✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असत्य तेही शास्त्रोक्त

र
रन्गराव यांनी
Fri, 12/03/2010 - 20:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3861 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ब्वॉरं...

शिल्पा ब
Fri, 12/03/2010 - 22:31 नवीन
ब्वॉरं...
  • Log in or register to post comments

खुलासा

राजेश घासकडवी
Fri, 12/03/2010 - 23:08 नवीन
माझं नाव घेऊन असा लेख लिहिल्यामुळे घासकडवी असत्य लिहितात असा समज होऊ नये म्हणून हा खुलासा. मूळ लेखाचा उद्देश - हायपोथेसिस मांडण्यापूर्वीची प्राथमिक चौकशी असा होता. बॅक ऑफ द आन्व्हलोप कॅल्क्युलेशन. त्यात अमुक एक हायपोथेसिस अधिक खोलात जाऊन शास्त्रशुद्ध रीतीने तपासून बघण्यास जागा आहे, इतपतच निष्कर्ष काढला. मिपावरच्या फुटकळ कौलातून मिळणाऱ्या विद्यातून आणखी किती शास्त्रीय माहिती मिळणार? कौलाचा उद्देश डिस्ट्रिब्युशन काढणे वगैरे नसून सरासरीचा एक सर्वसाधारण अंदाज घेणे असा होता. कौल नसता काढला तर हे आकडे मी कुठच्या आधारावर घेतले असते? त्यातही गणित करताना मी फक्त दोन स्पेशल केसेसचा विचार केला होता. १. आत्तापर्यंतच्या आठवणीत ज्यांना बरोब्बर १२ स्वप्नं पडली आहेत असे लोक. २. आत्तापर्यंतच्या आठवणीत ज्यांना बरोब्बर ५० स्वप्नं पडली आहेत असे लोक. व शक्यता काढण्यासाठी बायनॉमियल डिस्ट्रिब्यूशन वापरलं होता. कोणत्याही पंधरवड्यात ते स्वप्न पडण्याची शक्यता प (१/२४) असेल तर ज्यांना बारा स्वप्नं पडली त्यांना त्यातली तीन एका विशिष्ट पंधरवड्यात पडण्याची शक्यता किती. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर असं बघा. समजा २४ बाजू असलेला एक फासा आहे. त्याच्या प्रत्येक बाजूवर प्रत्येक पंधरवड्यांची नावं आहेत. आता एखाद्या व्यक्तीने १२ वेळा हा फासा टाकला तर त्यातल्या कितींना त्यातल्या ३ वेळा 'पितृपक्ष' असं दान पडेल? असं साधं गणित आहे. त्याचं उत्तर येतं १.३%. म्हणजे हजार लोकांनी बारा वेळा फासा टाकला (म्हणजे बरोब्बर बारा स्वप्नं पडली आहेत) तर त्यातल्या सुमारे १३ लोकांना ३ वेळा 'पितृपक्ष' असं दान येईल (म्हणजे त्यातली तीन स्वप्नं पितृपक्षात पडलेली असतील). अशीच गणितं ५० स्वप्नं पडणाऱ्यांच्या बाबतीत करता येतात. सगळ्याचा मुद्दा असा होता की - सुमारे १ टक्के लोकांना 'आपल्याला पितृपक्षातच ही स्वप्नं पडतात' असा विश्वास ठेवायला जागा होते. माझ्या लेखात मी हे सगळं स्पष्ट करायला हवं होतं. यातही खुसपटं काढता येतीलच. तीनच स्वप्नं पुरे का, त्यातून विश्वास बसतोच का... वगैरे वगैरे पण मूळ मुद्दा असा आहे की मी हे विधान शास्त्रसिद्ध विधान म्हणून करण्याऐवजी 'या दृष्टिकोनातून विचार करावा' अशा स्वरूपात मांडलं होतं. प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे? साप म्हणून भुई धोपटताय राव. संख्याशास्त्र हा फार उच्च प्रकार आहे. काही लोकं ते चुकीचं वापरत असतीलही. विशेषतः ज्यांना ओ की ठो कळत नाही असे. पण याचा अर्थ संख्याशास्त्राने काढलेला प्रत्येक निष्कर्ष चुकीचा असतो असं नाही. स्टॅटिस्टिक्सची फार बदनामी करून ठेवलीये लोकांनी.
  • Log in or register to post comments

तुम्ही असत्य लेख लिहिता, किंव

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 00:14 नवीन
तुम्ही असत्य लेख लिहिता, किंव तुमचा गणित पूर्णतः चुकीच होतं किंवा माझ म्हणणे पूर्ण बरोबर होत काहीही सिद्ध करण्याचा कोणताही हेतु लेख लिहिण्यामाग नव्हता. तसा तुमचा समज झाला असेल तर माफ करा. आज त्या पूस्तकांच मजेशीर नाव वाचल आणि त्यावेळी झालेल्या मजेशीर घटनांची आठवण झाली. म्हणून लिहिल. >>प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे? एकदम बरोबर! हीच चुक तेंव्हा केली होती. आणि स्टॅट्स्मध्ये आपण नेहमी नवीन आणि किचकट पद्धत वापरून जास्ती चांगल्या पद्धतीन उत्तर काढता येत आणि ह्याला कुठही अंत नाही हे त्यावेळी लक्षात न येनं ही माझी चुक होती. अशा चुका कशा टाळता येतील ह्यासाठी त्या पुस्तकाची मदत होईल ह्या विचारानं हा लेख लिहिला होता. आणि त्या पूस्तकाचा उद्देश स्टॅटिस्टिक्सची बदनामी करण हा नसून ती कशी टाळता येइल हा आहे. आणि विकिपिडियावरील माहीती ही हेच सांगत आहे., असो रॅपिड शेअरवर पुस्तक उपलब्ध आहे. वेळ मिळाला तर पडताळून पहा. बाकी भावना दुखावल्या असतील तर परत एकदा माफी मागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

गैरसमज नाहीत

राजेश घासकडवी
Sat, 12/04/2010 - 05:38 नवीन
चूक कोणाची पेक्षा तुमच्या लेखातून वरवर काय समज होऊ शकतो, तो टाळण्यासाठी खुलासा लिहिला होता. मला तुमच्या हेतूविषयी गैरसमज नाही, तेव्हा तुम्ही माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच येत नाही. तुमचा संख्याशास्त्राचा अभ्यास आहे, तसंच तुम्ही स्टॅटिस्टिक्सविषयी क्लिशेंमध्ये विचार करत नाही हेही माहीत आहे. (स्टॅटिस्टिक्स म्हणजे बिकिनी... या विधानाला तुम्ही दिलेलं उत्तर आठवतंय) असो. तुम्ही वाचलेल्या पुस्तकातले गमतीदार किस्से किंवा कुठच्या युक्त्या वापरल्या जातात हे सांगितलंत तर वाचायला आवडेल. हे जुनं पुस्तक आहे का? कारण अशाच शीर्षकाचं एक छोटेखानी, सचित्र पुस्तक खूप पूर्वी वाचल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

हो हे पुस्तक जुन आहे. बहुदा

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 08:38 नवीन
हो हे पुस्तक जुन आहे. बहुदा १९५४ सालच. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "छोटेखानी, सचित्र पुस्तक" आहे. त्यामुळे तुम्ही बहुदा तेच वाचलं असाव. आता मग तुम्हीच लिहा त्याविषयी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अग्गो बाई !!! केव्हढं हे

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 08:41 नवीन
अग्गो बाई !!! केव्हढं हे प्रेम ! उतू चाललंय नुसतं.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

त्या आदिती बाईंना भेटून वगैरे

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 08:55 नवीन
त्या आदिती बाईंना भेटून वगैरे आलात की काय?, काड्या टाकन सुरु झाला एकदम ;) डिसक्लेमर : हा निष्कर्ष आदितीविषयी लिहलेल्या एका धाग्यातील चर्चे वरून काढण्यात आला आहे, माझे वैयक्तिक मत नाही. ( आता माझ्यावर कुर्हाड कोसळनार नाही ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

ए अदिती ...बघ हे रन्गराव काय

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 09:42 नवीन
ए अदिती ...बघ हे रन्गराव काय म्हणतात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

+१

स्पा
Sat, 12/04/2010 - 09:49 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुम्ही का हसताय?

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 09:51 नवीन
तुम्ही का हसताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असंच.......... हसू नये कि

स्पा
Sat, 12/04/2010 - 10:35 नवीन
असंच.......... हसू नये कि काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मिपावर कुणीतरी प्रेमाने

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 12/04/2010 - 10:28 नवीन
मिपावर कुणीतरी प्रेमाने वागायला नको का हो? तुम्ही काही ते करणार नाही, त्यांना तरी करू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुम्हालाही ते जमत नाहीच ...हो

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 10:55 नवीन
तुम्हालाही ते जमत नाहीच ...हो कि नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जमते की, पण "शठं प्रति

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 12/04/2010 - 14:54 नवीन
जमते की, पण "शठं प्रति शाठ्यं" असे आमचे धोरण आहे. याचा अर्थ कळला नसेल तर अर्थाचा अनर्थ न करता मिपा वर अनेक संस्कृत पंडित आहेत त्यांना विचारावा. बाकी चालू द्या !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अरेरे!!! सहानुभूती आहे

शिल्पा ब
Sun, 12/05/2010 - 09:17 नवीन
अरेरे!!! सहानुभूती आहे आमच्याकडून...काय वाईट्ट लोक असतात न? तुम्हाला मेलं जरा गोड बोलू देत नाहीत ...दुष्ट कुणीकडचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव

शशिकांत ओक
Sun, 12/05/2010 - 11:52 नवीन
मूळ मुद्दा असा आहे की मी हे विधान शास्त्रसिद्ध विधान म्हणून करण्याऐवजी 'या दृष्टिकोनातून विचार करावा' अशा स्वरूपात मांडलं होतं. "प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे? साप म्हणून भुई धोपटताय राव."
धासकडवींच्या ह्या वरील धाग्यातील लाल अक्षरातील बोलांची भाषा नाडी ग्रंथांच्या बाबत मी करत होतो व आहे. त्यांचेच निळ्या अक्षरातील वोल हे त्यावेळी मी त्यांना दिलेल्या माझ्या उत्तराचा मतीतार्थ होता. म्हणून मी त्यांना व पर्यायाने इथल्या सर्वांना असे सुचवतो की "खुसपट काढून' नाडीग्रंथांना पूर्णपणे निरर्थक आहेत" असे - साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

वितरण नेहमी तपासावे

धनंजय
Sat, 12/04/2010 - 03:33 नवीन
आकडेमोड करताना वितरण नेहमी तपासावे. (उदाहरणार्थ : वितरण बायनोमियल आहे, की प्वासाँ की काय ते.) अर्थात प्रत्येक आकडा म्हणजे मोठ्या सँपलची सरासरी (अ‍ॅव्हरेज किंवा मीन) असेल, तर वितरण गॉसियन-नॉर्मल असते, असा सिद्धांत आहे. कित्येकदा मोजमाप केलेला आकडा असा अ‍ॅव्हरेज नसतो... सारांश : वितरण हे गृहीतक असते, सिद्धता नव्हे. आपण गृहीत धरले तसे वितरण आहे, हे तपासून बघण्याची प्राथमिक पायरी आवश्यक आहे. चित्र काढण्यापूर्वी पेन्सिलींना टोके करून घ्यायची तयारी आपण करतोच ना?
  • Log in or register to post comments

<<चित्र काढण्यापूर्वी

शिल्पा ब
Sat, 12/04/2010 - 04:30 नवीन
<<चित्र काढण्यापूर्वी पेन्सिलींना टोके करून घ्यायची तयारी आपण करतोच ना? हो, आणि जवळ खोडलब्बर पण ठेवतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

एकदम बरोबर. पण कळतय पण वळत

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 08:48 नवीन
एकदम बरोबर. पण कळतय पण वळत नाही असा प्रकार आहे. मग तुमच्या सारखं कुणीतरी चुक दाखावून दिल्याशिवाय डोळे उघडत नाहीत :) असो, थोडं ठेचकाळत तरी अक्कल येइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

साप म्हणून भुई धोपटताय राव.

शशिकांत ओक
Sun, 12/05/2010 - 12:00 नवीन
मूळ मुद्दा असा आहे की मी हे विधान शास्त्रसिद्ध विधान म्हणून करण्याऐवजी 'या दृष्टिकोनातून विचार करावा' अशा स्वरूपात मांडलं होतं. "प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे? साप म्हणून भुई धोपटताय राव."
रंगरावांच्या उत्तराशी सहमत. धासकडवींच्या ह्या वरील धाग्यातील लाल अक्षरातील बोलांची भाषा नाडी ग्रंथांच्या बाबत मी करत होतो व आहे. त्यांचेच निळ्या अक्षरातील वोल हे त्यावेळी मी त्यांना दिलेल्या माझ्या उत्तराचा मतीतार्थ होता. म्हणून मी त्यांना व पर्यायाने इथल्या सर्वांना असे सुचवतो की "खुसपट काढून' नाडीग्रंथांना पूर्णपणे निरर्थक आहेत" असे - साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव

अभ्यासासाठी आम्हाला नाडी

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 12/05/2010 - 20:47 नवीन
अभ्यासासाठी आम्हाला नाडी ज्योतिष पहाण्यासाठी काही शिष्यवृत्ती मिळेल काय? अभ्यासासाठी विद्यार्थी मिळवण्याची जबाबदारी घेण्यासाठी जबाबदार माणूस मी शोधू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

एक शंका आहे.

चिंतामणी
Sat, 12/04/2010 - 08:49 नवीन
पुस्तकाचं नाव आहे How to Lie with Statistics by Darrell Huff . हे पुस्तक मी नक्की वाचेन कारण त्यामुळे माझी कुणी फसगत करणार नाही आणि मीही अजाणतेपणे कुणाची. गेल्या तीन महिन्याती निकाल: १. गेल्या महिन्यात लोकप्रियता २०% रोडावली २. गेल्या ३ महिन्यात लोकप्रियता ३३% रोडावली. एक शंका आहे. हे लिहीण्यापुर्वी या पुस्तकाचा संदर्भ मिळाला होता का? ;)
  • Log in or register to post comments

आयला चोरी पकडली गेली परत एकदा

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 09:02 नवीन
आयला चोरी पकडली गेली परत एकदा ;) पण इथ मी वाचण्याएवजी अलेक्सा वाल्यांनी वाचल की नाही हे जास्ती महत्वाचं आहे. त्यांनी त्यांची पद्धत सांगितली आहे. आणि इथ मी वर सांगितल्याप्रमाणे थोडी डाटाबाबत अनिश्चितता आहे. कारण मिपावर सरासरी किती लो़क येतात आणि किती वेळ राहतात हा डाटा आपल्याकडे उपल्ब्ध नाही. हा मिपा जर लॉग करत असेल आणि दर महिन्याचा डाटा जर त्यांनी उपलब्ध करून दिला तर मग काही तरी करता येइल. तोपर्यंत अलेक्सावर विश्वास ठेवाण्याशिवाय दुसरा उपाय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पॉयसॉ म्हनजे काय हो दादा?

विजुभाऊ
Sat, 12/04/2010 - 14:25 नवीन
पॉयसॉ म्हनजे काय हो दादा?
  • Log in or register to post comments

तुम्ही थट्टा करत नाही आहात अस

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 14:44 नवीन
तुम्ही थट्टा करत नाही आहात अस ग्रुहीत धरून एक दुवा देतो http://en.wikipedia.org/wiki/Poisson_distribution
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा