✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भन्नाट

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 12/15/2010 - 15:55  ·  लेख
लेख
  • भन्नाट २
  • भन्नाट ३
  • भन्नाट ४
  • भन्नाट ५
  • भन्नाट ६
  • भन्नाट ७

Book traversal links for भन्नाट

  • भन्नाट २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26523 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

वाचतोय येऊ दे पुढचा भाग लवकर

निनाद मुक्काम …
Wed, 12/15/2010 - 16:00 नवीन
वाचतोय येऊ दे पुढचा भाग लवकर
  • Log in or register to post comments

सुहास शिरवळकरांच्या ज्या चार

असुर
Wed, 12/15/2010 - 17:39 नवीन
सुहास शिरवळकरांच्या ज्या चार नायकांची परा गोष्ट लिहीतोय, त्या चार नायकांविषयी चार शब्द लिहीण्याची अपार इच्छा झाल्याने हा प्रतिसाद. सु.शि. (दुर्दैवाने) ज्यांना माहीती नाहीत, अशा वाचकांसाठी या चारही हिरोंना अचानक खूप सार्‍या गोष्टी एकाचवेळी करताना पाहून आचंबा वाटेल खरा, तो आचंबा स्ट्रीमलाईन करायचा हा प्रयत्न आहे. बाकी कथेद्वारे (आणि पटापटा लिहून) परा तुम्हाला आचंबित करीत राहीलच याची खात्री! दारा - 'दारा हिम्मत बुलंद' असं दणदणीत नाव असणारा दणदणीत हिरो. राजस्थान हे याचं कार्यक्षेत्र. पण तो राजस्थानपुरता बांधलेला नाही. व्हिलन्सच्या पाठलागावर चंबळ, माळवा, इतकंच काय तर पाकिस्तानात देखील जाऊन आलाय! राजस्थानातील प्रत्येक तरूणीचा मानलेला भाऊ, कधीही कुणालाही मदत करायला तत्पर असा दारा सव्वासहा फूट उंच आहे, आणि अमानवी ताकदीचा आहे. या दाराचे ३ जीवाभावाचे मित्र त्याला त्याच्या कामात मदत करत असतात. त्यापैकी 'मधुर' या टीमचा ब्रेन आहे (आणि दाराच्या बहीणीचा 'सलोनी'चा हिरोही), 'शीतल' शस्त्रविद्येत पटाईत आहे, आणि 'बादल' मार्शल आर्टस आणि फ्रीस्टाईल मध्ये पारंगत! बॅरिस्टर अमर विश्वास - पदवीवरुनच लक्षात आलं असेल की अमर हा पेशाने वकील आहे. कोर्टरूममध्ये याला अजूनतरी कोणी चकमा दिलेला नाही! अडीअडचणीतल्या अशीलांच्या केसेस तो जीवापाड मेहेनत घेऊन आणि प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून सोडवतो. पण 'सत्याचा पाठपुरावा करणे' हे त्याचे तत्व आहे, त्यामुळे तो उगाच कोणाचेही वकीलपत्र घेत नाही. वकीली हा त्याचा पेशा असला तरी त्याने त्याचा धंदा केलेला नाही. 'गोल्डी' हा अमरचा मित्र आहे, आणि एक डिटेक्टीव्ह एजन्सी चालवतो. वेळोवेळी अमरला मदत करणे हे त्याचे आवडते काम आहे. पण जिथे कुठे जान का खतरा असेल तिथे गोल्डीचा जीव धोक्यात घालण्याऐवजी अमर स्वत: तिथे पोहोचतो 'रातों का राजा' बनून! पण त्याचा हा 'आयडी' फक्त वाचकांनाच माहीती आहे. मंदार पटवर्धन - 'पटवर्धन' या आडनावातूनच मंदारचे सगळे गुण प्रकट होतात. म्हणजे तो स्मार्ट आहे, मुंबईकर आहे, एकदम हिरो मटेरियल आहे आणि पेशाने डिटेक्टीव्ह आहे. प्रिन्स आणि डॅनी या मित्रांना मदतीला घेऊन मुंबईतले गुंड पिसणे, टोळ्या उध्वस्त करणे आणि उरलेल्या वेळात 'रमी'बरोबर (रमोला चक्रवर्ती, अर्थात मंदारची गर्लफ्रेंड) चकाट्या पिटत फिरणे हा याचा उद्योग! कमिशनर केतकरांचा भाचा असल्याने फोलिसमध्ये लैच ओळखी आहेत याच्या. दिनेश सायगल नावाचा तडफदार इन्स्पेक्टर हा मंदारचा मित्र. फिरोज इराणी - या चारही लोकांमधला सर्वात इरसाल मनुष्य! लहानपण अतिशय गरीबीत आणि मुंबईच्या झोपडपट्ट्या आणि फुटपाथवर गेल्याने जीवनाचे वास्तव जवळून पाहीलेला. आणि त्यामुळेच कुणालाही मदत करताना कायदा, सुव्यवस्था, पोलिस वगैरेची पर्वा न करणारा अतिशय बेदरकार हिरो! सुरुवातीची काही वर्षे फिल्मलाईनमध्ये स्टंटमन म्हणून काम केरताना अनेकविध मारामार्‍या आणि शस्त्रे शिकावी लागली त्याचा त्याला पदोपदी फायदा होतोय. रहीमचाचाने बनवलेल्या 'बैदुल'चा सढळ हाताने वापर करुन गुंडांना ठोकून काढणे हा याचा आवडता टाईमपास! बाकी दिवसभर कुणा गुंडाला (आणि त्याच्या टोळीला) पिसून झालं की रात्री एखाद्या कसिनोमध्ये जाऊन पत्ते पिसणे हा याचा मुख्य उद्योग. पत्त्यातला अतिशय बेरकी आणि तितकाच अव्वल दर्जाचा खेळाडू. तीच अक्कल सट्टा, जुगारातही लावून लोकांचा काळा पैसा त्यांच्या खिशातून काढून त्यांच्या मनातली टोचणी कमी करण्याचे सत्कार्यही करत असतो. इतक्या कुचाळक्या करुनही इन्स्पेक्टर मुकेश भाटीया आणि आघाडीचे उद्योगपती श्री. बिमल रॉय यांच्यामुळे कानूनच्या लंबे हातातून बचावला आहे. थोडक्यात म्हणजे 'रंगूनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा' असणारा हिरो! असे हे चार हिरो आपापल्या कादंबर्‍यांतून तर धुमाकुळ घालतच आहेत. आता पराषेठने त्यांना एकाच कथेत गुंफण्याचं जे शिवधनुष्य उचललंय त्यासाठी पराषेठ आणि त्यांच्या हिरोंना शुभेच्छा!! सुहास शिरवळकर नावाच्या विलक्षण प्रतिभेच्या लेखकाने गाजवलेले हे हिरो पराषेठचं ऐकतात का हाच सध्याचा सवाल नं. १ आहे! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

धन्यवाद

दिपक
गुरुवार, 12/16/2010 - 09:57 नवीन
धन्यवाद असुर. :-) सुरुवात एकदम भारी झालीये परा. येऊदेत पुढे!! उत्सुकता ताणली गेलेली आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

मान गये बॉस! मस्त पात्रपरिचय!

स्वानन्द
गुरुवार, 12/16/2010 - 10:26 नवीन
मान गये बॉस! मस्त पात्रपरिचय! बाकी परा ही जबाबदारी पेलू शकेल यात शंका नाही. सव्यसाची आणि हॅकर्स अंडरग्राऊंड ( तेच ते अर्धवट सोडलेले ) वाचल्यावर तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

दुर्दैवाने ह्या चारही

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 05:45 नवीन
दुर्दैवाने ह्या चारही शिलेदारांची एकही कांदबरी अथवा गोष्ट वाचली नाही . रहस्य कथांमध्ये आमची मजल गुरुनाथ नाईक व शैलजा राजे/ अगदीच कंटाळा आला तर प्रणय कथांची साम्रांज्ञी आशु विजू रानडे ह्या गोष्टीच्या निम्मित्ताने ह्या चार नायकांची बलस्थाने व कामगिरी फत्ते करण्याचा वकूब कळून येईन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

पुढे?

sneharani
Wed, 12/15/2010 - 16:01 नवीन
झाल का क्रमशः ? लिहा पटापट पुढे! मस्त झालाय हा भाग!
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट होतंय..

गवि
Wed, 12/15/2010 - 16:02 नवीन
पुढचे लवकर.
  • Log in or register to post comments

झकास सुरुवात

स्पा
Wed, 12/15/2010 - 16:02 नवीन
झकास सुरुवात ............ वाचतोय..... (सु शी चे चार नायक.... कृपया नवीन वाचकांसाठी खुलासा करावा)
  • Log in or register to post comments

काळापाहाडाची कथा वाचतोय असा

गणपा
Wed, 12/15/2010 - 16:03 नवीन
काळापाहाडाची कथा वाचतोय असा भास झाला. मस्त येउंदेरे अजुन. :D
  • Log in or register to post comments

मस्त लिहित आहात .. येवुद्या

गणेशा
Wed, 12/15/2010 - 16:04 नवीन
मस्त लिहित आहात .. येवुद्या पुढचे भाग ...
  • Log in or register to post comments

हाण्ण तेज्यायला.. परा किती

मेघवेडा
Wed, 12/15/2010 - 16:07 नवीन
हाण्ण तेज्यायला.. परा किती भारी सुरूवात केलीयेस रे. पण सुसाट वेगात सुटलेल्या गाडीनं अचानक काच्चकन ब्रेक मारावा तसं काहीसं.. (क्रमशः)
  • Log in or register to post comments

+१

भाऊ पाटील
Wed, 12/15/2010 - 16:39 नवीन
लय भारी सुरूवात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

असेच म्हणते

स्मिता.
Wed, 12/15/2010 - 17:26 नवीन
गोष्ट अशी रंगात येत असतानाच हे क्रमशः का कलमडतं देव जाणे! मला तर आता हा शब्दाबद्दल अतिशय नावड निर्माण झाली आहे. पुढले भाग लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

वा! वा! वा!! येऊ द्या की मग

यकु
Wed, 12/15/2010 - 16:08 नवीन
वा! वा! वा!! येऊ द्या की मग पुढचे भाग पण! जब्बरदस्त वेगवान आणि उत्कंठावर्धक झालंय. भन्नाट - २ लवकरच वाचायला मिळो अशी आशा :)
  • Log in or register to post comments

छान !

प्राजक्ता पवार
Wed, 12/15/2010 - 16:11 नवीन
वाचतेय .पुढचा भाग लवकर टाका .
  • Log in or register to post comments

झक्कास!

नंदन
Wed, 12/15/2010 - 16:12 नवीन
वेगवान सुरुवात. पुढच्या भागांची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 12/15/2010 - 16:18 नवीन
+१ अजुन काय लिहणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२ तेच.

नगरीनिरंजन
Wed, 12/15/2010 - 17:37 नवीन
+२ तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+३

अनिल हटेला
गुरुवार, 12/16/2010 - 23:34 नवीन
वाचतोये !!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पहिल्यांदा लेखाच्या खाली

स्वानन्द
Wed, 12/15/2010 - 16:15 नवीन
पहिल्यांदा लेखाच्या खाली 'क्रमशः' आहे का ते पाहिलं. क्रमशः असल्याने, पूर्ण लेख मालिका आल्याशिवाय वाचणारच नाही.
  • Log in or register to post comments

मी पण आता हाच मार्ग निवडावा

गणेशा
Wed, 12/15/2010 - 17:28 नवीन
मी पण आता हाच मार्ग निवडावा असे वाटत आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

झकास !!

सूड
Wed, 12/15/2010 - 16:16 नवीन
झकास !!
  • Log in or register to post comments

छान छान.

चिंतामणी
Wed, 12/15/2010 - 16:27 नवीन
पण दरवेळी लिखाणात (क्रमशः)चा ब्रेक असायलाच पाहीजे का रे परा?
  • Log in or register to post comments

ज ह ब ह र्‍या !!

सुहास..
Wed, 12/15/2010 - 16:38 नवीन
भन्नाट कल्पना आणि भन्नाट सुरवात रे पर्‍या !! "अरे.." असे म्हणत फिरोजनी तरुणाच्या डाव्या हाताला बघितले आणि तो फसला. त्याने मान वळवली आणि दुसर्‍याच क्षणी त्याचे पिस्तूल फिरोजच्या हातात होते. "चल तुझ्या मित्रांना भेटून येऊ" फिरोज त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. भकास नजरेने फिरोजकडे बघत तो तरुण पाय ओढत निघाला. >>> दोन मिनीटाकरिता वाटले सुशिंच एखाद पुस्तकच वाचतोय की काय , रंगुन गेलो आणि क्रमश : पाहिले ..का ? का ? का ? असो ..लवकर लिही .. अवांतर : कावेरीत दहा दिवसांची स्पॉन्सरशिप देतो हवे तर !! ;)
  • Log in or register to post comments

+१ (सूशी च फक्त)

आत्मशून्य
Wed, 12/15/2010 - 19:55 नवीन
असो.. ह्याची एकता कपूरची सीरियल बनवू नका.....
  • Log in or register to post comments

मस्तच...

चिगो
Wed, 12/15/2010 - 18:04 नवीन
>>"तुझी इच्छा. सत्ती टॉपवर येवढे पैसे जिंकणारा मी पहिला असीन बहुदा जगात" समोरच्या तरुणानं घाईघाईने त्याच्या पुढची पाने पालथी केली. तीन गुलाम... समोरचा तरुण डावा गाल उडवत छद्मीपणाने हसला.<< मी इथंच "सुशिं" स्टाईल ओळखली.. परा, लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा... तडफडत होतो सुशिं स्टाईल लिखाण वाचण्यासाठी यार.. असुरभौ आणि धमुभौ चे ही खुप खुप धन्यवाद.. ऑल द बेस्ट फ्रेंड्स... (मी ही सिरीज कॉपी-पेस्ट करुन ठेवणार आहे)...
  • Log in or register to post comments

तुझ्यामायला.... उद्या पुढचा

अवलिया
Wed, 12/15/2010 - 18:10 नवीन
तुझ्यामायला.... उद्या पुढचा भाग आला नाही तर कॅफेवर येउन डोळे काढुन गोट्या खेळेल...
  • Log in or register to post comments

भाग जोरदार ... औत्सुक्यवर्धक

टारझन
Wed, 12/15/2010 - 18:11 नवीन
भाग जोरदार ... औत्सुक्यवर्धक .. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

श्रावण मोडक
Wed, 12/15/2010 - 18:19 नवीन
आरंभशूर ठरू नये, ही शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/15/2010 - 20:02 नवीन
पुढे? (आणखी एक आरंभशूर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तिच्या मारी..

उपास
Wed, 12/15/2010 - 19:31 नवीन
'क्रमशः 'च्या एन.सी.टी
  • Log in or register to post comments

+१

सविता
गुरुवार, 12/16/2010 - 10:18 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

वाहवा!

पैसा
Wed, 12/15/2010 - 19:51 नवीन
ही कथा सुरू करताना परा वर नक्कीच सुशिंचा अवसर आला असावा! "क्रमशः" मात्र थोडा विरस करतो. पुढच्या वेळी अख्खी दीर्घकथाच द्या त्यापेक्षा!
  • Log in or register to post comments

परा..... का वेळ घालव्तो आहेस?

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 12/15/2010 - 20:10 नवीन
पुर्ण लिहुनच टाकत जा यार!
  • Log in or register to post comments

सही...

मस्त कलंदर
Wed, 12/15/2010 - 20:10 नवीन
सुशि वाचून खूप दिवस झाले. आता पटापट पुढचे भाग येऊ देत. तिची शिकार केलीत तर बघाच मग!!!!
  • Log in or register to post comments

भन्नाट

योगी९००
Wed, 12/15/2010 - 20:12 नवीन
परा.. बर्‍याच दिवसांनी तुमच्या कडून चित्तथरारक लिखाण आले आहे..पुढचा भाग लवकर टाका ... सुरूवात भन्नाट आहे...
  • Log in or register to post comments

पुढे?

स्वाती दिनेश
Wed, 12/15/2010 - 21:25 नवीन
सुरुवात झक्कास... सु शि स्टाइल लिहिण्यात परा यशस्वी झालेला आहे, क्रमश:चा व्यत्यय लवकर दूर कर रे.. स्वाती
  • Log in or register to post comments

बापरे! फारच धाडस दाखवतो

ऋषिकेश
Wed, 12/15/2010 - 23:04 नवीन
बापरे! फारच धाडस दाखवतो आहेस! अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान!

पिवळा डांबिस
Wed, 12/15/2010 - 23:40 नवीन
सुरवात एकदम मेलोड्रामॅटिक (एका रहस्यकथेला जशी हवी तशीच) झालीये! त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. क्रमशः बद्दल तक्रार करायचा अधिकार आम्हाला नाही (असं नंदन म्हणतो!!) तेंव्हा पुढील भागांची वाट पहातो... येऊ द्या!
  • Log in or register to post comments

ऐला! ह्याला म्हणतात का सुशि

शुचि
गुरुवार, 12/16/2010 - 00:17 नवीन
ऐला! ह्याला म्हणतात का सुशि स्टाईल????????? मी पहील्यांदाच वाचतेय. मला अक्षरक्षः ऐलमा पैलमा खेळावसं वाटू लागलय एक्साईट्मेंट्मुळे ...... आय मीन इट्स टू मच!!! लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

मस्त सुरूवात, पुढचे भाग लौकर

पुष्करिणी
गुरुवार, 12/16/2010 - 00:33 नवीन
मस्त सुरूवात, पुढचे भाग लौकर येउदेत
  • Log in or register to post comments

मस्त!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/16/2010 - 02:43 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

पुढचे भाग लवकर येउदे नाहीतर

पिंगू
गुरुवार, 12/16/2010 - 05:27 नवीन
पुढचे भाग लवकर येउदे नाहीतर उपासमार व्हायची हो.. - (पुढच्या भागासाठी भुकेला) पिंगू
  • Log in or register to post comments

भन्नाट कल्पना ... कोणे एके

मनीषा
गुरुवार, 12/16/2010 - 09:26 नवीन
भन्नाट कल्पना ... कोणे एके काळी ... सुहास शिरवळकरांची अनेक पुस्तके वाचली आहेत . त्यांची लेखनशैली तुम्ही बरोबर आत्मसात केली आहे ...
  • Log in or register to post comments

वरच्या सगळ्यांशी सहमत

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/16/2010 - 10:05 नवीन
वरच्या सगळ्यांशी सहमत :)
  • Log in or register to post comments

सुरुवात तर झक्कास झाली आहे.

मृत्युन्जय
गुरुवार, 12/16/2010 - 10:31 नवीन
सुरुवात तर झक्कास झाली आहे. पण पराचा एकुण लिखाणाचा वेग, आवेग आणि उत्साह बघता तिसर्‍या आणि चौथ्या नायाकाची एंट्री बहुधा अनुक्रमे २०११ आणि २०१२ मध्य व्हायची. कथा पुर्ण होइपर्यंत जगल्या वाचल्यास (मी नव्हे परा) पुढची प्रतिक्रिया नक्की देइन.
  • Log in or register to post comments

उच्चभ्रू प्रतिक्रिया : सुशि

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/16/2010 - 10:34 नवीन
उच्चभ्रू प्रतिक्रिया : सुशि हे नाव वाचले आणि धागा बंद केला. मनातली प्रतिक्रिया : परा, लै भारी. वेगवान. साला तू तर सुशिंचा वारस वगैरे होशील यार!
  • Log in or register to post comments

फिरोजच्या गाडीचे नाव

अजिंक्य विश्वास
Fri, 11/27/2015 - 18:24 नवीन
कल्पना छान आहे. मात्र फिरोजच्या गाडीचे नाव स्पीड-ब्रेक ९०० असे आहे. आणि कथेत थोडी घाई होत आहे. बाकी कल्पना मस्त. पूर्ण झाल्यावर फेसबुकवर शिरवळकरांच्या ग्रूपवर आणि पेजवर शेअर करता येईल का?
  • Log in or register to post comments

आवडली

आगाऊ म्हादया......
गुरुवार, 05/07/2020 - 06:50 नवीन
मी ही फेयर डील नावावर जरा अडकलो. मस्त आहे पण. आज 2020 मध्ये वाचतोय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा