कोडे
एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे.
(१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर. गंगापूरमध्ये १००० खेडूत रहात असतात.
(२) या खेडूतांमध्ये १०० जणांच्या डोळ्यांचा रंग पिंगा असतो तर ९०० जणांच्या डोळ्यांचा रंग असतो काळा.
(३) एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही.
(४) हे लोक कोणत्याही प्रतिबिंब दाखविणार्या वस्तूमध्ये आपले रूप पाहू शकत नाहीत किंवा स्वतःच्या अथवा अन्य कोणाच्या डोळ्याच्या रंगाबद्दल चर्चा करू शकत नाहीत.
(५) जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो.
(६) गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.***
*** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.
(७)सर्व लोक एकदुसर्याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात.
(८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो.
(९) त्याचे खूप आदरातिथ्य होते आणि या आदरतिथ्याच्या आभाराप्रीत्यर्थ तो एक भाषण एका संध्याकाळी देतो.
(१०) या भाषणात तो चुकून बोलून जातो की "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
(११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
प्रतिक्रिया
एका धार्मिक प्रथेनुसार या
हाहा
एक प्रश्न
अतिशय योग्य प्रश्न
जमातीवर काही परिणाम होणार
वरील उत्तर चूकीचे वाटते. लोक
जर एखाद्याला त्याच्या
तर्काची एक पद्धत
अशीच काहीशी धारणा...
१०० पिंगेमंडळी आहेत.
कोणी सांगावं?
कोड्यात एवढाच उल्लेख आहे की
या घटनेनंतर गावातल्या
नाही हो
जर कोणी दिलं नाही तर, उत्तर
या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
शुचि, समजा मी काळ्या ( किंवा
स्वानंद मला जरी काळे आणि
ती शक्यता तर तो पाहुणा गावात
"मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात
उत्तम प्रयत्न
ओके
उत्तर चूक आहे. तुमचं
अजून एक उत्तर
स्पष्टीकरण? उत्तर चूक आहे.
गहन विचार प्रक्रिया सुरु
तुमच इंटर्प्रेटेशन बरोबर आहे
तर्काची बाजू पक्की आहे म्हटले
उत्तर - काहीच परिणाम होणार
अंदाज
माउ परदेशी माणसाला शिक्षा
शुचि मामी तुझा उपक्रमावर आयडी
+१
मला वाटते
दोन शक्यता आहेत. १. लोकांना
#१ आणि #२ इनव्हॅलीड
मृत्यूदंड..........
उत्कर्ष प्रश्न हा आहे की या
शुचिताई मूळ कोडं, अनुवाद न
There is an island upon which
गमतीदार दुवा
धनंजय इन्ड्क्शन ची व्याख्या
खाली आणखी एक
नाही परत एकदा विचार करता
मला वाटते
पण दुसर्या दिवशी दुपारी
अरे हो, ते नजरेतुन सुटले होते
काळ्याला चारी पिंगे दिसत
हो पण चारच पिंगे आहेत हे
४ पिंगे आहेत (अ, ब, क, ड).
Pagination