खालुन पाचव्या फोटुत नर्तिकेचे ट्रायसेप कसे चमकत आहेत .. वा वा वा !!
धन्यवाद जकार्ताकाका !
बाकी पुण्यातल्या बालगंधर्व मधे होणार्या "चौफुला" ,"नाद करायचा नाय" वगैरे मधे जो माहोल तयार होतो तो तिकडे झाला असेल ह्या बाबद सांशक .
-(णटराज)
एक चूक आहे
(ढोलकीवर 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर)
या चित्रात ते वाजवीत असलेल्या वाद्याचे नाव सम्बळ असे आहे. ती ढोलकी नाहिय्ये गोंधळ वगरे गाताना संबळ वाजवतात.
विजूभाऊ, सर्वात प्रथम धन्यवाद.
त्या कार्यक्रमात ढोलकीचंच नांव घेतलं गेलें. पण माझी ऐकण्यातही चूक झाली असू शकते. कारण हीच दुरुस्ती आणखी एका वाचकाने सुचविली होती.
सुदैवाने ढोलकीसम्राट घोटकरसाहेबांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले आहे. त्यांनाच फोन करून विचारतो आणि चूक असल्यास दुरुस्त करणासाठी सकाळच्या संपादकांना विनंती करतो.
पुनश्च धन्यवाद!
विजूभाऊ,
आज सकाळीच 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकरांशी बोलणे झाले. त्या 'ताशा'सारख्या दिसणार्या वाद्याचे नांव 'संबळ'च आहे! आता ते बरोबर करण्यासाठी संपादकांना लिहितो.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
मला तरी लावणी हा प्रकार फार आवडतो.
>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते.
सुपे हे पारनेर तालुक्यात येते. पारनेर हे माझे गाव.
>>('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)
मला वाटते ते सुपे दुसरे असावे.
ह्या सुप्याला लढाई झाली असे मला वाटत नाही.
ही माझी माहिती आहे.
चुकीचीही असु शकते
सुधीर काळे .. आपला लेख उत्तम जमला आहे ..
लावणी मला पण खुप आवडते ..
..सांगते ऐका चे मेकींग आधीच वाचले होते .. मस्त आहे .. एकदम नक्की सर्वांनी वाचावे असे..
----------
अवांतर :
विलास राव आपण पारनेर चे असल्याने आनंद वाटला , शिरुर ला ३-४ वर्षे होतो तेंव्हा पारनेर चे मित्र मैत्रीणींची आठवण झाली ..
बारामती जवळील 'सुपा' ही शहाजीराजेंची सर्वात पहिली जहागीरी होती. कदाचीत ते हे सुपा असेल असे वाटते ..
आणि ते माझे गाव आहे .[:)]
या सुप्या जवळ केडगाव असे गाव आहे .. जसे पारनेर च्या सुप्या जवळ केडगाव आहे तसेच त्यामुळे ही बराच गोंधळ होतो काही जणांचा..
आणि या सुप्याजवळ ही चौफुला (केडगाव) हे ठिकाण आहे .. त्यामुळे हे पथक पहिल्यांदा तेथलेच वआटले मला पण नगरकर वाचुन कळाले हे तिकडच्या सुप्याचे ते ..
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे.
पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले.
अजून थोडा शोध घेतो.
काळे
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे.
पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले.
अजून थोडा शोध घेतो.
काळे साहेब. बरोबर आहे. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे पण हे सुपा मोरगावजवळ (बारामती तालुका) आहे.
>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)
अहमदनगर जवळचे सुपे असा उल्लेख आल्याने मला असे वाटले.
बाकी ते मॅपमधले सुपे वेगळे आहे.
असो.
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल.
पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी.
हे बारामतीचे सुपे वेगळे आहे. बहुतेक चौफुला म्हणतात ते हेच किंवा जवळच असावे.
चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण.
ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत.
आता तिथे कुठली कला चालते ते धमालराव प्रकाश टाकु शकतील.
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी.
शिरूर-नगर अंतर ५०-६० किमी आहे असे आठवते. म्हणजे सुपे-नगर २५ किमी?
म्हणजे नगरच्या जवळच, नाहीं कां?
असो. मुख्य लेख "सुपे कुठे आहे" याबद्दल नसून "लावणी-दर्शन या कार्यक्रमाबद्दल आहे" तरी तिकडे जास्त लक्ष असू द्या.
त्या ग्रूपमधील एका कलाकाराचे कार्ड माझ्याकडे आहे. त्यालाच फोन करून विचारतो आणि कळवतो.
दरम्यान Back to "Lavani Darshan"
चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण.
ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत.
चौफुल्याला कलाकेंद्र आहेतच. पण वरील कलाकारांचे सुपे/सुपा हे शिरुरच्यापुढे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात येते. तेथेसुध्दा घाटाच्या पायथाशी कला केंद्रे आहेत.
चौफुल्यापासुन सुपा आत मोरगाव मार्गावर आहे.
उगीचच पिंका टाकायाची सवय मिपाकरांनी सोडावे असे मला वाटते.
"..."लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले....."
श्री.सुधीर काळे यांच्या उत्स्फूर्त लिखाणावरून ते त्या कार्यक्रमाच्या प्रेमात किती गुंफले गेले होते ते स्पष्ट दिसून येते. 'लावणी' हा प्रकारच मराठी माणसाला मोहित करणारा आहे, भले त्या कलेविषयी सर्वसाधारणपणे डावेच मत मांडले जात असले तरी. वर उदधृत केलेल्या अवतरणातही श्री.काळे यानी हीच भावना प्रकट केली आहे, तीबद्दल मी थोडा खुलासा करतो.
इथे मी 'चुकीच्या कलंकावर' असा शब्दप्रयोग न वापरता "चुकीच्या समजुतीमुळे" हा नृत्यप्रकार मागे पडला असे म्हणतो. कारण या परंपरेत वाढलेली 'मुलगी' ही पुरुषसेवेसाठीच जन्माला आली आहे अशी खुद्द त्या समाजाचीच (कोल्हाटी) धारणा असून तसे एखाद्या मुलीने केले नाही तर खंडेरायाचा उग्र कोप पुर्या छाटीवर [छाटी = समाज] पडतो. तमासगिरीण आणि शरीरअर्पण याची वीण अशी काही दाट आहे तिथे की, त्या समाजातील एखादी सुशिक्षित (तसे पाहिले तर मुलींना अतिशय अल्प शिक्षण दिले गेलेले असते...वयाच्या ८ व्या वर्षीच चाळ पायात बांधले जातात) नृत्यांगणा आपणदेखील चारचौघीसारखे लग्न करून सुखाने संसार करावा का हा विचारच करू शकत नाही.
"बामना घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं, महारा घरी गाणं, कोल्हाटी घरी नाचणं...." ही शिकवण देवाची असून तिथे जन्मजात आहे असे मानले जाते आणि त्याच मार्गाने यांची वाटचाल चालू असते. "पिंजरा" चित्रपटातील ते एक दृश्य फार बोलके आहे की, जिथे मास्तर आणि पाटील त्या तमाशावाल्यांचा फड गावी येऊ न देता त्याची नदीपलिकडे (म्हणजेच गावकुसाबाहेर) हकालपट्टी करतो. तो प्रसंग बिलकुल काल्पनिक नसून कोल्हाटी समाजाची ती वर्षानुवर्षाची तिडीक आहे. पांढरपेशा वर्गही या समाजातील मुलांमुलीकडे फार आपुलकीने पाहतो असे बिलकुल नाही. रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. मेट्रोमध्येही यांच्याबाबतीत हा भेदभाव होतोच होतो.
याला दुसरेही कारण म्हणजे कोल्हाटी जातीतील मुलीना नसलेली लग्नाची परवानगी. "पाट" लावून घेणे हा एक प्रकार सर्रास (आजही) चालू असल्याने एखाद्या बारीच्या वेळी "दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला, गं बाई हसला..." असा कुणी तालेवर "पाटील, इनामदार, सावकार" दिसतो का ते पाहणे हे यांचे विधिलिखितच असते. कोल्हाटी समाजाच्या "माळी कोल्हाटी" आणि "भातू कोल्हाटी" अशा दोन पोटजाती आहेत. माळीकरीण रितसर तमासगिरीण (मी करीत असलेला हा उल्लेख अपमानस्पद नाही, हे इथल्या वाचक-सदस्यांनी समजून घ्यावे, तर हे लेबल खुद्द कोल्हाट्यांनी त्या मुलींना लावलेले असल्याने शासन दरबारी गॅझेटियरमध्येही हेच नाम नोंदीत झालेले आहे) झाल्यावर लग्न करू शकते....पण कुणाशी? तर तिच्याच बारीतील एका पुरूषाशी....जो सहसा ठेकेदारांसमवेत व्यवहाराला पुढे असतो....तर भातू कोल्हाटीणीच्या पायात घुंगरू आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारच्या लग्नाचा 'अधिकार' नाही....ती खंडोबाचीच पत्नी...पण शरीरभुकेसाठी आणि उतार आयुष्यासाठी "योग्य" वयातच 'पाट' लावून घेते....तालेवाराची रखेल होते...आणि एकदा का जवानीचा मोहोर गळाला की, त्याच तालेवाराच्या घरातील 'पायपुसण्याची' अवकळा येते त्या एकेकाळच्या सुंदरीला !!
फार वाईट जगणे आहे....पण तरीही श्री.सुधीर काळे यानी इथे दिलेल्या फोटोमधून अपरिहार्यपणे त्याना समाजाच्या चार घटका मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या पोटापाण्यासाठी तो शृंगाररस नृत्यरूपात बोर्डावर सांडावाच लागतो.
इन्द्रा
रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही.
वाह वा. खरच छान लिहीले आहेत. हेच इम्रान हाश्मी, शबाना आजमीलासुध्दा सांगाय्ला पाहीजे असे वाटते.
अतिशय सुन्दर झाला असला पाहिजे कार्यक्रम! मध्ये एकदा कोल्हापुरला एक दिवस खास महिलांसाठी या कर्यक्रमाच सादरी करण केले गेल होत. त्यातली एक नर्तिका पी एस आय म्हणुन रुजु होणार होती. या मुले व्यवस्थित शिकलेल्या असतात.
काका एकच चुकलय अस मला वाटतय, ते फोटो मध्ये ढोलकी सम्राट ढोलकी वाजवत नसुन ' संबळ ' वाजवताहेत. खंडोबाच गाण असाव ते.
मी खुप दिवसा पासुन ' कवडसा कवडसा चांदाचा पडला ' गाण शोधते आहे. कुठे मिळेल का?
अप्रतिम लेख
जर्मनीत व युरोपात दक्षिणात्य नृत्य शैलीचे कायर्क्रम खूप गर्दी खेचतात .माझ्या मते आपली लावणी असो कि भांगडा हे सुरवातीपासून नुसत्या वाद्याच्या आवाजाने रसिकांचे मनमोहून घेतात .तेव्हा आपली लोककलेचे युरोपात कार्यक्रम का करत नाहीत असा प्रश्न मला नेहमीच पडतो .युरोपातील मराठी माणूस संमेलन भरवू शकतो .अमेरिकेत सुरेखा पुणेकर जाऊन येतात .युरोपात आम्हाला शिट्या कधी वाजवायला मिळणार ह्या प्रतीक्षेत सध्या आहोत .
प्रतिक्रिया
लावणीचा कार्यक्रम असल्याने
:)
एक चूक आहे (ढोलकीवर
विजूभाऊ, सर्वात प्रथम
त्या 'ताशा'सारख्या दिसणार्या वाद्याचे नांव 'संबळ'च आहे
ती उपमा त्याच कारणास्तव भावली
अप्रतिम
सुधीर काळे .. आपला लेख उत्तम
गणेशा
सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली
काळे साहेब. बरोबर आहे. पण......
सुपे गाव पारनेर तालुक्यात असून ते गांव शिरूर-नगर रस्त्यावर आहे
छानच हो साहेब... मजा आली
ब्राऊझर मधे आणखी कसलासा टॅबु
छान वाटले वृत्तांत वाचून!
इथे पहा सुपे कुठे आहे ते!
काळेकाका
तुम्हीच उत्तर दिले आहेत या नकाशात.
इथे पहा सुपे कुठे आहे
काका
दरम्यान Back to "Lavani Darshan"
ओव्क्के
जाता कशाला कॉमेंट करता.
लावणी वॄतांत आवडला...
शी:
छान लेख त्यात खेळण्यातला जोश,
लावणीमागील आयुष्य...!!
वाह वा.
धन्यवाद
सुंदर प्रतिसाद .. छान माहिती
अतिशय सुन्दर झाला असला पाहिजे
ऐका http://ishare.rediff.com/
धन्यवाद नरेशजी!
अप्रतिम लेख जर्मनीत व युरोपात
आजच हा लेख 'ई-सकाळ'ने प्रकाशित केला.