✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राष्ट्रस्पाऊस

व
विजुभाऊ यांनी
Fri, 12/10/2010 - 11:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11775 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

पती शब्दाचा अर्थ

अपूर्व कात्रे
Fri, 12/10/2010 - 11:17 नवीन
पती या शब्दाचा अर्थ केवळ "नवरा" असा नसून अधिपती किंवा मुख्य असाही आहे. यावरूनच राष्ट्राचा मुख्य तो राष्ट्रपती हा शब्द आला असावा. लखपती, करोडपती, धनपती हे शब्दही असेच बनले असावेत असा माझा अंदाज आहे. राष्ट्रपती या शब्दातील "पती" हा शब्द नवरा या अर्थाने घेतला तर आदरणीय प्रतिभा पाटील बाईंना राष्ट्रपत्नी असे म्हणायला लागेल. :D :D :D :D
  • Log in or register to post comments

राज्यकर्ता = राज्यकर्ती

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 11:24 नवीन
राज्यकर्ता = राज्यकर्ती मंत्री = मंत्रीण महापौर = महापौरीणबै ससा = सशी मासा = मासोळी हे शब्द अनेकदा वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

मासा चे माशी किंवा माशिण केले

प्राजु
Sat, 12/11/2010 - 03:29 नवीन
मासा चे माशी किंवा माशिण केले नाहीस ... परा, त्याबद्दल अभिनंदन भाऊ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मासा चे माशी किंवा माशिण केले

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 11:21 नवीन
मासा चे माशी किंवा माशिण केले नाहीस ... परा, त्याबद्दल अभिनंदन भाऊ!
=)) =)) पण मासोळी हा शब्द बरोबर आहे का नाही ? सर्रास वापरला जातो हा. ह्या नावाची एक नदी आहे, अभयारण्य आहे. 'जाळ्यात मासोळी गावायची नाय' असे एक गाणे पण आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मस्त.. पण जनरली मासोळी हा

शैलेन्द्र
Sat, 12/11/2010 - 17:52 नवीन
मस्त.. पण जनरली मासोळी हा शब्द "मासा" याचे अनेकवचन म्हणुन वापरला जातो, खास करुन कोळी लोक तो तसा वापरतात. तो लिंगवाचक म्हणुन वापरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाय हो!

पैसा
Sun, 12/12/2010 - 23:27 नवीन
तुम्ही म्हणता तो अनेकवचनी शब्द "मासळी". लहानशा माशाला "मासोळी" म्हणतात, आणि तो स्त्रीलिंगीच उच्चारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

परा ---- परी जालावर सापडली

अरुण मनोहर
Sat, 12/11/2010 - 07:30 नवीन
परा ---- परी जालावर सापडली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अतिशय षेंषेषणल विषयाला हात

टारझन
Fri, 12/10/2010 - 11:28 नवीन
अतिशय षेंषेषणल विषयाला हात घालुन विजुभौंनी फार मोठे मौलीक कार्य केले आहे . विजुभाऊ आज का सलाम , आप के नाम. बाकी पोहणारा मासा आणि उडणारी माशी .. ह्यांन्ना लिंगानुसार संबोधणे खरोखर अवघड आहे . तसेच "कुत्रा" ह्या प्राण्याचं आहे. कुत्रा चे स्त्रीलिंग कुत्री आहे .. तर अनेक वचन सुद्धा कुत्रीच आहे .. त्यामुळे आम्ही गणितानुसार एक सिद्धता मांडली होती ( जी बर्‍याच अंशी खरी आहे ) अनेक ( कुत्रा ) = कुत्री म्हैला ( कुत्रा ) = कुत्री म्हणुन , अनेक (कुत्रा) = म्हैला ( कुत्रा) कुत्रा कुत्रा गेट कँसल .... पुढचं तुम्ही बघा .. माझं गणित आजकाल बहिसटलं आहे. बाकी राष्ट्रपतीचं जर राष्ट्रपत्नी केलं तर खरोखर अनर्थ होतो !
  • Log in or register to post comments

टार्‍या इन्क्लूड राहीले

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 12:23 नवीन
टार्‍या इन्क्लूड राहीले की आणि लायब्ररी फंक्षन कुठे आहे # विजुभाऊ #
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तसे नसते

मिसळभोक्ता
Fri, 12/10/2010 - 14:05 नवीन
विजूभौ, आता तुम्ही हँड्स-ऑन राहिले नाही, ह्याचेच सदर प्रतिसाद प्रतीक आहे. (हात तिथून काढा, कामाला लावा :-) ते खरे, #इन्क्लूड <टार्‍या.एच> असे हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

१+

विनायक प्रभू
Fri, 12/10/2010 - 14:33 नवीन
मिभो शी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अरे बाबा मी लोकाना कामाला

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 15:41 नवीन
अरे बाबा मी लोकाना कामाला लावतो. < आणि दोन्हीकडून शिव्या खातो.एच >
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

राष्ट्रप्रमुख

स्वानन्द
Fri, 12/10/2010 - 11:30 नवीन
राष्ट्रप्रमुख. तसेच वर, अपूर्व च्या प्रतीसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

करेक्ट!

पिवळा डांबिस
Sat, 12/11/2010 - 04:05 नवीन
राष्ट्रप्रमुख हेच बरोबर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

अपुकत्र्कत्रेन्च्या मताशि

सुधिर बेल्हे
Fri, 12/10/2010 - 11:46 नवीन
अपुकत्र्कत्रेन्च्या मताशि सहमत आहे.
  • Log in or register to post comments

आ( भा) दरणीय पराजी मंत्री =

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 11:48 नवीन
आ( भा) दरणीय पराजी मंत्री = मंत्रीण महापौर = महापौरीणबै ससा = सशी ससा चे सशी हे स्त्रीलिंगी रूप आहे हा शोध लावल्याबद्दल तुमचे अभिनन्दन. आत्तापर्यन्त हा शब्द मी कुठेच वाचला नव्हता. माझे अगाध अज्ञान्दूर करण्यात मदत केल्याबद्दल आभार. मराठीत मंत्र्याच्या बायकोला मंत्रीण बै म्हणतात. जसे पाटलाच्या पत्नीला पाटलीण . डॉक्टरच्या पत्नीला डॉक्तरीण बाई असे म्हणतात. पण वैद्य असलेल्याच्या पत्नीला वैद्यीण वगैरे म्हनत नाहीत. महीला डॉक्टर ला डॉक्टरईण बाई असे म्हनता कुठे कुठे पण त्यांच्या ( डॉक्तर नस्लेल्या )पतीला डॉक्टर वगैरे म्हणत नाहीत. नर्स हा शब्द केवळ स्त्री साठी वापरला जातो. पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का?
  • Log in or register to post comments

हे बघा विजुभौ तुम्हाला पटत

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 11:53 नवीन
हे बघा विजुभौ तुम्हाला पटत नसेल तर द्या सोडून. सगळ्या महान शोधांना लोकांनी आधी असेच नाकारले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पटत ना. तुमचे हे नवे शब्द

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 12:07 नवीन
पटत ना. तुमचे हे नवे शब्द पेटन्ट सहीत नेमाड्यांना कळवतो ( हल्ली गुजरातेत असल्यामुळे आसपास सगळेच पटेल ) बाय द वे शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे बोलावतात शिक्षकाला ओ बुवा असे का बोलावत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 12:09 नवीन
शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे बोलावतात शिक्षकाला ओ बुवा असे का बोलावत नाहीत
अता नाही आवडत एखाद्याला. काय करणार आपण ? ;) बाकी तुम्ही इंचा इंचाने ह्या धाग्याच्या जो काश्मिर करत आहात तो पाहून आम्ही सदगदित झालोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

>>>>>पुरुष नर्स साठी नर्सोबा

मुलूखावेगळी
Fri, 12/10/2010 - 12:19 नवीन
>>>>>पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का? हाहा........................... सहीच हा दाजीबा, म्हसोबा,खन्डोबा,आजोबा शब्द कसे आले ते कळ्ले आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नर्सोबा

नितिन थत्ते
Fri, 12/10/2010 - 14:55 नवीन
>>पुरुष नर्स साठी नर्सोबा हा शब्द वापरावा का? चालूद्या. मी जरा नर्सोबाच्या वाडीला जाऊन येतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अजुन आले का नाय ?

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 18:32 नवीन
अजुन आले का नाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ह्या घ्या ढीगभर आयडीया.........

मन१
Fri, 12/10/2010 - 12:01 नवीन
"राष्ट्रध्यक्ष" हा शब्द कसा वाटतो.(फार तर "राष्ट्राध्यक्षा" असा बदल करावा लागेल्,पण अवघडल्यासारखं नाही होणार.)बरेच देश सध्या हाच शब्द वापरताना दिसतात. आता माझ्या डोक्यातले काही पर्यायः- राष्ट्रप्रमुख (Head Of State) राष्ट्राधिकारी(CEO,MD ह्यासारखा, आख्य्ख्या देशाचा अधिकारी/officer,) राष्ट्रशासक ((राष्ट्रप्रमुख (Head Of State) प्रमाणेच)) राष्ट्रपालक(स्त्रिलिंगीही हेच नाव खपुन जाइल.) (राष्ट्राचा (प्रतिकात्मकरित्या) प्रतिपाळ करणारा,सांभाळणारा,caretaker, "राज्यपाल" हे नाव वापरतोच ना आपण,अगदि तस्सच) राष्ट्रस्वामी/राष्ट्रस्वामिनी (राष्ट्रप्रमुख (Head Of State) प्रमाणेच) राष्ट्रमित्र (हे आपलं असच, ह्या नावाच पद फक्त आपल्याच देशात असेल आणि एक वेगळं, designation statement बनेल आपल्या देशाचं) राष्ट्रमूर्ती ( "न्याय मूर्ती " म्हणतो ना आपण्,तसच. प्रतिकात्मक दृष्टीनं राष्ट्रपती म्हंजेच राष्ट्र. किंवा राष्टृअपती म्हंजे साक्षात आख्य्ख्य देशाचं one person प्रतिनिधित्व.) प्रथमनागरिक(हे सध्याच वापरात असलेलं नाव्/कार्य) अंतिम अधिकारी( Final Word,final authority असणारं स्थान) हे शब्द पहिल्यांदाच ऐकतोय म्हणुन वेगळे वाटु शकतात. पण ह्यातले बहुतांश शब्द सवयीने रुळु शकतात अशी मला खात्री आहे. (च्यायला,इतक्या भारी भारी आयड्या आहेत आपल्याकडं, पाठवाव्या काय गव्हर्मेंट ला? ;-)) आपलाच मनोबा.
  • Log in or register to post comments

नगरपाल - नगरपालीका

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 12:09 नवीन
"राज्यपाल" हे नाव वापरतोच ना आपण,अगदि तस्सच) नगरपाल हा शब्द ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने नगरपालीका हा शब्द वापरला जात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

विजुभाऊ.. राष्ट्रस्पाऊज हा तर

कानडाऊ योगेशु
Fri, 12/10/2010 - 12:05 नवीन
विजुभाऊ.. राष्ट्रस्पाऊज हा तर हायब्रीड शब्द झाला. (प्रेसिडेंट हा शब्द जेंडर बायस्ड नाही आहे.) राष्ट्रपती हा संस्कृत शब्द आहे. स्पाऊजला समानार्थी संस्कृत शब्द आहे काय?
  • Log in or register to post comments

स्पाऊज ला समानार्थी मराठी

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 12:11 नवीन
स्पाऊज ला समानार्थी मराठी शब्द " साथीदार / जोडीदार " पण चोरांचे साथीदार असतात. आणि भ्रष्टाचार्‍यांचे जोडीदार
  • Log in or register to post comments

स्पाऊज

स्पा
Fri, 12/10/2010 - 12:15 नवीन
स्पा माझ्या नावाचं अनेकवचन वाटतंय..... ;)
  • Log in or register to post comments

'संपादक मंडळ' हा आय डी नेहमी

अप्पा जोगळेकर
Fri, 12/10/2010 - 17:13 नवीन
'संपादक मंडळ' हा आय डी नेहमी खटकतो. संपादिका मंडळ का नाही. हा महिलांना मुद्दाम सिंगल आउट करण्याचा प्रकार आहे. सरपंच ह्या आय डी ची सुद्धा तीच कथा.
  • Log in or register to post comments

आक्षेप!

पंगा
Sat, 12/11/2010 - 19:49 नवीन
'मंडळ' हा शब्द नपुंसकलिंगी आहे, याची कृपया दखल घ्यावी. त्यामुळे यात महिलांना सिंगल-आऊट करणे किंवा पुरुषप्राधान्य यांपैकी काहीही दिसते असे वाटत नाही. चूभूद्याघ्या. (गुडबुकाचा आवेदनकर्ता!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरे बापरे..... ओ

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 17:46 नवीन
अरे बापरे..... ओ अप्पाकाका..... मंडळ म्हणजे कोणी व्यक्ती नसते. असो. इतिहासात क्लीओपात्रा ला किंवा तिची बहीण अर्सीनी याना लोक काय म्हणायचे ते कळाले तर बरे होईल पितामह भीष्माना सामोरे जाणारा शिखंडी हा/ही /हे तृतीय पन्थी होता/होती/होतं म्हणून भीष्माने लढायचे नाकारले. शिखंडी ला लोक काय संबोधायचे कोण जाणे. ( भीष्माला सामोरे जाण्याचा मान मिळवणारी व्यक्ती किमान राजपुत्र तरी असेल ना )
  • Log in or register to post comments

पितामह भीष्माना सामोरे जाणारा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 17:55 नवीन
पितामह भीष्माना सामोरे जाणारा शिखंडी हा/ही /हे तृतीय पन्थी होता/होती/होतं म्हणून भीष्माने लढायचे नाकारले. शिखंडी ला लोक काय संबोधायचे कोण जाणे. ( भीष्माला सामोरे जाण्याचा मान मिळवणारी व्यक्ती किमान राजपुत्र तरी असेल ना )
विजुभौंचा नविन शोध. शिखंडी तॄतीय पंथी होता. Image removed. आता हे आणि कोणी सांगीतले तुम्हाला विजुभौ ? त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले. तो पुरुष बनला असला तरी आधी स्त्रीच होता म्हणुन त्याच्याशी लढण्याचे भिष्मांनी नाकारले होते. श्री. शरद ह्यांनी ह्यावर अत्यंत सुंदर लिखाण केले आहे ते वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रेमदान चळवळीतील चिटोरे

अवलिया
Fri, 12/10/2010 - 17:59 नवीन
प्रेमदान चळवळीतील चिटोरे वाचुन हिंदू रिती रिवाज धर्म संस्कृती समजुन घेण्याचा प्रयत्न केला की असेच होते. विजुभाऊंचा दोष नाही. त्यांना योग्य गुरु न मिळाल्याने त्यांचे विचार भरकटले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला

विजुभाऊ
Fri, 12/10/2010 - 18:12 नवीन
त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले. तो पुरुष बनला असला तरी आधी स्त्रीच होता म्हणुन त्याच्याशी लढण्याचे भिष्मांनी नाकारले होते अंबालीका ही नव्या जन्मात शिखंडी बनून आली होती. हे भीष्माना ठौक होते. अर्जूनसुद्धा एक वर्षे बृहन्नडा म्हणून वावरला होता. त्याच्या बाबत भीष्मानी कधी आक्षेप घेतला नव्हता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अंबालीका ही नव्या जन्मात

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:15 नवीन
अंबालीका ही नव्या जन्मात शिखंडी बनून आली होती. हे भीष्माना ठौक होते. अर्जूनसुद्धा एक वर्षे बृहन्नडा म्हणून वावरला होता. त्याच्या बाबत भीष्मानी कधी आक्षेप घेतला नव्हता
ते जौ द्या ! वरच्या शोधाचे काय ते बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ओ इजुभाऊ, अंबालिका नाय, ती

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 12/10/2010 - 20:18 नवीन
ओ इजुभाऊ, अंबालिका नाय, ती अंबा व्हती हो. अम्बालिकेने लगीन केले इचीत्रविर्याशी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ जर भीष्म असतील तर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/10/2010 - 20:30 नवीन
विजुभाऊ जर भीष्म असतील तर त्यांना माहित ना जास्त अंबा का अंबालिका ते! ;-) काय राव, तुम्ही कोणाला इतिहास शिकवता आहात, व्याकरणमहर्षि, सुसंगतीसम्राट, इतिहासाचार्य, योगाचार्य विजुभाऊ यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला

Nile
Fri, 12/10/2010 - 18:17 नवीन
त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले.
म्हंजी ट्रान्ससेक्शुअल का रे परा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाय, मार्फयकल जारफॅक्स्न

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 18:30 नवीन
नाय, मार्फयकल जारफॅक्स्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मराठीत विचार रे निळोबा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:49 नवीन
मराठीत विचार रे निळोबा :( विंग्रजी अंमळ कच्च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

विजुपर्सन, छानच चर्चा हो.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/10/2010 - 18:42 नवीन
विजुपर्सन, छानच चर्चा हो. खूपच मौलिक माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

आता मला कळलं...

धमाल मुलगा
Fri, 12/10/2010 - 18:47 नवीन
गुजरातेत कायमची दारुबंदी का ते!
  • Log in or register to post comments

भाड्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/10/2010 - 18:48 नवीन
भाड्या Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इनोद लय भारी कर्ता राव

आत्मशून्य
Fri, 12/10/2010 - 18:52 नवीन
तूम्ही
  • Log in or register to post comments

प्रचंड करमणूक होतेय...

प्राजु
Fri, 12/10/2010 - 22:01 नवीन
प्रचंड करमणूक होतेय... प्रतिसाद आणि चर्चा वाचून. चालू द्या. आहेच मी वाचायला.. मोठ्ठा पॉपकॉर्न चा डबा आणून ठेवलाय. संपला की पुन्हा आणेन.. आमच्या बाजूच्या दुकानदारणी कडे भरपूर पॉपकॉर्न मिळतात. ;)
  • Log in or register to post comments

पेशवाईत एकाने नाइक हे पद

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/11/2010 - 09:32 नवीन
पेशवाईत एकाने नाइक हे पद नकारले कारण त्याच्या बायकोला सारे नायकिण म्हणु लागले
  • Log in or register to post comments

नायकाची बायको नायकीण. पण

विजुभाऊ
Sat, 12/11/2010 - 10:18 नवीन
नायकाची बायको नायकीण. पण तमाशाच्या फडाच्या मलाकाची बायको ( असे समजू काही क्षण ) अथवा एखाद्या कळपाच्या नायकाची आवडती स्त्री ( अशी की तो नायक जिच्या कह्यात असेल ) यात व्याकरणदृष्ट्या चूक काहीच नाही. पण मराठी व्यत्यास भोवतो अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ झेंड्याचा हत्ती , मानाचा हत्ती , जो सर्वात पुढे असतो ढालगज भवानी हा त्याचा व्यत्यास.
  • Log in or register to post comments

<<ढालगज भवानी

शिल्पा ब
Sat, 12/11/2010 - 11:34 नवीन
<<ढालगज भवानी :D :-D :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 11:46 नवीन
अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ झेंड्याचा हत्ती , मानाचा हत्ती , जो सर्वात पुढे असतो ढालगज भवानी हा त्याचा व्यत्यास.
विजुभौंचा एक अजुन महान शोध =)) ह्यांना कोणितरी नोबेल द्या रे. सैन्याच्या अग्रभागी सैन्याचं निशाण घेऊन जाणारा बेफाम असा हत्ती असायचा. ‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ म्हणजे हत्ती. पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची, तिचं नाव होतं, ‘भवानी’. त्यावरून ‘ढालगज भवानी’ हा वाक्प्रचार रूढ झाला. संदर्भ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभाउ रॉक्स !

अवलिया
Sat, 12/11/2010 - 12:30 नवीन
विजुभाउ रॉक्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रॉक्सचे मराठी भाषांतर

बिपिन कार्यकर्ते
Sat, 12/11/2010 - 14:28 नवीन
रॉक्सचे मराठी भाषांतर करायच्या भानगडीत मुद्दामच नाही पडलो. उगाच लफडी नकोत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा