Skip to main content

चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

लेखक रोमना यांनी गुरुवार, 09/12/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल. मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो. इतर मराठी पदार्थहि छान असतात.

वाचने 22171
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

काजूच्या बोन्डापासून "अस्सल स्वदेशी" निघते बर का स्पा भौ.... आता तरी विदेशी सोडून स्वदेशी कडे वळा....पैक पन कमी लागत्याल्..है का न्हाई????

In reply to by नन्दादीप

काजूच्या बोन्डापासून "अस्सल स्वदेशी" निघते बर का स्पा भौ.... हो तर...... सो टक्के कि बात कि आपने नंदादीप साब

In reply to by स्पा

स्वदेशी जिन्दाबाद...म्हणून सान्गतो..देशी वापरा आणि देशाचा विकास करा. कशाला कोण झक मारायला जीव देइल...ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी... मग लोकाना चळवळी पण उभारायला नकोत....

In reply to by स्पा

लवकरच आम्ही शेतकरी प्रश्नात लक्ष घालणार आहोतच. कणीस आणि काजूंची निर्यात.............. काजुची ;) उसळ मस्त लागते.. यम्मी! बाकी मुळ लेखाबद्दल, मिसळची चव ही आईन्स्टाईन सांगुन गेल्या प्रमाणे सापेक्ष असते.. तेव्हा आपण जमेल तसे सर्व ठिकाणांची मिसळ चाखुनच नंतर त्यावर भाष्य करणे उचित ठरेल. श्री कृष्ण वडेवाले यांचा 'रेट' जरी जास्त असला तरी त्यांच्या वड्यांची सर मुंबईत तरी कोणाला नाही. जोशी वडेवाले देखील उत्तम. परवाच शिवाजी पार्क / शिवसेना भवन येथील वडापाव खाल्ला, चव लै भारी होती. - ॠषिकेशकुमार इंट्या, मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर.

In reply to by रोमना

मा. रोमनाजी, केवळ आपल्या माहितीकरीता - श्री पराकुमार हे एक शेतकरी असुन आजकाल फार्मविलेमध्ये शेती करतात!

पत्र लिहून काही होत का????? आपल्याकडे आता रॉबिनहूड नायतर शिवा, तूफान, करण्-अर्जुन व्हायला हवे......

आता उतारा सान्गा लवकर....

रोमना आइक... JSS RD वरुन मेट्रो कडे जाताना गायवाडिच्या आधी म्हण़जे केतकर मोतिवालेच्या जरासे पुढे डाव्या हातालाच गल्लीत एक वडेवाला आहे . छान वडा मिळतो ग ;;) .. ताब्मे हल्लिचे मालक सरपोतदार फारच महाग ग :( प्रार्थना समाजचे ... माझ लग्न झाले त्या हॉलच्या पुढचे कोणते ते होटल नाव विसरले मी..मस्त पावभाजी ग ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

ताब्मे हल्लिचे मालक सरपोतदार फारच महाग ग मालक महाग असो की स्वस्त आपल्या वडे खाण्याशी मतलब प्रार्थना समाजचे ... माझ लग्न झाले त्या हॉलच्या पुढचे कोणते ते होटल नाव विसरले मी..मस्त पावभाजी ग लग्नात हाटेलात पौभाजी खायला घातलीस की काय लोकान्ना?

तुम्ही लेखात फारच महाग ग पावभाजी ग असा उल्लेख केलात जर माझ्या बद्दल असेल तर लक्षात घ्या कि मी पुरुष आहे. अभिप्रायासाठी धन्यवाद तुम्ही पावभाजी खाल्ली ते हॉटेल बहूदा नित्यानंद असावे. आजही फार सुरेख पावभाजी मिळते तेथे असे म्हणतात. मी एकदा नव्हे दोनदा गेलो होतो तेथे पण मित्रांच्या पार्टिला. त्यांना वेगळा फटका नको म्हणून पंजाबी हाणल. मस्त असत. आणि तुम्ही उल्लेख केलेला वडापावचे दुकान जर परशुराम वाडीत (कांदेवाडी पुलिसचौकी समोर असेल) तर माहीती साठी सांगतो. त्याचे मालक वारले. फारच चांगले गृहस्थ होते. एका अमराठी (भैया) माणसाने गर्दिमुळे त्रास होतो अशी तक्रार केल्याने धंदा बंद करायला लावला. त्यानंतर फारच मानसीक त्रास दिला त्यांना. असो. पुढच्या वेळि अरे तुरे करा पण अग बिग नको

In reply to by रोमना

रोमन नाव हवे मग तुमचे ... असो परशुराम वाडीत ..हो हो..वारले का..अगो बै.. ते हॉटेल बहूदा नित्यानंद असावे...हो हो तेच ते होटल .... मी अनेकदा जात असे मग वेटर न विचारताच पाव भाजी समोर आणुन ठेवत असे :ओ लग्नाचा हॉल नाहि ओळ्खलात पण :ओ

In reply to by रोमना

खोताच्या वाडीतले 'अनंताश्रम' अजून आहे का?

In reply to by प्रदीप

खरं तर, हाच नेमका प्रश्न :) खडपे बंधूंचं ना? बहुतेक बंद झालं ते.

धाग्यावर लोकांनी फक्त वडा आणि मिसळ कुठे चांगला मिळेल ते दिले आहे. भजीबद्दल कोणि बोलेना. तर भजी म्हणजे कांदा भजी आख्ख्या जगात केवळ आमच्या सिंहगडावर चांगली मिळते. केवळ ती खाण्यासाठी म्हणुन आम्ही कित्येक्वेळा गडावर गेलो आहोत.

मुंबईत (बृहन्मुंबईत नव्हे) थोडे तरी मराठी लोक अजून टिकून आहेत हे बघून सुखद धक्का बसला. माझे काका गिरगावात राहायचे (अजून जागा सोडली नसली तरी आता ठाण्याला शिफ्ट झालेत). तेव्हा त्यांच्या चाळीत शेजारी पाजारी सगळे मराठीच होते. काही एक दोन गुजराथी, मारवाडी. एक दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तर काकांचं घर सोडलं तर एकही मराठी घर दिसेना! :( असो, मूळ धागा मिसळ व वड्यांचा आहे त्यामुळे हा विषय नकोच. पण मुंबईतल्या जुन्या हॉटेलांची व स्थळांची नावं वाचून जरा नॉस्टॅल्जिक झालो.

In reply to by नन्दादीप

णॉस्टॅल्जिक म्हणजे डोळे पाणावणे . मराठी अंतरजालावर सर्वप्रथम तात्या णॉस्टॅल्जिक झाले होते. नंतर कोदा. (कोदा कोण ? असे प्रश्न विचारण्या ऐवजी "खोदा म्हणजे कळेल कोण कोदा" ) -टा.रा. अंबाणी (माहितिगार, रिलायंस अंतरजालिय विदागॄह)

पुण्याला असताना दगडुशेठ हलवाई मन्दिरासमोर "जोशी वडेवाले"...येथे वडापाव खायचो....

गिरगावात राहता तर माधवाश्रमात खाऊन बघा एकदा (वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ५). मिसळ पाव, वडा-उसळ पाव एकदम चविष्ट. पुचाट बेचव पण नाही आणि झणझणीत तिखट पण नाही. त्याच्याच जवळ "स्पेशल टी हाउस" नामक उपहारगृह आहे. मिसळ तिथेही चांगली मिळते. मात्र बऱ्यापैकी मसालेदार (तिखट नव्हे) असते. वडापावसाठी बोरकरचा वडापाव (मुगभाट) try करून बघा. (वेळ संध्याकाळी ४ ते ९). मिरचीच्याऐवजी तिखटपणासाठी काळी मिरी वापरतात इथे. एकदम वेगळी चव. दादरला गेलात तर कीर्ती कॉलेजजवळ अशोकचा वडापाव famous आहे. दत्तात्रेय हाटीलातही बरी मिसळ मिळायची. भज्यांची काही कल्पना नाही बुआ....

In reply to by अपूर्व कात्रे

@कीर्ती कॉलेजजवळ अशोकचा वडापाव मी लिहील होत त्या बद्दल (तो कीर्तीचा वडापाव म्हणून फेमस आहे दोन वडापाव/ मिरची पार्सल घ्यायची .दोन बियर (काळ्या पिशवीत ) व सरळ अशोकाच्या इथून चौपाटी वरील कट्यावर बसायचे तिथून मग शिवाजी पार्कात कट्यावर जाऊन चकाट्या पिटायच्या .मिलिंद सोमण धावायला आला असेल तर बालपाणीचे सवंगडी असल्यासारखे हाय करायचे .हळूच कणेकर काकांच्या ग्रुप मध्ये (वयाचे बंधन नाही .) शिरकाव करायचा .मनसोक्त हसून झाल्यावर .मग जिप्सीत जेवायचे .तेही खेकडा खायला संगतीला अतुल परचुरे नाहीतर मोहन काका असायचे (म्हणजे बाजूच्या टेबलावर आपल्या मिन्त्रांसोबत )

पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा. पोटपुजेची ठिकाणे चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ? या दोन धाग्यावरची माहिती वाचुन आता कुठे जायचे कळेनासे झाले आहे. शहर, पत्ता, खाण्याचे पदार्थ अश्या क्रमाने मार्गदर्शक पुस्तक (त्याला मराठीत "गाईड" म्हणतात) बनवले तर खूप उपयोग होईल. (कॉम्प्युटरवर कोण काम करून देउ शकेल हे सगळ्यांना माहीत आहेच. ;)