सगळी कथामालिका वाचताना आपण पण त्या घारींबरोबर एक साक्षीदार आहोत असं वाटत राहिलं.
माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या सायलीला सांगत असणार “ रडू नकोस आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळ ठिपका असणार हे आता मी तुम्हाला सांगायला नको.
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबर साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
नेमकी कशाची भीती वाटते हो ही कथा पूर्णत: सत्य आहे हे सांगायला??
तुमच्या त्या कोवूरांची??
की वाचकांची? वाचकांची वाटत असती तर तुम्ही हे इथं मांडलंच नसतं.
आम्ही काही विचारायला येणार नाही सायलीला ते कसब कसे शिकवलेत ते.
पण अब्राहम टी. कोवूरांच्या चाहत्याची अशीही बाजू पाहून अमंळ मजा वाटली ;-)
आपण लिहिलेली कथा सत्य आहे अथवा नाही हे आपल्यालाच ठाऊक.
आपण त्या बद्दल अटकळ बांधायला जागा ठेऊन लेख संपवलात.
अत्यंत उच्च दर्जाचा लेख.
उच्च दर्जाचा ह्यासाठी की केवळ आपले आप्त, जिवलगच नव्हे तर, आपल्याला पदोपदि भेटणारी माणसे कशी आहेत, हे आपल्याला कळण्यासाठी ह्या तंत्राचा उपयोग होतो.
मी गेले २४ - २५ वर्षे भारत व जग फिरुन अनेक लोकांशी व्यवहार केला.
कोठे ठेचकाळलो, तर कोठे अनपेक्षीतपणे मनापासुन मदत करणारे भेटले.
ह्या वर विचार करता करता, लोकांच्या अंतरंगात डोकावण्याचे तंत्र आत कोठेतरी विकसीत होत गेले.
बर्याच वेळा माझ्या प्रतिक्रिया ह्या माझ्याशी बोलणार्या माणसाच्या आतल्या विचारांवर अवलंबून असतात, भलेही तो माणूस तोंडाने काही वेगळे बोलत असेल.
हे तंत्र आपले मन विकसीत करते.
कुठल्याहि व्यक्तीशी एकात्म होणे हे तपश्चर्येने जमते. आपण ह्यात १००% नाही, पण,बर्याच अंशी यशस्वी होऊ शकतो.
हि तपश्चर्या म्हणजे व्यक्तींचा अभ्यास, त्यांच्या विषयीचे मनन
"मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. ""थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल"
यार, माणसांना जळवायची लिमिट पार केलीत त्या बद्दल निषेध!
छान वाटलं इतक्या सुंदर साहीत्य कृतीमधे आमची नावं गुंफलीत : ) ..... परत शांतपणे पारायण करणार आहे या भागांचं. आत्ता ऑफीसमधून गडबडीत वाचले .
ह्म्म कोजागीरीच्या चांदण्यात शेकोटी पेटवून त्या ज्वाळांची आभा कशी बरं दिसत असेल? - विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
जयंतराव लिहीत रहा आपले लेख फार आवडतात. आणि आता आमची नावं गुंफल्याने तर वाचक-लेखक नात्याचे निराळेच बंध निर्माण झाले आहेत असं वाटतं. :)
या सुंदर प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ! आपणाला आपली नावे गुंफल्याचा आनंद झाला हे बघून मलाही बरे वाटले. असा प्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे.
वाचल्याबद्दल आणि आवडले ते इथे लिहील्याबद्दल परत एकदा आभार !
पहिल्या पासुन तर वाचलीलच पण आज पुर्ण झाल्यावर परत एकदा सगळी वाचली. अतिशय गुढ वाटत होत वाचताना. म्हणजे हे वर्णन वाचुन झालय पुढ जावु अस नाही, परत एकदा पुरी त्याच जिज्ञासेन वाचुन झाली. सुन्दर !
कथा पहिल्या भागापासूनच पकड घेते. त्या पोथीचं गूढ काय आहे हा पडलेला प्रश्न सुटेपर्यंत राहावत नाही. ते नक्की काय आहे याची हळुहळू मांडणी पहिल्या तीन भागात फारच छान झाली आहे. या कथेचा प्रवास एकरेषीय होत नाही. मूळ कथानकाला फांद्या फोडून एकाच वेळी उत्कंठा जास्त ताणणं, आणि त्या फांद्या रेखाटताना कथानकाला आवश्यक वातावरण निर्मिती करणं हे तंत्र फारच समर्थपणे वापरलेलं आहे. वातावरण निर्मिती सुंदर झालेली आहे. तो वाडा, तो बाक, ती पोथी... सगळं डोळ्यापुढे उभं राहातं.
शेवटच्या उपोद्घातात्मक भागातला हळुवार गौप्यस्फोटही उत्तम.
मिपावर इतक्या ताकदीचं लिखाण क्वचितच दिसून येतं. तेव्हा अजून उत्तमोत्तम लिहीत रहा ही विनंती. तोपर्यंत आमच्याकडून सलाम स्वीकारा.
श्री. राजेश,
आपली प्रतिक्रिया वाचून आनंदलो. जे मला करायचे होते, त्याचे वर्णन आपण अचूक केले आहे. आणि ते मला जमले आहे हे वाचून बरं वाटले. मला बर्याच वाचकांचे ( माझ्या ब्लॉगच्या) इ-मेल आले त्यात शेवट गुंडाळला आहे असे म्हटले आहे. आपल्याला व इतरांनाही तसे वाटते आहे का ? लोकांचे म्हणणे आहे शेवटच्या भागात जरा या विद्येची जास्त तांत्रिक माहिती द्यायला पाहिजे होती. पण माहितीच नाही तर कुठून देणार ?
:-)
परत एकदा धन्यवाद.
प्रतिक्रिया
सुंदर!
धन्यवाद ! वाचल्याबद्दल आणि
झकास भाग जयवंत
धन्यवाद !
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक
हा हा ! :-) एक वेगळेच मत !
त्यांच्याकडे उत्तर नसते
झकास!
धन्यवाद स्वाती ! धन्यवाद !
मस्तच...जरा उशीरा आले ..पण
सॅल्युट जयंत साहेब!
धन्यवाद ! बसू एकदा यासारखे !
धन्यवाद!
छान वाटलं इतक्या सुंदर
या सुंदर प्रतिक्रिये बद्दल
+१
आवडली कथा. मित्रांमध्ये
धन्यवाद ! //घारीशी संवाद होतो
अवांतर
हो अर्थातच ! म्हणूनच त्यांची
दीर्घकथा आवडली! सत्याच्या
धन्यवाद ! या प्रामाणिक
मस्त... मध्यंतरी ट्रीप मारली
धन्यवाद !
जबरदस्त...
नमस्कार ! कथा वाचल्याबद्दल
पहिल्या पासुन तर वाचलीलच पण
मनाची पकड घेणारं लिखाण आहे.
आनंद झाला वाचुन..
श्री. जोगळेकर, श्री. झंप्या
अतिशय उत्तम दर्जाचं लेखन
धन्यवाद !
वाह!!! एकदम वेगळी कथा...खूप
धन्यवाद ! शिल्पा ब !
सुंदर कथा ! सगळे भाग एकदमच्
धन्यवाद !
सगळे भाग वाचले आवडली
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम वेगळी कथा