माझिया केसानो!!
"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे.
अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली )
कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे.
माझिया केसानो सरळ व्हा ना,
माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा...
तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो ||
माझिया केसां जरा चमक ना,
माझिया केसां जरा चमक ना,
घालवु कशी मी ही तुझी रूक्षता...
टकलि न मी वाढतोस तू
आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!... माझिया केसानो ||
माझिया केसा तुला धुते ना,
माझिया केसा तुला धुते ना,
सांजवेळी रोज तेलही लावेन ...
रात्रित ते तुम्ही पिऊन घेणे
सकाळी येईल मस्त मउपणा... माझिया केसानो ||
माझिया केसानो सरळ व्हा ना,
माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा...
तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो ||
लेखनविषय:
याद्या
1413
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
वृत्तात थोडा मार खाल्ला आहेत,
मला आता हा धागा परत एडीट कसा
In reply to वृत्तात थोडा मार खाल्ला आहेत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
+ १
In reply to वृत्तात थोडा मार खाल्ला आहेत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
छान सूचना.. ! धन्यवाद ! छान