुवार, 12/30/2010 - 07:14 नवीन
सुरेख,सहज व मौलीक प्रकटन:-)
  • Log in or register to post comments

अतिशय छान

विनायक बेलापुरे
गुरुवार, 12/30/2010 - 08:39 नवीन
शब्दातील जादू ..... क्षणभर माझ्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या काहि मनात साठ्वलेल्या आठवणी . सावरकरान्च्या ओळी सार्थ आहेत शीर्षकासाठी.
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
गुरुवार, 12/30/2010 - 08:55 नवीन
सुरेख प्रकटन. लेखाइतकंच शीर्षकही रसिक, समर्पक.
विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !"
--- अगदी, अगदी. श्रीमंत करून जाणारे असे हे क्षण थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतील. पण त्यांचं इतकं सुरेख प्रकटन वाचून Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away सारखं तद्दन फॉरवर्डणीय झालेलं हे सत्य, कुठेही क्लिशे होऊ न देता मांडणं किती अवघड आहे, हे पुन्हा जाणवलं.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख !!

सूड
गुरुवार, 12/30/2010 - 09:42 नवीन
अतिशय सुरेख !!
  • Log in or register to post comments

आवडलं

कवितानागेश
गुरुवार, 12/30/2010 - 10:23 नवीन
नेहमीप्रमाणेच खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

मितान ताई, खुप सुंदर लिहिलेय

मी ऋचा
गुरुवार, 12/30/2010 - 10:45 नवीन
मितान ताई, खुप सुंदर लिहिलेय गं!
  • Log in or register to post comments

मस्त

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 12/30/2010 - 10:51 नवीन
नेहेमीप्रमाणे छान...
  • Log in or register to post comments

सुंदर !

दिपक
गुरुवार, 12/30/2010 - 11:02 नवीन
काय जादू आहे तुमच्या लिखाणात. प्रत्येक वाक्य वाचताना तो अनुभवतोय असे वाटले. खुप आवडले प्रकटन.
  • Log in or register to post comments

सुंदर...!!!

नन्दादीप
गुरुवार, 12/30/2010 - 11:11 नवीन
अप्रतिम...सुंदर लिहिलय मितान...मस्तच......
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख ...

sagarparadkar
गुरुवार, 12/30/2010 - 11:24 नवीन
अगदी नेमक्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही अनुभव असे असतात की दुसर्‍यांना सांगितले तर "त्या काय विशेष ..." असे उद्गार ऐकायला मिळतात. त्यांनी जर ती अनुभूती घेतली तरच त्यांना त्यातली मजा कळेल. मला दोन सुंदर सकाळ (अनेकवचन काय?) आठवताहेत, त्या पण अशाच निसर्गसुंदर वातावरणातील अद्भुत वाटणार्‍या. पहिली म्हणजे प्राथमिक शाळेत असताना एकदा कोकणात 'तुरळ' नावाच्या खेड्यात एका दूरच्या नातेवाइकांकडे गेलो होतो तेव्हाची. संध्याकाळी उशिरा तंगड्तोड करत त्यांच्याकडे पोहोचलो. खूपच दमलो होतो, जेवण करून जो झोपलो, ते पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग आली. आणि त्यावेळचा एकूण निसर्गाचा आविष्कार असा काही भावला, की गेल्या जवळ जवळ ३०-३२ वर्षांत मी ती सुंदर सकाळ विसरू शकलो नाहीये. दुसरी अशीच निसर्गरम्य सकाळ अनुभवली ती इंग्लंडमधील अ‍ॅस्कॉट मधे. त्या उन्हाळ्यातल्या पहाटे ३:३०-४:०० वाजताच अशीच पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे जाग आली. 'बी अ‍ॅन्ड बी' मधे उतरलो होतो, ते म्हणजे एका सुखवस्तु शेतकर्‍याचं मळ्यातलं घर होतं. चहू बाजूनी निसर्ग नुसता बहरात आला होता. तेव्हा खरोखर मला अरूण दातेंनी गायलेल्या "या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे" गाण्याचा अर्थ उमगला, अनुभवता आला ...
  • Log in or register to post comments

अ-प्र-ति-म

प्यारे१
गुरुवार, 12/30/2010 - 11:37 नवीन
मायातै, सुंदर. अत्यंत छान तर्‍हेने आपण अनुभवलेले क्षण शब्दात पकडले आहेत. फक्त आणि फक्त अनुभव... ना कसली तुलना, ना कसली समीक्षा, ना कसली प्रतिक्रिया. अनुभव 'संपल्या' नंतर हे सगळे सुरु होते.
  • Log in or register to post comments

मायाचे लिखाण न बाकिच्यांचे

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 11:58 नवीन
मायाचे लिखाण न बाकिच्यांचे प्रतिसाद सगळेच कसे उत्तम !!!
  • Log in or register to post comments

खूप छान लिहीलंय. वाचताना

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 12:09 नवीन
खूप छान लिहीलंय. वाचताना प्रत्येक क्षणाबरोबर मी ही अनुभवलेले असेच क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले. >>असं वैतागलेल्या क्षणी त्या माणसासोबत तो अनुभव झेलताना मनात " हे पुन्हा कधीच नाही " असे आले तर वैताग कमी होईल का ? हे खासंच. कुठलं कुठलं अध्यात्मिक तत्वज्ञान वाचून मन अलिप्त वगैरे करण्यापेक्षा समरसून प्रत्येक क्षणाचे सुख-दु:ख अनुभवण्याचे हे अध्यात्म कधीही श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 12/30/2010 - 12:12 नवीन
मस्त लिखाण!
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे

नेत्रेश
गुरुवार, 12/30/2010 - 12:40 नवीन
हेच लेखन दैनिक सकाळच्या मुक्तपिठ सदरात लिहील्यास काय काय (मसालेवाईक) प्रतिक्रिया येतील हा विचार मनात आला.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद लिहायचा म्हणुन

स्पंदना
गुरुवार, 12/30/2010 - 13:00 नवीन
प्रतिसाद लिहायचा म्हणुन काहीतरी लिहिते आहे, खर सांगु ? जस शांत संध्येत आवाज न करता बसाव ना तस वाटल ! काहीही न बोलता बस वाचत रहाव. काही काही गोष्टी हात वा रव लागला तर लुप्त होतात ना? चुकुन हे ही तसच काही असल तर?
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/30/2010 - 13:18 नवीन
<या प्रकटनात एकूण जितकी अक्षरं आहेत, त्याच्या दसपट अभिवादनाच्या स्मायल्या इथे समजून घ्याव्यात> ही माया, काही बोलायलाच ठेवत नाही शिल्लक. असे प्रसंग अनुभवले आहेत पण ते असं लिहायचं बळ नाही माझ्याकडे.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.. प्रत्येकवेळेला

अर्धवट
गुरुवार, 12/30/2010 - 21:54 नवीन
अगदी अगदी.. प्रत्येकवेळेला लिहिताना अव्वल आणि शंभर नंबरी.. सकस.. खुप तरल आणि निर्मळ लिहितेस आमचा रतीब म्हणुनच कोता वाटतो.. बाकी काय बोलणार.. नेहेमीचंच.. महान आहेस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी !!

अर्धवटराव
Fri, 12/31/2010 - 23:39 नवीन
मनातलं बोललात. एका सामान्य माणसाचं जगणं देखील असामान्य करुन जातात असले क्षण... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

जादूभरं..

स्वाती दिनेश
गुरुवार, 12/30/2010 - 13:30 नवीन
माया, तरल, जादूभरं लिहिलं आहेस ग, फार आवडलं.. स्वाती
  • Log in or register to post comments

शब्दलेस..

गणेशा
गुरुवार, 12/30/2010 - 13:50 नवीन
शांत राहुन तुझ्या शब्दांच्या सरीमध्ये असेच भिजत राहवे असे मनापासुन वाटले .. तुझे लिखान संपुच नये असे वाटत होते ..
  • Log in or register to post comments

खुप सुंदर लेखन.... अचानक

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 12/30/2010 - 13:53 नवीन
खुप सुंदर लेखन.... अचानक मलाही असे अनुभवलेले प्रसंग आठवले....
  • Log in or register to post comments

मस्त

चाणक्य
गुरुवार, 12/30/2010 - 13:59 नवीन
लिखाण 'आतून' आल्याचं जाणवतंय
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन अमोल केळकर

अमोल केळकर
गुरुवार, 12/30/2010 - 15:46 नवीन
सुंदर लेखन अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मितान, खुप छान लिहिलं आहे,

५० फक्त
गुरुवार, 12/30/2010 - 17:18 नवीन
मितान, खुप छान लिहिलं आहे, तुम्ही असंच लिहित राहावं या साठी मी सकाळीच सुर्यनारायणाला सांगुन ठेवलं आहे. तुम्ही जेंव्हा पुन्हा अशा निसर्गाकडे जाल ना तेंव्हा माझ्यासाठी प्रार्थना कराल ,मला पण असं लिहिता यावं या साठी. हर्षद.
  • Log in or register to post comments

!

अवलिया
गुरुवार, 12/30/2010 - 17:20 नवीन
!
  • Log in or register to post comments

नि:शब्द !

स्वैर परी
गुरुवार, 12/30/2010 - 17:52 नवीन
या सर्व वर वर वाईट दिसणार्‍या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
अगदी अगदी! काही प्रसंगी चिड्ण्यापेक्षा असा विचार मनात आणावा, 'हे पुन्हा कधीच नाही' आणि क्षणात सगळे बदलुन जाते! विचार आनि क्रुती दोन्हीही! :) तुमच लिखाण अतिशय सुंदर आहे! __/\__ ---------
  • Log in or register to post comments

आनंद

मितान
गुरुवार, 12/30/2010 - 18:06 नवीन
मला जे सांगायचं आहे ते तुम्हा सर्वांपर्यंत तसंच्या तसं पोहोचलं याबद्दल आनंद होतोय. उत्स्फूर्तपणे तुम्हापैकी काहीजणांना आपले अनुभवही शेअर करावे वाटले ही मी मला तुम्हा सर्व वाचकांकडून मिळालेली शाबासकी समजते :) धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments

अतिशय आवडलं :)

गणपा
गुरुवार, 12/30/2010 - 18:07 नवीन
तुझ्या या प्रकटनापुढे छान, मस्त, सुरेख,अप्रतिम आदी सर्व शब्द थिटे आहेत.
  • Log in or register to post comments

टचिंग...

चिगो
गुरुवार, 12/30/2010 - 22:19 नवीन
अत्यंत सुरेख लेख...
  • Log in or register to post comments

छान

सुनील
गुरुवार, 12/30/2010 - 23:08 नवीन
सुंदर लेख. खजिन्याची उधळण आवडली!
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!

टुकुल
Fri, 12/31/2010 - 10:46 नवीन
जबरदस्त लिखाण. एकदम डोळ्यासमोर उभे केल चित्र. --टुकुल
  • Log in or register to post comments

छान लेख...

अतुलजी
Sat, 01/01/2011 - 06:11 नवीन
छान लेख...
  • Log in or register to post comments

माया गं, विशेषणं तरी काय

मेघवेडा
गुरुवार, 01/06/2011 - 04:27 नवीन
माया गं, विशेषणं तरी काय वापरायची आता? तसं बघायला गेलं तर सर्वांनाच असे अनुभव आलेले असतात. पण 'लाईफ इज ब्युटिफुल' म्हणजे काय हे कळायला ती सौंदर्यदृष्टी असायलाच हवी. बारीकसारीक गोष्टींतून आलेले अनुभव किती श्रीमंत करून जातात नाही? तू म्हटलंयस ते -
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.
. अगदी खरंय. आयुष्य मनसोक्त जगण्याच्या वगैरे कल्पना इतक्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहेत की म्हणजे नक्की काय करायचं किंवा केलं हे प्रत्येकाला शब्दांत व्यवस्थित मांडता येईलच असं नाही. तुझा लेख वाचून हे पुनः जाणवलं नि तू इतका 'क्लिशेड' विषय सहजसोप्या शब्दांत मांडलास याबद्दल कौतुक तर वाटलंच सोबत हेवाही वाटला तुझा फार! शीर्षकही समर्पक! तुझा हा लेख वाचून मन प्रसन्न झालं बघ अगदी! मस्तच!
  • Log in or register to post comments

वा...

मन१
Sun, 06/17/2012 - 22:30 नवीन
मस्त भिजून निघालो आठवणींच्या प्रवासात...
  • Log in or register to post comments

"या सर्व वर वर वाईट

स्वराजित
Mon, 06/18/2012 - 14:41 नवीन
"या सर्व वर वर वाईट दिसणार्‍या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं ! असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.." अप्रतिम
  • Log in or register to post comments

वा..

ब़जरबट्टू
Wed, 04/09/2014 - 14:36 नवीन
खुप सुंदर लिखाण.... आवडले.. मोहरुन गेलो... :) मिपाचा सगळा प्राचीन "खजिना" शोधतोय :)
  • Log in or register to post comments

@खुप सुंदर लिखाण.... आवडले..

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/09/2014 - 15:16 नवीन
@खुप सुंदर लिखाण.... आवडले.. मोहरुन गेलो...>>> +१ & Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

धन्यवाद त्या निमित्ताने

आरोही
Wed, 04/09/2014 - 14:47 नवीन
धन्यवाद त्या निमित्ताने आम्हाला हि चांगले काहीतरी वाचायला मिळाले ... मस्त आहे लेख मीतान तै ...+)
  • Log in or register to post comments

+१

त्रिवेणी
Wed, 04/09/2014 - 15:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

खूपच सुंदर.

बॅटमॅन
Wed, 04/09/2014 - 15:42 नवीन
खूपच सुंदर.
  • Log in or register to post comments

आहाहा!

शुचि
Wed, 04/09/2014 - 17:18 नवीन
वा!! हुजूरपागेता माझ्या शाळेत जांभळाचा असाच सडा पाहिला आहे. माझ्या लहान मुलीबरोबर सिदधीविनायकला अथर्वशीर्ष ऐकत बसले आहे, तिच्याबरोबर जुहू चौपाटीवर गोल चक्रात बसले आहे. लहानपणी मैत्रिणॆंबरोबर्चे तर वेधक असंख्य क्षण अनुभवले आहेत . Very therapeutic piece of writing.
  • Log in or register to post comments

अप्रतिम गं मितान !

अजया
Wed, 04/09/2014 - 21:01 नवीन
अप्रतिम गं मितान !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा