Skip to main content

सूर तेच छेडिता

लेखक यकु यांनी बुधवार, 03/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीत: सूर तेच छेडिता मूळ गीत एका प्रियकरानं प्रेयसीसाठी म्हटलेलं आहे. गमंत अशी असते की बहुतांशी लोकांची प्रेयसी जेव्हा सुटते, तेव्हा त्यांना सिगारेट ही नवी प्रेयसी हमखास मिळत असते. या कल्पनेवर या गाण्याचे शब्द सहज इकडे तिकडे ठेऊन पाहिले आणि तयार झालं धूर तोच काढीता... धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. वलय उमटले नवे ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. रोज लाभते सखी सौख्य जे मला हवे सखोल झीट उसळली गळी हळूच उतरली कामना सुखावली भासली नवी हवी ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती काढले कसे किती वलय वलय आठवे धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. सर्व मिपाकरांना आणि मिपा वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
काव्यरस

वाचने 3648
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

पन भौ येक सांगा. तुमी कंच्याबी कंपुत सामील नाही. बरोबर ना????? ;)

In reply to by चिंतामणी

खरंय! पण काही हरकत नाही. कंपूत असल्याशिवाय कशाचा आनंद घेताच येत नाही असे काही नाही. तुम्हाला, शुचितै आणि मेघवेडा यांना आवडले तेवढे पुरे!

स्वागतार्ह विडंबन. आवडलं. सिगरेट बद्दल असल्याने स्त्री सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या नसाव्यात. मी तरी सिगरेट्च्या उत्तेजनार्थ वाटल्यामुळे देणार नव्हते. पण एक विडंबन म्हणून खरोखरच स्तुत्य आहे.

>>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. वलय उमटले नवे ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. >> =)) मस्त आणि निखळ विडंबन आहे!! आत्ता पाहिले! :)

एकदम काळजाला भिडलं भौ हे इडंबन. :) (साला, एक ते प्रेमभडंग सोडलं तर आख्खं गाणं काय मलाच बघून लिहिलं का काय असं वाटलं ना. :) ) - (हर फिक्र को धुव्वे में उडातां चला) ध.

In reply to by धमाल मुलगा

धम्याच्या काळजाला भिडल्याने ह्या विडंबनाला 'चान चान' म्हणत आहे. धम्यानी चार शिग्रेटी ओढल्या की त्या धुराने आजुबाजुच्यांची एक फुकटात ओढून होते ;)

आवडले! खास करुन ते : ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. आणि ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ