Skip to main content

मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू

मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू

Published on 07/12/2010 - 06:08 प्रकाशित मुखपृष्ठ
मूष साहेबांचा विसा नाकारणे. त्यावर त्यांनी कांगावा करणे साहजिकच आहे ...पण नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे . त्यांनी बलुचीस्तांमधील कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला.( हे सत्य असल्यास असे समजू कि भारतीय करदात्यांचा पैसा कुठेतरी सत्कर्मी लागतोय .नाही तर आपले मंत्री म्हणजे राजा आहेतच पैशाचा सद उपयोग करणारे . ) त्यामुळे आपल्या सरकारने त्यांचा विसा नाकारला. हे तत्कालीन कारण आहे .सध्या मिस्टर १० सत्तेवर आहे .पाकिस्तानी लोकांच्या मते त्यांच्या इतिहासातील सर्वात दुबळे नेतृत्व सध्या पाकिस्तानात आहे .झरदारी हे राजनैतिक नाहीच उलट कट्टरपंथीय हि नाही .त्यांची तत्वे व आयुष्यात कोणतीही धोरणे नाहीत .त्यांना एकच गोष्ट आजपर्यत अप्रतिम जमली आहे ..ती म्हणजे उचलेगिरी व दलाली खाणे ..बेनझीर च्या काळात प्रत्येक सरकारी व गैरसरकारी कामात १० % त्यांचा हिस्सा असायचा .म्हणून मिस्टर १० असे पाकिस्तानात त्यांना आदराने बोलले .जाते .अमेरिका व भारताला अफगाण मध्ये तालिबानी सरकार नको आहे .( गंमत म्हनजे सुन्नी पंथीय तालिबान हे शिया पंथीय इराण ला सुद्धा नको आहे .कारण पाकिस्तान व अफगाण ह्यांची सीमा जिथे इराण ला मिळते .त्या बहुसंख्या भागातील शिया बहुल लोकसंख्येचे दायित्व हे जगातील एकमेव शिया पंथीय राष्ट्र इराण कडे आहे . हे सत्य अबू धाबी येथील वास्तव्यात मला एका पाकिस्तानी शिया पंथीय टैक्सी चालकाने सांगितले .आजही त्याला उत्तर वझारीस्तान मधील त्यांच्या गावी जायचे असले तर इराण मार्गे जावे लागते .व भारतात शिया मुस्लीम सुखात आहेत ह्याची त्याला कल्पना असल्याचे हि सांगितले २० % शिया बहुल लोकांवर व अहमदिया पंथाच्या लोकांवर पाकिस्तानात अनेक प्राणघातक हल्ले सुन्नी कट्टर पंथीय पाकिस्तानी संघटना गेल्या काही महिन्यात करत आहेत .ह्या सुन्नी संघटना मूष साहेबांनी सौदीच्या देवबंदी ह्या कट्टर सुन्नी समुदायाच्या सहकार्याने निर्माण केल्या आहेत ..)त्यामुळे झरदारी हे अमेरिकेची कटपुतली असून त्यांच्या मर्जीने आर्मीला तालिबानविरुद्ध लढवत आहे इमरान खान नेहमी म्हणत असतो कि अमेरिकने खैरात दिल्यावर अमेरिका म्हणते डु मोर / डु मोर म्हणजे जवानाची शहादत पक्की .( आज वर ह्या युद्धात तालिबान कडून आय एस आयचे व लष्कराचे अनेक बडे अधिकारी /कर्नल व एकतर चक्क ब्रिगेडियर शहीद झाले आहे ) आजवरच्या इतिहासात प्रथमच भारत व अफगाण ह्यांच्यात मुक्त व्यापार होण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करायला झरदारी ह्यांनी अनुमती दिली आहे .सध्या पाकिस्तानात अमेरिका पुरस्कृत सरकार /आय एस आय / पाकिस्तानी लष्कर / व कट्टर पंथीय दहशत वादि संघटना व( आय एस आय व आर्मीच्या निवृत्त अधिकारांच्या संघटना ज्याचे नेतृत्व हमीद गुल हा माजी आय एस आय प्रमुख व मूष साहेबांचा गुरु करत आहे .) असे चार संमातर सत्ता केद्र आहे .विकी लिक्स च्या नुसार यु ए इ च्या राजपुत्राने अमेरिकन अधिकार्यांना साकडे घातले झरदारी ह्यांचे कुमकुवत नेतृत्व व भारताचा आशियात उदय हे समीकरण खंडातील सत्ता केंद्राचे समीकरण बुडवणारे आहे .म्हणून मूष साहेबाना परत बोलवा .ह्या मागाणी मागे अर्थात अरब देशात भरपूर आर्थिक गुंतवणूक करणारा चीन आहे .( मूष साहेबांच्या राजवटीत शेवटी त्यांनी अमेरिकेला अंधारात ठेवून चीन बरोबर मधुर संबध चालू केले . . ग्वादर हे बंदर चीन ने पाकिस्तानला मोक्याच्या बलुचिस्तान मध्ये बांधून दिले .त्यामुळे चीनी व्यापारी व सामरिक नौका थेट आखतात उतरू शकतात .व सौदी व यु ए इ व अनेक अरब राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या अमेरिकन तैनाती फौजेला व आखतात तैनात असलेल्या अमेरिकन युद्ध नौका ह्यांना पुढे मोठी डोके दुखी आहे .म्हणून मूष साहेबावर अमेरिकेची मर्जी खप्पा झाली .मात्र झरदारी चीनची योग्य अंतर राखून आहेत .) अर्थात त्यामुळेच भारताने सध्याच्या पाकिस्तानी सरकारला त्रासदायक ठरणारे मूष साहेबाना आपली भूमी वापरायला मनाई केली .(ओबामा काय म्हणाला तें आठवा .स्थिर पाकिस्तान भारताच्या हिताचा आहे .) ईश्वर चरणी हीच प्राथना कि झरदारी साहेबच्या पदवीत बढत मिळून त्यांना मिस्टर १५ तें २० असे संबोधिले जावे .बाकी आपली जनता पूरग्रस्त असतांना हे आपल्या युरोपातील नुकात्यास विकत घेतलेल्या अलिशान महालात राहायला गेले. व लंडन मध्ये आपला उच्च विभूषित व इमरान खानच्या व राहुल महाजन ह्यांच्या एक पाऊल पुढे असणाऱ्या बिलावर भुत्तो ह्यांचे पाकिस्तानी राजकारणातील करियर लॉंच करायला गेले .(तेथे त्यांचा उद्दात हेतू सहन न झाल्याने तेथील जनतेने त्यांच्या भाषणात जोडे मारले .सध्या जनतेत त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष असून म्हणून पाकिस्तानातील इतर ३ समांतर सत्ता केद्र पर्यायी नेतृत्व शोधात आहे .(आर्मी चीफ कयानी हे कोणत्याही परिस्थितीत मी सत्तेवर येणार नाही असे म्हणत आहे .म्हणून पदरी ३ वर्षाची मुदत वाढ मिळाली आहे .व त्यांच्या भारत विरोधी कारवायांना अमेरिकेकडून अभय )अश्या वेळी मूष साहेब हा एक पर्याय चाचपडून बघितला जात आहे. त्यांनी लंडन मध्ये बसून एक राजनैतिक पार्टी उभी केली आहे. ..तें भारताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही .म्हणूनच कर्तबगार झरदारी ह्यांचे महान नेतृत्व पाकिस्तानात राहावे हे अमेरिका व भारताच्या हिताचे आहे .तेच सध्या आपले सरकार करत आहे .बाकी मागे ५ वर्षापूर्वी बिलावरच्या कृष्ण लीला मी लंडन मध्ये पंचतारांकित हॉटेलात काम करीत असताना पाहील्या आहेत .बाळाचे पाय पाळण्यात दिसून येत होते .त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा .
लेखनप्रकार

याद्या 3370
प्रतिक्रिया 15

तु परदेशस्थ आहेस आणि तेथे राहुन भारतविषयक घडामोडींचा चांगला अभ्यास केलेला दिसत आहे. बाकी सवडीने लिहीन.

निनाद मुक्काम प... साहेब, तुम्ही केवढी प्रचंड चूक केली आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे काय? अहो, तुम्ही चक्क भारतीय सरकार कार्यक्षम असल्याचा संशय व्यक्त केला आहे - बलुचिस्तान मधल्या कारवायांचा उल्लेख वगैरे करून. आणि
म्हणूनच कर्तबगार झरदारी ह्यांचे महान नेतृत्व पाकिस्तानात राहावे हे अमेरिका व भारताच्या हिताचे आहे .तेच सध्या आपले सरकार करत आहे .
असं म्हणणं म्हणजे तर सरकार काहीतरी राजनैतिक खेळी खेळतं आहे, आणि कदाचित उद्दिष्टं साध्य देखील करतं आहे असं म्हणताय. काय म्हणावं तुम्हाला? अहो, मिपावर तुमचा धागा इंचाइंचाने पुढे सरकायचा असेल तर भारत सरकार कसं मूर्ख, नादान आहे असं लिहावं लागतं. पाकिस्तान आपल्याशी छुपं युद्ध खेळताना आपणही लढतो आहोत असं म्हटलं तर त्यात लोकांना आकर्षक काय वाटणार?

In reply to by राजेश घासकडवी

राजेश साहेब आपल्या कथनाचा मतितार्थ आला धान्यात . भारतातीय प्रसार माध्यमातून भष्टाचार व लालफितीचा कारभार व सरकारी मुळमुळीत विधाने व निर्वाणीचे निषेधाचे खलिते .ह्यावर रकानेच्या रकाने भरून वाचल्याने आपल्या देशाची भूमिका म्हणजे सीमेपलीकडील दहशतवादास आपण फक्त खलिते पाठवतो असा समाज होणे स्वाभाविक आहे .साध उदाहरण द्यायचे आय एस आय म्हणजे काय प्रकरण आहे हे भारतात काय जगात कोणालाही विचारा त्यांना उत्तर माहित असते .मात्र भारतात जर सामान्य माणसाला विचारले कि रिसर्च एंड एनालिसिस विंग. उर्फ रॉ म्हणजे काय ? उत्तर मिळणार नाही .भारतीय प्रीमियम हेर खाते आपल्या लो प्रोफाईल बद्दल प्रसिद्ध आहे .ह्याचा अर्थ ते काहीच करत नाही असे नाही. कारण आपल्या संविधानानुसार त्याच्या कारवायांवर संसदेत चर्चा कोणीही करू शकत नाही .व ते उत्तर द्यायला फक्त पंतप्रधानांना बांधील असतात .त्याचे बजेट सुद्धा डिफेन्स बजेट मध्ये वेगळे दाखवत नाही .सचिन जसा आपल्या फळीने गोलंदाजांना उत्तर देतो .मुलाखतीत तोंडाने व्यर्थ वाफ दवडत नाही तसाच रॉ चा खाक्या आहे ..त्याच्या माजी अधिकार्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली तर कल्पनेहून वेगळे जग आपल्या समोर येते .बाकी आय एस आय हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखे आहे .त्यांना जगभरात स्टेट विदिन द स्टेट असे म्हणतात .आता ते एक स्वयंपूर्ण संस्थान असून आपला निधी उभारण्यासाठी अनेक मार्ग अवलंबून ( डी कंपनीला हाताशी धरून ) ते अनुसरतात .त्यामुळे ते एक वेगळे सत्ता केंद्र आहे .( बाकी डी कंपनीचा मुखिया इंटरपोल ने जाहीर केलेल्या यादीत ३र्य क्रमांकाचा दहशतवादी जाहीर झाला होता .१ल होता लादेन २र मुल्ला ओमार बाकी कोलंबियन /इटालियन /रशियन /अमेरिकन अश्या जगभरातील अनेक माफियांना मागे टाकत त्यांनी हि नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे .मी आमच्या हॉटेलात काम करणाऱ्या कराची मधील माणसाला नेहमी चिडवतो .अल्ताफ हुसेन व इमरान खान ह्यांच्या भांडण्यात कराचीचा बेताज बादशहा शेवटी एक मुजाहीर बनला आहे आहे. .( त्याच्या निपातासाठी.अथवा मोसाद सारखा एखादे स्पेशल ऑपरेशन केले पाहिजे .बाकी पाकिस्तानी प्रसार माध्यमे वर्षभर रॉ च्या नावाने खडी फोडत असतात .त्यांनी रिसर्च एंड एनालिसिस विंग.केलेय असंख्य आरोप मधील एक तरी खरा असेल तरी भरून पावलो . बाकी मूष मागील भारत भेटीत काय म्हणले होते आठवा .तुम्ही आय एस आय च्या नावाने का एवढी खडी फोडता .आय एस आय तेच करते जे तुमची रॉ करते .(ह्या विधानाचा पाकिस्तानी काही मूष धार्जिण्या मीडियातील गटाने मूष साहेबांनी भारतीय भूमीवर जर You try to do damage to us, we will do damage to you. ... The ISI does the same thing as the RAW does. ... असे उद्गार टाकले .अर्थात कुठल्याही विधानाचा हवा तो अर्थ काढून पाकिस्तानी जनतेच्या माथी मारण्याचे कसब पाकिस्तानी प्रसार माध्यमांना चांगलेच अवगत आहे ..

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद, लेख आणि प्रतिसाद आवडले.
अनिवासी भारतीय म्हणजे फक्त मंडले स्थापून प्रादेशिक अस्मिता कुरवाळणे हे मला मान्य नाही .प्रत्येक अनिवासी हा भारताचा स्वयंघोषित राजदूत असावा .
आपण भारताचे राजदूत नसलो तरीही बर्‍याचदा असा लोकांचा समज असतोच, आणि कधीमधी त्याचा कंटाळाही येतो. पण मुख्य विचार १००% मान्य.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लंडन वा जर्मनी वा अबुधाबी येथील महाराष्ट्रीयन मंडळाचे पदाधिकारी व सभासद ( जे बरेचदा आय टी मध्ये असतात .) माझ्या ह्या विचारांवर कोपिष्ट होऊन एक दिवस माझ्या संगणकावर बग्स चा वर्षाव करतील .अशी भीती वाटते . मी त्यांच्या मंगळागौर/ डोहाळजेवण ह्या कौटुंबिक व चमचा लिंबू शर्यत व नाटुकली असे सार्वजिक सभारंभात फारसा जात नाही .(शिष्ट असेन मी कदाचित .) हा पण युरोपियन संमेलन जिथे नारळीकर /किंवा चंदू बोर्डे /नाना ह्यासारखी दिग्गज येत असतील तर माझी हजेरी लावतो .वेशभूषा आंग्ल व जिभेवर गटणे पद्धतीची माय मराठी असे फ्युजन व्यक्तिमत्व घेऊन वावरतो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .

निनाद, 'मिपा'वरील पहिल्या (आणि सुरेख) लेखाचे स्वागत! तुझे म्हणणे बरोबर आहे. जरदारी राजकारणी नाहींतच. ते मूळचे कराचीतील एका चित्रपटगृहाचे मालक व (कु)प्रसिद्ध Playboy आहेत. बेनझीरशी लग्न होण्यात त्यांचा "मटका लागला" असेच म्हणावे लागेल. पण बिचार्‍याने दहा-एक वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यामुळे सध्या जरा रुबाब केला तर माफ करायला हरकत नाहीं. स्वतःच्या पत्नीचा वध दहशतवाद्यांनी केला त्यामुळे ते समदु:खी आहेत असे म्हणता येईल. त्यांनी २६/११ नंतर ISI चे प्रमुख पाशा यांना भारताला जायला सांगितले. पण पाकिस्तानमधील सत्तेचे समीकरणच असे विचित्र आहे कीं लष्कराने त्यावर नकाराधिकार (Veto) वापरून तो हुकूम रद्द केला. मग पाकिस्तानमध्ये बॉस कोण हे (पुन्हा एकदा) उघड झाले! पुराच्या संकटानंतर जरदारींनी जे वर्तन केले त्यामुळे त्यांची उरली-सुरली इज्जतही मातीमोल बनली. जरदारींनी तर मला कयानी कधीही जिवे मारतील (take me out) ही भीती अमेरिकेच्या राजदूता अ‍ॅन पॅटरसनना सांगून आपल्या बहिणीला वारसही नेमले! अगदी नेहरू-गांधींचेच उदाहरण ते वापरत आहेत की काय? (फरक इतकाच कीं अद्याप तरी "वारस" जाहीर करण्याची 'हिंमत' गांधी घराण्याने दाखविलेली नाहीं.) विकीलीक्सने पाकिस्तानची उरली-सुरली वस्त्रेही फेडली आणि कयानी, जरदारी आणि ISI चे प्रमुख पाशा यांच्यातला खो-खोच्या खेळाचे छान मनोरंजक वर्णन बाहेर आले. सौदीचे राजे जरदारींना पाकिस्तानचे सडलेले डोके म्हणतात, पण जरदारी इतके Teflon-coated आहेत कीं त्यांनी "सौदीचे राजे माझे मोठे भाऊ असून आमच्यात गैरसमज होणेच शक्य नाहीं" असे (निर्लज्जपणे) जाहीर करून टाकले. थोडक्यात काय? पाकिस्तानात लोकशाही रुजणे केवळ अशक्यच वाटते. प्रश्न उरतो तो सध्याच्या नेत्यांची जागा कोण घेणार? मुशर्रफ, कयानी कीं हमीद गुल? सारेच आपल्या कामाचे नाहींत. पण शेवटी अमेरिकाच तिथे कुणाला तरी सिंहासनावर बसवेल असे दिसते. दोन चांगल्या गोष्टी दिसत आहेत. १) पाकिस्तानची न्यायसंस्था मुशर्रफमुळे चांगलीच बलवान झालेली आहे. त्यात वकील वर्गाचा मोठाच हात होता! २) अमेरिकेला आपली गरज आहे. असो. पुनश्च सुरेख लेखाबद्दल शाबासकी.

In reply to by सुधीर काळे

@@मुशर्रफ, कयानी कीं हमीद गुल? सारेच आपल्या कामाचे नाहींत. अगदी बरोबर दगडा पेक्षा वीट मऊ ह्या नायायाने सध्याचे कुचकामी पाक सत्ताधारी परवडतील . मूष साहेबाना लंडनमध्ये पाहुणचार करू दे . बाकी शरीफ व सौदी अरेबियाचा जगप्रसिद्ध अघोषित करार नुकताच संपुष्टात आला आहे .( जीवदान व सौदीमध्ये आश्रय ह्या बदल्यात पाकिस्तानी राजकारणात ८वर्श सक्रीय राहायचे नाही .) त्यामुळे आता शरीफ आपला राजकीय पुनरागमनासाठी सज्ज झाले आहे .हा पंजाबी जमीनदारी व सरंजामी मानसिकतेचा गृहस्थ मूष व गुल ह्यांचा कट्टर हाडवैरी आहे .पण सत्तेसाठी भारतविरोधी कारवायांना मुक्त परवाना लष्कराला देऊ शकतो .त्याचे सौदीचे लागेबांध पाहता व विलीलीक्स ने नुकतेच सौदीला अतिरेक्यांची ए टी एम म्हटल्याने .त्यापेक्षा भारताच्या दृष्टीने मिस्टर १० बरे आहेत .खा आणि खाऊ द्या अशी सात्विक विचारसरणी आहे त्यांची .(मारे अमेरिकेचा विरोध पत्करून इराणशी पाईप लाईन जोडण्याचा करार केला खरा पण करार पूर्ततेसाठी तेलवाहिनी बनविण्यासाठी पाकिस्तानी तिजोरीत ह्यांनी पैसाच शिल्लक ठेवला नाही असे विकीलीक्स ने जाहीर केले .त्यामुळे परत तेलासाठी सौदी कडे हात पसरणे आले .)बाकी काका तुम्ही अनुवादित केलेल्या पुस्तकातून पाकिस्तानी राजकारण्याचे लष्कराचे अनेक कारनामे उघडकीस आले .अर्थात यु ट्यूब वर ह्याच लोकांनी पुस्तकातील विधानाचा पुनरुच्चार व समर्थन केले आहे .त्यातून त्यांचे अंतर्गत संघर्ष व सत्ताप्राप्तीसाठी भारत द्वेष हे प्रभावी हत्यार दिसते .बाकी कौतुक त्या स्कॉट चे ज्यांनी मुळाती घेऊन हे पुस्तक लिहिले व काळे काका तुमचेची कि तुम्ही त्याचा प्राज्ञ मराठीत अनुवाद केला.

In reply to by निनाद मुक्काम …

नवाज शरीफ (हे पहिल्या निवडणुकीत लष्कराने निवडलेले होते) यांनीच नव्हे तर बेनझीरबाईंनसुद्धा प्रत्यक्ष 'मुषू'ला तो डायरेक्टर जनरल ऑपरेशन्स असताना दहशतवादी तळ/प्रशिक्षणकेंद्रे उभारायची परवानगी दिली होती. शेवटी तिला उडवलं तेही अशाच कुणी अतिरेक्यांनी! खरं तर पाकिस्तानी लष्कर किंवा ISI कधीच परवानगी 'मागत' नसावेत, ते 'घेत' असावेत. 'रॉ'वरील पुस्तकांचा तू उल्लेख केला आहेस त्यांची नावे मला कळव. ती वाचायला मला आवडेल. पण मुशर्रफ, हमीद गुल यात गुल हा जास्त खतरनाक आहे. त्याला सदसद्विवेकबुद्धीच नसावी असे त्यांच्या यू ट्यूबवरील मुलाखतींवरून वाटते. कयानीचा अनुभव यायचा आहे. पण तो त्यावेळी तरी मुशर्रफ यांचा 'पुठ्ठा' होता!

In reply to by सुधीर काळे

India's External Intelligence: Secrets of Research and Analysis Wing (RAW) Author: Maj. Gen. V.K. Singh Year: 2007 ISBN: 8170493323 The Kaoboys of R&AW : Down Memory Lane Book Details Author: B. Raman Year: 2007 ISBN: 0-9796174-3-X [ 23 cm., pp. 304 ] Inside RAW the story of India's secret service Asoka Raina. Published 1981 ह्या पुस्तकांचे नेट वरील विविध साईट वरून अनेक प्रस्तावना व कधीकधी तर पाकिस्तानी वेब साईटवर ह्या पुस्तकातील काही प्रकरणातील प्रमुख आशय वाचला आहे .(तेथील मुठभर शिकलेल्या लोकांच्या भारतविरोधी भावना भडकवायला जरासुद्धा संधी सोडत नाही. .) बाकी काका तुमच्या मूष वरील लेखात मी प्रतिक्रियेत मी गुल हा मूष पेक्षा खतरनाक आहे हे लिहिले होते . .त्यावर विस्ताराने परत कधीतरी लिहीन .तूर्त इतकेच ता .क वरील उल्लेखल्या एकातरी पुस्तकाचा मराठी अनुवाद कुणी तरी केला तर ........ (काय मज्जा येते आयते वाचायला . )

काळेकाकां बरोबर आता कोणीतरी बर्‍याच दिवसांनी चांगल्या विषयाला हात घातल्यामुळे मजा आली. लेख छान...अजुन येऊ देत. काळेकाकांनी लिहिलेले सगळे लेख आणि त्या अनुशंगाने Nuclear Deception पण वाचनात आलय. काळेकाकांचे धन्यवाद त्यानिमीत्ताने...सध्या विकीलिक्सने चालवलेला 'जाळीय यज्ञ' व त्यातल्या सौदी लोकांचे अल कायदा लोकांना असलेले समर्थन हा एक नक्कीच अभ्यासाचा विषय असावा... बाकी अवांतर.. "अनिवासी भारतीय म्हणजे फक्त मंडले स्थापून प्रादेशिक अस्मिता कुरवाळणे हे मला मान्य नाही ."...ह्या वाक्याशी प्रचंड सहमत. "लंडन वा जर्मनी वा अबुधाबी येथील महाराष्ट्रीयन मंडळाचे पदाधिकारी व सभासद ( जे बरेचदा आय टी मध्ये असतात .) मी त्यांच्या मंगळागौर/ डोहाळजेवण ह्या कौटुंबिक व चमचा लिंबू शर्यत व नाटुकली असे सार्वजिक सभारंभात.." ह्या वाक्याला प्रचंड टाळ्या... फक्त त्यात 'अमेरिका' असाही एक दावा घाल...घरोघरी मातीच्याच चुली रे...शिवाय लोकही तिथे आपापले वैयक्तिक कार्यक्रम (नाचगाणी, राजकारण आणि काय काय) करायलाच जातात. किती लोक तिथे आपला समाज आणि त्याची प्रगती साधण्यासाठी जातात हा पि.एच.डी चा विषय होऊ शकेल...;) परिसंवाद, रसग्रहण वगैरे तर जणु आदिम काळातील गोष्टी झाल्यात..असो...जास्त विषयांतर नको... - वाटाड्या..

In reply to by वाटाड्या...

वाटाड्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक आभार भारतात बहुतेक भारतीयांची गोर्या लोकांशी ओळख हि निळ्या सिनेमातून झाली असते. .त्यामुळे हि गोरी लोक व विशेतः बायका म्हणजे सर्व जणू मेनका उर्वशीचे परदेशी वर्जन वाटतात .(विशेतः गावातील व शहरातील पान काही लोकांना. मग पर्यटनाला आलेल्या गोर्या महिलांचा मोकळेपणाने बोलण्याचा गैर अर्थ निघतो .व शहरात व गावात विनय भंग व बलात्काराची प्रकरणे समोर येतात .(अमीर खानला जाहिरात करावी लागते .) हरयाणा व पंजाब मधील काही होतकरू तरुण आपली स्थानिक पुरुषप्रधान मानसिकता घेऊन येथे येतात .मग पब /क्लब व सार्वजिक ठिकाणी मद्यपान अति झाले कि माती करतात .परदेशात विशेतः अमेरिकेत काही दशकापूर्वी भारत हा गारुडी व हत्ती सिंहाचा देश वाटायचा आता तो त्यांच्या नोकर्या चोरणाऱ्या चोरांचा देश वाटतो .युरोपातही काही प्रमाणत वाटतो .मंदीच्या काळात व्यवस्थित सेविंग करून सेव झालेला अनिवासी भारतीय गोर्यांच्या नजरेत खुपतो मग कुठल्यातरी शेलक्या शेर्यातून त्याच्या भावना व्यक्त होतात .(काही लोकांच्या ) च्यायला परदेशात कर भरायचे व वरती ह्यांची हे शेरे ..मग शांतपणे त्यांचे बौधीक घेऊन त्यांचे गैरसमजाच्या हवेत भरारी मारणारे फुक्या अभिमानाचे विमान वास्तवाच्या धावपट्टीवर आणणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो .(अशी अनेक यशस्वी लेंडिंग माझ्या खात्यात जमा आहेत .) सुरवात माझ्या जर्मन सासरच्या मंडळीकडून झाली .तुर्की लोक व इतर मुस्लीम ह्यांची २रि ३ री पिढी अजूनही जर्मन समाजाच्या मुख्य प्रवासात आली नाही .असे आपल्या पुस्तकात सध्याच्या बर्लिन च्या मेयर ने लिहून एकच खळबळ सुरु केली .तेव्हा मी भारतीय ह्याला सणसणीत अपवाद आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले .उदा जर्मन वंशीय लोकप्रिय गायक झेवियर नायडू किंवा यूकेतील अभिनेत्री परमिंदर ( बेंड इट लाईक बेह्काम फेम ) इक्यादी .व इतर अनेक मुद्दे भारत सरकारने आपल्या देशाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी येथील प्रसार्माध्यामानात पेड न्यूज द्यायला हरकत नाही (कागळे काका हातवारे करत एखादी महाचर्चा घडवून आणतील येथे ) बाकी माझ्या जर्मन आख्यानात माझा भर हा येथिल लोक त्याची मानसिकता व समाजजीवन/ मुल्ये /परंपरा हे सराव मुद्दे अधोरेखित करणार आहे

झरदारी साहेबांचा आणि परकीय शिक्षणाने उच्च शिक्षित असा बिलावर भुट्टो ह्यांची नुकतेच भारतात सदिच्छा भेट सफल झाली. झरदारी बिलावर ला राजकीय वारसदार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा देशात पूर आला तेव्हा लंडन आणि आता सैनिक बर्फाखाली गाडले गेले तेव्हा भारतात घेऊन आले. मायदेशात इम्रान सारखे नेते ह्यावर जरी टीका करत असले. तरी मागच्या वर्षी चीन ला बिलावर घेऊन जाऊन प्रत्येक ठिकाणी आपला मुलगा हा महासत्तेची कटपुतली होण्यास आपल्याहून कसा कर्तबगार आहे हेच बहुदा त्यांनी पटवून दिले आहे. आता सामान्य जनतेची उर्दू भाषा न येणे किंवा पाकिस्तान मध्ये पालनपोषण न झाल्याने सर्व सामान्य जनतेची दुख न उमजणे ह्या फुटकळ गोष्टी राजकारणात सहज खपून जातात. आता तर बिलावर ला पाकिस्तान मध्ये भारतीय युवा गुरु भेट देऊन जनतेशी कसा संवाद साधायच्या व क्वचित झोपडी मध्ये राहून त्यांच्या सोबत जेवण करणे किंवा कराची च्या लोकल ट्रेन मधून प्रवास करणे असे संवंग लोकप्रियतेची मुळाक्षरे गिरवायला शिकवणार आहेत. भारताच्या दृष्टीने हा बिलावर चा राजकीय उदय महत्वपूर्ण आहे. कारण सध्या त्याचे वडील नामनिराळे राहून अमेरिकन सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर आणि धार्मिक संघटना ह्या पैकी कोणालाही दुखावत नाही. तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला मला माझे १० टक्के द्या एवढीच शुल्लक मागणी त्यांची असते. ह्यामुळे अमेरिकन सरकारचे द्रोण हल्ले व ह्यांचे पर्यवसान पाकिस्तान मधील गरीब जनता जी कट्टर पंथीय संघटनांच्या जाळ्यात आली आहे ते नाखूष आहेत. ह्यामुळेच अमेरिकेचे बाहुले म्हणून अरब जगत आणि मुस्लीम जगत पाकिस्तानची अवहेलना करते. ( सौदी व कतार भारतासोबत व्यापारी राजनैतिक संबन्ध घट्ट करत आहेत) पाकिस्तानी आर्मी आणि धार्मिक संघटना ह्यांच्या वर वेस्टर्न वल्ड ते तालिबानी समर्थक म्हणून नाखूष आहे. पाकिस्तान मधील विचारवंत आणि सर्व ठरतील घटक झरदारी आमच्या इतिहासातील सर्वात नाकर्ते राज्यकर्ते असले तरी सध्या त्यांना समर्थ पर्याय नसल्याने सध्याच्या परिस्थितीत तेच योग्य उमेदवार आहेत हि भावना दिसून येते. किंबहुना हेच त्यांचे यश आहे. आर्मीला सत्तेवर यावेसे वाटत नाही. कारण आर्मी प्रमुख निवृत्त होऊन पाकिस्तानात मानाने आणि सुखाने राहू इच्छितात त्यानं मूष सारखे परागंदा व्हायचे नाही आहे. .नुकतेच पाक प्रशासित काश्मीर ची राजधानी मुज्झ्फाराबाद सह तेथील मोठ्या शहरात काश्मीर च्या स्वातंत्र्य लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी जो जिझिया कर तेथील जनता भरते तो रद्द करावा म्हणून जनता रस्त्यावर उतरली ( त्यांचे म्हणणे असे कि गेल्या १० वर्षात काश्मीर स्वातंत्र्य लढ्यासाठी काहीही उल्लेखनीय पाकिस्तान सरकारने केले नाही आहे म्हणून ह्या कराचा उपयोग नाही ) मुळात त्यांना आता पाकिस्तान मध्ये न राहता स्वतंत्र व्हायचे आहे. बिचारी आय एस आय त्यांची एक स्वतंत्र शाखा फक्त काश्मीर साठी बनविली आहे ते भारतातील गिलानी व इतर नेत्यांच्या सहाय्याने अजून काय उजेड पाडणार आहेत. म्हणून आता त्यांनी आपले लक्ष्य मावो वाद्यांकडे केंद्रित केले आहे. पण बलुचिस्तान मध्ये आपल्याच पायाखाली काय जळत आहे ह्याची कल्पना असून नसल्यासारखे ते वावरत आहेत. झरदारी ह्यांच्या भारतभेटी मागील नक्की कारण काय ? भारतासही व्यापार वाढवण्याची सुब्बुद्धी अचानक त्यांना कशी झाली ? आफिज सइद वर आताच अमेरिका इतकी मेहेरबान का झाली आणि भारताच्या दृष्टीकोनातून ह्याचा नक्की अर्थ काय ? अफगानिस्तान मधील यादवीचे शेवटचे पर्व सुरु झाले आहे. तेव्हा हा एंड गेम नक्की कसा खेळला जात आहे अथवा खेळला जाणार ? ह्या सर्व विषयांवर माझी तुटपुंजी मते राजस्थान दौरा झाला संपला कि नक्की मांडेन. अवांतर अवांतर देवीस रेमेंड ची घटना मला त्यावेळी खूप महत्वाची वाटली कारण पाकिस्तानच्या इतिहासात त्यांचे सर्व घटक हे एकाच सुरात देवीस चा विविध कारणास्तव विरोध करत होते. हि घटना अमेरिका व पाकिस्तान मधील संबंधांना एक नवे परिमाण देणार असे त्या वेळी मला वाटले म्हणून त्यावर एक लेख पाडला. त्यावेळी एका प्रतिसादात मी पाकिस्तान अमेरिकेला त्यांची भिक घेऊन डोळे का दाखवतो ह्याचे कारण नाटो सैन्याची ८० टक्के रसद .... हा मुद्दा मांडला. सुका ह्यांनी हि रसद वेगळ्या मार्गे अफगाण येथे कशी पोहोचवता येईन ह्याबाबत चर्चा केली. पण त्यांच्या मताचा आदर राखून मी तेव्हा सांगितले कि असा कोणतीही शक्यता अस्तित्वात नाही आहे. पुढे २४ सैनिकांच्या जीवाचे राजकारण करत पाकिस्तान ने हि रसद आजतागायत बंद केली. व अमेरिका व नाटो असहाय्य होऊन हा तमाशा पहात राहिली. त्यांच्या अफगाण मधील कात्रज चा घाट होण्याची कारणी मीमांसा नंतर कधी तरी. आमच्या येथे जगभरातील निर्वासित म्हणजे इराण ,इराक ,अफगाण ,पाकिस्तान ,लिबिया ,पेलेस्तैन , तमिळ आणि बर्याच देशांचे नागरिक काम करतात. एखादी घटना वृत्तपत्रात वाचली कि ह्या लोकांशी संभाषण करून त्या बाबत त्यांची मते जाणून घेणे मला आवडते. त्यामुळे एखादा लेखक पेड न्यूज गिरी करतो कि सी एन एन च्या फरीद सारखी तटस्थ पत्रकारिता करतो ह्यांचे आकलन होते. तेच सवडीने येथे मांडेन.