खरंच, शब्दा-शब्दाला दाद द्यावी इतका छान झालाय लेख. वाचता-वाचता मी माझ्या खजिन्याचा विचार केव्हा करायला लागले कळलंच नाही.
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून..
अगदी अगदी!! हे असे साधे-नेहमीचे पण वेगळी अनुभूती देणारे काही क्षण कायम मनात घर करून राहतात. त्याहीपुढे जाऊन मी असं म्हणेन की ते क्षण आपल्याला काहीतरी नवीनच शिकवून जातात. आताही असं होतंय की मनात जे आहे ते शब्दात सांगताच येत नाहीये... तो केवळ अनुभव असतो आणि ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो :)
विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !"
--- अगदी, अगदी. श्रीमंत करून जाणारे असे हे क्षण थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतील. पण त्यांचं इतकं सुरेख प्रकटन वाचून Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away सारखं तद्दन फॉरवर्डणीय झालेलं हे सत्य, कुठेही क्लिशे होऊ न देता मांडणं किती अवघड आहे, हे पुन्हा जाणवलं.
अगदी नेमक्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काही अनुभव असे असतात की दुसर्यांना सांगितले तर "त्या काय विशेष ..." असे उद्गार ऐकायला मिळतात. त्यांनी जर ती अनुभूती घेतली तरच त्यांना त्यातली मजा कळेल.
मला दोन सुंदर सकाळ (अनेकवचन काय?) आठवताहेत, त्या पण अशाच निसर्गसुंदर वातावरणातील अद्भुत वाटणार्या. पहिली म्हणजे प्राथमिक शाळेत असताना एकदा कोकणात 'तुरळ' नावाच्या खेड्यात एका दूरच्या नातेवाइकांकडे गेलो होतो तेव्हाची. संध्याकाळी उशिरा तंगड्तोड करत त्यांच्याकडे पोहोचलो. खूपच दमलो होतो, जेवण करून जो झोपलो, ते पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग आली. आणि त्यावेळचा एकूण निसर्गाचा आविष्कार असा काही भावला, की गेल्या जवळ जवळ ३०-३२ वर्षांत मी ती सुंदर सकाळ विसरू शकलो नाहीये.
दुसरी अशीच निसर्गरम्य सकाळ अनुभवली ती इंग्लंडमधील अॅस्कॉट मधे. त्या उन्हाळ्यातल्या पहाटे ३:३०-४:०० वाजताच अशीच पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे जाग आली. 'बी अॅन्ड बी' मधे उतरलो होतो, ते म्हणजे एका सुखवस्तु शेतकर्याचं मळ्यातलं घर होतं. चहू बाजूनी निसर्ग नुसता बहरात आला होता. तेव्हा खरोखर मला अरूण दातेंनी गायलेल्या "या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे" गाण्याचा अर्थ उमगला, अनुभवता आला ...
मायातै,
सुंदर.
अत्यंत छान तर्हेने आपण अनुभवलेले क्षण शब्दात पकडले आहेत.
फक्त आणि फक्त अनुभव... ना कसली तुलना, ना कसली समीक्षा, ना कसली प्रतिक्रिया.
अनुभव 'संपल्या' नंतर हे सगळे सुरु होते.
खूप छान लिहीलंय. वाचताना प्रत्येक क्षणाबरोबर मी ही अनुभवलेले असेच क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले.
>>असं वैतागलेल्या क्षणी त्या माणसासोबत तो अनुभव झेलताना मनात " हे पुन्हा कधीच नाही " असे आले तर वैताग कमी होईल का ?
हे खासंच. कुठलं कुठलं अध्यात्मिक तत्वज्ञान वाचून मन अलिप्त वगैरे करण्यापेक्षा समरसून प्रत्येक क्षणाचे सुख-दु:ख अनुभवण्याचे हे अध्यात्म कधीही श्रेयस्कर.
प्रतिसाद लिहायचा म्हणुन काहीतरी लिहिते आहे, खर सांगु ? जस शांत संध्येत आवाज न करता बसाव ना तस वाटल ! काहीही न बोलता बस वाचत रहाव. काही काही गोष्टी हात वा रव लागला तर लुप्त होतात ना? चुकुन हे ही तसच काही असल तर?
<या प्रकटनात एकूण जितकी अक्षरं आहेत, त्याच्या दसपट अभिवादनाच्या स्मायल्या इथे समजून घ्याव्यात>
ही माया, काही बोलायलाच ठेवत नाही शिल्लक. असे प्रसंग अनुभवले आहेत पण ते असं लिहायचं बळ नाही माझ्याकडे.
अगदी अगदी..
प्रत्येकवेळेला लिहिताना अव्वल आणि शंभर नंबरी.. सकस..
खुप तरल आणि निर्मळ लिहितेस
आमचा रतीब म्हणुनच कोता वाटतो..
बाकी काय बोलणार.. नेहेमीचंच.. महान आहेस...
मितान, खुप छान लिहिलं आहे, तुम्ही असंच लिहित राहावं या साठी मी सकाळीच सुर्यनारायणाला सांगुन ठेवलं आहे.
तुम्ही जेंव्हा पुन्हा अशा निसर्गाकडे जाल ना तेंव्हा माझ्यासाठी प्रार्थना कराल ,मला पण असं लिहिता यावं या साठी.
हर्षद.
या सर्व वर वर वाईट दिसणार्या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
अगदी अगदी! काही प्रसंगी चिड्ण्यापेक्षा असा विचार मनात आणावा, 'हे पुन्हा कधीच नाही' आणि क्षणात सगळे बदलुन जाते! विचार आनि क्रुती दोन्हीही! :)
तुमच लिखाण अतिशय सुंदर आहे!
__/\__
---------
मला जे सांगायचं आहे ते तुम्हा सर्वांपर्यंत तसंच्या तसं पोहोचलं याबद्दल आनंद होतोय. उत्स्फूर्तपणे तुम्हापैकी काहीजणांना आपले अनुभवही शेअर करावे वाटले ही मी मला तुम्हा सर्व वाचकांकडून मिळालेली शाबासकी समजते :)
धन्यवाद ! :)
माया गं, विशेषणं तरी काय वापरायची आता? तसं बघायला गेलं तर सर्वांनाच असे अनुभव आलेले असतात. पण 'लाईफ इज ब्युटिफुल' म्हणजे काय हे कळायला ती सौंदर्यदृष्टी असायलाच हवी. बारीकसारीक गोष्टींतून आलेले अनुभव किती श्रीमंत करून जातात नाही? तू म्हटलंयस ते -
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.
.
अगदी खरंय. आयुष्य मनसोक्त जगण्याच्या वगैरे कल्पना इतक्या अॅब्स्ट्रॅक्ट आहेत की म्हणजे नक्की काय करायचं किंवा केलं हे प्रत्येकाला शब्दांत व्यवस्थित मांडता येईलच असं नाही. तुझा लेख वाचून हे पुनः जाणवलं नि तू इतका 'क्लिशेड' विषय सहजसोप्या शब्दांत मांडलास याबद्दल कौतुक तर वाटलंच सोबत हेवाही वाटला तुझा फार!
शीर्षकही समर्पक! तुझा हा लेख वाचून मन प्रसन्न झालं बघ अगदी! मस्तच!
"या सर्व वर वर वाईट दिसणार्या आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून.."
अप्रतिम
वा!! हुजूरपागेता माझ्या शाळेत जांभळाचा असाच सडा पाहिला आहे.
माझ्या लहान मुलीबरोबर सिदधीविनायकला अथर्वशीर्ष ऐकत बसले आहे, तिच्याबरोबर जुहू चौपाटीवर गोल चक्रात बसले आहे.
लहानपणी मैत्रिणॆंबरोबर्चे तर वेधक असंख्य क्षण अनुभवले आहेत .
Very therapeutic piece of writing.
प्रतिक्रिया
सु - रे - ख !
फार फार सु रे ख!!! तुझे लेख
लई खास हो!
सहमत आहे
फार सुरेख!!
अप्रतिम आठवणी
मस्त लेखन! मगाशी घाईत होते
मस्त!
अतिशय छान
सुरेख
अतिशय सुरेख !!
आवडलं
मितान ताई, खुप सुंदर लिहिलेय
मस्त
सुंदर !
सुंदर...!!!
अप्रतिम लेख ...
अ-प्र-ति-म
मायाचे लिखाण न बाकिच्यांचे
खूप छान लिहीलंय. वाचताना
मस्त
छान लिहीले आहे
प्रतिसाद लिहायचा म्हणुन
अप्रतिम!
अगदी अगदी.. प्रत्येकवेळेला
अगदी अगदी !!
जादूभरं..
शब्दलेस..
खुप सुंदर लेखन.... अचानक
मस्त
सुंदर लेखन अमोल केळकर
मितान, खुप छान लिहिलं आहे,
!
नि:शब्द !
आनंद
अतिशय आवडलं :)
टचिंग...
छान
जबरदस्त !!
छान लेख...
माया गं, विशेषणं तरी काय
वा...
"या सर्व वर वर वाईट
वा..
@खुप सुंदर लिखाण.... आवडले..
धन्यवाद त्या निमित्ताने
+१
खूपच सुंदर.
आहाहा!
अप्रतिम गं मितान !