✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

स
सुधीर काळे यांनी
Wed, 10/27/2010 - 22:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10754 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

सगळे मान्य समंजस. पण तसे

मृत्युन्जय
Sat, 10/30/2010 - 14:45 नवीन
सगळे मान्य समंजस. पण तसे भारताबद्दल तरी कुठे इतर कुठल्या देशाला प्रेम आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

भारताबद्दल grudge असण्याचे कारण असूया आणि आपले विचारस्वातंत्र्य?

सुधीर काळे
Sat, 10/30/2010 - 15:59 नवीन
माझ्या मते भारताबद्दल एक तर्‍हेचा (grudging कां होईना, पण) आदर नक्कीच आहे. कांहीं वर्षांपूर्वी मला जपानी कंपन्यांच्या कांहीं उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली असताना "मी भारतीय आहे" असे सांगितल्यावर त्यांच्या चेहेर्‍यावर सौहार्द्राचे भाव उमटत व "आम्हाला कुठल्याही गोष्टीची आयात न करणार्‍या भारताबद्दल आदर आहे" असे ते आवर्जून सांगत. ही अर्थात खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुढे १९८४ साली इंडोनेशियात आल्यावर जिकडे बघावे तिकडे फक्त जपानी गाड्या व इतर जपानी माल दिसू लागल्यावर मला त्यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ कळला. भारताबद्दल grudge असण्याचे कारण असूया असावी. लोकशाही राबवत असूनही आपली आर्थिक प्रगती नेत्रदीपक आहे. त्यात आपण कुणाच्याही ताटाखालचे मांजर होण्यास नेहमीच नकार दिला आहे. त्यामुळेही कांहीं राष्ट्रे आपल्याशी दुरावा धरतात. शिवाय पहावे त्या देशात भारतीय इंजीनियर्स, डॉक्टर्स व इतर व्यवसायातील लोक नेहमीच पुढे असतात व पहिल्या १०त त्यांची गणना होते! अमेरिकेत शालेय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यातही चांगल्या grades मिळविणारी मुलेही ७० टक्के आशियाई व ३०-४० टक्के भारतीयच असतात. 'डब्या' बुश (४३) नेहमी अमेरिकन मुलांना बजावायचे कीं गणीताचा अभ्यास पक्का करा नाहीं तर एकादा भारतीय तुमची नोकरी घेऊन जाईल! ओबामाही तेच सांगतात. आपल्या शिक्षणाच्या उच्च प्रतीचा सर्वांनीच धसका घेतला आहे! भारताबद्दल कांहींशी नावड असली तरी आदर नक्कीच भरपूर आहे. इथे इंडोनेशियातही तीच परिस्थिती आहे. आम्ही इथे सन्मानाने रहात आहोत व आम्हाला आदरपूर्वक वागणूक मिळते. आज इंडोनेशियातील बहुसंख्य पोलाद कारखाने चालविण्याची जबाबदारी भारतीयच उचलत आहेत. फक्त मध्यपूर्वेत (जिथे बहुसंख्य भारतीय मजूर म्हणून गेले आहेत) जरा परिस्थिती वेगळी आहे. आपल्या लोकांच्या बुद्धिमत्तेमुळे, कामसूपणामुळे व त्यापायी मिळालेल्या व्यावसायिक व आर्थिक यशामुळे श्रीलंका, मलेशियासारख्या देशात थोडफार मत्सर मात्र आहेच. तेंव्हा कुणीही कमीपणा वाटून घेऊ नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बरोबर

समंजस
Sat, 10/30/2010 - 17:04 नवीन
भारताबद्दल सुद्धा इतर देशांना प्रेम नाही. सहमत. कोणत्याही देशाला पाकिस्तान बद्दल प्रेम नाही किंवा आदर नाही हे वाक्य लिहीण्याचा उद्देश होता तो, पाकिस्तानाला पुरा सारख्या नैसर्गिक आपत्तीबद्दल मदत हैती या देशा पेक्षा कमी मिळाली त्याला अनुसरून होता. इतर देश हैतीला मुक्तहस्ताने मदत करतात परंतू पाकिस्तानला नाही या वरून इतर देशांची पाकिस्तान बद्दल असणारी समजूत/वागणूक किंवा उदासीनता दिसून येतेय. संभावीत कारण वरील प्रतिसादात दिलं आहेच. भारता बद्दल इतर देशांना जरी प्रेम नसलं तरी वरील प्रकारची उदासीनता सुद्धा दिसून येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

"....भारता बद्दल इतर देशांना

इन्द्र्राज पवार
Sat, 10/30/2010 - 19:01 नवीन
"....भारता बद्दल इतर देशांना जरी प्रेम नसलं तरी वरील प्रकारची उदासीनता सुद्धा दिसून येत नाही...." ~ इथे थोडा गोंधळ होतोय असे मला वाटते. द्वेष, प्रेम आणि उदासीनता या संज्ञा आपण "भारत" आणि त्यायोगे "भारतीय" याना एकत्रीतरित्या लावू पाहात असलो तर परिस्थिती काहीशी वेगळी आहे, जी श्री.सुधीर काळे यांच्या जपान+इंडोनेशीया अनुभव बोलातून प्रतीत होते. माझा स्वतःचा काही कारणानिमित्य अमेरिकन्स आणि युरोप (केवळ इंग्लंडच नव्हे तर स्वीडन, नॉर्वे, जर्मनी आणि हॉलंड) येथील Educationally Elite Faculties समवेत खूप पत्रव्यवहार होत असतो. हे लोक त्या त्या देशात त्यांच्या क्षेत्रात नावाजलेले आहेत, आणि त्यांच्या पत्रातून ज्यावेळी Indian Brain Power बद्दल जे काही वाचायला मिळते त्यावेळी माझे मन आनंदाने फुलून येते. खुद्द इंग्लंडमधील एक जोडपे आपल्या मुलीला Political Sciences या विषयासाठी दिल्लीच्या जेएनयूमध्ये दाखल करण्याची गोष्ट माझ्यासमोर छेडते त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते की, ब्रिटीश लोकही आता भारताला कोणत्या नजरेने पाहात आहेत. लंडनस्थीत लक्ष्मी मित्तलच्या उद्योगसमूह कार्यालयात ज्यावेळी ब्रिटीश तरुण-तरुणी अर्जाची भेंडोळी घेऊन तिष्ठ्त उभे राहतात त्याचवेळी समजून चुकते की, २१ शतकात कशा प्रकारचे राज्य करण्याची संधी भारतीयांपुढे आहे. ~ हे झाले भारतीयांबद्दल.....तसे पाकिस्तानी नागरिकाबद्दल मत होणे, सद्यस्थितीत, कदापिही शक्य नाही. निव्वळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आणि पर्यायाने पाकिस्तानी नागरिक म्हणजे आतंकवाद्यांचे बगलबच्चे हीच ढोबळ व्याख्या झाली आहे. पॅट्रीकच्या लेखातील अनेक कारणापैकी ही मानसिकतादेखील एक आहेच. "भारत" अ‍ॅज अ कंट्री...म्हणून दुमत असू शकते...त्याला कारण म्हणजे सदैव बदलत राहणारी सरकारी धोरणे, महागाई, बेफाट होत चाललेले शहरीकरण, चढत्या भाजणीचा भ्रष्टाचार, सरकारी दप्तरदिरंगाई, नोकरशाहीची अरेरावी, पर्यावरणाचा र्‍हास, जातपात, उच्चनीच, पोलिटिकल अनरेस्ट, लोकसंख्येला आळा घालण्यात येणारे अपयश....आदीमुळे कदाचित भारताबद्दल जसे आणि जितके प्रेम असायला पाहिजे तितके परदेशात नसेल....पण 'भारतीयां'बद्दल तसे वातावरण अजिबात नाही, हे मी स्वानुभवाने सांगतो. .... आणि नेमका हाच फरक एक भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक यांच्यात आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

हम्म...

प्रदीप
Sat, 10/30/2010 - 20:10 नवीन
खुद्द इंग्लंडमधील एक जोडपे आपल्या मुलीला Political Sciences या विषयासाठी दिल्लीच्या जेएनयूमध्ये दाखल करण्याची गोष्ट
आरारारारारा....... अजूनही वेळ गेलेली नाही त्या मुलीला तथाकथित डाव्या विचारसरणीच्या पाकातून बुडवून काढण्याची. जमले तर वाचवा तिला इंद्राकाका ह्या अरिष्टातून!!
लंडनस्थीत लक्ष्मी मित्तलच्या उद्योगसमूह कार्यालयात ज्यावेळी ब्रिटीश तरुण-तरुणी अर्जाची भेंडोळी घेऊन तिष्ठ्त उभे राहतात
मित्तल समूहाचे यश आनंददायक व अभिमानास्पद आहे खरे, पण नेमक्या ह्याच तर्‍हेच्या हाईपपासून आपण दूर राहिले पाहिजे. मित्तल एक यशस्वी समूह आहे, त्यांच्याकडे नोकरीसाठी जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काही उमेदवार रांगेत उभे आहेत. तसेच ते इतरही कार्यालयांसमोद जाऊन उभे राहत असतील. ह्यात इतके हाईप करण्याची गरज काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

विषयांतर होतेय्, पण हा एकच मुद्दा मांडतो.

सुधीर काळे
Sun, 10/31/2010 - 09:01 नवीन
विषयांतर होतेय्, पण हा एकच मुद्दा मांडतो. मित्तलसाहेबांच्या सुराबायातील पोलाद कंपनीत मी सहा वर्षें काम केले आहे व त्या सहा वर्षात त्यांचे पाय मला बर्‍यापैकी "पाळण्या"त दिसले होते व त्यांचे हे उत्तुंग यश पाहून मला मुळीच आश्चर्य वाटले नाहीं. ते या यशाला पूर्णपणे लायक आहेत. ते अतीशय धूर्त व भावनेच्या आहारी न जाणारे उद्योगपती आहेत. त्यामुळे ते कुठल्याही "हाईप"च्या आहारी जाणार नाहींत याची मला खात्री आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कंपन्यांत त्यांच्या मुलाखेरीज एकही नातेवाईक नोकरीला नाहीं. सौ. उषा मित्तल सुराबायाला बारीक-सारीक जबाबदार्‍या घेत असत, पण फारशा गुंतलेल्या नसत. खरे तर श्री लक्ष्मी निवास मित्तल (L N Mittal) हे त्यावेळी 'निवासबाबू' होते, अद्याप 'लक्ष्मी' झालेले नव्हते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

इंद्रजीत-जींच्या समर्थनार्थ 'गॉन'मधील हे पत्र वाचण्यासारखे आहे

सुधीर काळे
Sun, 10/31/2010 - 09:10 नवीन
निव्वळ अमेरिकाच नव्हे तर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आणि पर्यायाने पाकिस्तानी नागरिक म्हणजे आतंकवाद्यांचे बगलबच्चे हीच ढोबळ व्याख्या झाली आहे. इंद्रजीत-जी, तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्या मुद्द्याच्या समर्थनार्थ (जरी थोडेसे भरकटलेले असले तरी) 'डॉन'मधील हे पत्र वाचण्यासारखे आहे! आता पाकिस्तानीच या दहशतवादाला विटले आहेत व परदेशातील त्यांच्या प्रतिमेबद्दल काळजीत आहेत हे उघड आहे. http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspaper/letters-to-the-editor/rethinking-antiterror-strategy-000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

२९ ऑक्टोबर २०१० रोजी आमच्या

गांधीवादी
Sun, 10/31/2010 - 09:27 नवीन
२९ ऑक्टोबर २०१० रोजी आमच्या दुसर्‍या नातीचा जन्म झाला.
दिवाळी आणखीनच गोड. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

पाकड्यांची सध्याची परिस्थीती

मदनबाण
Sun, 10/31/2010 - 09:52 नवीन
पाकड्यांची सध्याची परिस्थीती बघता...आपल्या टाळक्याला त्रास होण्याची शक्यताच जास्त आहे. कारण ज्या वेळी आपण पहिल्यांदा अणुस्फोट केले त्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी "आम्ही गवत खाऊन राहू, पण अणुबॉम्ब मिळवू," असे म्हटले होते. आजच्या घडीला पाकिस्तानजवळ ७०-९० तर भारताजवळ ६०-८० अणू बॉम्ब असल्याचा अंदाज आहे... चीनी मंत्र्यांनी आम्हाला ५० किलो संपन्न युरेनियम दिले असे खान यांनी त्यांच्या हस्त लिखितात म्हंटले आहे. दिवसेन दिवस पाकडे अणू बॉम्बची संख्या वाढवण्यात गुंतले आहेत... आता माकडाच्या हातात कोलीत लागले तर काय होईल? आपल्याला सर्वात मोठा धोका चीन कडुन जरी असला तरी सुद्धा पाकिस्तानी तालिबानी लढवय्यांचा वापर करुन आपल्या विरुद्ध अणवस्त्रांचा वापर करु शकतील ही शक्यता दिवसेन दिवस वाढत चालली आहे. पाकिस्तानात जितकी अस्थिरता वाढेल तितकी ती आपल्या देशासाठी काळजीची गोष्ट ठरणार आहे हे नक्की... :( अवांतर :---- हा लेख वाचण्यासारखा आहे. :) http://amitjoshitrekker.blogspot.com/2010/02/blog-post_26.html
  • Log in or register to post comments

अल कायदाच्या रडारवर जरी भारत नसला तरी पाकिस्तानच्या रडारवर आहेच

सुधीर काळे
Sun, 10/31/2010 - 10:15 नवीन
मदनबाण-जी, अगदी माझ्या मनातलं बोललात! मी मागे म्हटलं होतं कीं भारताचा उपयोग Target practice अशा स्वरूपात करून शेवटी हल्ले होतील पाश्चात्य राष्ट्रांवर व अमेरिकेवर. "आमच्या हातात अण्वस्त्रें आली तर आम्ही ती अमेरिकेवर डागू" असे विधान अल कायदाचे (त्यावेळचे पण आता मरहूम) नं. ३ नेते मुस्ताफा अबुल-याझीद केलेच होते. (http://www.misalpav.com/node/8315) पाकिस्तानच्या शस्त्रागारातील अण्वस्त्रें जेंव्हां अल कायदाच्या अतिरेक्यांच्या हाती पडतील त्यावेळी काय होईल? याबाबत 'न्यूक्लियर डिसेप्शन'च्या १९व्या प्रकरणातील शेवटचा भाग वाचनीय आहे त्यात 'अल-कायदा'च्या २०२० पर्यंतच्या महत्वाकांक्षी योजनेची (Vision) सर्व धर्माच्या लोकांना काळजीत टाकणारी माहिती आहे. (त्या 'महत्वाकांक्षी योजने'त भारताचा मात्र उल्लेख नाहींय्, पण 'अल कायदा'च्या रडारवर जरी भारत नसला तरी पाकिस्तानच्या रडारवर असणारच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हाईप करण्याच्या बाबी....

इन्द्र्राज पवार
Sun, 10/31/2010 - 10:54 नवीन
"....आरारारारारा....... अजूनही वेळ गेलेली नाही त्या मुलीला तथाकथित डाव्या विचारसरणीच्या पाकातून बुडवून काढण्याची. ...." ~~ श्री.प्रदीप यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि संतुलित विचाराच्या सदस्याने "...आरारारारारा..." सारखी ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्‍यासम पातळी या विषयासंदर्भात गाठावी याचा मनस्वी खेद होत आहे. कसल्या डाव्या विचारसरणीची तुम्ही कथा सांगत आहात, हे मला कळेल का? जे.एन.यू. दिल्लीत मी दोन वर्षे काढलेली आहेत, तिथल्या विविध चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे, संसद सदस्य तिथे वारंवार भेटत असतात, त्यांच्यासमोर अनेक प्रकारे, (स्वतंत्र, गटाने) संवाद साधले आहे. मला तर ते स्थळ लोकशाहीच्या वाढीचे एक निकोप केन्द्र वाटले आहे....नव्हे आहेच. आता डावे, उजवे, कुंपणावरचे, लिप्त, अलिप्त शिक्षणाच्या कुठल्या क्षेत्रात नाहीत? २५ ते ३० राष्ट्रातील युवकयुवती तिथे येत असतात, साहजिकच ते आपल्यासमवेत आपल्या देशाची संस्कृती, विचार, मतप्रणाली तिथे आणणारच ना? निर्भेळ मनाने त्यांचे विचार समजून घेणे, आपल्याकडीच विचारांची, प्रणालीची त्यांच्या समवेत देवाणघेवाण करणे.....यात वावगे काय आहे, प्रदीप जी? बरे, चला वादाकरीता मानून चालू की, आहे तिथे तुम्ही म्हणता ती तथाकथित डाव्या विचारसरणी.... पण त्यामुळे देशाची कोणत्या हिताला बाधा पोहोचते, हे तुम्ही सांगाल? कोणत्या प्रकारचा पाक तुम्हाला तिथे आढळला हे तरी मला समजू द्या. बर्मिंगहॅमच्या त्या जोडप्याने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिथे प्रवेश घेण्याचे जे नक्की केले आहे, ते काय तिथल्या वातावरणाचा अभ्यास केल्याशिवाय? एक इन्द्रराज पवार नावाची व्यक्ती भारतातून त्यांना जेएनयूबद्दल सांगते म्हणून थोडेच ते तसा निर्णय घेतील काय? तिच गोष्ट लक्ष्मी मित्तल यांची ~~ का करू नये भारतीयांनी त्यांच्या कर्तृत्व हाईपची गोष्ट? ब्रिटिश युवावर्ग इंग्लंडमध्ये अन्यत्र अर्ज करीत असणारच...पण एका भारतीयाच्या हाताखाली काम करण्यास ते उत्सुक आहे, यात आपल्या देशाचे चित्र चांगले रंगविले जाईल का विरोधाचे? श्री.सुधीर काळे यांनी दिलेले त्यांचे स्वत:चे उदाहरण मित्तल यशगाथाच सांगते ना? आज IBM, Intel, Microsoft येथील भारतीयांची टक्केवारी खुद्द अमेरिकेला चिंतेची बाब वाटत आहे, ही बाब हाईप करण्यासारखी नाही? मला वाईट वाटते ते अशासाठी की सर्वार्थाने सीनिअर असलेल्या एका सदस्याला हे सांगावे लागत आहे. असो. इन्द्रा
  • Log in or register to post comments

हाईप

प्रदीप
Sun, 10/31/2010 - 15:16 नवीन
जे. एन, यु. च्या संदर्भात तुमचे मन दुखावले गेले असल्यास मी तुमची सपशेल माफी मागतो. पण दोन गोष्टी नमूद जरूर करू इच्छितो. पहिली, मी पडलो तद्दन शहरी माणूस. त्यामुळे 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा' कशा शब्दात मारतात ह्याविषयी मी संपूर्ण अनभिज्ञ आहे. तरीही 'आरारारारा...' ह्यात 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्‍यासम पातळी' (पक्षी: काही हीन, हिणकस वगैरे) आहे, हे मी मानत नाही. दुसरी, 'जे. एन. यु. त [मला आक्षेपार्ह अ‍ॅक्टिव्हीटीज चालतात] त्यामुळे "देशाची कोणत्या हिताला बाधा पोहोचते" असे मी काहीच म्हटलेले नाही. का करू नये भारतीयांनी त्यांच्या कर्तृत्व हाईपची गोष्ट? ब्रिटिश युवावर्ग इंग्लंडमध्ये अन्यत्र अर्ज करीत असणारच...पण एका भारतीयाच्या हाताखाली काम करण्यास ते उत्सुक आहे, यात आपल्या देशाचे चित्र चांगले रंगविले जाईल का विरोधाचे? मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे अनेक भारतीय व्यक्ति, कंपन्या, संस्था तसेच काँग्लोमेरेट्स आदरणीय आहेत, त्यांविषयी प्रत्येक भारतीयाने जरूर अभिमान बाळगावा. पण अभिमान असणे एक गोष्ट आहे आणी 'इंग्लिश लोक त्यांच्या कंपन्यांसमोर नोकरीसाठी अर्जाची भेंडोळी घेऊन उभे आहेत' असे म्हणत त्यात काही विशेष आहे असे ध्वनित करणे ही सर्वस्वी दुसरी-- ही दुसरी गोष्ट माझ्य्या तरी लेखी हाईप ह्या सदरात मोडते. इंग्लंडमधे कार्यरत असलेल्या आर्सेलोर मित्तल ह्या कंपनीत तेथील स्थानिक लोक काम करू इच्छितात, ह्यात गर्व बाळगण्यासारखे नक्की काय आहे? माझा स्वतःचा काही कारणानिमित्य अमेरिकन्स आणि युरोप (केवळ इंग्लंडच नव्हे तर स्वीडन, नॉर्वे, जर्मनी आणि हॉलंड) येथील Educationally Elite Faculties समवेत खूप पत्रव्यवहार होत असतो. हे लोक त्या त्या देशात त्यांच्या क्षेत्रात नावाजलेले आहेत, आणि त्यांच्या पत्रातून ज्यावेळी Indian Brain Power बद्दल जे काही वाचायला मिळते त्यावेळी माझे मन आनंदाने फुलून येते. तुमचे मन आनंदाने फुलून येते त्यामुळे ते तूर्तास तरी तसेच राहू दे. तेव्हा हा विषयी मी इथे थांबवतो. ह्या विषयातील माझी निरीक्षणे तुमच्यापेक्षा थोडी वेगळी आहेत इतकेच इथे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मतभेद

इन्द्र्राज पवार
Mon, 11/01/2010 - 10:46 नवीन
माफीचा मुद्दा चुकूनही मनात आणू नका प्रदीप जी. तुमच्यासारख्या वरिष्ठाने तसे म्हटल्याने मी आत्ता नक्कीच खजील झालो आहे कारण माझी तितपत बिलकुल पात्रता नाही....असो. "...तरीही 'आरारारारा...' ह्यात 'ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गावगप्पा मारणार्‍यासम पातळी' (पक्षी: काही हीन, हिणकस वगैरे) आहे, हे मी मानत नाही...." इथे शहरी, निमशहरी, ग्रामीण हे मुद्दे गैरलागू आहेत. कारण शब्दाच्या योजनातून जो ध्वनी प्रतीत होतो त्याला अमुक एका प्रादेशिकततेचा वा मातीचा गंध असतो असे नसून त्याचे प्रयोजन कोणत्या संदर्भात केले गेले आहे ते पाहणे भाषाविज्ञान शिकविते. "आरारारारा...." हे एक्स्प्रेशन जरी हीन, हिणकस दर्शवित नसले तरी ते 'हेटाळणी' युक्त नक्कीच आहे....(आणि तोच भाव जेएनयू संदर्भात तुमच्या त्या वाक्यात उमटला आहे असे मी मानतो....) ....यावर आता वाद नको....तुमची तिथल्या वातावरणासंबंधी जी मते असतील तीचे मी खंडन करणार नाही, कारण घटनेने तुम्हाला मतप्रदर्शनाचा हक्क बहाल केलेलाच आहे.... पण तशी ती इतरांचीही असावीत किंवा तशी ती बनावीत असे कुणी म्हणू नये इतकेच.....कारण जिथे शिकलो त्या जागेविषयी मी हळवा असणे साहजिकच आहे. २. तुमचे मन आनंदाने फुलून येते त्यामुळे ते तूर्तास तरी तसेच राहू दे. तेव्हा हा विषयी मी इथे थांबवतो. Indian Brain Power बाबत मी जे लिहिले त्याबद्दल तुमच्या वरील वाक्याला हलकी का होईना एक अपमानाची किनार आहेच....पण ती मनावर घेत नाही.....आणि सबब विषयही वाढवित नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

विषयः पाकिस्तानी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

सुधीर काळे
Sun, 10/31/2010 - 13:19 नवीन
मूळ धागा "पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?" हा आहे इकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो! खरे तर निवासबाबूंच्यावर एक वेगळा लेखच लिहिला पाहिजे!
  • Log in or register to post comments

एक नवी मनोरंजक माहिती

सुधीर काळे
Fri, 11/05/2010 - 16:55 नवीन
एक नवी मनोरंजक माहिती http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/6870853.cms या दुव्यावर वाचा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा