राष्ट्रस्पाऊस
मराठीत बरेच शब्द हे पुरुष वाचक आहेत
जसे राज्यकर्ता , मंत्री , महापौर , ससा , मासा या शब्दांचे स्त्रीलिंगी शब्द मराठीत लिहिले जात नाहीत
अर्थात बरेच शब्द हे स्त्री लिंगी आहेत त्यांचे पुल्लिंगी शब्द मराठीत नाहीत
जसे: माशी वाटी
पण त्यामुळे पंचाईत होते.
यावर जायच्या अगोदर इंदीरा गांधी ना रशियन अधिकार्यानी त्याना काय संबोधले जावे अशी विचारणा केली "हर एक्सेलन्सी "की "हर हायनेस" किंवा "मॅडम प्राईममिनिस्टर" इंदीरा गांधी म्हणाल्या की त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यावर त्या रशियन अधिकार्याने विचारले की तुमचा स्टाफ तुम्हाला काय संबोधतो. इंदीरा गांधी उत्तरल्या " सर"
अधीकारी ही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते. पण बहुतेक पदांची नावे मात्र पुरुष वाचक आहेत.
उदा : चेअरमन.... आता एखादी स्त्री एखाद्या संस्थेची चेअरमन असेल तर त्या पदाला चेअरवुमन असे संबोधावे की काय असा पेच निर्माण झाला याला उत्तर म्हणून त्या पदाचे नाव चेअर पर्सन असे करण्याची सूचना पुढे आले.
याच न्यायानुसार राष्ट्रपती पदावर एखादी महिला विराजमान झाली तर त्या पदाचे नाव काय करायचे अशी एक विचारणा केली जावू लागली.
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानन्तर ही चर्चा फारच प्रकर्षाने होऊ लागली.
कोर्टात पती किंवा पत्नी यांचा उल्लेख वेगळा करण्यापेक्षा दोंघांसाठी स्पाऊस हा शब्द वापरला जातो ( हाय कोर्टाच्या दोस्तानानिर्णयानन्तर हा शब्द किती उपयोगी आहे ते कळून आले )
स्पाऊस या शब्दा पती आणि पत्नी या दोन्हीं शब्दांचा समावेश होतो.
त्या न्यायाने राष्ट्रपती हा पदवाचक शब्द राष्ट्रस्पाउस असा बदलावा का?
समानतेच्या युगात हा महीलाना समान न्याय ठरेल
प्रतिक्रिया
हरकत नाही. रॉकीपंत
परा यांची ढाल गज याची
"पेशव्यांच्या सैन्याच्या
सर्व
राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्षा हे शब्द असताना इतका शोध कशाला?
Pagination