कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्री. पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो..
[मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse… या दुव्यावर वाचता येईल. तसेच तिथे ’ला प्रेस’च्या वाचकांचे प्रतिसादही वाचता येतील]
या उपहासपूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखातून पाकिस्तानबद्दलची आम पाश्चात्य जनतेची सहानुभूती काशी कमी-कमी होत चालली आहे हे दिसून येते.
पाकिस्तानला जो नुकताच प्रलयंकारी महापुराचा तडाखा बसला त्यामुळे त्या देशातील दोन कोटी पूरग्रस्त जनता बेघर होऊन रस्त्यावर आली. त्यांच्या पुनर्वसनासाठी ४६ कोटी डॉलर्स लागतील असे संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर करून सार्या जगाला मदत करण्याची हांक घातली होती. पण केवळ १८.५ कोटीचीच मदत ही संघटना जमा करू शकली. एका मानवतावादी परोपकारी संघटनेने पकिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी फक्त दोन लाख डॉलर्सचीच मदत जमा केली पण त्याच काळात तिने हेतीसारख्या (Haiti) छोट्या देशातील भूकंपग्रस्त लोकांसाठी याच संघटनेने ३६ लाख डॉलर्सची मदत जमा केली होती. यामुळे पाकिस्तानच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आणि त्याने या पाश्चात्य देशांवर खूप आग पाखडली.
त्या आधीच पाकिस्तानने दर F-16 या लढाऊ विमानासाठी प्रत्येक नगामागे ४ कोटी डॉलर्स मोजून २० अशी विमाने खरेदी केली होती असे सांगून लेखिका विचारते कीं या विमानांसाठी पाकिस्तानने २०x४=८० कोटी डॉलर्स उडवले (म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने मागितलेल्या ४६ कोटी डोलर्सपेक्षा जास्त रक्कम मोजली होती. हे पैसे कुठून आले?) पण पूरग्रस्तांसाठी मात्र पाकिस्तान हातात कटोरी घेऊन उभा!
लेखिका पुढे म्हणते कीं ज्या देशाकडे लष्करी सामुग्री विकत घेण्यासाठी पैसे आहेत किंवा असा पैसा जे राष्ट्र उभा करू शकते अशा राष्ट्रांना पूरग्रस्तांसाठी कां नाहीं स्वतःचा निधी कसा काय उभा करता येत? लेखिका पुढे म्हणते कीं अशा पाकिस्तानला एक दमडीसुद्धा मदत द्यावीशी त्यांना वाटत नाहीं.
याहूनही चीड आणणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील बडे-बडे नेते स्वतःचा आयकर व इतर कर देत नाहींत. १९ जुलै रोजी न्यूयॉर्क टाइम्सने एक पाकिस्तानला अवमानित करणार्या लेखात पाकिस्तानच्या करवसूली करण्याच्या पद्धतीवर खणखणीत टीका केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातले श्रीमंत लोक कर देतच नाहींत असा गौप्यस्फोट केला. तोही हा थोडाथोडका कर बुडवण्याचा प्रकार नसून अजीबात कर न देण्याचा प्रकार आहे. जिथे १ कोटी पाकिस्तान्यांनी कर भरला पाहिजे तिथे त्याच्या २५ टक्के लोकच कर भरतात. पाकिस्तानी खासदारांची सरासरी माया (Net worth) नऊ लाख डॉलर्स आहे. भूतपूर्व पंतप्रधान व आताचे विरोधी पक्षनेते नवाज शरीफ हे करोडपती आहेत पण त्यांनी २००५ ते २००७च्या दरम्यान अजीबात आयकर भरलेला नाहीं. थोडक्यात करवसूलीची पद्धती श्रीमंतांनी श्रीमंतांसाठी केलेली पद्धती आहे.
याच विषयावर 'गॉन' या आघाडीच्या पाकिस्तानी वृत्तपत्रात इस्लामाबादच्या मेहनाज सिद्दीकी या पाकिस्तानी नागरिकाचे 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'तले हे पत्र फारच उद्बोधक आहे. (http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-news…) या पत्रलेखकानुसार पाकिस्तानी लोकसभेला दिलेल्या अहवालानुसार करबुडवे लोक १० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा (१२५ कोटी डॉलर्सचा) कर बुडवत आहेत तर वसूल न केलेला कर याच्या पाचपट आहे. या अपमानास्पद परिस्थितीत (सध्या तरी) लोकशाहीचा मार्ग अनुसरणार्या पाकिस्तानच्या सरकारचे मित्रसुद्धा यापुढे पाकिस्तानला मदत करायला कांकू करू लागले आहेत असे पत्रलेखक म्हणतो.
मूळ इंग्रजीत लिहिलेला पॅट्रिस लागासे यांचा लेख आणि गॉनमधील वाचकाचे पत्र जरूर वाचण्याची मी सर्व मिपाकरांना शिफारीस करतो.
(अर्थात् भारतीय नेते आणि भारतीय श्रीमंतही यात कांहीं कमी नाहींत, पण आपला देश कटोरी घेऊन हिंडत नाहीं हाच फरक!)
PAKISTAN By Patrice Lagacé - La Presse - Montréal
http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse…
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10814
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला लेख! पण एक गोष्ट मात्र
भारतात पुन्हा हल्ला झाल्यास
In reply to चांगला लेख! पण एक गोष्ट मात्र by रन्गराव
त्रासदायक
In reply to भारतात पुन्हा हल्ला झाल्यास by गांधीवादी
सहमत आहे. मी तर
पुपे..
In reply to सहमत आहे. मी तर by llपुण्याचे पेशवेll
हॅहॅहॅहॅहॅहॅ
काळे काकाचे काही कळत नाही
छान लेख आहे.
काळे काका , आपल्या व्यासंगाला सलाम.
त्रास
सो सॅड!!
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
हॅहॅहॅहॅहॅहॅ
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
>>>>तरी वाटतच होत मानवतावादी
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
अवांतर : काळे साहेब,
In reply to >>>>तरी वाटतच होत मानवतावादी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॅ हॅ हॅ महाराष्ट्रात मराठीच
In reply to अवांतर : काळे साहेब, by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
In reply to हॅ हॅ हॅ महाराष्ट्रात मराठीच by अवलिया
"आहिस्ता कदम"
In reply to अवांतर : काळे साहेब, by llपुण्याचे पेशवेll
काश्मीरमधील फुटीरवादी संघटना
In reply to "आहिस्ता कदम" by सुधीर काळे
हे समजत नाहीं
In reply to काश्मीरमधील फुटीरवादी संघटना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसाबचा बाप खुप श्रीमंत होता.
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
पिडां काका
In reply to कसाबचा बाप खुप श्रीमंत होता. by पिवळा डांबिस
अरे, पाकिस्तानातील रुलिंग
In reply to पिडां काका by वेताळ
>> पण पूर, भूकंप यांसारख्या
In reply to अरे, पाकिस्तानातील रुलिंग by पिवळा डांबिस
असे नाही वाटले...
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
मत!
In reply to असे नाही वाटले... by विकास
पाकिस्तानी माणूस
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
त्यांच्या घरादाराला आणि फारतर
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
कुठल्याही देशाचे सरकार आणि जनता यात गल्लत करू नये व मी करत नाहीं
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
पिडां, अगदी सहमत आहे
In reply to सो सॅड!! by पिवळा डांबिस
Just to clarify
पाकिस्तानच्या आईची --------
पाकिस्तानच्या आईची --------
पाकिस्तानच्या आईची
In reply to पाकिस्तानच्या आईची -------- by चेतन शिवणकर
चेतन फुल पेटलाय.........
इसवी सन २०२५ नुकत्याच हाती
पुन्हा अवांतर
In reply to इसवी सन २०२५ नुकत्याच हाती by गांधीवादी
+१
In reply to पुन्हा अवांतर by Dhananjay Borgaonkar
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची
Patrice, Patricia or Patrick?
In reply to कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची by निखिल देशपांडे
Patrice हा पुरूषच आहे!
In reply to कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची by निखिल देशपांडे
खुलासा
In reply to Patrice हा पुरूषच आहे! by सुधीर काळे
दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद
In reply to खुलासा by विकास
अमेरिका जोपर्यंत पाकड्यांना
अवांतर
अजून काही विनोद..
In reply to अवांतर by पैसा
बाणशेठ...
एक विनोद
In reply to बाणशेठ... by वाटाड्या...
कारवाया...!
पाकिस्तानच्या
In reply to कारवाया...! by इन्द्र्राज पवार
सगळे मान्य समंजस. पण तसे
In reply to पाकिस्तानच्या by समंजस
भारताबद्दल grudge असण्याचे कारण असूया आणि आपले विचारस्वातंत्र्य?
In reply to सगळे मान्य समंजस. पण तसे by मृत्युन्जय
बरोबर
In reply to सगळे मान्य समंजस. पण तसे by मृत्युन्जय
"....भारता बद्दल इतर देशांना
In reply to बरोबर by समंजस
हम्म...
In reply to "....भारता बद्दल इतर देशांना by इन्द्र्राज पवार
विषयांतर होतेय्, पण हा एकच मुद्दा मांडतो.
In reply to हम्म... by प्रदीप
इंद्रजीत-जींच्या समर्थनार्थ 'गॉन'मधील हे पत्र वाचण्यासारखे आहे
In reply to "....भारता बद्दल इतर देशांना by इन्द्र्राज पवार
२९ ऑक्टोबर २०१० रोजी आमच्या
In reply to इंद्रजीत-जींच्या समर्थनार्थ 'गॉन'मधील हे पत्र वाचण्यासारखे आहे by सुधीर काळे
पाकड्यांची सध्याची परिस्थीती
अल कायदाच्या रडारवर जरी भारत नसला तरी पाकिस्तानच्या रडारवर आहेच
In reply to पाकड्यांची सध्याची परिस्थीती by मदनबाण
हाईप करण्याच्या बाबी....
हाईप
In reply to हाईप करण्याच्या बाबी.... by इन्द्र्राज पवार
मतभेद
In reply to हाईप by प्रदीप
विषयः पाकिस्तानी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?
एक नवी मनोरंजक माहिती