Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 11/08/2010 - 11:11
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे.. सवड मिळतातच इथे टाकतो.. ओबामामामा आणि मिशेलमामीनं मात्र भारतात अजून काही दिस राहावं.. अगदी नाय म्हणायला एखाद्या सकाळी आमच्या कोकणातली पानगी, आणि एका सांच्याला देशी दारू अन् आमच्या मिपाच्या ब्रिटिशने बनवलेलं झणझणीत आगरी मटन अन् भाकरी खाऊन अवश्य जावं.. :) मात्र त्यामुळे एफ बी आय ची मंडली मात्र नाराज होतील..होऊ देत..! आम्ही मात्र ओबामामामाला सुक्क्या जवल्याची चटनी, अन् तांदलाची भाकरी-आगरी मटन खिलवायला उत्सुक आहोत.. :) (ओबामामामाचा अन् मिशेलमामीचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
  • 4022 views

प्रतिक्रिया

Submitted by रामदास on Mon, 11/08/2010 - 11:15

Permalink

मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या

येऊ द्या मिपाच्या मुखपृष्ठावर मामीला .
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/08/2010 - 11:20

Permalink

हा अजून एक दुवा

http://www.youtube.com/watch?v=vRQuuJBLzgo
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 11/08/2010 - 11:28

Permalink

अरे! अरे ! अरे!

ओबामामा, कोण होतास तु? काय झालास तु? हे ओबामा म्हणजे अमेरिकेचेच राष्ट्राध्यक्ष ना?? एवढा वेळ असतो यांच्याकडे? म्हणजे एकाच शहरात दोन-दोन ठिकाणी भाषणं, एका ठिकाणी डान्स. पुन्हा दिल्लीत राजघाट हुंगणे वगैरे. हा बेकार राष्ट्राध्यक्ष दिसतो. अमेरिकन जनतेनं काही कमावून दाखव म्हणून इकडे पिटाळला असेल. बाकी बाई मस्त नाचल्या. पण कुछ फायदा नहीं.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/08/2010 - 14:20

Permalink

ओबामामांपेक्षा मिशेलमामी अंमळ

ओबामामांपेक्षा मिशेलमामी अंमळ बर्‍या नाचत होत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Mon, 11/08/2010 - 21:01

Permalink

नाचानाची..

थिरकला हा सध्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांचा आवडता शब्द दिसतोय.. ;) सामन्याचा आजचा ओबामाच्या भारतभेटीवरचा अग्रलेख तथ्यपूर्ण वाटला.. असो, प्रत्येकाने आपला फायदा बघावाच त्यात गैर नाहीच.. :) अंतू बर्वा म्हणतो, (महात्मा)गांधीला कोकणंच अप्रूप असण्याचं कारण नव्हतं, आणि (त्यांच्या भक्ताला) ओबामाला अप्रूप दाखवण्यावाचून पर्याय नाही.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 11/08/2010 - 21:35

Permalink

समरस

ओबामा भारतात कसे समरस होऊ शकले याचे हे चित्रिकरण बघण्यासारखे आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 11/08/2010 - 21:59

In reply to समरस by विकास

Permalink

भार्रीय हो!! तुम्ही तयार

भार्रीय हो!! तुम्ही तयार केलंत का??
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 11/09/2010 - 07:43

Permalink

जाईल तिथ पोर नाचत होती. काय

जाईल तिथ पोर नाचत होती. काय म्हणेल जग? सगळा भारत म्हणजे बॉलिवुडचा पडदा आहे अस वाटत होत. काय करेल बिचारा आफ्रिकेत गेला तर मसाइ लोकांच नृत्य कराव तस भारतात येउन बॉलिवुड च ठुमका स्टाइल कराव लागल. त्याच्या आजुबाजुचे नाचत होते म्हणुन त्याला सहभाग दाखवावा लागला.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com