✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोष्ट-२ लिंगबदल

श
शरद यांनी
Sat, 11/27/2010 - 08:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5719 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

भीष्म क्षत्रिय असूनही

नगरीनिरंजन
Sat, 11/27/2010 - 08:28 नवीन
भीष्म क्षत्रिय असूनही परशुरामाचा शिष्य कसा? वरारोहा म्हणजे काय? शिखंडी पुरुष झाला हे भीष्माला माहिती नव्हतं का? की माहिती असूनही मरायचं म्हणून त्याने शस्त्रं टाकली? की खरोखरच शिखंडीने पराक्रम करून भीष्माला मारलं?
  • Log in or register to post comments

प्रश्न

ए.चंद्रशेखर
Sat, 11/27/2010 - 12:07 नवीन
महाभारताच्या गोष्टीत असे का? हा प्रश्न कधीही विचारायचा नसतो. कारण त्याला उत्तर नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

केवळ महाभारतातील गोष्टींविषयी?

क्लिंटन
Sat, 11/27/2010 - 12:23 नवीन
महाभारताच्या गोष्टीत असे का? हा प्रश्न कधीही विचारायचा नसतो. कारण त्याला उत्तर नसते.
केवळ महाभारतातील गोष्टींमध्ये असे का हे विचारायचे नाही का इतर अनेक प्रकारांविषयी हा प्रश्न विचारायचा नाही? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर

Genaralization

ए.चंद्रशेखर
Sat, 11/27/2010 - 12:31 नवीन
चर्चेचा विषय महाभारताबद्दल आहे म्हणून मी महाभारतातील गोष्टींबद्दल असे लिहिले आहे. तसे बघायला गेले तर भारतीय रीति-रिवाज, कर्मकांडे, अंधश्रद्धा वगैरे सारख्या बर्‍याच गोष्टींबद्दल असे म्हणता यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/27/2010 - 12:44 नवीन
चर्चेचा विषय महाभारताबद्दल आहे म्हणून मी महाभारतातील गोष्टींबद्दल असे लिहिले आहे. तसे बघायला गेले तर भारतीय रीति-रिवाज, कर्मकांडे, अंधश्रद्धा वगैरे सारख्या बर्‍याच गोष्टींबद्दल असे म्हणता यावे.
+१ सहमत आहे. आंतरजालावर देखील बर्‍याच धार्मिक धाग्यांवर येउन श्रद्धा,धर्म,देव, कर्मकांडे ह्यांच्याविरुद्ध ओकार्‍या काढणार्‍यांना देखील 'का ?' असे विचारायचे नसते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर

भीष्मांना अर्जुनाने मारले.

अपूर्व कात्रे
Sat, 11/27/2010 - 12:50 नवीन
परशुराम आणि भीष्म गुरु-शिष्य आहेत ही माहिती मलाही नवीन आहे. शिखंडी पुरुष झाला हे भीष्मांना माहित होते. अंबेने भीष्मांच्या समोरच त्यांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. मात्र शिखंडी मुलगी म्हणून जन्माला आल्याने व स्त्रीवर (शिखंडी जरी नंतर पुरुष झाला असला तरीही) शस्त्र रोखणे हा क्षात्रधर्म नसल्याने भीष्मांनी शिखंडी समोर आल्यावर शस्त्रे चालविली नाहीत. तरीही शिखंडीने भीष्मांना मारले नाही. त्यांना अर्जुनाने मारले. त्यामागचा इतिहास पुढीलप्रमाणे: - भीष्म व कर्णाचे वाकडे असल्याने भीष्मांच्या सेनापत्याखाली युद्धभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा कर्णाने केली होती. युद्ध सुरु होऊन बराच काळ लोटूनही पांडवांपैकी कोणीही धारातीर्थी न पडल्याने दुर्योधनाने भीष्मांची निर्भत्सना केली व कौरवांचे सेनापतीपद कर्णाकडे देण्यास सुचवले. यावर संतप्त होऊन भीष्मांनी प्रतिज्ञा केली की उद्या एकतर पांडव तरी संपतील किंवा मी (भीष्म) तरी. हे कळल्यावर पांडवांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. त्यावर उपाय म्हणून कृष्णाने द्रौपदीला संपूर्ण सौभाग्यवतीचे अलंकार लेवून, डोक्यावर पूर्ण पदर घेऊन भीष्मांना भेटण्यास सांगितले. द्रौपदीने भीष्मांना भेटल्यावर वंदन केले तेव्हा भीष्मांनी तिला "सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद दिला. त्यानंतर द्रौपदीने आपली खरी ओळख दिली. आपला आशीर्वाद खरा करण्यासाठी व पांडव वाचण्यासाठी भीष्मांनी तिला उपाय सांगितला. यानुसार शिखंडी समोर आल्यावर तो स्त्री म्हणून जन्माला आल्याकारणाने भीष्म शस्त्र चालविणार नाहीत. त्यामुळे शिखंडीच्या आडून अर्जुनाने भीष्मांवर शस्त्र चालवून त्यांना मारावे. दुसऱ्या दिवशी युद्धात याच उपायाने अर्जुनाने भीष्मांना शरबद्ध केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सहमत

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/27/2010 - 13:04 नवीन
परशुराम आणि भीष्म गुरु-शिष्य आहेत ही माहिती मलाही नवीन आहे.
सहमत आहे. परशुराम हे भिष्माचे गुरु कधीच न्हवते. मात्र भिष्माशी झालेल्या २३ दिवसांच्या अखंड युद्धानंतर त्यांनी शस्त्रास्त्रांचा त्याग करुन तपश्चर्येला जाताना आपल्याकडील सर्व संपत्ती दान केली. हे दान पुर्ण झाले आणि तिथे द्रोणांचे आगमन झाले. रीक्तहस्ताने उभ्या असलेल्या परशुरामांनी शेवटी आपल्याकडी सर्व शस्त्र-अस्त्र विद्या मंत्रार्चनेसकट द्रोणांना दिली. त्यामुळे त्यांना एका अर्थाने द्रोणांचे गुरु म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अपूर्व कात्रे

भीष्म क्षत्रिय असूनही

मृत्युन्जय
Sat, 11/27/2010 - 13:04 नवीन
भीष्म क्षत्रिय असूनही परशुरामाचा शिष्य कसा? भीष्म शंतनु आणि गंगा यांचा मुलगा. गंगेच्या विनंतावरुन परशुरामांनी भीष्माला शिकवणे मान्य केले. शिखंडी पुरुष झाला हे भीष्माला माहिती नव्हतं का? माहिती होते की माहिती असूनही मरायचं म्हणून त्याने शस्त्रं टाकली? युद्धाचा वीट आला म्हणुन शस्त्र टाकली. एकाबाजुला कृष्ण आणि दुसर्‍याबाजुला आपण असेपर्यंत युद्धाचा निकाल लागणार नाही हे त्यांना माहिती होते म्हणुन त्यांनी शस्त्रे टाकली. शिखंडी हे एक कारण देखील होते कारण त्याच्या जन्माचे रहस्य ते जाणुन होते. त्यांना कुठुन कळाले हे महाभारतात लिहिलेले नाही (किमान मला माहित नाही) की खरोखरच शिखंडीने पराक्रम करून भीष्माला मारलं? पराक्रम कोणीच केला नाही. भीष्म शिखंडीच्या आडुन मारलेल्या अर्जुनाच्या बाणाने शरपंजरी पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काही उत्तरे

शरद
Sat, 11/27/2010 - 15:13 नवीन
(१) भीष्माला परशुरामांनी कसे शिकवले ? परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती तरी नंतर पीतरांच्या सांगण्यावरून त्याने तो राग सोडून दिला होता. नंतर फक्त दोन वेळा राग उफाळून आला म्हणून त्याने क्षत्रीयांशी भांडण काढले. पहिल्यांदी शंकराचे धनुष्य मोडले म्हणून रामाबरोबर व नंतर आपले म्हणणे आपला शिष्य ऐकत नाही म्हणून भीष्माबरोबर. दोनही वेळा त्याचा पराभव झाला. कालाय तस्मै नम: ! भीष्माचे वडील क्षत्रीय असले तरी तो गंगापुत्र म्हणजे देवपुत्र होताच. गंगेने भीष्माच्या जन्मानंतर त्याला स्वर्गी नेले व तेथे सर्वगुणसंपन्न करावयाचे म्हणून परशुराम, वशिष्ट,बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून धनुर्विद्या, वेद, अर्थशास्त्र व राजधर्म यांचे शिक्षण दिले. व तो तरुण झाल्यावरच त्याला परत शंतनूकडे पोचविले. ( महाभारत, आदिपर्व, संभवपर्व,अ.१००) (२) वरारोहा म्हणजे शब्दश: आरोहण करण्यास श्रेष्ट. आज ग्राम्य वाटेल असा हा शब्द पूर्वी सर्रासपणे , नि:संकोचपणे संस्कृत भाषेत वापरलेला आढळतो. हनुमानासारखा ब्रह्मचारीही याचा उपयोग करतो. (३)शिखंडी पूर्वी स्त्री होता हे भीष्मांना माहीत होते का ? हो. अंबा आपल्यावर फार खवळून गेली आहे हे माहित झाल्यामुळे त्यांनी तिच्या पाळतीवर हेर ठेवले होते व तिच्या दोनही जन्मातील माहिती त्यांनी अद्ययावत ठेवली होती. युद्धाच्या आधी भीष्म दुर्योधनाला सांगतात की शिखंडीवर बाण सोडणार नाही कारण तो प्रथम स्त्री होता. व नंतर वरील गोष्ट ते सांगतात.(महाभारत, उद्योगपर्व,अ.१७३) भीष्म इच्छामरणी असल्याने अर्जून किंवा शिखंडी कोणीच त्यांना मारणे शक्य नव्हते. झाले असे की युद्धाच्या दहाव्या दिवशी शिखंडीच्या मागून अर्जुन लढला व भीष्म शिखंडीवर बाण सोडत नाहीत याचा त्याने फायदा घेतला. भीष्मांना अष्टवसूंनी सांगितले म्हणून त्यांनी युद्ध थांबविले. भीष्म रथाच्या खाली पडले याचा अर्थ तांत्रिक दृष्ट्या ते मेले असा घेऊन युद्ध थांबंविण्यात आले. शिखंदी मोठा योद्धा होता, महारथी होता पण अर्थात भीष्म-अर्जून यांच्या पंक्तीतला नव्हता. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मनोरंजक

अविनाशकुलकर्णी
Sat, 11/27/2010 - 10:01 नवीन
मनोरंजक
  • Log in or register to post comments

मस्स्त! महाभारतासारख्या सुरस

स्वानन्द
Sat, 11/27/2010 - 10:24 नवीन
मस्स्त! महाभारतासारख्या सुरस आणि रोचक आणि मनोरंजक कथा आजवर तरी वाचनात आल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

कथा माहिती होती, पण तुमच्या

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/27/2010 - 12:23 नवीन
कथा माहिती होती, पण तुमच्या शैलीत वाचताना अजुन मला आली :) लिंगबदलाचे असेच अजुन एक उदाहरण म्हणजे अर्जुन. मिळालेल्या शापाचा खुबीने वापर करुन त्याने अज्ञातवासातले एक वर्ष लिंगबदलाच्या सह्हायाने पुर्ण केले.
  • Log in or register to post comments

मिळालेल्या शापाचा खुबीने वापर

स्पा
Sat, 11/27/2010 - 12:51 नवीन
मिळालेल्या शापाचा खुबीने वापर करुन त्याने अज्ञातवासातले एक वर्ष लिंगबदलाच्या सह्हायाने पुर्ण केले बदललेलं लिंग कुठे ठेवलेला होतं मग त्याने? उगी आपलं कुतूहल म्हणून..... (ह घे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शमीच्या झाडावर बहुधा !

अवलिया
Sat, 11/27/2010 - 12:52 नवीन
शमीच्या झाडावर बहुधा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खल्लास.......................

स्पा
Sat, 11/27/2010 - 12:54 नवीन
खल्लास....................... सांद्लोय खुर्चीवरून..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

शरदराव ! जियो ! मस्त लेखमाला

अवलिया
Sat, 11/27/2010 - 12:46 नवीन
शरदराव ! जियो ! मस्त लेखमाला चालु आहे !! फक्त माहिती देतांना ज्यांना काही माहिती नाही किंवा ज्यांचे हेतु आधीच ठरलेले आहेत त्यांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या ! :)
  • Log in or register to post comments

एक माहिती म्हणून छान

शिल्पा ब
Sat, 11/27/2010 - 13:23 नवीन
एक माहिती म्हणून छान लेख...आता अशा गोष्टींबाबत बोलू नये पण खरोखरच असे काही लिंगबदल कसे झाले असतील? शिखंडी वा अर्जुन कोणी असो... म्हणजे आमच्या पूर्वजांनी विमानाचा शोध लावला यासारखेच आहे म्हणून विचारले... अवांतर: महाभारत हि माझी अत्यंत आवडती कथा आहे...आणि कर्ण पण आवडतो
  • Log in or register to post comments

कल्पित पात्रे

यकु
Sat, 11/27/2010 - 17:01 नवीन
मुळात ही सगळी कल्पित पात्रे होती. नाटकात नाही का गरज भागवण्यासाठी सर्वात जास्त सूट होणार्‍या नटाला दोन भूमिका कराव्या लागतात तसं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

<<<मुळात ही सगळी कल्पित

शिल्पा ब
Sun, 11/28/2010 - 00:44 नवीन
<<<मुळात ही सगळी कल्पित पात्रे होती. काढला का वाद ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

मला वाटतं लिंग बदलाच्या

इंटरनेटस्नेही
Sat, 11/27/2010 - 17:40 नवीन
मला वाटतं लिंग बदलाच्या बाबतीत अधिक माहिती मायकल जॅक्सन देऊ शकतील.. पुढच्या सर्वपित्रीला भेटतो त्याला. असो.. सविस्तर प्रतिसाद नंतर.. सध्या अंमळ 'कामा'त आहे. - इंटेश देशमुख.
  • Log in or register to post comments

रोचक!! महाभारताच्या एका

स्पंदना
Sun, 11/28/2010 - 15:47 नवीन
रोचक!! महाभारताच्या एका कथेमाग अश्या अनेक कथा असतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा