Skip to main content

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे. बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? मग हा वाद कशासाठी, या वादचा मुळ उद्देश काय ? सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक पडेल ? या वादाला वैचारीक क्रांती म्हणायचे का ? हा वाद घालणारे लोक म्हणतात की मागील ३०० वर्षापासुन महाराष्ट्रातील जनतेला हा खोटा इतिहास शिकवला जातो आहे, आणि हा खोटा इतिहास आम्हाला मान्य नाही आम्ही तो बदलणार , जे मान्य नाही ते जरुर बदलावे परंतु महाराजांनी शेकडो वर्षापासुन मुघल राजवटीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्याची पहाट दाखवली, चारही बाजुंनी मुस्लीम राजवटी होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील जनता हालअपेष्टा भोगत होती, त्यातुन महाराजांनी जनतेची सुटका केली, स्वराज्याची बांधणी करीत असताना अनेक युध्दाचे प्रसंग आले, महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथाळा बाहेर काढला, लालमहालात शाहीस्तेखानाची बोटे कापली वगैरे प्रसंग तरी तसेच राहु द्यावेत कारण त्यात महाराष्ट्राच्या मर्दमुकीचा इतीहास आहे, गर्वाने प्रत्येस महाराष्ट्रीय माणसाची छाती अभिमानाने फुलुन यावी असे हे प्रसंग आहेत, दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याचा हा इतिहास आहे, हे तरी आपणास मान्य असेल तर हे बदलु नका ,अफजलखानाचा धडा अभ्यासक्रमात राहु द्या. महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे परंतु जातीजातीत भांडणे लावुन देण्यासाठी अशा वादांना हवा दिली जाते आहे. मात्र सरकारमधील नेत्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन त्यांना गुरु मानावे म्हणजे तरी ते चांगला राज्यकारभार चालवु शकतील , दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करु शकतील. एवढे मात्र नक्की की विचार हे असे भुत आहे की टाळकी फोडली, मेंदु बाहेर आला तरी ते जात नाहीत कारण जे विचार त्या टाळक्यात घुसायला ३०० वर्षे लागली ते विचार ईतक्या सहजासगजी बाहेर निघतील असे समजने म्हणजे तो विनोद होईल मात्र महाराष्ट्रालाच काय संपुर्ण भारताला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजकीय गुरुची खरी गरज आहे येवढे निश्चीत मग महाराज खरच इतके थोर होते त्यांचे गुरु कोणी का असेना जर ते असतील तर किती थोर असतील ?. ----------------------------------------------------------------- महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे. अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे. - संपादक मंडळ -------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12088
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by मैत्र

हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >> +१ .. १ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ? २ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ? सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

In reply to by मैत्र

आपला रिप्लाय मनापासुन आवडला ... सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ? ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते . त्वरा करा

१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ? २. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे. ३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ. एक स्वयंभू प्रतिसादक नाना भू-रके

In reply to by नाना बेरके

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ? बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे . पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत! त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.