Skip to main content

बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 18/11/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत काव्यात समस्यापुर्ती हा एक खुप लोकप्रिय काव्यप्रकार होता. मिपावर देखील सुरू करून पाहुया. समस्यापुर्तीसाठी एक ओळ दिल्या जाते. त्या ओळीत मांडलेल्या प्रश्नाचे, किंवा परिस्थितीचे समाधान करणार् या तीन ओळी तुम्ही रचायच्या आहे. दिलेली ओळ कुठल्याही क्रमांकात बसवून चार ओळीत समस्यापुर्ती करायची आहे. कुठलेच उत्तर बरोबर वा चुक असणार नाही. त्यामुळे स्पर्धा अशी नाही. पण एकच परिस्थिती कशी विविध प्रकारांनी हाताळल्या जाऊ शकते ह्याची मनोरंजक उदाहारणे नक्की समोर येतील (अशी आशा करुया). चला तर सुरवातीसाठि ओळ देत आहे. चंद्र अवचित ग्रासला
लेखनविषय:

वाचने 2206
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by रणजित चितळे

वाहवा क्या बात है! (स्वगत- आपण पुर्वेला नाही, द्क्षीण्-पूर्वेला असल्यामुळे हे दिसले नसावे!)

गवाक्षातुनि डोकावता ती चंद्रमुखी भर माध्यान्ही मुखचंद्र मला दिसला नजरभेटता दाटला तो लज्जामेघ पदर होऊनि चंद्र अवचित ग्रासला