असत्य तेही शास्त्रोक्त
काही महिन्यांपूर्वी राजेश घासकडवी साहेबांनी एक कौल काढल होत- पूर्वजांविषयी पडणारी पितृपक्षातील पडणारी स्वप्न आणि योगायोग ह्या विषयी. नंतर त्यांनी आकडेमोड मांडून तो योगायोग कसा आहे हे दाखवणारा लेखही लिहिला होता. तो बर्याच अंशी पटणारा होता. आणि बर्याच लोकांना पटलाही.
पण त्यातली आकडेमोड मला न रुचल्यामुळे मी वेगळी जास्ती शास्त्रोक्त पद्धत कशी वापरली पाहिजे ह्या विषयी एक लेख लिहिला होता. त्यात एक आगाऊ आणि आवांतर वक्तव्य होतं स्वप्नांच्या डिस्ट्रीब्युशन विषयी . राजेशनी ते पॉयसॉन आहे हे कौलाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला अस वाटत होत कि ह्यात नवीन काहीच नाही. ते पॉयसॉन शिवाय दुसर काही असूच शकत नाही. उगाच कौल काढून वेळ वाया घालवला वगैरे. खर पाहता त्या पद्धतीला डिस्ट्रीब्युशनने काहीही फरक पडला नसता. बर्याच जणांना हे मतही पटलं
मग त्या लेखावर एक प्रतीक्रिया आली धनंजय ह्यांची. " पद्धत बरोबर आहे. सहमत वगैरे--- " आणि पुढे "पण डिस्ट्रीब्युशन पॉयसॉन असू शकत नाही". मी पद्धत बरोबर सांगू शकतो तर डिस्ट्रीब्युशन कस चुकू शकतो हे काही पटल नाही. बरेच तर्क लढवले. आणि बर्याच वादानंतर तर्क संपले. मग दुसर्या दिवशी स्टॅटसच्या एका प्राध्यापकांना भेटून आलो. त्यांनीही मी चुक असल्याच सांगितल आणि त्याच कारणही दिलं.
त्यानंतर काही दिवसांनी एक पेपर वाचनात आला. त्यातही एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पॉयसॉन वापरल होतं. मग आम्हीपन तेच कोड केलं. पाहिजे तसे रीझल्ट्स मिळाले नाहीत. मग पून्हा ग्राफ वगैरे काढून झाल. आणि परत तेच- पॉयसॉन डिस्ट्रीब्युशन नाही. म्हणजे बघा काही तरी सांयटीफीक म्हणून आपण विश्वास ठेवतो आणि फसतो.
आणि आज असच जालावर शोधाशोध करत असताना एक पुस्तक सापडलं. पुस्तकाचं नाव आहे How to Lie with Statistics by Darrell Huff . हे पुस्तक मी नक्की वाचेन कारण त्यामुळे माझी कुणी फसगत करणार नाही आणि मीही अजाणतेपणे कुणाची ;). विकीपिडिया ह्या पूस्तकाबद्दल म्हणत.-
Themes of the book include "Correlation does not imply causation" and "Using Random Sampling". It also shows how statistical graphs can be used to distort reality, for example by truncating the bottom of a line or bar chart, so that differences seem larger than they are, or by representing one-dimensional quantities on a pictogram by two- or three-dimensional objects to compare their sizes, so that the reader forgets that the images don't scale the same way the quantities do.
आवांतर: ह्याचा अर्थ स्टॅट्स म्हणजे फसवेगिरी असा काढु नये कारण Statistics may be defined as- "a body of methods for making wise decisions in the face of uncertainty."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ब्वॉरं...
खुलासा
तुम्ही असत्य लेख लिहिता, किंव
गैरसमज नाहीत
हो हे पुस्तक जुन आहे. बहुदा
अग्गो बाई !!! केव्हढं हे
त्या आदिती बाईंना भेटून वगैरे
ए अदिती ...बघ हे रन्गराव काय
+१
तुम्ही का हसताय?
असंच.......... हसू नये कि
मिपावर कुणीतरी प्रेमाने
तुम्हालाही ते जमत नाहीच ...हो
जमते की, पण "शठं प्रति
अरेरे!!! सहानुभूती आहे
साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव
वितरण नेहमी तपासावे
<<चित्र काढण्यापूर्वी
एकदम बरोबर. पण कळतय पण वळत
साप म्हणून भुई धोपटताय राव.
अभ्यासासाठी आम्हाला नाडी
एक शंका आहे.
आयला चोरी पकडली गेली परत एकदा
पॉयसॉ म्हनजे काय हो दादा?
तुम्ही थट्टा करत नाही आहात अस