'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला..
मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :)
इथे पाहा..
जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :)
परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे.. सवड मिळतातच इथे टाकतो..
ओबामामामा आणि मिशेलमामीनं मात्र भारतात अजून काही दिस राहावं..
अगदी नाय म्हणायला एखाद्या सकाळी आमच्या कोकणातली पानगी, आणि एका सांच्याला देशी दारू अन् आमच्या मिपाच्या ब्रिटिशने बनवलेलं झणझणीत आगरी मटन अन् भाकरी खाऊन अवश्य जावं.. :)
मात्र त्यामुळे एफ बी आय ची मंडली मात्र नाराज होतील..होऊ देत..!
आम्ही मात्र ओबामामामाला सुक्क्या जवल्याची चटनी, अन् तांदलाची भाकरी-आगरी मटन खिलवायला उत्सुक आहोत.. :)
(ओबामामामाचा अन् मिशेलमामीचा प्रेमी) तात्या.
वाचने
4044
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या
हा अजून एक दुवा
अरे! अरे ! अरे!
ओबामामांपेक्षा मिशेलमामी अंमळ
नाचानाची..
समरस
भार्रीय हो!! तुम्ही तयार
In reply to समरस by विकास
जाईल तिथ पोर नाचत होती. काय