✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

ग
गंगाधर मुटे यांनी
Fri, 11/12/2010 - 11:58  ·  लेख
लेख
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते. ‘रानमेवा’ ११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे. ‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे. * ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा. * पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी. * मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा. * मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे. * ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल. धन्यवाद! . आपला स्नेहांकित . गंगाधर मुटे ..................... रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी. ..................... रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी. ..................... रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. .................... रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी .................. रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी ................... थोडा हास्यविनोद. ...................... उपस्थित जनसमुदाय. ............................................
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2777 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

वा!

अवलिया
Fri, 11/12/2010 - 11:59 नवीन
अभिनंदन !! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Fri, 11/12/2010 - 12:10 नवीन
हार्दीक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मनापासुन अभिनंदन ... साईट्स

गणेशा
Fri, 11/12/2010 - 12:13 नवीन
मनापासुन अभिनंदन ... साईट्स ब्लॉक असल्याने फोटो पाहु शकलो नाही .. नक्की बगेन बाहेर जावुन .. तुमची प्रगती अशीच वाढत जावो ...
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नगरीनिरंजन
Fri, 11/12/2010 - 13:05 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/12/2010 - 14:12 नवीन
अभिनंदन.......! एवढ्यावर थांबू नका. अजून येऊ द्या कवितासंग्रह. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुटे साहेब

विलासराव
Fri, 11/12/2010 - 18:55 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अरे वा!

धमाल मुलगा
Fri, 11/12/2010 - 19:16 नवीन
अभिनंदन...अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

मुटे साहेबांचे विशेष

पिंगू
Fri, 11/12/2010 - 19:58 नवीन
मुटे साहेबांचे विशेष अभिनंदन.. - शुभेच्छुक पिंगू
  • Log in or register to post comments

अभिनंदन..तसेच प्रा.डॉ.शी

डावखुरा
Fri, 11/12/2010 - 20:12 नवीन
अभिनंदन..तसेच प्रा.डॉ.शी सहमत...
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

गंगाधर मुटे
Sun, 11/14/2010 - 07:07 नवीन
खूप खूप आभारी आहे सर्वांचा..
  • Log in or register to post comments

थोडा उशीर झाला.

गवि
Tue, 11/16/2010 - 13:35 नवीन
सर्..वाचायला थोडा उशीर झाला. मनापासून अभिनंदन.. अशीच अजून पुस्तकं येऊ देत. मिळवून वाचतो. आधीही तुमचा ब्लॉग वाचत असल्याने काही वाचन झालेच आहे.
  • Log in or register to post comments

'सकाळ'ने घेतली 'रानमेवा' ची दखल.

गंगाधर मुटे
Sun, 12/19/2010 - 21:37 नवीन
आज 'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीने' 'रानमेवा' ची दखल घेतली. . थोडा ’रानमेवा’ खाऊ चला! .................................................. Image removed. .................................................
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक अभिनंदन आणि

पुष्करिणी
Mon, 12/20/2010 - 00:04 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

शहराजाद
Mon, 12/20/2010 - 00:34 नवीन
अभिनंदन आणि पुलेशु.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा