मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू
मूष साहेबांचा विसा नाकारणे. त्यावर त्यांनी कांगावा करणे साहजिकच आहे ...पण नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे .
त्यांनी बलुचीस्तांमधील कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला.( हे सत्य असल्यास असे समजू कि भारतीय करदात्यांचा पैसा कुठेतरी सत्कर्मी लागतोय .नाही तर आपले मंत्री म्हणजे राजा आहेतच पैशाचा सद उपयोग करणारे . ) त्यामुळे आपल्या सरकारने त्यांचा विसा नाकारला. हे तत्कालीन कारण आहे .सध्या मिस्टर १० सत्तेवर आहे .पाकिस्तानी लोकांच्या मते त्यांच्या इतिहासातील सर्वात दुबळे नेतृत्व सध्या पाकिस्तानात आहे .झरदारी हे राजनैतिक नाहीच उलट कट्टरपंथीय हि नाही .त्यांची तत्वे व आयुष्यात कोणतीही धोरणे नाहीत .त्यांना एकच गोष्ट आजपर्यत अप्रतिम जमली आहे ..ती म्हणजे उचलेगिरी व दलाली खाणे ..बेनझीर च्या काळात प्रत्येक सरकारी व गैरसरकारी कामात १० % त्यांचा हिस्सा असायचा .म्हणून मिस्टर १० असे पाकिस्तानात त्यांना आदराने बोलले .जाते .अमेरिका व भारताला अफगाण मध्ये तालिबानी सरकार नको आहे .( गंमत म्हनजे सुन्नी पंथीय तालिबान हे शिया पंथीय इराण ला सुद्धा नको आहे .कारण पाकिस्तान व अफगाण ह्यांची सीमा जिथे इराण ला मिळते .त्या बहुसंख्या भागातील शिया बहुल लोकसंख्येचे दायित्व हे जगातील एकमेव शिया पंथीय राष्ट्र इराण कडे आहे . हे सत्य अबू धाबी येथील वास्तव्यात मला एका पाकिस्तानी शिया पंथीय टैक्सी चालकाने सांगितले .आजही त्याला उत्तर वझारीस्तान मधील त्यांच्या गावी जायचे असले तर इराण मार्गे जावे लागते .व भारतात शिया मुस्लीम सुखात आहेत ह्याची त्याला कल्पना असल्याचे हि सांगितले २० % शिया बहुल लोकांवर व अहमदिया पंथाच्या लोकांवर पाकिस्तानात अनेक प्राणघातक हल्ले सुन्नी कट्टर पंथीय पाकिस्तानी संघटना गेल्या काही महिन्यात करत आहेत .ह्या सुन्नी संघटना मूष साहेबांनी सौदीच्या देवबंदी ह्या कट्टर सुन्नी समुदायाच्या सहकार्याने निर्माण केल्या आहेत ..)त्यामुळे झरदारी हे अमेरिकेची कटपुतली असून त्यांच्या मर्जीने आर्मीला तालिबानविरुद्ध लढवत आहे इमरान खान नेहमी म्हणत असतो कि अमेरिकने खैरात दिल्यावर अमेरिका म्हणते डु मोर / डु मोर म्हणजे जवानाची शहादत पक्की .( आज वर ह्या युद्धात तालिबान कडून आय एस आयचे व लष्कराचे अनेक बडे अधिकारी /कर्नल व एकतर चक्क ब्रिगेडियर शहीद झाले आहे ) आजवरच्या इतिहासात प्रथमच भारत व अफगाण ह्यांच्यात मुक्त व्यापार होण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करायला झरदारी ह्यांनी अनुमती दिली आहे .सध्या पाकिस्तानात अमेरिका पुरस्कृत सरकार /आय एस आय / पाकिस्तानी लष्कर / व कट्टर पंथीय दहशत वादि संघटना व( आय एस आय व आर्मीच्या निवृत्त अधिकारांच्या संघटना ज्याचे नेतृत्व हमीद गुल हा माजी आय एस आय प्रमुख व मूष साहेबांचा गुरु करत आहे .)
असे चार संमातर सत्ता केद्र आहे .विकी लिक्स च्या नुसार यु ए इ च्या राजपुत्राने अमेरिकन अधिकार्यांना साकडे घातले झरदारी ह्यांचे कुमकुवत नेतृत्व व भारताचा आशियात उदय हे समीकरण खंडातील सत्ता केंद्राचे समीकरण बुडवणारे आहे .म्हणून मूष साहेबाना परत बोलवा .ह्या मागाणी मागे अर्थात अरब देशात भरपूर आर्थिक गुंतवणूक करणारा चीन आहे .( मूष साहेबांच्या राजवटीत शेवटी त्यांनी अमेरिकेला अंधारात ठेवून चीन बरोबर मधुर संबध चालू केले . . ग्वादर हे बंदर चीन ने पाकिस्तानला मोक्याच्या बलुचिस्तान मध्ये बांधून दिले .त्यामुळे चीनी व्यापारी व सामरिक नौका थेट आखतात उतरू शकतात .व सौदी व यु ए इ व अनेक अरब राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या अमेरिकन तैनाती फौजेला व आखतात तैनात असलेल्या अमेरिकन युद्ध नौका ह्यांना पुढे मोठी डोके दुखी आहे .म्हणून मूष साहेबावर अमेरिकेची मर्जी खप्पा झाली .मात्र झरदारी चीनची योग्य अंतर राखून आहेत .) अर्थात त्यामुळेच भारताने सध्याच्या पाकिस्तानी सरकारला त्रासदायक ठरणारे मूष साहेबाना आपली भूमी वापरायला मनाई केली .(ओबामा काय म्हणाला तें आठवा .स्थिर पाकिस्तान भारताच्या हिताचा आहे .)
ईश्वर चरणी हीच प्राथना कि झरदारी साहेबच्या पदवीत बढत मिळून त्यांना मिस्टर १५ तें २० असे संबोधिले जावे .बाकी आपली जनता पूरग्रस्त असतांना हे आपल्या युरोपातील नुकात्यास विकत घेतलेल्या अलिशान महालात राहायला गेले. व लंडन मध्ये आपला उच्च विभूषित व इमरान खानच्या व राहुल महाजन ह्यांच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या बिलावर भुत्तो ह्यांचे पाकिस्तानी राजकारणातील करियर लॉंच करायला गेले .(तेथे त्यांचा उद्दात हेतू सहन न झाल्याने तेथील जनतेने त्यांच्या भाषणात जोडे मारले .सध्या जनतेत त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष असून म्हणून पाकिस्तानातील इतर ३ समांतर सत्ता केद्र पर्यायी नेतृत्व शोधात आहे .(आर्मी चीफ कयानी हे कोणत्याही परिस्थितीत मी सत्तेवर येणार नाही असे म्हणत आहे .म्हणून पदरी ३ वर्षाची मुदत वाढ मिळाली आहे .व त्यांच्या भारत विरोधी कारवायांना अमेरिकेकडून अभय )अश्या वेळी मूष साहेब हा एक पर्याय चाचपडून बघितला जात आहे. त्यांनी लंडन मध्ये बसून एक राजनैतिक पार्टी उभी केली आहे. ..तें भारताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही .म्हणूनच कर्तबगार झरदारी ह्यांचे महान नेतृत्व पाकिस्तानात राहावे हे अमेरिका व भारताच्या हिताचे आहे .तेच सध्या आपले सरकार करत आहे .बाकी मागे ५ वर्षापूर्वी बिलावरच्या कृष्ण लीला मी लंडन मध्ये पंचतारांकित हॉटेलात काम करीत असताना पाहील्या आहेत .बाळाचे पाय पाळण्यात दिसून येत होते .त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा .
याद्या
3370
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
वेगळी माहिती मिळाली.
काहीतरीच काय?
राजेश साहेब आपल्या कथनाचा
In reply to काहीतरीच काय? by राजेश घासकडवी
निनाद, लेख आणि प्रतिसाद
In reply to राजेश साहेब आपल्या कथनाचा by निनाद मुक्काम …
फ्युजन व्यक्तिमत्व
In reply to निनाद, लेख आणि प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
निनाद, 'मिपा'वरील पहिल्या
खा आणि खाऊ द्या
In reply to निनाद, 'मिपा'वरील पहिल्या by सुधीर काळे
'रॉ'वरील पुस्तकांचा उल्लेख
In reply to खा आणि खाऊ द्या by निनाद मुक्काम …
Asoka Raina in “Inside RAW: The Story of India’s Secret Service
In reply to 'रॉ'वरील पुस्तकांचा उल्लेख by सुधीर काळे
निनाद, सुंदर लेखन रे.
निनाद, आपला लेख आवडला. आणी
निनाद...
माझे आद्य कर्तव्य
In reply to निनाद... by वाटाड्या...
आपले पुढील लेखन वाचण्यास
झरदारी साहेबांचा आणि परकीय