आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे?
माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना.
१. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास
२. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी
३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर
४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी
यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही. पण त्यांचा मुत्सद्दी पणा आणि व्यवहार चातुर्य इतके पराकोटीचे होते की कधीही प्रत्यक्ष युद्ध न करताही युद्ध जिंकत असत. पण त्यांच्या युध्दभूमिवरच्या या कमकुवतपणामुळे त्याना अर्धे शहाणे म्हटले जात असे.
या विषयाबद्दल कोणाला अधिक काही माहीती असेल कळवावी तसेच वरील माहीती मधे काही त्रुटी असेल तर ती दूर करावी.
आपला
(साडेतीन शहाण्यांच्या शोधात)
पुण्याचे पेशवे
वाचने
18033
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
विट्ठल सुंदर
उत्तरं बरोबर आहेत... पण...
ह्म्म
भले
हे साडेतीन जण
पण वरील
In reply to हे साडेतीन जण by विजुभाऊ
अरे बापरे ...
In reply to हे साडेतीन जण by विजुभाऊ
झ्याक आयडीया विजुभाऊ..
नाही हो...
साडेतीन शहाणे.
होय विठ्ठल सुंदर.
In reply to साडेतीन शहाणे. by नीलकांत
पेशवाईतील
In reply to साडेतीन शहाणे. by नीलकांत
चाणक्य सोडा हो...
In reply to पेशवाईतील by अवलिया
+१
In reply to चाणक्य सोडा हो... by नीलकांत
जिवा
In reply to +१ by कोलबेर
विठ्ठ्ल सुंदरच!
In reply to साडेतीन शहाणे. by नीलकांत
ठीक आहे.
In reply to विठ्ठ्ल सुंदरच! by पिवळा डांबिस
संदर्भ..
In reply to ठीक आहे. by नीलकांत
घ्या!!!
In reply to संदर्भ.. by llपुण्याचे पेशवेll
हाहाहा.....
In reply to घ्या!!! by पिवळा डांबिस
राजकारण
पेशवे