Skip to main content

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 03/12/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18953
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

******

ओक्के.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. >>> मला वरील शब्दांशी , अर्थाशी आणि एकुणच सो कॉल्ड पडद्यामागच्या त्रासाशी काही ही घेणे देणे नाही , आणि आंतरजालीय राजकारणाशी ही काही घेणे- देणे नाही. हा प्रतिसाद जस्ट टु से वेलकम टार्‍या !!!! (मनातल्या मनात : भदाडं आल तिच्याआयला मिर्‍या ..........ला !! ) ऑल-टाइम टार्‍याज रिडर दिलदार सुहास

बरं बरं ये रे टारूबाळा ये परत

टारझन, तुझी येण्याची खबर कळल्यामुळे आनंद झाला. तुला प्रत्यक्ष सुद्धा भेटण्याची इच्छा आहे.

दर दोन दिवसाला पब्लिककडून आठवण काढली जात असलेल्या महात्मा टारझन यांना साष्टांग प्रणिपात. टारझन यांचे सगळे लिखाण अवलियांनी दिलेल्या लिंकमुळे वाचून धन्य झालो आहे. होऊ जाऊ द्या आता एखादा फटका लेख!

In reply to by अवलिया

घ्या! आता तुम्हीच असं विचारा म्हणजे बास! धोबीपछाड वगैरे डाव शिकून घेईन म्हणतो एप मॅनकडून! ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छ्या:!!! तुम्ही कशाचंही काश्मिर करणं सोडणार नाही! आपण जरा बाजूला जाऊन बोलू... कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनीत व्यत्यय नको.

बातमी वाचली अणि अक्षरश: टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला. टारझनवर आमचा आधीपासुनच भारी जीव आहे. अत्यंत आनंद झाला. आशा आहे टारझन आपल्यासोबत आता कायम राहील. वेलकम बॅक टारझन!

जंगल जंगल बात चली है पता चला है.... :-) --असुर

टीआरपी वाढणार आता. मिपाचे शेअर्स खरेदी करतो. - ओंकार.

स्वागत आहे टारझन बुवा..

In reply to by नगरीनिरंजन

सही प्रश्न आहे. आयडी तयार करायला काहीही लागत नाही त्यामुळे तो उडवण हे फारसं बरोबर नाही अस वाटतं. असो.

>>मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. हे सगळं लिहनं आवश्यक होतं का? फक्त परतीची घोषणा करून ही काम झालं असत. असो टारझन ह्यांच स्वागत आहे! :)

In reply to by मितभाषी

एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना आम्हला देण्याऐवजी त्यांना जाहीर तंबी दिल्यासारखी वाटती आहे. आपण एखाद्याला घरात घ्यायच ते सन्मानानं. आमच्या गल्लीत आलायस, बघून घेतोच अस सांगून त्याला दहशती खाली ठेवून नव्हे!

In reply to by रन्गराव

नमस्कार, दिलेलं निवेदन हे मिसळपाव व्यवस्थापनाकडून आहे. मिपा व्यवस्थापनाने काय लिहावं आणि कसं वागावं याबाबत जाहीर न बोलता व्य.नि. केलात तर उत्तम. यापुढे याची दखल घ्यावी. मिसळपाववर जशी कारवाई करतांना स्पष्टीकरण करण्यात आलं तसंच कारवाई परत घेतानासुध्दा देण्यात आलंय तेथे काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.याबाबत प्रत्यक्ष संबंधित सदस्यं सरपंचांना व्य.नि. करू शकतात. सरपंच हे मिसळपावचे नियंत्रक सदस्यंनाम आहे. नीलकांत यांचेकडे सरपंच आयडीचे अधिकार आहेत. -

In reply to by सरपंच

यापुढे दखल घेतली जाईल.
काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.
हम्म्म्म्म्म्म . महात्मा गांधी तंटामुक्ती योजना राबवा मिसळपाववर. टार्‍याचा फॅन भावश्या.

In reply to by मितभाषी

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. त्यामुळे आल्या आल्या अशा काड्या करणे , त्याचे धागे उडवणे इत्यादी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रकार सुरु केले आहेत. बाकी शब्द फक्त टारझननेच पाळावेत मग तो मर्द असल्याचे चॅलेंज पुर्ण करेल =)) =)) =)) हे लिहिणार नव्हतो पण मागील एका चर्चेत एक ज्येष्ट संपादकच म्हणाले होते "किमान माझ्या कडून वादाला सुरुवात होईल असे मी वागणार नाही ". ह्याचा व्यत्यास म्हणुन प्रतिसाद दिला आहे. बाय द वे ज्यांना उडालेला धागा वाचायचा असेल त्यांनी टारझन-ब्लॉग वर जाउन वाचावा. -टारझन खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता सांगा षंढ कोण ?

In reply to by टारझन

खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता हे असं लिहील्यावर स्वतःच्या नावाने माज करणाऱ्या बायकांबद्दल काय म्हणाल?

In reply to by शिल्पा ब

१. ही सहि आहे . तेंव्हा जेनेरिक विधान आहे. २. मर्द हे विशेषण आहे. त्याचे लैंगिक अर्थ काढुन लैंगिकतेचं स्तोम माजवु नये. ३. बायकांबद्दल काहिहि न म्हणलेले उत्तम असते. कारण रिकामटेकड्या बायका वाट बघुन असतात कोणी आपल्या विषयी काहि बोलतं का ते ;) बाकी हवापाणी काय म्हणते तुमची ?

In reply to by टारझन

असतात हो अशा रिकामटेकड्या बायका...मेल्यांना काही कामच नसतं.. बाकी आमची हवा अन पाणी दोघी रेग्युलर आहेत...

In reply to by टारझन

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. हा हा हा :)

In reply to by सरपंच

मेंदुचा भुगा व्हायची येळ आल्या आता ( आता मेंदू आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न अशी एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ;) ) . नाय कस हाय, तुम्ही, संपादक मंडळ, सरपंच आन इतर कोन अधिकारी असत्याल त्यानी एक नीट धोरण ठरवा. दोन दिसापूर्वीच "संपादक मंडळ" ह्या आयडीवरून " संपादक मंडळ कुणास उत्तर देणे लागत नाही " असे एक उत्तर आले होते. आता हे धोरण सरपंचाना माहित नाय का दोन दिसात धोरण बदललं ते ह्या गरीबाला माहिती नाय असा जळजळीत प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या ह्या प्रतिसादामु़ळं. जाहीर बोलण्याची येळ फकस्त माझ्यावर नव्हं तर इतर लई जणांवर आलीया. का त्येचा ईचार करा कुणीतरी. आणि व्यनीचा अर्थ व्यक्तिगत निरोप असा काही तरी असावा. नसल तर कुणीतरी दुरोस्ती करा. सार्वजनीक मुद्दा सार्वजनीक निरोपातन कळवलेला बर अस एक इचार होता. मग त्याच्यावर चर्चा करून चित्र स्पष्ट होत. मध्ये पडदा ठेवला तर माहितीच्या अभावी गैर्समज होतात. मग स्पष्टीकरण त्यावर टीका, आणि परत स्पष्टीकरण हे दुष्ट चक्र चालू होतं. जर सगळ पारदर्शी आणि मुक्त असेल तर ह्या सगळ्याची गरज राहणार नाही. बघा पटतय का?

आपले मिपावर पुन: स्वागत. - तिरशिंगराव टारझाणे

पाठोपाठ २ चांगल्या बातम्या! तिकडे मोदींना 'क्ली चिट' मिळाली आनि इकडे टारझला. अवांतरः दोघांची रास एकच असावी का बरे? अतिअवांतरः आता शुद्धलेख बदला बरे का....

अजून टाऱ्या आला नाही तर दंगा! तो आल्यावर... असो. स्वागत. दिलेले शब्द पाळ.

In reply to by श्रावण मोडक

येलकम ब्याक! शब्द देणे मोठी गोष्ट नाही, दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो. नवी इनिंग सुधारित रुपात खेळण्यासाठी शुभेच्छा!

In reply to by धमाल मुलगा

दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.
येस्स. तो आहेही. मध्येच तोल जातो. तो आता जाऊ देऊ नये त्याने म्हणजे काम तमाम. आपण एन्जॉय करू त्याची हीही इनिंग... :)

श्री.टारझन यांच्या (तात्पुरत्या का असेना...) अनुपस्थितीची इथल्या सर्वच सदस्यांना तीव्रतेने जाणीव होत होती हे सातत्याने त्यांच्याविषयीच्या इथे येत असलेल्या उल्लेखावरून समजत होतेच....(नव्या सदस्यांनादेखील). पण आता संपादक मंडळाने त्यांचे पुनरपी स्वागत केले असल्याने खुद्द श्री.टारझन यानाही सदस्यांइतकाच आनंद होत असेल असे वाटते. परत एका गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते ते अशासाठी की, घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....हे त्यांच्या स्वभावाशी सुसंगतही आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रराजशी सहमत. मिपावर प्रवेश देताना त्याच्याकडून काही गोष्टींची कबुली घेण्याली आहे असे सरपंचांनी नमूद केलेले असतानाही काही सदस्य अभिनंदनाव्यतिरिक्त जे विचार व्य्क्त करीत आहेत ते करू नयेत असे वाटते.

In reply to by इन्द्र्राज पवार

घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले.... याबद्दल मी काही वेगळेच ऐकले होते.

टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? बाकी गुळमुळीत टारूबाळ कसे काय असेल हे आठवून हसत आहे.

In reply to by नितिन थत्ते

>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे? असेच म्हणतो. ज्या अर्थी टारझन यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना (म्हणजे टारझनना) तसे करावेसे वाटले असावे. कुणी दमदाटी केली आणि दिलगिरी व्यक्त कर म्हणले (आणि ती देखील सरपंचमहोदयांनी) म्हणून ते ऐकून घेतील असे वाटत नाही.

पण ज्यांचं स्वागत होत आहे ते टारझन कुठे आहेत?? इथल्या ज्येष्ठ सदस्यांना विनंती की त्यांनी टारझन यांना व्यासपीठावर आमंत्रित करून ( स्वारी प्रकट होऊन! ) दोन शब्द बोलण्याची विनंती करावी.

टारोबा,टारु,टार्‍या,टारेश्वर,प्रा.डॉ.झन,टार्‍याबुवा,टारेश भेगाबुजव,,टारूशेठ,टारसांड,टात्या भाउ ,टारझन-जी, कात्रट टार्ट,टार्झटा,टार्‍या भाय,फोटुत्सु,टाराटीरी,टारेश काथ्याकुटवी,ख्रराटुत्सु,टारगट,टारोबा मिटर,टरपाल, टार्‍येंद्र ,टारायण, महाटारत, टुराण,सद्गुरू टारानंद महाराज,टार यार,टारूजी..,टरटर..,टारोपंत,टार्या..,टारूबाळ, टाराज ठाकरे,(ख)टारा,टार्‍याभाय,टार्‍या अतिभयंकर ,.......................................................................आणि अशा बर्याच उपाढ्या प्राप्त असलेल्या टार्झन्याचे पुनर्राग्म्न.......................................................!!! चला लोंच्यात तिखट पड्लं.... -टार्लालसा लाल्सार्झन ;)

वेलकम बॅक टार्‍या.. साद आणि प्रतिसाद होऊन जाऊं देत पुण्हा एकदा.. आणि गेलेल्या सगळ्या आयडीज ना 'पुनरागमनायच' :) - टुपास

इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या श्री. टारझन याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा आता योग येईल........ बरंय,,,,

In reply to by स्पा

इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या अरे बाबा तो दंतकथाकार आहे. दातांचा आणि जाबड्याचा विमा उतरवतो. अयथा दातांची कथा करून टाकतो

लोकमताची कदर करणारा निर्णय. टारझनचे स्वागत.