स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? मग हा वाद कशासाठी, या वादचा मुळ उद्देश काय ? सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक पडेल ? या वादाला वैचारीक क्रांती म्हणायचे का ? हा वाद घालणारे लोक म्हणतात की मागील ३०० वर्षापासुन महाराष्ट्रातील जनतेला हा खोटा इतिहास शिकवला जातो आहे, आणि हा खोटा इतिहास आम्हाला मान्य नाही आम्ही तो बदलणार , जे मान्य नाही ते जरुर बदलावे परंतु महाराजांनी शेकडो वर्षापासुन मुघल राजवटीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्याची पहाट दाखवली, चारही बाजुंनी मुस्लीम राजवटी होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील जनता हालअपेष्टा भोगत होती, त्यातुन महाराजांनी जनतेची सुटका केली, स्वराज्याची बांधणी करीत असताना अनेक युध्दाचे प्रसंग आले, महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथाळा बाहेर काढला, लालमहालात शाहीस्तेखानाची बोटे कापली वगैरे प्रसंग तरी तसेच राहु द्यावेत कारण त्यात महाराष्ट्राच्या मर्दमुकीचा इतीहास आहे, गर्वाने प्रत्येस महाराष्ट्रीय माणसाची छाती अभिमानाने फुलुन यावी असे हे प्रसंग आहेत, दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याचा हा इतिहास आहे, हे तरी आपणास मान्य असेल तर हे बदलु नका ,अफजलखानाचा धडा अभ्यासक्रमात राहु द्या.
महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे परंतु जातीजातीत भांडणे लावुन देण्यासाठी अशा वादांना हवा दिली जाते आहे. मात्र सरकारमधील नेत्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन त्यांना गुरु मानावे म्हणजे तरी ते चांगला राज्यकारभार चालवु शकतील , दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करु शकतील. एवढे मात्र नक्की की विचार हे असे भुत आहे की टाळकी फोडली, मेंदु बाहेर आला तरी ते जात नाहीत कारण जे विचार त्या टाळक्यात घुसायला ३०० वर्षे लागली ते विचार ईतक्या सहजासगजी बाहेर निघतील असे समजने म्हणजे तो विनोद होईल मात्र महाराष्ट्रालाच काय संपुर्ण भारताला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजकीय गुरुची खरी गरज आहे येवढे निश्चीत मग महाराज खरच इतके थोर होते त्यांचे गुरु कोणी का असेना जर ते असतील तर किती थोर असतील ?.
-----------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे.
अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे.
- संपादक मंडळ
-------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
गोब्राम्हणप्रतिपालक,
च्यायला !!
+१
कमाल आहे बुवा..
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराज
मग महाराज हे गो आणि ब्राम्हण
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
म्हणजे? स्वयंभू असणे आणि
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले
म्हणजे? तुम्ही काही निराधार
अच्छा
चालू द्या....
शिवाजी महाराजांचा लाडका
होळकर बडोद्याचे?
निनाद बेडेकर
होय ते शाहीरच आहेत
सोयिस्कर तेवढे घ्यावे उरलेले
सोयीस्कर नाही
निनाद बेडेकर यांनी त्यांच्या
इनडायरेक्ट स्पीच
हो पण मी त्यांची नावेही
सत्य प्रतिपादन
बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे
वाघ्या कोणाचा
मग वाघ्या शिवरायांचा होता हे
पारंपरिक समज
सदर पवाडा कोणत्या शाहीराचा?
मुद्दा
गोब्राम्हणादिप्रतिपालक...
रोचक
'इतर' सुद्धा स्वयंभु
मग महाराज हे गो आणि ब्राम्हण
नवीनच राजमुद्रा
ओक्के ओक्के. आमची चूक झाली
तीच शंका आहे.
माफ करा मी ज्ञानी नाही. हा
नाही
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा
वा! वा!
खो खो
बालपणी गुरु असल्यामुळे
अमोल जी पहिल्यांदा हा धागा
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु
यांचे म्हणणे आहे...अहो दादा
स्वयंभू राजें शिवछत्रपतींना
एकदम जोषात चर्चा चालु आहे ..
पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव
-----------------------------
Pagination